मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

मला ३ जी असताना माबोचा नेहमीचा लेआऊट दिसतोय पण घरी वायफाय असताना प्रॉब्लेम येतोय. आणि हे कालपासूनच होतंय. त्या लेआऊटमध्ये मराठीत टाईप करता येत नाही.

आऊटडोअर्स
मलाही असा अनुभव आला आहे पण माझा नेटचा स्पीड स्लो असताना असं झालयं बरेचदा.
स्पीड स्लो असला की पेजचे सगळे कंटेंट लोड न झाल्यामुळे असे होते.
एक दोनदा रिफ्रेश केल्यावर काय होते बघा.

>> स्पीड स्लो असला की पेजचे सगळे कंटेंट लोड न झाल्यामुळे असे होते.
आडो, हे मी पण अनुभवले आहे एकदोनदा. पण एकदा पेज रिफ्रेश करून आणि एकदा कूकीज क्लीअर करून हा त्रास निस्तरला गेला होता.

कोणताही फोटो अपलोड करायचा असल्यास आधी पहिले बरेच फोटो डिलिट केल्याशिवाय नवीन फोटो अपलोडच होत नाहीत.
तर आता माझी फोटोंसाठीची जागा संपली आहे असं समजून पूर्वीचे फोटो डिलिट करत जायचं का?
मदत करा.

11:23:15 The selected file DSCN1904.JPG could not be uploaded. DSCN1904.JPG is 141.98 KB which would exceed your Directory quota. You are currently using 29.96 MB of 30 MB.

11:23:15 Upload failed.
चांगले पूर्वीचे ५/६ फोटो जरी डिलिट केले तरी एखादा फोटो अपलोड होतो आणि २र्‍याच फोटोला हा वरचा मेसेज येतो.
काहीतरी पर्मनन्ट उपाय आहे का? कारण कुठलाही फोटो अपलोड करण्याआधी खाजगी जागेत जाऊन आधीचे फोटो डिलिट करणे हे किचकट काम वाटते.

मानुषी, तुम्हाला ३० एम्बी जागा दिलेली आहे, ती सगळी तुम्ही ऑलरेडी वापरून टाकली आहे.

सोपा इलाज म्हणजे थर्डपार्टी पिक्चर होस्टवर फोटो अपलोड करून इथे लिंक द्या. जसे www.tinypic.com किंवा पिकासा इ.

जुने फोटो डिलीट केलेत तर ज्या लेखात तुम्ही ते डकवले आहेत, तिथून गायब होतात. जुने लेख वाचणार्‍याला ते फोटो दिसणार नाहीत. इथेच जागा मोकळी करायची असेल, तर वाहत्या बाफवर (गप्पांचे धागे) डकवलेले फराळ/चहाचे फोटो असतील तर ते उडवा आधी Wink

धन्यवाद इब्लिस.जुने फोटो डिलीट केलेत तर ज्या लेखात तुम्ही ते डकवले आहेत, तिथून गायब होतात. >>>>>>> हो असं झालंय. जे नकोय व्हायला.
समजा पिकासावरून इथे फोटो अप्लोड केले तर इथे लिंक दिसते की डायरेक्ट फोटो दिसतात?(घोर अज्ञान!!!)
वाहत्या बाफांवर फोटो नसावेत. निसर्गाच्या गप्पात असतात पण तो लेखनाचा धागा आहे.
या प्रत्यक वेळेस जुने फोटो डिलिट करण्याच्या द्राविडी प्राणायामाने फोटो डकविण्याचा पेशन्स संपत चाललाय.

सोपा इलाज म्हणजे थर्डपार्टी पिक्चर होस्टवर फोटो अपलोड करून इथे लिंक द्या. जसे www.tinypic.com किंवा पिकासा इ. >>>>>>> हे करून बघते जमतंय का!
लगोलग मदतीबद्दल धन्यवाद!

मानुषी,

मदतपुस्तिका>> लेखनासंबंधी प्रश्न>> लेखात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा? (इथे 'पिकासा लिंक कशी द्याल' यासंबंधी तपशीलात लिहिलेले आहे.)

पियु परी आणि मंजुडी
माझे पिकासावरच असतात बहुतेक फोटो.
तिथून प्रयत्न करते.
धन्यवाद मुलींनो!

एखादा लिहिलेला धागा वाहता धागा कसा होतो?
लिहितानाच ते सेट करता येते क?
की admin ठरवतात काय करायचे ते? म्हणजे धागा वाहता ठेवायचा की नाही ते?

सुखी_जो,
तुमचा धागा सुरू करताना तुम्ही 'नवीन गप्पांचं पान' हा पर्याय निवडला असेल, म्हणून प्रतिसाद वाहून जात आहेत. 'नवीन लेखनाचा धागा' असं निवडलं तर असं होणार नाही.

मी आत्ताच एक जुने लिखाण फोटो टाकून अपडेट केलं तर ते नवीन लेखन मधे दिसत नाही.
पौष्टिक फज नावाची जुनी रेसिपी फोटो सह अपलोड केली तर ती दिसत नाही.

मानुषी, तुमचे मूळ लिखाण २००८ चे आहे, त्यात फोटो अपडेट केले तरी त्याची तारीख २००८चीच राहणार. ती पाककृती नवीन लेखनात दिसण्यासाठी त्यावर आजच्या तारखेला प्रतिसाद द्यावा लागेल.

मी मायबोली वर नवीनच आहे,
बाफ़, बीबी, पाऊलखुणा आणि दिवे घ्या म्हणजे काय????

बाफ = बातमी फलक = बीबी = BB = Bulletin Board

पाऊलखुणा = सदस्याच्या प्रोफाईल मध्ये गेल्यावर वरच्या टॅबवर करड्या रंगात 'लेखन' असे लिंक दिसते त्याचे नाव आधी पाऊलखुणा होते.

दिवा घ्या = हलकेच घ्या. टेक इट लाईटली.

Pages