मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

अ‍ॅडमिन.....मला नवी पोस्ट टाकताना मराठीचा पर्याय दिसत नाहिये. पोस्ट एडिट करताना मात्र दिसतोय. कालपासून हेच होतंय. फक्त ह्याच बीबीवर मात्र नव्या पोस्टलाही मराठीचा पर्याय दिसतोय. काय करु? Sad

कृपया माला सांगा की माला माझेच लिहिलेले लेख शोधायचे असतील तर काय करायचे ..
आता शीर्षक आठवत नाही आहे म्हणून ...
लवकर मदत अपेक्षित

धन्यवाद .....

नंद्या, Mozilla Firefox आहे. ऑफिसच्या लॅपटॉपवर आहे. सोमवारी बघते तुमच्या सूचनेनुसार करून. मग पोस्टेन इथे. धन्यवाद Happy

मराठी गझल या गुलमोहरमधील सदरात माझी एकच रचना चुकून दोनदा प्रकाशित झाली आहे. कृपया त्यातील एक काढून टाकावी.

मला माझे जुने लेखन शोधायचे आहे त्यासाठी काय करावे लागेल, मला शीर्षक लक्षात नाही आहे,
चारोळी साठी मला कुठल्या गात नाव्दायाला हवा...
मला माझे लेखन सगळ्यांसाठी मोकळे करायचे असेल तर काय करवावे लागेल....

मदतीची अपेक्षा लवकरात लवकर....
धन्यवाद....

स्वप्ना_राज - ठीऽऽके.

क्रांति - नमस्कार, तुम्ही दोन्हीपैकी एक गझल अप्रकाशित करू शकता. किंवा नको असलेल्या धाग्याचे दुवा प्रशासकांच्या विपूमध्ये लिहू शकता.

ओ ऋतुराजभाउ, वरतीच उत्तर दिले आहे की. ते देखील सापडेना काय? Proud
चारोळी कुठे लिहावी असा प्रश्न असेल तर कृपया मदतपुस्तिकेतले हे पान बघा.
"चारोळी" हा कविताप्रकार कुठे लिहावा?

नंद्या, तुमची सूचना अंमलात आणली. आता नवी पोस्ट टाकताना मराठीचा पर्याय दिसतोय. खूप खूप धन्यवाद Happy

मला आय ए ए ए (फ्रान्कफर्ट) ची काहि फोटो एथे पोस्ट करायचे आहेत कोणि मदत करेल काय..? आणि मी करु शकतो काय..?

\नमस्कार.
"
काही तांत्रिक चुकीमुळे माझ्या पोस्ट पुन्हा पुन्हा प्रकाशित होत आहेत.

मराठी कविता सदरात "आरोग्यदुर्गा" चुकून ४ वेळा प्रकाशित झाली आहे. कृपया योग्य ती कारवाई करावी, ही नम्र विनंती.

स्वप्ना_राज -चला प्रॉब्लेम सुटला, बरे झाले. Happy

ऋशिबेला
कृपया इथे पहावे.

क्रांति तुमच्या ४ पैकी नको असलेल्या ३ कविता, तुम्ही स्वतःच संपादनात जाउन अप्रकाशित करू शकता. किंवा त्यांचे दुवे प्रशासकांच्या विपूमध्ये देऊ शकता. धन्यवाद !

प्रकाशचित्र उपलोड कसे करावे?
नविन लेखन-गुलमोहर-प्रकाशचित्र - हे ओप्शन सिलेक्ट केल्यानंतर पुढे काय करावे कारण अपलोड हा ओप्शन दिसत नाही स्क्रीनवर.

विहंग
मदतपुस्तिकेतला धागा बघितलात का "प्रकाशचित्र कसे अपलोड करावे" तसेच "मायबोलीवर नवीन लेखन कसे करावे" असा पण धागा आहे तो ही पहा.
विभाग्रज - त्या संपादन वर कधी टीचकी मारून बघितलीत का? स्वतःचेच पोस्ट परत एकदा संपादित करण्याची/बदलण्याची सुविधा आहे ती. तुम्हाला फक्त तुमचेच पोस्ट बदलता येते इतरांचे नाही म्हणून फक्त "संपादन"तुमच्याच नावासमोर दिसते इतरांच्या नावासमोर नाही.

विहंग, वर "लेखनासंबंधी प्रश्न" या पर्यायावर क्लिक केलेते तर उघडणार्‍या पानावर तुम्हाला "लेखात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा" याविषयी माहिती सापडेल.

एखाद्या धाग्याची विशिष्टा प्रतिसाद असलेली लिंक कशी शेयर करावी? म्हणजे त्या लिंकवर क्लिक केल्यावर डायरेक्ट त्या पेजवरील तो विशिष्टा प्रतिसाद समोर उघडेल? आणि मग जर युजर ला मुळ लेख किंवा बाकीचे प्रतिसाद वाचायचे असतील तर तो वर किंवा खाली स्क्रोल करेल.

तुमच्या सदस्यनामावर टिचकी मारून स्वखात्यामध्ये गेल्यावर तिथे पाउलखुणा हा विभाग आहे त्यात तुम्हाला तुम्ही प्रतिसाद दिलेले सर्व धागे दिसतील.
bnlele यांच्या पाउलखुणा

Pages