मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

नमस्कार. आपल्या "हितगुज-गावानुसार" मधे, हॉंगकॉंग मधले मायबोलीकर असा ग्रुप नाही. हॉन्गकॉन्ग मधे कुणी मायबोलीकर असतिल तर मला कसं कळू शकेल? तिथल्या मायबोलीकरांची सुची देऊ शकाल तुम्ही मला, प्लीज?

सर्च बॉक्स मधे देवनागरी मधे काही पण लिहून शोधल की सर्च पान रिकाम येत आहे. आधी जे शब्द शोधले होते आणि रिझल्ट मिळायचे, त्या शब्दांना पण आता पान रिकाम येत आहे.

अदि
हा प्रॉब्लेम काल मला पण आला, कुठलाही शब्द टाकला सर्चबॉक्समध्ये तरी नंतर पूर्ण रिकामे पान येत होते. मला वाटले की हा माझ्या ब्राऊझरचाच प्रश्न आहे.

हा प्रॉब्लेम काल मला पण आला, कुठलाही शब्द टाकला सर्चबॉक्समध्ये तरी नंतर पूर्ण रिकामे पान येत होते. मला वाटले की हा माझ्या ब्राऊझरचाच प्रश्न आहे. >> रुनी +१
मला आजही हाच प्रॉब्लेम येतोय रेसिपी शोधताना.

मला पण आधी ब्राऊसर वर शंका आली, मग मी कुकीझ आणि इतर गोष्टी साफ केल्या, तरी काहीच मिळत नाही!
घरातले रताळ सडायच्या आत सुरू झाल तर बर होईल Happy

रताळे शोधत असाल तर हे घ्या.
मदतपुस्तिकेत पाककृती कशा शोधाव्यात यावर एक आख्खे पान आहे ते पण एकवार बघून घ्या.
मायबोलीवरील आहार व पाककृती विभागात पाककृती कशा शोधाव्यात.

उत्तरे सापडायची पूर्वी... Happy

हे पाककृतींचं झालं. बाकीच्याचं काय? खालचा सर्च चालत नाही. रिकामे पान येते आहे ते पण एकवार बघून घ्या.
धन्यवाद!

सर्च चालू झालेला दिसतोय.
रेसिपी सर्चमध्ये फोटो वगैरे येत आहेत. वा वा..

पानाच्या शेवटी एक आयत दिसतो, त्यात लिहायचे. त्यापुढे एक 'Search' button होते ते गायब आहे. पण त्यात लिहून enter प्रेस करा. चालते.

search.PNG

कांही वेळा ' हे पान तुम्हाला पाहाता येणार नाही ' असा मेसेज येतो त्याचे कारण काय ते समजले नाही.
उदा.-'सावरकर आणी क्रांति' ह्या विषयावर असा मेसेज येतो.

नमस्कार, माझे सदस्यत्व क्लिक केल्यावर आतापर्यंत केलेले लिखाण अर्थात पाऊलखुणा सदर दिसत नाही. कृपया याबाबत मार्गदर्शन करणे.

धन्यवाद
देवनिनाद

देवनिनाद, कृपया पाऊलखुणांची सोय तात्पुरती बंद येथे अधिक माहिती बघावी. काही शंका असल्यास त्या धाग्यावर लिहावे ही विनंती.

धन्यवाद !

कोणत्याही पानाच्या शेवटी हे लेखन आवडलेल्या मायबोलीकरांची संख्या लिहिलेली असते.

हे मायबोलीकर कोण आहेत हे पाहाता येऊ शकेल काय?
त्या ग्रुपमधील समविचारी मायबोलीकर विपुच्या माध्यमातून एकत्र येण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकेल.

मला माझे लेखन सगळ्यांसाठी मोकळे करायचे आहे....फक्त ग्रुप साठी नाही....

कृपया ... सहकार्य करावे...
आणि मला जुने लेखन सुधारून पुन्हा लिहायचे असल्यास जुने लेखन कसे काढावे ह्यासाठी सुद्धा मार्गदर्शन करावे ...

सहकार्य लवकर अपेक्षित....
धन्यवाद.....

ऋतुराज ......

मला माझे लेखन सगळ्यांसाठी मोकळे करायचे आहे....फक्त ग्रुप साठी नाही....

तुम्हाला लेखन 'सार्वजनिक' करायचे आहे असे म्हणायचे असावे, असे मानून, मदतपुस्तिकेतल्या खालील पानावर दिलेली माहिती वाचावी.

हितगुजच्या कोणत्याही ग्रूपमधे नवीन "गप्पांचं पान", "लेखनाचा धागा", "कार्यक्रम" किंवा "नवीन प्रश्न" कसा सुरू करायचा?


आणि मला जुने लेखन सुधारून पुन्हा लिहायचे असल्यास जुने लेखन कसे काढावे ह्यासाठी सुद्धा मार्गदर्शन करावे ...

स्वतःचे जुने लेखन शोधण्यासाठी मदतपुस्तिकेतला हा धागा बघावा.
एखाद्या सदस्याचे (किंवा तुमचे स्वतःचे) सर्व लेखन कसे वाचायला मिळेल?

सुधारण्याकरिता, लेखनावर असलेल्या 'संपादन' दुवा वापरून त्यात बदल करून, सेव्ह करावे.

कालिदास,
मराठी लेखन काँप्युटरवरून करायचे असल्यास, युनिकोड वापरावे लागते. ते कसे सुरू करावे हे या धाग्यावर बघा. मोबाईलवरून करायचे असल्यास , कुठला मोबाईल वगैरे माहिती दिलीत तर मदत करणे सोपे जाईल.

सध्या लॉगआउट झाल्यावर पेज रिफ्रेश करूनही सदस्यनाम दिसत राहतं. तसंच नवीन प्रतिसाद वगैरे दिसतात. पुन्हा लॉग आउट होऊनही फायदा होत नाही..

माझ्या कार्यालयात इंटरनेटसाठी मी एकच विभाग बनवला आहे. ज्या मशिनवर मी मायबोली ओपन करतो तिथेच नंतर कर्मचारीही बसतात. आमच्याकडे मायबोली बरेच जण वापरतात. व्यवस्थित लॉग आउट न झाल्यास मी काय काय काम केलं ते त्यांना सहज उपलब्ध होणार ना ?

काय करायला हवं ?

Pages