मार्केट टॉक - आउटलूक

Submitted by केदार on 27 January, 2010 - 13:28

सेन्सेक्स आज ४९० पाँईटसने घसरला. पुढे काय?

१. २० ऑगस्टला मार्केट पडले पण २१ ला मार्केट गॅपने उघडले (१०४) व सुरु झालेली रॅली ( १४९२१) आक्टो १७ ला १७३२६ ला थांबली. (मध्ये एकदा दोन तीन दिवस पडून १५३९८ लेव्हल ला सपोर्ट घेऊन परत ही रॅली झाली.
२. नंतर तिथून खाली येऊन १५९०४ पर्यंत परत एकदा मार्केट खाली आले. (नोव्हे ३)
३. नोव्हे ३ पासून परत मार्केट वर गेले नोव्हे २५ पर्यंत १७१९८.
४. नोव्ह २७ ला गॅप डाउन ने मार्केट ओपन झाले. ( ओपन १६७१८ , हाय १८७१८, लो १६२१०, क्लोज १६६३२)
५. नंतर साईडवेज कधी वर कधी खाली करत ६ जानेवारीला हायस्ट पाँईट म्हणजे १७२९० ला गेले.

ह्या सर्व डेटाचा टेक्नीकल अ‍ॅनॅलिसिस केला तर बर्‍याच कन्फुझिंग लेवल्स सापडतात. पण नेमका ह्यावेळी मग इतिहास लक्षात घेऊन मागे मार्केट मध्ये काय घडले ह्यावर विचार केला. दर जानेवारीत गेले ५-६ वर्षे मार्केट पडते.

दिड-दोन आठवड्यांपूर्वी मी आणि उपास बोलताना त्याने विचारले की नंतरच्या लेवल्स काय असतील. त्याचाशी बोलताना मार्केट लवकरच खूप पडुन फर्स्ट सपोर्ट लेव्हल १६२०० वर जाईल असे सांगीतले होते. तेंव्हा मार्केट १७,७०० च्या आसपास होते, व १६,२०० कुठेही बोर्डवर येतील असे दिसत नव्हते. पण आज मार्केट १६,२८९ ला आहे.

उद्या एक्सापरीचा गुरुवार असल्यामुळे त्याचाही परिणाम होणार.

पुपुवर गेल्या आठवड्यात लिहीले होते की पैसे गोळा करा. आता ती वेळ येऊ घातली आहे. कालचा फॉल १६,२०० ला टच झाला नाही म्हणजे ह्या सपोर्ट लेव्हल तो थांबेल का? हे पाहायला आणखी दोन तीन दिवसांची गरज आहे पण इथे जर लगेच सपोर्ट मिळाला नाही तर नंतरचा सपोर्ट साधारण १५,३०० ते १५,५०० आहे असे वाटते.

पैसे असतील तर अनेक चांगले सेक्टर्स - मेटल्स, इन्फ्रा आणि फार्मा हे चांगले वाटत आहेत, जर अजून खाली घसरले तर नक्कीच ह्यात नक्कीच गुंतवणूक करायला सुरु करावी.

* हे सर्व माझे अंदाज आहेत, जे चुकीचेही असू शकतात. (असतात) आपले पैसे निट विचार करुन गुंतवा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निकिता,
मला ICICI वर TATAMOTORS सापडत नाही अरेरे..अगदिच ढ प्र्श्न पण खरच सापडत नाहीय.

TELCO असे शोधा म्हणजे सापडेल.

आम्हाला कॉफी च आवडते! >> Lol तुम्ही लोकं लिहा कुठला हवा आहे ते, मग मी त्याची कुंडली मांडेन. Happy

पण इथे जे मी ट्रेड साठी लिहले आहेत ते गुंतवणूकीसाठी चांगले आहेत. सहसा ट्रेड करताना माझा मुख्य नियम असा आहे की, त्या स्टॉकच्या सर्व लेवल्स मला माहिती हव्यात, आंधळेपणाने मी खूप वर्षांमागे एकदा टिळकनगर इंडस्ट्रीला (ड दर्जा) तिलक लावून बसलो होतो, पण फायदा शून्य, उलट नुकसान झाले, तेंव्हापासून घ्यायचा असेल तर सर्व माहिती काढल्याशिवाय घेत नाही. ( एक अनुभव इथे लिहावा वाटला म्हणून लिहिला. Happy ) पण माझे गुंतवणूकीचे आणि ट्रेडचे स्टॉक कधीकधी वेगळे असतात.

टाटा मोटर्स, ओरियन्टल, लार्सन, मारुती, रिलायन्स हे मात्र दिर्घ कालासाठी ठेवणार. टाटा पुढच्या तिमाहीत ११०० च्या पुढेच असेल असे वाटते.

मास्तुरे - बघून इथे लिहितो.

ह्या स्टेज ला IT वा Metal मध्ये एन्ट्रि करणे योग्य आहे का >> गुंतवणूक म्हणूक नको, ट्रेड करण्यासाठी ठिक आहेत. एकदा मार्केट थोडेसे पडले की परत गुंतवणूक करता येईल. ( थोडे म्हणजे निदान २०० पाँईट्सने ) स्टर्लाईट कडे बघा. सेसा गोवा मात्र अजूनही गुंतवणूक म्हणून चांगला आहे.

ह्या स्टेजला कुठलिही दिर्घकालीन गुंतवणूक करु नका. मी देखील करत नाही. उलट काल मी माझ्याकडचे भारती टेलकॉम ( जे मी इथे फेब मध्ये घ्या म्हणून लिहले होते) ते २८ टक्के नफ्यात काढले. थोडा फायदा बुक करत राहा. जर ट्रेन्ड बदलला तर असेलेला फायदा निघून जायचा. विकने फार अवघड!!

शॉर्ट टर्म ट्रेन्डचा (ट्रेड नाही) फायदा घ्यायचा असेल तर मिनिनिफ्टी MNIFTY ज्याचे २० भाग असतात, त्याला ट्रेड करता येईल. म्हणजे ट्रेन्ड जसा असेल तसे विकता / वा विकत घेता येईल. फारतर आपण ऑप्शन घेऊ म्हणजे सगळ्यांनाच कमी पैशात, थोडा कमी पण ट्रेन्डचा फायदा होईल असे बघू शकतो.

.
थोडे भविष्याविषयी :

मेटल्स व इन्फ्रास्टॉक्स ह्या दिर्घकालाच्या म्हणजे १ ते ३ वर्षेच्या बेटस आहेत. भारत जोमाने वाढतोय, ८.५ टक्यांची ग्रोथ आहे, पुढच्याही वर्षी राहणार पण आपले रस्ते, सुविधा बघितल्या का? त्या आजही शून्य आहेत, मग ह्या सुविधा व्ह्यायला काय लागणार? तर मेटल्स आणि इन्फ्रा. म्हणून आजपासून पुढची पाच वर्षे पण हे स्टॉक नुसते घेउन ठेवले तरी तोटा होणार नाही. ह्या लाँग टर्म बेटस आहेत. मला २००४ मधील औंध आठवते, तिथे घर घेताना मला सगळ्यांनी "नको" असे सांगीतले होते कारण तिथे धड रस्ते पण नीट नव्हते, आज औंध ही हॅपनिंग प्लेस आहे. तसेच काहिसे मेटल्स, इन्फ्राचे आहे, भारतात आता रस्ते व्हायला सुरुवात झाली आहे, मोठ मोठी धरण पण बांधली जात आहेत, त्या सर्वांसाठी इन्फ्रा कंपन्यांकडे कॉन्ट्रॅक्टस आहेत, त्याला मेटल पण लागणार, ह्याचा फायदा आपण नाही घेणार तर कोण? ऑफकोर्स पण वेळोवेळी फायदा बुक करायला हवाच. मार्केट पडल्यावर मी ह्या दोन्ही सेक्टरचे चांगले स्टॉक्स इथे परत लिहीन. लार्सन, भेल तर ठेवाच. Happy

केदार
१. मार्केट ने जर ५८२० पर्यंत करेक्शन केले तर मिनी निफ्टि लॉंग करावा का?
२. करेक्शन न करता ५९३० दाखवले तर शॉर्ट करावा का? आणखी ऑलटरनेटिव्ह म्हणजे त्या लेव्हल ला ऑक्टोबरचा ५९०० चा पूट घ्यावा का?

सुरेश कालचा व्हॉल्युम बघता Index Futures 685381 19134.23 करोड, कॉल पुट रेशो १.०२ मार्केट तेजी मध्ये अजून आहे. आज जर व्हॉल्युम साथ मिळाली नाही तरच वेगळे काही तरी होण्याची शक्यता आहे. आज जर लो व्हॉल्युम किंवा जास्त पुट लिहले गेले तर ट्रेन्ड कदाचित चेंज होऊ शकतो. पण तो पर्यंत निफ्टी वर लाँग जायला काहीच हरकत नाही. शिवाय अमेरिकन मार्केट वर गेले आहे, सध्या तरी तिथे रिव्हर्सल नाही, म्हणजे ग्लोबल क्युज + आहेत.

शॉर्ट मध्ये आत्ता पडू नका. कारण नियम दोन - ऑलवेज ट्रेड विथ ट्रेन्ड Happy पहिल्या दिवशी रिव्हर्सल झाले तर मग शॉर्ट करायचे कारण मग ट्रेन्ड बदलायला सुरु होते. जर ट्रेन्ड बदलला तर मी पण जोरात शॉर्ट मध्ये असेन. Happy

हेज स्ट्रॅटेजी वर थोड्या वेळात लिहतो.

केदार,
धन्यवाद! भविष्य कथन मस्तच! जबरदस्त इनसाईट आणी व्यासन्ग!!
तुम्ही जे काही लिहिता त्यातुन महत्वाचे इनपुट्स मिळतातच!
बाकी भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल असे आशादायक वाचले की बरे वाटते!

केदार
ACC चार्ट वर चांगला वाटतोय. क्लोझ ९६६ आहे, एन्ट्री करावी का? आइडियल प्राइस जुन ला ७०० होती. पण तो भुतकाळ.
२०११ मला वाटते त्यांचे ७५ वे वर्ष आहे. कदाचीत बोनस???

केदार
इतर पोस्टचा तू track कसा ठेवतोस ते माहीत नाहि म्हणून येथे लिहितो.
ह्या मार्केटचा रेफरन्स घेवुन टेक्निकलचा ३ रा धडा लिहिणार का?
वीकली कॉलमचे काय? जरा मनावर घेणार का?
कालचा व्हॉल्युम बघता Index Futures 685381 19134.23 करोड, कॉल पुट रेशो १.०२ मार्केट तेजी मध्ये>>>>
हा डेटा कुठे सापडेल?

केदार
United Bank आणी Ashok leyland बद्दल तुम्हाला काय वाटते?
अजुन वर जाण्याची शक्यता आहे का?
current price ला घेतले तर चालतील का?

सतीश
सुरेश >>>>शॉर्ट चे सिग्नल आढळले तर लिहि.
गेले चार दिवस Hourly MACD फॉलींग आहे. तेंव्हा वर जाण्यावर थोडा लगाम आला आहे. ६००० ला जोरात पोहोचायला कदाचीत रिलायन्सचा धक्का लागेल??
अजुन तरी खरे शॉर्टचे सिग्नल नाहीत.

ह्या मार्केटचा रेफरन्स घेवुन टेक्निकलचा ३ रा धडा लिहिणार का? >>> हो. थोडा बिझी असल्यामुळे लिहायचा राहून जात आहे.

वीकली कॉलमचे काय? जरा मनावर घेणार का? << हो. Happy नक्कीच.

हा डेटा कुठे सापडेल? >> http://nseindia.com/ वर F & O मध्ये. इथे बराच डेटा असतो.

Ashok leyland >> ऑलरेडी पिकवर आहे असे वाटत आहे. निदान ७० टक्के प्रॉफिट बुक करावा असे माझे मत. पण ते चुकीचे असू शकते.

युनायटेड बँक >> १२० पर्यंत जाईल असे वाटते. गेल्या काही दिवसातील रन बघता सहज शक्य आहे. पण कालचा दिवस इनसाईडचा होता त्यामुळे नीट सांगन्यासाठी आजची वाट पाहावी लागेल.

current price ला घेतले तर चालतील का >> नको. आत्ता त्यां दोघांचीही स्टिम संपली आहे. मार्केट जर पडले तर युनायटेड वगैरे सरळ खाली येतील, त्यामुळे नका घेऊ.

श्रेणुज अ‍ॅण्ड कंपनी - ह्या वर्षी मस्त परतावा. पुढच्या वर्षी पण चांगली ग्रोथ दिसत आहे, कारण डायमंडस आर फॉर एव्हर. Happy टेक्नीकल्स वर तो सध्या सपोर्ट लाईनवर तग धरुन आहे. ब्रेक कधी होईल ते सांगता येत नाही. पण ५८ ते ६० लेवल पुढच्या तिमाहीत सहज येईल असे वाटते. एकच प्रॉब्लेम मला वाटला तो म्हणजे कॅश फ्लोचा. पण सध्या ग्रोथ भरपुर असल्यामुळे तो एवढा मोठा वाटत नाही. गेले चार-पाच वर्षे १० ते ११ टक्यांच्या मार्जिनवर नफा आहे, तो पुढिल वर्षीही राहील असे नक्कीच वाटते. घ्यायला हरकत नाही, पण हा स्टॉक मेगा वा मल्टी बॅगर नाही, तो मार्केट परफॉर्म मात्र करेन. इथून पुढे १०-१२ टक्के रिटर्नस सहज शक्य आहेत.

केदार,

श्रेणुजच्या अ‍ॅनालिसिसबद्दल मनापासून आभार. तुमच्या टिप्स व माहिती खूपच उपयुक्त असते.

Long होण्याकरिता मला risky वाटते >>> सतीश सध्यातरी नो वरीज. (अजून दोन -तीन सेशन) स्टाँग मार्केट विथ स्ट्राँग सेंटीमेंट.

अती महत्वाचा रुल म्हणजे मार्केट हे लॉजीक वर नाही सेंटीमेंटवर चालते. जो पर्यंत सेंटीमेंट (मुड) बदलत नाही तो पर्यंत काही प्रॉब्लेम नाही.

मी निफ्टीवर लाँग आहे, पण काळजीपूर्वक, म्हणजे रोज इंडिकेटर्स चेक करत. मागे रिलायन्स बद्दल लिहले होते की रिलायन्समुळे निफ्टी ड्रॅग होत आहे, गुरुवारी आणि काल दोन्ही दिवशी रिलायन्स २२-२४ ने वर गेला आणि त्यामुळे निफ्टी पार १०० पाँईटस, हे दोन दिवस माझ्यामते रेकॉर्ड मध्ये नक्कीच जातील. रिलायन्स १०५५५ ते ६० च्या रेंज मध्ये जाउ शकतो. त्यामुळे निफ्टी अजून ५० पाँईट आज उद्यात मध्ये कव्हर करेल. ग्लोबल (म्हणेज अमेरिकन! ) सेंटीमेंट एकदम मस्त आहे. त्यामुळे परत एकदा मार्केट वरच जाईल. शिवाय १५ तारखेच्या आसपासच ( दोन तीन सेशन अगोदर) इन्फा सेक्टर ने अजून भाग घेतला नाही असे लिहले होते, तेंव्हा लार्सन १९०० वर होता, आज १९९८, त्यामुळे तिकडूनही थोडा पुश मिळत आहे.

सप्टेबरच्या सुरुवातीला मी सप्टेंबर मार्केटसाठी चांगला नसतो हे लिहले होते, पण हा सप्टे मात्र नेमका उलटा निघाला, अपवादासारखा!

पण एकदाका २३ गेली (म्हणजे सप्टे एक्सपायरी) की चित्र पालटेल असे मला उगीच वाटत आहे, व्हिक्स २१ वर आणि निफ्टी पिई २५.२५ म्हणजे रेकॉर्ड ब्रेक (गेल्यावेळी २४ च्या थोडासा वर) म्हणजे मार्केट ओव्हरब्रॉट आहे. पडायला पाहिजे, तरच दिवाळी वा डिसेंबर मध्ये परत वर जायला वाव, माझ्यामते बबल फॉर्म व्हायला ५६०० नंतर सुरुवात झाली, केवळ सेंटीमेंटमुळे मार्केट खूप वर जात आहे व परत अर्निंग्स जस्टिफाय करायच्या असतील तर मार्केट ५६००-७०० रेंज मध्ये यायला हवे. नाहीतर बबल फॉर्मेशन चालूच राहिल व जानेवारी किंवा फेब २०११ मध्ये परत एकदा निफ्टी १२- १५ टक्याने कोसळेल. अजून बबल बद्दल कोणी बोलले नाही, ही माझी शंका आहे, चुकीची असू शकते. इंडिजिनस ग्रोथ असल्यामुळे आपण इतर देशांच्या तुलनेत फार लवकर रिकव्हर झालो. ५३०० व ५४७५ लेवलला जसे मस्त कन्सॉलिडेशन होते तसे ५६-५७०० नंतर झाले नाही, त्यामुळे मार्केट मेकर्स मार्केट पाडणार यात शंका नाही.
शिवाय मार्केट १०० पाँईटनी पडले व तुम्ही लाँग असला तरी हरकत नाही कारण पडल्यावर शॉर्ट कव्हर रॅली (निदान २० ते ४० पाँईटची) सुरु होईल, तेंव्हा बाहेर पडता येईल. त्यामुळे गो लाँग विथ कॉशन, आणि पोझिशन्स असल्या तर अजिबात विकू नका, ठेवा. पडल्यातरी शॉर्ट रॅली आहेच.

एक्स्पायरीवर लक्ष ठेवा ( रादर एक्स्पायरी पर्यंतच्या प्रत्येक दिवशी मार्केट कडे बारिक नजर असायला हवी. तिथे कदाचित सेंटीमेंटमध्ये बदल होऊ शकतो.

केदार
>>>>
पण एकदाका २३ गेली (म्हणजे सप्टे एक्सपायरी) की चित्र पालटेल >>>>????
सप्टे एक्सपायरी ३० ला आहे...........

अरे सॉरी. तुझे बरोबर ३० पाहीजे. मी कॅलेन्डर पाहताना ३० ला बुधवार समजत होतो. पण पुढचे तीन - चार सेशन्स महत्वाचे ठरतील.

केदार
प्रथम धन्यवाद. विश्लेषणाबद्दल.
मी निफ्टीवर लाँग आहे, पण काळजीपूर्वक, म्हणजे रोज इंडिकेटर्स चेक करत?>>>
कुठले इंडिकेटर्स व कुठे बघतोस? May be dumb question.

MACD, निफ्टी व्हॉल्युम, डेली, विकली चार्ट, PE, कॉल पुट रेशो, निफ्टी प्रेशर पाँईट्स (जे मी वर चार्ट मध्ये मांडले होते), विक्स व डेली वोलटॅलिटी, मार्केट अ‍ॅक्टीविटी रिपोर्ट.

बरेच nseindia वर आहेत.

६००० आणि २०,००० साठी अभिनंदन. तिथे प्रेशर येउन मार्केट काही काळासाठी खाली गेले पण परत वर चढत आहे.

रॅनबॅक्सी शॉर्ट टर्म फ्युचर्स गेन साठी खूप चांगले वाटत आहे. टाटा मोटर्स १०३५ ते १०७० पर्यंत आला आहे, १०७० ब्रेक झाल्यावर नक्कीच सब ११००. सेसा गोवा ने ३३० रेंज ब्रेक केली आहे, त्यामुळे पुढची रेंज नक्कीच चांगली राहिल मे बी सेसा गोवा वर जायला सुरुवात होईल.

केदार
खूपच छान माहिती देत आहात.
सीएमसी आता घ्यावा काय(१९१०-१९२० आज आहे.). TCS घेणार अशा बातम्या आहेत.

TCS घेणार अशा बातम्या आहेत. > CMC २००१ मध्ये TCS ने घेतली आहे. Happy

मी टाटा मोटर्स ११०० साठी लाँग जायला सांगीतले होते, आज ११०९ वर जाउन सध्या ११०० वर आहे. स्वेअर ऑफ करा. Happy

Pages