मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

mi ek gruhini ahe ,mla craft work hi video clip pathwaychi ahe mi tivideo clip maayboli mdhe kshi pathau.

nittya - नमस्कार. प्रोफाईल फोटो अपलोड करण्यास - माझे सदस्यत्व --> संपादन या क्रमाने जा. तिथे पिक्चर या विभागात, फोटो अपलोडिंगची सुविधा आहे. ती वापरून फोटो अपलोड करा.

माझे सदस्यत्व हा दुवा, सर्व पानांवर उजव्या बाजूला तुमच्या सदस्यनामाखाली दिसतो.

rajtonpe नमस्कार. विचारलेला प्रश्न कुठे दिसत नाही? नवीन लेखनात ? का मायबोलीवर ? तुमच्या लेखनात मला तुम्ही विचारलेले प्रश्न दिसत आहेत. ते सार्वजनिक केल्यास उपयोग होईल. सार्वजनिक करण्याबद्दल माहिती या दुव्यावर आहे.

Order No.#3170 date 05-17-2012 02:04 How can I traqce the order? I have placed it on 17.5.2012. When can I expect the delivery

शुगोल : तुम्ही हितगुज ग्रूप: कवि आणि कविता किंवा गाण्याचे शब्द हवे आहेत... या पैकी एका ग्रुपात धागा उघडू शकता.

madhurasathe नमस्कार, या संदर्भात येथील फॉर्म वापरून चौकशी करू शकता.

I have send 5/6 mails using this form but no reply received. Please help. I want to gift this books to somebody on Birthday.

madhurasathe तुम्ही प्रशासकांशी संपर्क साधला आहे का?

रचनाशिल्प तुमचा धागा व्यवस्थित दिसतो आहे. नवीन लेखन हे प्रतिसादांनुसार क्रमवारीत असल्याने तुमचा धागा प्रकाशित झाल्यानंतर मागील पानावर गेला असल्याची शक्यता आहे.

--

माझ्या तीन चार दिवसांपूर्वीच्या पोस्ट केलेल्या गझला कशा पहाव्यात?

नमस्कार गायत्री१३ , आपण हा दुवा : तुमची छोटी जाहिरात इथे... वापरून जाहिरात दिली आहे का? तसे असल्यास ती प्रत्येक पानावर बाजूला जाहिरातींसाठी असलेल्या जागेत ती दिसू लागेल. अधिक माहितीसाठी प्रशासकांशी संपर्क करावा ही विनंती.

नमस्कार सतीश, मदतपुस्तिकेतला हा दुवा बघितलात का?
एखाद्या सदस्याचे (किंवा तुमचे स्वतःचे) सर्व लेखन कसे वाचायला मिळेल?

माझ्या नविन अ‍ॅनरॉइड टॅबलेट वर मला कुठलीच अक्षरे दिसत नाहियेत...याबाबत कुठल्याश्या धाग्यावर मागे चर्चा झालेली आठवतेय..आता सापडत नाहिय. कुणी त्याची लिंक देऊ शकेन काय...?

किरण कुमार : लेखात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा? या पानावरची माहिती एकदा वाचून बघा. उत्तर सापडले नाही तर येथे परत विचारा.

चंबू, ही लिंक उपयोगी आहे का ते बघा एकदा. अँड्रॉईड

Pages