मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

१] आपल्या महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांवरील ट्रेकींग संबंधीच्या माहितीचा, किंवा ट्रेकर्ससंबंधीची माहीती देणारा, चर्चा करणारा धागा कुठे आहे?
२] काही बीबी वरील प्रतिक्रियेमधील काही रेफरंस लिंक्स, प्रतिकियेमधील मजकुर कधी काढुन टाकण्यात येतो? ते काम कोण करत? त्यासंबंधीचे नियम कुठे आहेत?

sarika c नमस्कार : हितगुज ग्रूप: मुलांचे संगोपन | Maayboli या ग्रुपमध्ये तुम्हाला धागा सापडतो आहे का ते बघा. तुम्ही त्या ग्रुपचे सदस्य नसल्यास, ग्रुपमध्ये सामील झाल्यावर तुम्हाला सर्व धागे दिसतील.

माबोवर फोटो चढवताना १५०केबी ही जास्तीत जास्त स्वीकाराची मर्यादा आहे त्यामुळे चढवलेले फोटो तितकेसे स्पष्ट दिसत नाहीत यासंदर्भात कोणी मदत करु शकेल काय ?

.

नमस्कार..मी माझी कादंबरी आठवणींच कपाट- भाग ३ पोस्ट केला. पण तो गुलमोह्रर मधील कादंबरी यात दिसत नाही आहे. तो हितगुज या ग्रुप मधे कथा/कादंबरी येथे दाखवत आहे. कारण कळेल काय?
विनीता देशपांडे

मला पिकासावरून प्रचि टाकायची आहेत. लेख लिहून झालाय पण आता मधे मधे लिन्क्स दयायचा प्रयत्न केला तर लिन्क दिसते पण फोटो दिसत नाही. लिन्क वर क्लिक करून पिकासा ओपन होतय पण मला embeded img कशी देउ ते कळत नाहीये. मदत हवीय.

खरेदीविभागातून दोन राख्या खरेदी केल्या आणि त्या अमेरीकेत धाडल्या होत्या. त्यासंदर्भात तक्रार कुठे करावी? इथेही लिहूनच टाकते. माझी तक्रार दोन मुद्द्यांवर आहे :

१. दोन राख्यांचे पैसे भरूनही (नक्की आठवत नाही पण साधारण रु. ६००-६५० होते.) केवळ एकच राखी पोहोचली. तीही अमेरीकेतल्या २ तारखेच्या संध्याकाळी. दुसरी राखी का पोचली नाही?

२. चित्रात दाखवल्याप्रमाणे राखी नव्हतीच. ते चित्रं त्या भेटकार्डावरचं आहे. राखी म्हणून केवळ एक जाड धागा (चित्रातलं मधलं फूल वगळून जे उरेल तो) पाठवला गेला.

आता याची जबाबदारी कोणाची असते? दाद कुठे मागायची? असं झालं तर पुन्हा ही सोय का वापरावी आम्ही?

मला नविन साहित्य लेखन कसे करता येईल? अधि सारखं गुलमोहर मध्ये गेल्यानंतर नविन लेखन करण्यासाठी मिळत नाही.

नमस्कार आनंद राजगोळे .

मदतपुस्तिकेतले मायबोलीवर नवीन साहित्य कसे लिहावे? हे पान बघितलेत का? आपल्या प्रश्नाचे उत्तर तिथे आहे.

-मदत_समिती.

पल्ली | 31 July, 2012 - 16:34
वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्य आणि पुणेरी पाट्या कुठे वाचायला मिळतील;?
<<<<
पल्ली,
वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये इथे पहा: http://www.maayboli.com/node/3009

पुणेरी पाट्यांची स्वतःची साईट आहे पुणेरीपाट्या.कॉम अशी.

मला माहित नाही हा प्रश्न मी योग्य जागेवर विचारत आहे की नाही जर काही चुकले असेल तर चूकभूल समजून माफ करा... मी फार पूर्वी एक कथा/कादंबरी वाचायला घेतली परंतु नेहमीप्रमाणे क्रमश: होते त्यामध्ये.. कथा काहीशी रहस्य कथा होती.. फार तुटक संदर्भ देत आहे बघा कोणाला माहित असेल तर लिंक द्या... एक मुलगा त्याचा गावी येतो आणि तिकडे काही संपत्तीचे वाटप वगेरे असते.. त्यात मग त्याचा कोणतरी वारलेला भाऊ की कोणी त्याच्या LAPTOP मधून बर्याच गोष्टी सांगत असतो.. असा काही तरी.. सांगा काही समजले तर!!

योगिता मृण्मयी हे असे लिहा : mRuNmayee

प्रतिसाद लिहीता त्या 'टेक्स्ट बॉक्स'वरच्या पट्टीत , निळ्या सफरचंदाच्या उजव्या बाजूला एक प्रश्नचिन्ह आहे, त्यावर क्लिक केले असता, ऋ कसे लिहावा ते दिसेल.

गेल्या दोनेक महिन्यांपासून प्रोफाईल मधे फोटो अ‍ॅड होत नाहीये. नुसता संदेश येतो कि केलेला बदल साठवलाय म्हणून. लॉग आऊट करून झालंय,पान रीफ्रेश करून झालंय..पण काहीकेल्या फोटो अपलोड होत नाही. फोटो चा साईझ पण चेक केलाय.

मला माझ्या पाककृतीमध्ये फोटो अ‍ॅड करायचे आहेत, पुर्वी इमेज लिंक असा ऑप्षन होता मी माझ्या खाजगी जागेत फोटो अपलोड केलेत ते पाककृतीमधे कसे डकवू ? कृपया मार्गदर्शन करा

नमस्कार अनाहक,

मदतपुस्तिकेतले , लेखनासंबंधी प्रश्न विभागातले मायबोलीवर नवीन साहित्य कसे लिहावे? हे पान बघितलेत का? आपल्या प्रश्नाचे उत्तर तिथे आहे.

-मदत_समिती.

माझ्या समस्येचं आहे का काही सोल्युशन??

गेल्या दोनेक महिन्यांपासून प्रोफाईल मधे फोटो अ‍ॅड होत नाहीये. नुसता संदेश येतो कि केलेला बदल साठवलाय म्हणून. लॉग आऊट करून झालंय,पान रीफ्रेश करून झालंय..पण काहीकेल्या फोटो अपलोड होत नाही. फोटो चा साईझ पण चेक केलाय.
पूर्वी वापरलेले प्रोफाईल फोटो ही अपलोड नाही होत आहेत!!

Pages