मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

हितगुज-सुंदर मि होणार मध्ये ओठांचे सौंदर्या असा धागा होता तो डिलिट झाला आहे. पुन्हा कसा आणु.
ओठांचे सौंदर्य हा एक धागा वगळला...... तो पुन्हा कसा आणायचा कोणि सांगेल का?

मला वाटलं होतं की "निवडक १०" ही सोय अतिशय सोयीची आहे. त्यामुळे जेव्हाही मला एखादा बीबी आवडला तेव्हा मी निवडक १० मधे नोंदवलं. पण मला माहिती नव्हतं की जेव्हा मी १० पेक्षा जास्त वेळा असं करेन तेव्हा आधीच्या माझ्या खुणा नाहिशा होतील. आता जेव्हा कळलं, तेव्हा खूप उशीर झालाय असं जाणवलं Sad

आता माझ्या आधीच्या खुणा मला शोधता येतील का ?

Sad

नवीन लेखनाचा धागा या सदराचा मजकुर कमीत कमी दहा शब्दाचा आसला पाहिजे म्हणजे काय? कारण मी काही अपलोड करण्याचा प्रयत्न केला कि आशी अडचण येते कृपया सांगा.

मी चित्रकला विभागात एक पोस्ट लिहीली आहे. हि पोस्ट गुलमोहर चित्रकला येथे दिसते व मि गुलमोहर -
प्रकाश चित्रण व ईतर कला या ग्रुप मधे पण सामील आहे तर माझी पोस्ट गुलमोहर -
प्रकाश चित्रण व ईतर कला या विभागात दिसत नाही या विभागात पोस्ट दिसण्यासाठी काय करावे लागेल..
कळवा

माझी चिकन जालफ्रेझी ही पाककृती सार्वजनिक आणि ग्रुप अशा दोन ठिकाणी चुकून पोस्टल्या गेलीये. ग्रुपची पोस्ट डिलीट करता येईल का ? मला माझी पाककृती सार्वजनिक हवीये.

नमस्कर !!

मला शोध हा पर्र्याय विशेष जमत नाही!!

मी दिवाळी मध्ये "येताय ना दिवाळीला" असा लेख वाचला होता. तो कसा शोधायचा?

धन्यवाद !
जराम

मनस्विनी
तुम्ही काढलेल्या धाग्याची लिंक अ‍ॅडमिनच्या विचारपूसमध्ये द्या आणि त्यांना धागा उडवण्याची विनंती करा.

जयवी,
>>आता माझ्या आधीच्या खुणा मला शोधता येतील का ? >> नाही. निवडक १० हे एखाद्या पाईपलाईनप्रमाणे आहे. नवीन खूण आली की सुरुवातीची बाहेर. त्यामुळे ज्या खुणा गेल्या आहेत त्या पुन्हा दाखवता येणार नाहीत.

Sanj.jpg

.

Alka ताई,
नवी चप्पल सुरुवातीचे ४ दिवस थोडी चावते. सहन करा अन प्रयत्न सोडू नका. एकदा जमायला लागलं की सोप्पं असतंय बघा!

मानिनीगुरव८१@ म... नमस्कार,

आपले चित्र , जर आपण स्वतः तयार केले असेल तर ते गुलमोहोरात प्रकाशित करावे ही विनंती. त्यासंबंधीची माहिती येथे आहे.

Alka, नमस्कार.

मायबोलीवर आपले सहर्ष स्वागत आहे. मराठी लिहीण्याचा सराव करण्यासाठी हा चाचणी बा.फ आहे. तसेच अक्षरांविषयी काही मदत लागली तर प्रतिसाद जिथे टाइप करता त्या चौकोनावरती निळ्यासफरचंदाच्या चित्राशेजारी एक प्रश्नचिन्ह आहे. त्यावर टिचकी मारली असता संपूर्ण अक्षरतक्ता दिसतो. मायबोलीच्या विभागांची थोडक्यात ओळख येथे आहे. ती देखील एकवार नजरेखालून घालावी ही विनंती.

-मदत_समिती

.

मी मायबोलीवर वाचनमात्र असतो. क्वचितच प्रतिसाद देतो. एका धाग्यावर प्रतिसाद देत असताना तो उमटतच नव्हता. मी तीन वेळा सेव्ह ला क्लिक करुनही तो दिसत नव्हता. याचा अर्थ मी असा घेतला कि येथील मॉडरेटर लोकांना प्रतिसाद पब्लिश न करण्याचे अधिकार आहेत म्हणुन मी नाद सोडून दिला. शेवटचा प्रयत्न केला तर प्रतिसाद प्रकाशित झाला. असे काही आहे का कि काही सभासदांचे प्रतिसाद संपादकांच्या / मॉडरेटर च्या नजरे खालून गेल्याशिवाय तो प्रतिसादच प्रकाशित होऊ शकणार नाही?एखाद्या सभासदाचे व्हेरिफिकेशन झाल्यावर मगच त्याचे प्रतिसाद प्रकाशित होणे सुरु होईल?

मायबोली सदस्य असलेल्या प्रत्येकाचा प्रतिसाद प्रकाशित होतो. पोस्ट करतांना कुठलेही मॉडरेशन केले जात नाही. तुमच्या browserचा हा प्रश्न असावा मायबोलीचा नाही.

धन्यवाद रुनी
मला माझा प्रतिसाद सोडून इतर पोस्ट व प्रतिक्रिया दिसत होत्या.
<<मग मज्जा मज्जा चाललीये करत कशाला टवाळी करताय तिही तीन तीन वेळा.
तसल्या आयडींमधेच तुमची गणना करावी काय?>> असा प्रतिसाद मला आला. म्हणुन मला शंका आली व काय गडबड आहे ते विचाराव म्हणुन मी विचारणा केली. मी लिहित असलेल्या अन्य मराठी संकेतस्थळावर पण कधी कधी दोन तीन वेळा प्रतिक्रिया प्रकाशित होते. काही तांत्रिक अडचण झाली असेल म्हणुन आपण परत प्रतिसाद पाठवतो. त्याचा अर्थ असा घेतला गेला. असो. आपुलकीने प्रतिसाद दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.

हेलो. नवीन धागा सुरू करण्यासाठी काय करावे लागते? कोण सुरू करून देते?

पारिजाता, हेडरमधे लिहिलेल्या 'लेखनासंबंधी प्रश्न' यावर क्लिक करा. उघडणार्‍या अनुक्रमणिकेत तुमचा प्रश्न दिसेल, त्यावर क्लिक केल्यावर उत्तर सापडेल.

Pages