Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54
मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.
नंद्या, माहितीबद्दल धन्यवाद !
नंद्या, माहितीबद्दल धन्यवाद !
मलहि नविन आहे, अजुन पुर्नपने
मलहि नविन आहे, अजुन पुर्नपने ओलख झालेलि नाहि लवकरच मि माझे लिखान या वेब वर द्यायचा प्रयत्न करतो.
धन्यवद
भाऊ मायबोलीवरच्या
भाऊ
मायबोलीवरच्या प्रतिसादाच्या चौकटीत ctrl v कधी कधी काम करत नाही कारण आपण लिखाणाची भाषा मराठी निवडलेली असते (मला फायरफॉक्समध्ये ही अडचण येते). तेव्हा ctrl v अशा शॉर्टकट न वापरता ब्राउझरचा मेन्यु वापरून त्यातला पेस्ट पर्याय निवडला तर तो पिकासाचा दुवा मायबोलीवरच्या प्रतिसादाच्या चौकटीत डकवता येईल.
प. भ
अॅडमिनकडे तुझी विनंती पाठवलेली आहे. आप कतार मे है कृपया प्रतीक्षा किजीए|
माझ्या सदस्य खात्यात
माझ्या सदस्य खात्यात संपर्काची सुविधा का दिसत नाही ?
आधी दिसत होती.
मी संपादनमध्ये जाऊन २-३ वेळा प्रयत्न केला, पण तरी जमत नाहीये. मदत.....
मला group join करायचा आहे.
मला group join करायचा आहे. काय करु.
कुठे जाऊ.. पद्दतशिर कुनी सांगेल का
रुणुझुणू तुमच्या प्रोफाईलमधे
रुणुझुणू तुमच्या प्रोफाईलमधे संपर्क सुविधा आहे. ईतर मायबोलीकर तुमच्या प्रोफाईल मधे आल्यास त्यांना ती दिसते. ती सोय वापरून ते तुम्हाला संपर्क करू शकतात.
रूणुझुणू अहो संपर्क सुविधा
रूणुझुणू
अहो संपर्क सुविधा प्रोफाइलमध्ये स्वतःची स्वतःला नाही तर इतरांना दिसते. तुमची दिसते आहे मला. स्वतःच स्वतःशी संपर्क साधायचा नसल्याने दिसत नाही.
सुधिर
मायबोलावरील सगळ्या ग्रूपची यादी इथे आहे, प्रत्येक ग्रूपच्या नावापुढेच 'सामील व्हा' असा पर्याय उपलब्ध आहे http://www.maayboli.com/og
वेगवेगळे ग्रुपकुटठे दिसतील
वेगवेगळे ग्रुपकुटठे दिसतील ?
स्व्तःच जुने लिखाण दिसत नाही ... कां ?
बर्यच वेळी पोस्ट केलेली कविता किंवा ललित पोस्ट झाल्याच कस कळॆल ?
नमस्कार, मला भाषा विषयात नवीन
नमस्कार,
मला भाषा विषयात नवीन धागा सुरु करायचा आहे. परंतु तिथे गेल्यावर नवीन लेखन वर टिचकी मारल्यानंतर, परत मुळ मेनु ला येते आहे. कोणी मला मदत करेल का?
bnlele - नमस्कार. >>वेगवेगळे
bnlele - नमस्कार.
>>वेगवेगळे ग्रुपकुटठे दिसतील ?
रूनी पॉटर यांनी वरच लिंक दिलेली आहे.
>>स्व्तःच जुने लिखाण दिसत नाही ... कां ?
दिसते ना. माझे सदस्यत्व --> पाउलखुणा --> लेखन. अशा क्रमाने गेल्यास ते दिसेल.
>>बर्यच वेळी पोस्ट केलेली कविता किंवा ललित पोस्ट झाल्याच कस कळॆल ?
पोस्ट केल्यावर , तुमच्या ब्राउझरमध्ये >> http://www.maayboli.com/node/<आकडे> << अशा स्वरूपाचा पत्ता URL च्या खिडकीमध्ये [browser's URL address box] येईल. तसा पत्ता आला की समजावे कविता किंवा ललित पोस्ट झाले आहे.
sumedhav
खालील चित्रात दर्शविल्यानुसार, निळ्या चौकोनातील योग्य तो पर्याय निवडला असता तिथे तुम्हाला धागा सुरू करता येईल.
नवीन गप्पांचं पानः हा दुवा, एखादा 'वाहता' बातमीफलक तयार करतो.
नवीन कार्यक्रम : हा दुवा , भाषे संदर्भातील कार्यक्रमाची माहिती मायबोलीकरांना देण्यास वापरता येईल.
नवीन लेखनाचा धागा: हा दुवा वापरून पाने साठवून ठेवणार बातमीफलक तयार करता येतो.
नवीन प्रश्न : हा दुवा वापरून , भाषेसंदर्भातील एखाद्या प्रश्नाचे उत्तर मायबोलीकरांना विचारता येईल.
मी लिखाण प्रकाशित केल्यानंतर
मी लिखाण प्रकाशित केल्यानंतर ते मला त्या सदरात दिसते मात्र जाण्याची नोंद केल्यानंतर ते कुठेही दिसत नाही , मदत करा ..
तुम्ही कुठे लिहीलय त्याची
तुम्ही कुठे लिहीलय त्याची लिंक देणार का? बर्याचदा हितगुजमधल्या एखाद्या ग्रूपमध्ये लिखाण केले असेल आणि ते फक्त ग्रूपपुरते मार्यादित ठेवले गेले असेल तर त्या ग्रूपच्या सदस्यांनाच लॉग इन करून ते दिसते कारण ते सार्वजनिक नसते. कदाचित म्हणूनच तुम्हाला लॉग इन केल्यावर दिसत असेल आणि लॉग आऊट केल्यावर नाही
मी काकाक सदरात लिखान प्रकशित
मी काकाक सदरात लिखान प्रकशित केल आहे ते कुठल्याही ग्रुपमध्ये नाही अस वाटतय,
असेलच तर ग्रूपमधून सार्वजनिक कसे करावे
अजून लिंक दिलीच नाही तुम्ही
अजून लिंक दिलीच नाही तुम्ही लेखनाची.
"सार्वजनिक" - इथे चौथ्या पॅरात तुम्हाला उत्तर मिळेल http://www.maayboli.com/node/3581
HH आणि रुनी, धन्यु. << स्वतःच
HH आणि रुनी, धन्यु.:)
<< स्वतःच स्वतःशी संपर्क साधायचा नसल्याने दिसत नाही.>> हे पटलं.
( गेल्या १५-२० दिवसांत दोन लोकांनी मला संपर्कासाठी मेल आयडी विपुतून मागितला, त्यामुळे संपर्काची सुविधा दिसत नसल्याची शंका आली. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे अर्थातच माझं मला ते दिसलं नाही.)
किरणकुमार >>मी लिखाण प्रकाशित
किरणकुमार
>>मी लिखाण प्रकाशित केल्यानंतर ते मला त्या सदरात दिसते मात्र जाण्याची नोंद केल्यानंतर ते कुठेही दिसत नाही , मदत करा .. <<
जेव्हा लिखाण प्रकाशित झालेले दिसते, ती URL , जाण्याची नोंद केल्यावर न्याहाळकाच्या अॅड्रेसबारमध्ये टाकल्यावर तुमचे लिखाण दिसते का? माझ्यामते दिसत असावे. काय आहे की नवीन लिखाण हे प्रतिसादांच्या अनुसार क्रमवारित असते. त्यामुळे तुमचे लिखाण हे जाण्याची नोंद केल्यानंतर ज्यांना प्रतिसाद मिळालेला आहे अशा धाग्यांच्या मागे दडलेले असते.
एडीटः मायबोलीचे पान जे असदस्यांना दिसते, ते साधारण तासाभराने अपडेट होते. सदस्यांना 'येण्याची नोंद' केल्यानंतर अपडेटेड दिसते. ह्यामुळे तुमचे लिखाण दिसण्यास वेळ लागेल.
काकाक मध्ये सदर कविता
काकाक मध्ये सदर कविता प्रकाशित केली आहे जाण्याची नोंद केल्यानंतर दिसत नाही . अस का होत असाव .
मदत हवी आहे.
http://www.maayboli.com/node/26536
मी "कोकण" या शीर्षकाखाली
मी "कोकण" या शीर्षकाखाली कोकणाचे फोटो टाकले आहेत, आणी ते चुकून "कोकणी फकाणे"या ग्रुप मध्ये गेले आहेत.मला ते फोटो "प्रकाशचित्र" या साहित्यप्रकारात टाकायचे आहेत.मी "प्रकाशचित्रण" वर क्लिक करुन बघितल तरी काही होत नाही आहे.मी काय करु.
मला कोणी लवकर मदत करेल काय?
मला कोणी लवकर मदत करेल काय?
तो बाफ गुलमोहरात प्रकाशचित्र
तो बाफ गुलमोहरात प्रकाशचित्र या सदरात हलवण्याची विनंती मा. अॅडमिनांना त्यांच्या विपूत करा.
धन्यवाद! मंजूताई.
धन्यवाद! मंजूताई.
मदतसमिती- सिनेमा आणि
मदतसमिती-
सिनेमा आणि संस्कृती ही लेखमाला मी चित्रपट या ग्रूपमधे लिहित आहे. लेखनाचा धागा म्हणून मी तो ओपन केला होता पण बहुधा तो वाहता गप्पांचा धागा झाला आहे. कृपया तिथली पोस्ट्स वाहून जाणार नाहीत याची व्यवस्था होऊ शकेल का? धन्यवाद.
मला परवलीचा शब्द बदलता येईल
मला परवलीचा शब्द बदलता येईल का? मला जो शब्द पुरवण्यात आला आहे तो खूप किचकट आहे.धन्यवाद.
संपादित: मला हवी ती माहिती मिळाली. आभार.
शर्मिला, अॅडमिन ना सांगा ते
शर्मिला, अॅडमिन ना सांगा ते बदलायला.
मला ह्या प्रतिसादाचं नवीन
मला ह्या प्रतिसादाचं नवीन धाग्यात रुपांतर करायचं आहे. ते कसं करता येईल?आणि ते नेमक्या कोणत्या गटात (=ग्रुपमध्ये) वर्ग केलेलं बरं पडेल?
सहाय्याबद्दल आगाऊ आभार!
आपला नम्र,
-निनाद चित्रे
निनाद, तुम्ही स्वतः एक नवीन
निनाद, तुम्ही स्वतः एक नवीन लेखनाचा धागा उघडू शकता. वाचन विभागात चालायला हरकत नाही.
धागा उघडताना सुरुवातीला वर दिलेला दुवा द्या म्हणजे पार्श्वभूमी कळेल.
कधी कधी इथे लोक धाग्याचा/बाफ
कधी कधी इथे लोक धाग्याचा/बाफ चा नंबर देतात, त्या नंबरावरुन तो धागा / बाफ कसा काढायचा /शोधायचा ?
शुगोल http://www.maayboli.com
शुगोल
http://www.maayboli.com/node/आकडा
इथे आकडा लिहीले आहे त्याजागी तो धाग्याचा नंबर टाकायचा. म्हणजे त्या धाग्यावर जाता येते.
धन्स रुनी !
धन्स रुनी !
मि मायबोलि मधे नविन आहे
मि मायबोलि मधे नविन आहे ...आपले फ्रेद्स कसे शोधायचे?
Pages