बारावीनंतर....

Submitted by शैलजा on 21 January, 2010 - 10:32

बारावी, शास्त्र (Science) घेऊन उत्तीर्ण झाल्यानंतर करिअर घडवण्यासाठी भारतामध्ये कोणते अभ्यासक्रम उपलब्ध आहेत, ह्या विषयावर इथे ठाऊक असलेली माहिती लिहायची माबोकरांना विनंती आहे. ठराविक पर्याय, जसे की मेडीकल, इंजिनिअरींग हे तर झालेच. त्यातही नवीन काही पर्याय निघाले असतील, काही माहिती असेल तर लिहावी. हे सर्व पर्याय एकत्र केलेले पुस्तक वगैरे उपलब्ध आहे का, की जेणेकरुन सर्व माहिती एकत्र स्वरुपात सापडू शकेल?

मेडिकल/ इंजिनियरींगशिवाय इतर पर्याय काय? बीएससी कोणकोणत्या विषयांमधे करता येते? पुढील उच्च शिक्षणाच्या काय संधी/ स्कोप आहे? कोणाला मायक्रोबायॉलॉजी ह्या अभ्यासक्रमाबद्दल ठाऊक असेल तर लिहावे, अशी विनंती. धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शैलजा
पुण्यात बर्‍याच ठिकाणी करीअर कौन्सिलींग सेंटर्स आहेत, तिथे चक्कर मार एखादी. त्यांच्याकडे तू म्हणतेस तसे बुकलेट सापडेल कदाचित.
मायक्रोबायलॉगी मध्ये BSc करता येते. तसच मायक्रोबायलॉजीसाठी अहमदाबादला कुठलातरी मास्टर्स कोर्स आहे, माझ्या क्लासमेट्च्या बहीणीने केला, त्यानंतर ती आता मद्रास मध्ये एका फार्मा कंपनीत रीसर्च करते. विचारून त्याबद्दल लिहीन इथे.
तसच फर्ग्युसन मध्ये जीओलॉजी घेवून BSc करता येते. जीऑलॉजी मध्ये मास्टर्स करणारे बरेच जण ऑइल कंपन्यात, मायनिंग इ. क्षेत्रात नोकरी करतात पण जर भारताने चंद्रायान सारखी अजून काही Moon missions केली तर नक्कीच जीऑलॉजी मध्ये काम करणार्‍यांची मागणी वाढेल.
माझा स्वतःचा अनुभव असा आहे की बॅचलर डीग्री ही फक्त एक दिशा दर्शकाचे काम करते नंतर तुम्ही मास्टर्स कश्यात करता, किंवा कश्यात रीसर्च करता यावर तुमचे करीअर अवलंबून असते. तसच एका विषयात BSc असेल तर त्याच विषयात तुम्ही पुढे काम करता असे सहसा होत नाही.

BSc मायक्रोबायलॉजी केल्यावर पुणे युनिवर्सीटी मधुनही मास्टर्स करता येते. त्यानंतर Phd. ही करता येते. जर्मनी मध्ये या विषयात Phd. करण्यासाठी चांगली स्कॉलरशीपही मिळते.

रुनी, करीअर कौन्सिलींग सेंटर्समधे गेलो होतो, पण जिथे गेलो, तेथे अशी सर्व अभ्यासक्रमांबद्दल माहिती देणारे पुस्तक काही मिळाले नाही. युनिव्हर्सिटीत जाऊन बघायला हवे. मायक्रोबायॉलॉजीबद्दल विचारुन जरुर लिही, वाट बघते Happy

>तसच एका विषयात BSc असेल तर त्याच विषयात तुम्ही पुढे काम करता असे सहसा होत नाही > ते झालेच गं. मीही इलेक्ट्रीकल इंजि. केले आणि काम करते आहे आयटी क्षेत्रामध्ये, पण निदान काय काय संधी उपलब्ध आहेत, कोणते विषय अभ्यासायला मिळू शकतात हेही आधी कळले तर बरे, असे माझे मत. Happy

अजून कोणी माबोकर आहे का ज्यांनी मायक्रोबायॉलॉजीमधे करिअर केले आहे किंवा त्यासंबंधी, त्यातल्या पर्यायांविषयी ठाऊक आहे?

स्वाती आणि प्राजक्ता, धन्यवाद. तू दिलेली लिंक पाहते प्राजक्ता.

माझ्या मुलीला astrophysics ह्या विषयात रस आहे. १२वी सायन्स करुन पुढे हा विषय घ्यायचा असे तिचे मत होते, पण नेटवर बरेच धुंडाळूनही मला मुंबई विद्यापिठात हा विषय असल्याचे आढळले नाही.

पुणे युनिवर्सिटीत हा विषय घेऊन MSc. करता येते, अशी माहिती मिळाली. कुणाला अजुन काही माहिती असल्यास कृपया द्यावी.

(ती २०११ ला १० वीची परिक्षा देतेय, ११-१२ सायन्स करायचेय)

साधना, तुझ्या लेकीला अनेक शुभेच्छा १०वीच्या परीक्षेसाठी Happy
वत्सला, अजून डिटेल्स देशील का तिला विचारून? म्हणजे, बी एस्सी (टेक) करण्यासाठी बी एस्सी (मायक्रो) करणे आवश्यक होते का? हे शिकून झाल्यावर आता ती काय नोकरी/ व्यवसाय करते? इ. इ.

साधना
पुणे विद्यापीठात एम एस्सी फीजीक्स आहे त्यात स्पेशलायझेशन म्हणून अ‍ॅस्ट्रोफीजीक्स, अ‍ॅटमॉसफेरीक फीजीक्सि इ. घेता येते,त्या साठी आधी बी एस्सीला गणित आणि फीजीक्स असणे आवश्यक आहे, विद्यापीठाची एन्ट्रन्स असते त्यात पास झाले तर अ‍ॅडमिशन मिळते. मी तिथे असतांना एम एस्सी स्पेस सायन्स होते पण ते अनुदाना अभावी बंद पडले.

>>बी एस्सीला गणित आणि फीजीक्स असणे आवश्यक आहे
हे बरोबर.
माझ्या एका मैत्रिणीने पुणेविद्यापीठातून खगोलशास्त्रात एमेस्सी केले आहे. डॉक्टरेट परदेशात.
तुम्हाला हवा असल्यास तिचा इमेलपत्ता पाठवेन.
ती सध्या बंगलोरच्या रामन इन्स्टीट्यूटमध्ये काम करते.

माझ्या एका मैत्रिणीने पुणेविद्यापीठातून खगोलशास्त्रात एमेस्सी केले आहे. >>> याचा अर्थ तिने एम एस्सी फिजीक्स केले फीजीक्स डीपार्टमेंट मधुन आणि त्यातच एक वर्ष आयुकाशी/एन सी आर ए शी सलग्न असलेला खगोलशास्त्राचा अभ्यास केला जो एम एस्सी डीग्रीचा भाग होता. एम एस्सीत पहिले वर्ष कॉमन विषय आणि दुसर्‍या वर्षी तुम्ही जे स्पेशलायझेशन घ्याल त्याचा अभ्यास, त्यात आयुकात जावुन शिकणे, काम करणे, प्रोजेक्ट करणे इ. चा समावेश असतो.
अर्थात पी एच डी साठी तुम्हाला कुठल्या नावाने डीग्री मिळाली आहे या पेक्षा काय काय अभ्यास केला गेलाय मास्टर्स मध्ये किती खोलात केला गेलाय हे जास्त बघीतले जाते (हे मी भारताबाहेरच्या पी एच डी बद्दल बोलतेय). त्यामुळे तुम्ही सिव्हील इंजि असुन आईस फिजीक्स मध्ये पी एच डी करू शकता. माझ्या सोबत पी एच डी करणारे केमिस्ट्री, फीजीक्स, सिव्हील इंजी, जीओलॉजी (अगदी बायलॉजी सुद्धा) अश्या वेगेवेगळ्या बॅग्राउंडचे असले तरी सगळ्यांचे पी एच डी अ‍ॅटमॉसफेरीक फीजीक्स मध्ये होते.
तर माझ्या सोबत एम एस्सी करणारे काहीजण अ‍ॅस्ट्रो, सोलार फीजीक्स तर काही अ‍ॅटमॉसफेरीक, जीओलॉजी इ. काय काय करतात. थोडक्यात सायन्स मध्ये थोडे विषयांतर करून रीसर्च/अभ्यास करता येतो.

शैलजा, ती परिचीत औषधी कंपनी मध्ये म्यानेजर म्हणुन काम करत होती. अलिकडेच ती ईथे कायमची आली आहे. माझ्या माहीतीप्रमाणे टेक करण्यासाठी आधी बी एस्सी करणे आवश्यक आहे. तीला विचारुन सांगते १-२ दिवसात.

रुनी आणि मृदुला खुप खुप आभार. अजुन मदत लागली तर तशी मदत मागेनच मी हक्काने Happy
तिने आयुकाची साईटही पाहिलीय...

तसा अजुन वेळ आहे, पण जिकडे जायचेय त्याची वाट आधीच माहिती असली तर मग आयत्या वेळी धडपडावे लागत नाही म्हणुन Happy

खालील करियर पाथ पहा शैलजा

बी फार्म - क्लिनिकल रिसर्च मध्ये नोकरी मग पुढे एम .बी ए- आता आय बँकेत हेड ऑफ एच आर - माझी पूर्वीची बॉस
बी एस सी केमिस्ट्री, पुढे एम एस सी- सध्या निरी (National Environmental Research Insti) इथे नोकरी - आमची एक नातेवाईक.
बी आर्च (गणित विषय सोडला नसेल तर)- पुढे आर्किटेक्ट म्हणुन नोकरी, आता चक्क एज्युकेशन या विषयात अमेरिकेत पी.एच.डी.- माझी एक मैत्रीण.
बी. ई (सिवील), मग एम. ई ( एनवॉरनमेंटल एन्जीनियरींग)- मग वॉट्रर ट्रिटमेंटशी संलग्न कंपनीत नोकरी, सध्या अमेरीकेत वॉटर पोल्युशन मध्ये पी. एच. डी - भगिनी.
बी. ई (सिवील), मग एम. ई ( एनवॉरनमेंटल एन्जीनियरींग), मग एअर पोल्युशन मध्ये अमेरिकेत पी एच डी- आता अमेरिकेत नोकरी. - मेहुणा
बी ई ( केमिकल ईंजिनियरींग), मग अमेरिकेत पी एच डी ( केमीकल इंजिनियरिंग मध्ये)- गेली अनेक वर्ष मोठ्या फार्मा जायंट मध्ये कार्यरत.- नणंदेचे यजमान

रुनी- तुझ्या पोस्ट अप्रतिम आहेत.

In near future there'll be very high demand for software which can do automated trading.
This is very complicated field and needs a lot of mathematical background.

read more about algorithmic trading

http://www.investopedia.com/terms/a/algorithmictrading.asp
http://www.marketswiki.com/mwiki/Algorithmic_trading
http://en.wikipedia.org/wiki/Algorithmic_trading
http://www.theglasshammer.com/news/2008/03/13/financial-technologies-wom...
http://www.tcs.com/SiteCollectionDocuments/White%20Papers/TCS_FS_algorit...

http://www.google.com/search?hl=en&rls=com.microsoft:en-us&q=algorithmic...

There are various masters in finance math course offered in US and UK, not sure if there is anything similar in India. but in case person is strong in math, its good to do such course. it has great future.

माणूस,

<< software which can do automated trading. This is very complicated field and needs a lot of mathematical background. >>

याबद्द्ल जास्त माहीती द्याल का?

वत्सला आणि रुनीने माझ्या विपूमध्ये लिहिलेली माहितीही इथे चिकटवते.

वत्सला
27 January, 2010 - 17:19

शैलजा, तो 'बारावीनंतरचा.....' बाफ मला सापडत नाहीये आत्ता म्हणुन ईथे लिहीते आहे.

मी माझ्या ओळखीतल्या बाईना बी एस्सी टेक बद्द्ल विचारले. त्यांनी सांगितले की व्ही जे टी आय / यु डी सी टी च्या वेब साईट्स वर या सगळ्याची माहीती मिळु शकेल. टेक मध्ये बरेच विषय आसतात आणी बर्‍याच टेक साठी बी एस्सी आधी करावे लागते. टेक ला अ‍ॅडमीशन मिळणे मार्कस आणि एण्ट्रन्स वगैरे वर अवलंबुन आहे.

रूनी पॉटर
28 January, 2010 - 19:30

माझ्या मित्राने मला लिहीलय ते तसच पेस्ट करते इथे. B.Sc in some basic sciences, like Zoology, botany or Chemistry and then choosing the main topic, genetics, micro-bio etc. in the masters level is a good idea. त्याच्या बहीणीने जनरल बीएस्सी आणि अहमदाबाद युनीव्हमधुन मायक्रोबायलॉजीमध्ये एम एस्सी केले. कारण मग B.Scलाच जर तुम्ही एकाच टॉपीक मध्ये स्पेशलाईझ केलत आणि तो टॉपीक नाही आवडला तर, त्यापेक्षा जनरल बी एस्सी, त्या ३ वर्षात एखाद्या विषयाची आवड डेव्हलप झालेली असते आणि तुम्ही ठरवु शकता मास्टर्स कश्यात करायचय ते.

सागर, धन्यवाद. स्वाती म्हणते तसे डिटेल्स देऊ शकशील का?

इकॉलॉजिकल सोसायटीच्या वतीने "Course in Natural Resource Management, Restoration and Sustainable Development" हा कोर्स घेतला जातो. पुण्यात सेनापती बापट रस्त्यावर इकॉलॉजिकल सोसायटीचे कार्यालय आहे. आठवड्यातून केवळ ५ तास इतकी ह्या अभ्यासक्रमाची वेळ आहे. झाडे, ओढे, जमीन, प्राणी, पक्षी इ. पर्यावरणाचा अभ्यास यात आहे. निसर्गावर आघात न करता विकास कसा करता येईल हे या कोर्समध्ये शिकविले जाते. निसर्गाचा नाश न करता Natural Resource Management, Eco Landscaping, Destination Development इ. यातून शिकता येतात.

धन्यवाद, हा अभ्यासक्रम सर्टिफिकेट कॅटेगरीतला आहे का? म्हणजे मुख्य अभ्यासक्रमाला पूरक म्हणून करायचा, अशा प्रकारचा?

>>> हा अभ्यासक्रम सर्टिफिकेट कॅटेगरीतला आहे का? म्हणजे मुख्य अभ्यासक्रमाला पूरक म्हणून करायचा, अशा प्रकारचा?

माहिती नाही. त्यांच्या ऑफिसमधूनच पूर्ण माहिती मिळू शकेल. हा कोर्स बहुतेक मुख्य अभ्यासक्रमाला पूरक म्हणून असावा (आठवड्यातून फक्त ५ तास शिक्षण). हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर Nature Friendly Landscape Development, Environment Friendly Farm House / Resort Develpment इ. व्यवसाय करता येतील. निसर्ग व पर्यावरणाची आवड असणार्‍यांसाठी हा कोर्स चांगला आहे.

IIser, Pune संदर्भात कोणाला कल्पना आहे का? शिक्षणाचा दर्जा? सोयी? अध्यापक वर्ग कसा आहे?
मी त्यांची साईट पाहिली आहे, पण पूर्ण समाधान झाले नाही.

शैलजा, हा बीबी मी आता बघितला. मायक्रोबायॉलॉजी मध्ये छान करियर होऊ शकते. माझे मोठे मेहुणे मायक्रोबायॉलॉजिस्ट आहेत. सध्या ते एन सी एल मध्ये आहेत. बी.एस. सी, एम.एस.सी करून अशा संशोधन संस्थांमधे नोकर्‍याही मिळतात+ पुढे संशोधनही करता येते. आघारकर इंन्स्टिट्युत वगैरे संस्थातही संधी असते.
ज्यांना इंजिनिअरिंग्च्या परिक्षांची माहिती, त्याच्या एन्ट्रन्स परिक्षा वगैरेची माहिती देणारी डि एस के फ्युएल ही संस्था चांगली आहे.

माझ्या मुलाने आता बारावीच परीक्षा दिलि आहे त्याला Merchant Navy मधे करियर करायचे आहे Merchant Navy मधे प्रवेश मिळ्वण्यासाथि काय करावे लागेल

अगं काल की परवाच्या सकाळ मध्ये त्याची जाहिरात आली होती. मिळाले नाही तर मला सांग मी स्कॅन करेन शोधून....

Pages