मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

माझ्या खात्यातील छायाचित्र बदलण्याचा मी बराच प्रयत्न केला..पण आधीचेच छायाचित्र कायम राहतेय...नेमके काय कारण असावे?

hema 001.jpg

bnlele

मसाला १, मसाला २ ह्या पानांवर काही मसाल्याच्या कृती आहेत. त्यात आहे का नाही आग्री मसाला ते ठाउक नाही. जर कुणी टाकली होती कृती ते माहिती असेल तर शोधणे सुकर होईल.

माझ्या 'महिकावतीची बखर' या ११ भागात लिहिलेल्या लिखाणाची लेखमालिका व्हावी अशी इच्छा आहे. शक्य असल्यास आवश्यक ती कारवाई करावी.. Happy धन्यवाद.

माझ्या आळन्दि च्या लेखवर २२ प्रितिसाद आले पण सगळे दिसत नाहित. काय कारण असाव? ४ औगस्ट्चे दिसतात पण बकिचे आत दिसत नाहित. प्रथम दिसले.

मला आपली साईट खरच खूप आवडली.
मी wordpress.com वर लिहितो आहेच. तेथे प्रकाशित झालेले लेखन आपल्या मायबोलीच्या पुख्या पानावर दिसू शकत नाही का ? कि मला मायबोलीवर स्वतंत्र पणे लिखाण करणे गरजेचे आहे. मराठी विश्व, indiblogger अशा ठिकाणी मी केलेले लिखाण तेथील मुख्य पानावर दिसते तसेच आपल्याकडे का घडत नाही.
आपण आपल्या ब्लोगेर मित्रांसाठी स्पर्धा आयोजित करतो काय ?

http://rghana.wordpress.com/

मला माझे लेखन फक्त माझ्या ग्रुप मधल्यानी सगळ्यांना वाचता यावे अशी इच्छा आहे, त्यासाठी settings बदलाव्या लागतील...

मला माझे लेखन फक्त माझ्या ग्रुप मधल्यानीच नाही, तर ते सगळ्यांना वाचता यावे अशी इच्छा आहे, त्यासाठी काय settings बदलाव्या लागतील...

विजय २००६ - नमस्कार.
>>तेथे प्रकाशित झालेले लेखन आपल्या मायबोलीच्या पुख्या पानावर दिसू शकत नाही का ?
सध्यातरी अशी सोय नाही आहे.

>>आपण आपल्या ब्लोगेर मित्रांसाठी स्पर्धा आयोजित करतो काय ?
मायबोलीवरील स्पर्धा या मायबोलीच्या सभासदांकरिता असतात. कृपया खालील लिंक बघावी ही विनंती

>>विजय२००६ हे नाव बदलू शकतो काय ?आणि कसे ?
कृपया मदतपुस्तिकेतील --> सदस्यत्वासंबंधीत प्रश्न विभागात --> सदस्यत्वाचे नाव कसे बदलावे / देवनागरीत कसे तयार करावे? - हा उपविभाग बघावा.

ऋतुराज नमस्कार
आपल्या प्रश्नाचे उत्तर इथे सापडेल.

माझ्या वडीलाना मायलीटीस हा आजार गेल्या १२ वर्शान पासुन झालाय , पण त्यावर उपाय आम्हाला आता सापड्लाय , माझे वडिल आता पुर्ण पणे ठिक होणे कठिण आहे , पण मला ह्या इन्स्टीटञुट बद्दल सगळ्याना सान्गायचय जेणे करुन गरज्वन्ताना त्याचा फायदा होइल , पण ही पोस्ट कुठे टाकावी हे सान्गाल का??

नमस्कार आलू
आरोग्यम् धनसंपदा या ग्रुपमध्ये तुम्ही काढू शकता धागा. असा धागा काढण्यापूर्वी कृपया इथे एकवार नजर टाकून कुठल्या प्रकारचा धागा कसा सुरू करावा आणि सार्वजनिक कसा करावा ते एकवार बघून घ्या.

अमेरीकेत कुठे मराठी पुस्तक मिळतात का? मायबोलीवर पुस्तक आहेत पण बहुतेक ती भारतातुन येत असावीत कारण त्यांच्या शिपिंगचाच खर्च $३० वैगेरे आहे. माझा एक मित्र सांगत होता की भारतातुन कोणीतरी बल्कमधे पुस्तक पाठवतात आणि ते १ किलोला १०० रुपये प्रमाणे चार्ज घेतात. पण त्याला त्यांचा फोन नंबर वैगेरे माहीत नाहिय आणि सध्या कोणी मित्र येत नाहीय भारतातुन. त्यामुळे ईथे मायबोलीवर जर कोणाला भारतातुन/अमेरीकेत मराठी पुस्तक कमी खर्चात मागवण्यासंबंधी माहीती असेल तर क्रुपया कळवावे. मला ऐतिहासिक विशेषतः शिवाजी / संभाजी महाराजांसंबंधीची पुस्तक हवी आहेत पण मित्रांना ईतर मराठी पुस्तकसुद्धा हवी आहेत.

aabasaaheb

नक्कीच होता येईल
आहारशास्त्र आणि पाककृती इथे भेट द्या.
उजव्या बाजूला <सामील व्हा> असा ऑप्शन दिसेल त्यावर टिचकी मारून ग्रुपचे सदस्य व्हा.

>>एखादा ग्रुप जॉईन होण्यासाठी काय करावे?
त्या ग्रुपच्या पानावर जाउन 'सामील व्हा'वे.

अनया, नमस्कार,
कृपया मदतपुस्तिकेतले , लेखनासंबंधी प्रश्न उपविभागातले लेखात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा? हे सदर बघणार का? इथे तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत, तर कृपया कुठल्या क्रमाने काय कृती केली असता काय चूकदर्शक संदेश येतो ते इथे लिहावे.

इंद्रायणी,
सध्या मायबोलीवर एम्पी३ देता येत नाहीत. तुम्ही तुमच्या रेडिओ प्रोग्राम्सचा दुवा कानोकानीमध्ये देऊ शकता. किंवा प्रशासकांशी बोलून त्यांना काही उपाययोजना करता येत असेल तर विचारू शकता. अन्यथा, इंटरनेटवरील ईस्निप्स किंवा तत्सम संकेतस्थळांचा वापर करून तुम्हाला इथे ते दुवे देता येतील.

मी आज माझा संगणक फॉर्मॅट करून विन्डोज टाकले आणि गुगल क्रोम डाऊनलोड करून त्यावर माबो मुखपृष्ठ उघडून पाहिले तर निट दिसत नाहीये. Sad
या आधी क्रोमवर निट दिसत होते, पण आता लिहिलेले काहीच दिसत नाहीये.
आयईवर ओके आहे, पण क्रोममधेच हा प्रॉब्लेम येत आहे.
mabo_chrome_problem.JPG

संगणकाची फॉर्मेंटेशन नीट झालेले दिसत नाही, महेश Proud
क्रोमचे कुठले व्हर्जन आहे? त्यात इतर देवनागरी युनिकोड वेबसाईट्स [म.टा., लोकसत्ता, ब्लॉगस्पॉट वरील एखादा ब्लॉग] वगैरे नीट दिसतात का ?

Pages