मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

श्रीविद, प्रत्येक पानावर सर्वात शेवटी
'First created: Ganesh Chaturthi, Sept 16, 1996' या ओळींच्याखाली 'सर्च'साठी असलेली खिडकी आहे.
त्यात लिहून ’एंटर’ दाबले असता शोधनिकाल दिसतील. चित्रासाठी याच पानावरचे अन्कॅनी यांचे पोस्ट बघा कृपया.

किरण्यके : ती पाने ब्राउझरची कॅश उडवली असता दिसणार नाहीत.
कुणी काही पोस्ट करायचा प्रयत्न केला तर अशा प्रकारचा मेसेज दिसेल:
’Validation error, please try again. If this error persists, please contact the site administrator’

निर्मयी : Loksatta फोंट पेज या पानावर दोन झिप फाईल्स आहेत. त्यातली मिल्लेनियमवरुन.झिप फाईल उतरवून त्यात असलेला फाँट इंस्टॉल करा. मग तुम्हाला हे पान बघता येईल असे वाटते.

एखाद्या ग्रुप मध्ये केलेले लेखन सार्वजनिक करता येइल काय? त्यासाठी काय करावे?
(लेखनाखाली फक्त ग्रुप सभासदांसाठी असे दिसत आहे)

मी लिहिलेली देव-जात ही कविता का दिसत नाही ? त्यात काही अक्षेपार्ह असावे असे वाटत नाही, त्यावर काही प्रतिसाद चुकीचे वाटत असतील तर ते डिलीट करावेत....माझी कविता कशाला?
तसेच माझी बेफिकीर ही कविता; त्याचे काय झालेय? .........माबो असे वागेल तर आम्ही आमचे लेखन कसे प्रसिद्ध करायचे ? कृपया मार्गदर्शन करावे .आम्हास माबो ची गरज आणि आधार वाटतो म्हणून विचारणा करीत आहे

वैभव वसंतराव कुलकर्णी याबाबत तुम्ही वापराचे/वावराचे नियम, जाती धर्म विषयक लेखन हे दोन दुवे नजरेखालून घाला असे मी सुचवेन. तुम्ही सांगितलेले तुमचे धागे मी वाचलेले नाहीत. मी फक्त मायबोलीवरील नियमांकडे तुमचे लक्ष वेधू इच्छितो.

>> माबो असे वागेल तर आम्ही आमचे लेखन कसे प्रसिद्ध करायचे ?
कृपया, तुमचे किती साहित्य अजूनही प्रकाशित आहे तो आकडा(ही) बघा. मग या भावनिक प्रश्नाचे उत्तर आपोआपच तुम्हाला मिळेल. Happy

तरीदेखील उत्तर न मिळाल्यास कृपया प्रशासकांशी संपर्क साधलात तर बरं होईल.

विषयाशी संबंधित नसलेल्या प्रतिक्रीयांची साफसफाई करण्यास्तव धागा अप्रकाशित केला असावा असा माझा एक कयास आहे.

राजेंद्र नमस्कार !

आपले प्रश्न आपण कोणाशी तरी बोलायचंय येथे एक नवीन धागा उघडून विचारू शकता. नवीन धागा कसा सुरू करावा यासाठी हितगुजच्या कोणत्याही ग्रूपमधे नवीन "गप्पांचं पान", "लेखनाचा धागा", "कार्यक्रम" किंवा "नवीन प्रश्न" कसा सुरू करायचा? हा मदतपुस्तिकेतला धागा बघा.

धन्यवाद !

मला माहिती ह्वी आहे
या सदरात

माझा प्रश्न login केल्यावरच दिसतो

logout झाल्यावर प्रश्न दिसत नाही

please give me advice

मला येण्याची नोंद करताना अडचण येत आहे.सारखा परवलीचा शब्द मागवायला लागत आहे. त्यानंतर येण्याची नोंद करुन परवलीचा शब्द बदलला तरी परत दोन दिवसांनी तसेच होते.यावर काही उपाय ??

what is the best method for calculating maintainace charges in a society with unequal flat area? Is their any government rule about it? because my society members forcing me to pay equal maintainance charges. i.e. member with 250 sqf area is paying equal charges that of a member with 800 sqf flat area. Is this a correct way of calculating maintainance? Because, according my knowledge this Flat Monthly Fee method is applicable to only those societies where apartments are of the same size (Sq. ft).please give me direction.

नमस्कार Tabla

आपले प्रश्न आपण माहिती हवी आहे या ग्रुपमध्ये विचारू शकता. मदतपुस्तिकेतला हितगुजच्या कोणत्याही ग्रूपमधे नवीन "गप्पांचं पान", "लेखनाचा धागा", "कार्यक्रम" किंवा "नवीन प्रश्न" कसा सुरू करायचा? हा धागा एकवार नजरेखालून घाला.

धन्यवाद.

दोन गोष्टी -
१. गानभुली सदरात "आज अंतर्यामी भेटे" (http://www.maayboli.com/node/2459) ह्या लेखाची लिन्क दिसत नाहीये. ती घालता येईल का?
२. तसच अजून एक लेख जो मी जुन्या मायबोलीवर लिहिला होता, तो इथे गानभुलीच्या सदरात हवाय. तो मी मुळात इथे आणलाय का नाही हेच कळत नाहीये. माझ्या रेकॉर्ड्स (??) प्रमाणे तो इथे पब्लिश झालाय. पण मला तो माझ्या "लेखन" सुचीत दिसत नाहीये.
लेखाचं नाव आहे - "तुझे गीत गाण्यासाठी".
काही मदत मिळू शकेल का?
कळीचा प्रश्नं - हा लेख नवीन मायबोलीवर प्रसिद्धं झाला होता का?

मदत समिती,

ही जी वर बोल्ड, आयटॅलिक्स, मराठी/इंग्रजी इ. बटणे आहेत ती दाबल्यावर स्क्रीन बदलून एडिट मोड मध्ये जातो. बोल्ड वगैरे काही होत नाही. मला इंग्रजी अक्षरेही टाईप करता येत नाहीयेत. कारण काय असावे?

खरंतर बरेचदा लेख कॉप्युटरच्या डाव्या बाजूच्या चौकटीला एकदम चिकटून उघडले जात आहेत. मग रीफ्रेश केल्यावर समास सोडला जातो. हे असं आताआताच होऊ लागयल. आधी सगळं बरं चाललं होतं.

जरा प्लीज मदत करा.

मी आज एक कविता post केली. वर माझे नाव आहे.पण openकेल्यावर कानोकानी असे शीर्षक येऊन प्रतिसादकाच्या नावावर कविता दिसते असे का? कवितेचे नाव "तू".

Group हा शब्द कसा लिहावा? ग्रुप कि गृप ?? मला 'गृप' हा बरोबर वाटत होता कारण जसे 'नृत्य, वक्तृत्व, गृह'
मायबोलीमदत पुस्तिकेत हाच शब्द्द दोन स्वतंत्र वाक्यात र्‍हस्व आणि दिर्घ दिसतोय असं का?? संदर्भासाठी मी त्याची इमेज अ‍ॅड करतेय.
group.jpg

Pages