सेन्सेक्स आज ४९० पाँईटसने घसरला. पुढे काय?
१. २० ऑगस्टला मार्केट पडले पण २१ ला मार्केट गॅपने उघडले (१०४) व सुरु झालेली रॅली ( १४९२१) आक्टो १७ ला १७३२६ ला थांबली. (मध्ये एकदा दोन तीन दिवस पडून १५३९८ लेव्हल ला सपोर्ट घेऊन परत ही रॅली झाली.
२. नंतर तिथून खाली येऊन १५९०४ पर्यंत परत एकदा मार्केट खाली आले. (नोव्हे ३)
३. नोव्हे ३ पासून परत मार्केट वर गेले नोव्हे २५ पर्यंत १७१९८.
४. नोव्ह २७ ला गॅप डाउन ने मार्केट ओपन झाले. ( ओपन १६७१८ , हाय १८७१८, लो १६२१०, क्लोज १६६३२)
५. नंतर साईडवेज कधी वर कधी खाली करत ६ जानेवारीला हायस्ट पाँईट म्हणजे १७२९० ला गेले.
ह्या सर्व डेटाचा टेक्नीकल अॅनॅलिसिस केला तर बर्याच कन्फुझिंग लेवल्स सापडतात. पण नेमका ह्यावेळी मग इतिहास लक्षात घेऊन मागे मार्केट मध्ये काय घडले ह्यावर विचार केला. दर जानेवारीत गेले ५-६ वर्षे मार्केट पडते.
दिड-दोन आठवड्यांपूर्वी मी आणि उपास बोलताना त्याने विचारले की नंतरच्या लेवल्स काय असतील. त्याचाशी बोलताना मार्केट लवकरच खूप पडुन फर्स्ट सपोर्ट लेव्हल १६२०० वर जाईल असे सांगीतले होते. तेंव्हा मार्केट १७,७०० च्या आसपास होते, व १६,२०० कुठेही बोर्डवर येतील असे दिसत नव्हते. पण आज मार्केट १६,२८९ ला आहे.
उद्या एक्सापरीचा गुरुवार असल्यामुळे त्याचाही परिणाम होणार.
पुपुवर गेल्या आठवड्यात लिहीले होते की पैसे गोळा करा. आता ती वेळ येऊ घातली आहे. कालचा फॉल १६,२०० ला टच झाला नाही म्हणजे ह्या सपोर्ट लेव्हल तो थांबेल का? हे पाहायला आणखी दोन तीन दिवसांची गरज आहे पण इथे जर लगेच सपोर्ट मिळाला नाही तर नंतरचा सपोर्ट साधारण १५,३०० ते १५,५०० आहे असे वाटते.
पैसे असतील तर अनेक चांगले सेक्टर्स - मेटल्स, इन्फ्रा आणि फार्मा हे चांगले वाटत आहेत, जर अजून खाली घसरले तर नक्कीच ह्यात नक्कीच गुंतवणूक करायला सुरु करावी.
* हे सर्व माझे अंदाज आहेत, जे चुकीचेही असू शकतात. (असतात) आपले पैसे निट विचार करुन गुंतवा.
धन्यवाद सुरेश१.
धन्यवाद सुरेश१.
केदार State Bank च्या २८००
केदार
State Bank च्या २८०० पूट चे काही केलेस का?
सोन आणी चान्दी विकत ghyayachi
सोन आणी चान्दी विकत ghyayachi aasel tar End of Thursday (India time) vikat ghya, from friday it will shoot up.
केदार काल एक बातमी वाचली. Jin
केदार
काल एक बातमी वाचली. Jin Miekha नावाच्या अॅनॅलिस्टने चार्टवर Hindenburg Omen नावाचे फॉरमेशन दिसले म्हणून सप्टेंबरला US मार्क्रेट कोसळेल असे भाकित केले आहे. हे फॉरमेशन कसे आहे हे माहित नाही.
जर हे खरे ठरले तर निफ्टी माझे Q3 चे ५०९५ हे टार्गेट दाखवू शकतो. साधारण १०% फॉल. अजुन पूर्ण १ महिना बाकी आहे. बघुया!!
त्या फॉर्मेशनला व्हायला एक
त्या फॉर्मेशनला व्हायला एक पॅटर्ण असतो, तो मागच्या आठवड्यात आला, पण त्यात मेख अशी आहे की सलग दोन आठवडे NYSE वर नव्हते त्यामुळे त्याची किती शक्यता आहे हे माहित नाही. १९३६ पासून आजपर्यंत जेंव्हा जेंव्हा हा पॅटर्ण आला आहे, तेंव्हा मार्केट पडले आहे हे देखील नाकारता येत नाही.
पुट अजून आहे. निफ्टी काल पडले, आणखी एक दिवस पडले तर बॅन्क स्टॉक अंडर प्रेशर येतील असा माझा अंदाज आहे. बघू काय होते.
मला रिलायन्स शॉर्ट टर्म ट्रेड साठी (फ्युचर्स) चांगले वाटत आहे. मार्केट जर वर गेले तर १०२० साठी मी रिलायन्स मध्ये पोझिशन घेईन. कारण आता मार्केटला वर जायला जागा नाही, रिलायन्सला हालावेच लागणार, तो भरपुर कन्सॉलिडेट झाला आहे, म्हणून एक अपमुव्ह होईल असे वाटते.
केदार, सध्या विचित्र
केदार,
सध्या विचित्र परिस्थिती आहे. बाजार १-२ दिवस थोडा वर जातो व नंतर १-२ दिवस थोडा खाली येतो. A ग्रुपमधले बरेचसे शेअर्स फार वरखाली झालेले नाहीत. परंतु mid-cap व small cap मधले शेअर्स मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. ही बहुतेक मार्केट क्रॅश होण्याची चिन्हे आहेत.
केदार धन्यवाद. मला रिलायन्स
केदार
धन्यवाद.
मला रिलायन्स शॉर्ट टर्म ट्रेड साठी (फ्युचर्स) चांगले वाटत आहे. मार्केट जर वर गेले तर १०२० साठी मी रिलायन्स मध्ये पोझिशन घेईन.>>>>
शॉर्ट टर्म ट्रेड म्हणजे एक दिवसासाठि का? का घेतल्या वर टार्गॅट येइ पर्यंत.?
अजून मी स्टॉकच्या फ्युचर मध्ये कधी पोझीशन घेतली नाही. पण जमेल तेंव्हा बाफ वर टाकत जा. एक दोन वेळा पेपर वर्क करुन ते पण चालू करेन.
मी मिनी निफ्टी ५५०० ला घेतला आहे. ५४३२ ला विकलि EMA6 चा स्ट्राँग सपोर्ट आहे. ५४५० ला आणखी २ घेइन. ५५४५ परत एकदा दाखवेल से वाटते. तो तोडला तर ५६०० करू शकतो. Q3 चे वरचे टार्गेट ५६१८.
chayachi>> please change this
chayachi>> please change this word to ghyayachi
केदार, अप्पर ग्यांजेस शुगर ची
केदार, अप्पर ग्यांजेस शुगर ची कुंडली बघशील का? - लौग टर्म बल्क डील करिता.
अप्पर ग्यांजेस - सपोर्ट
अप्पर ग्यांजेस - सपोर्ट ४७-४८ च्या लेवल मध्ये, रेसिस्टन्स आधी ५४-५५ नंतर फर्म ६०. मे पासून फक्त दोनदा त्याने ६० ला टेस्ट केले आहे, तिथून परत तो वापस आला. त्यामूळे ५४-५५ रेंज हवी असेल तर घ्यायला हरकत नाही, गेल्या डिसेंमध्ये त्यांनी प्रति शेअर १.२ डिव्हिडंड दिला व आताही ते डिव्हिडंड द्यायचा विचार करत आहेत. पण मला त्यांचे फायनान्शिअल्स कुठे बघायला मिळाले नाहीत. ४९ + 1 (Div) + ३,४ र टारगेट (५४) असे ठेवले तर काहीच हरकत नाही.
स्ट्रिक्ट स्टॉपलॉस ४५ टेवा. म्हणजे तिथून पडायला लागला तर नुकसान मर्यादित होईल.
फायनान्शिअल्स: http://www.bse
फायनान्शिअल्स:
http://www.bseindia.com/xml-data/corpfiling/announcement/Upper_Ganges_Su...
मग हे डिव्हिडंड कुठल्या बेस
मग हे डिव्हिडंड कुठल्या बेस वर देत आहेत? साखरेची किंमत फक्त २० सेंटने इंटरनॅशनल मार्केट मध्ये वाढली आहे, त्याचा फायदा भरपुर होईल असे काही वाटत नाही.
तरी एन्ट्री घ्यायची असेल तर ४५ वर स्टॉप लॉस ठेवा.
बहुतेक मार्केट क्रॅश होण्याची चिन्हे आहेत >> मास्तुरे, ५३७० च्या खाली गेले तर कन्फर्म डाउन ट्रेन्ड. पण तो पर्यंत काही बोलने अवघड आहे.
टोटल नंबर share : ६००००००,
टोटल नंबर share : ६००००००, जर ६०००० घेतले तर १%, आणि ते रीयल इस्टेट मधे येणार आहे, hidden value आहे म्हणतात, माझी research चालु आहे.
केदार, मी तेच विचारणार होते ,
केदार, मी तेच विचारणार होते , माझा ब्रोकर म्हणत होता की करेक्शन येण्याची शक्यता आहे , तेव्हा कोणते शेअर्स कुठल्या लेव्हलला घ्यायला सुरु करावेत - ICICI bank , L & T , RIL , SBI , Tata Motors
बॅक ऑफ बरोडा मी ७१५ ने घेतले
बॅक ऑफ बरोडा मी ७१५ ने घेतले होते. आता ८३५ला आहे. अजुन वर जाईल काय??
केदार, L&T घेत रहावा काय?
केदार,
L&T घेत रहावा काय? माझ्याकडे १८१५ ला घेतलेले २० आहेत .घ्यावेत का अजुन?
Suzlon च नक्कि काय होतय? सतत पडतोच आहे..काय कराव?
>>> Suzlon च नक्कि काय
>>> Suzlon च नक्कि काय होतय?
सुझलॉन बद्दल अनेक विश्लेषकांनी प्रतिकूल अभिप्राय दिलेला आहे (Negative Outlook). हा शेअर बराच काळ वाढण्याची शक्यता नाही. किंबहुना तो ४०-४५ पर्यंत खाली येऊन नंतर बराच काळ फारसा वाढणार नाही. केदार व सुरेश सारखे जाणकार याविषयी अधिक भाष्य करू शकतील.
मास्तुरे केदार व सुरेश सारखे
मास्तुरे
केदार व सुरेश सारखे जाणकार याविषयी अधिक भाष्य करू शकतील.>>>
तुम्ही मला नारळावर चढवताय.
केदारची क्षमा मागून. ह्या गल्लीचा गुंड केदार आहे व तसेच राहूदे. मी आपला ४ बुक शिकलेला आहे. ती फक्त टेक्निकलची. जोक असाइड. ह्या वर लिहिणार्या केदार व इतरांमुळे. मला पण खुप फायदा होत आहे. आर्थिक व ज्ञानाचा.
मला ग्राफ पाहून उमजेल ते मी लिहिनच. उद्या L N T va Suzlon चे बघेन. पण केदार नक्किच बिनचूक सांगेल.
Moneycontrol वरील
Moneycontrol वरील विश्लेषकांचे सुझलॉन वरील काही Opinions -
http://www.moneycontrol.com/news/stocks-views/stay-awaysuzlon-energy-suk...
http://www.moneycontrol.com/news/stocksviews/suzlon-energy-may-go-to-rs-...
http://www.moneycontrol.com/news/stocksviews/suzlon-energy-may-slip-to-r...
http://www.moneycontrol.com/news/stocksviews/rahul-mohindar-negative-suz...
http://www.moneycontrol.com/news/stocksviews/recovery-not-seen-suzlon-en...
http://www.moneycontrol.com/news/stocksviews/avoid-suzlon-energydipan-me...
गल्लीचा गुंड केदार आहे >>
गल्लीचा गुंड केदार आहे >>
आता गुंडही म्हणवुन घ्यावे लागणार.
तेव्हा कोणते शेअर्स कुठल्या लेव्हलला घ्यायला सुरु करावेत >>> बँकींग व फार्मा लोड करा. मागे जानेवारीत पण मी हे सेक्टर सांगीतले होते. १०० टक्यांपेक्षा जास्त रिटर्नस मिळाले आहेत. तुम्ही लिहलेले सर्व शेअर्स मी घेईन. सोबत ओरियन्टल बँक, लुपिन, सिप्ला, टायटन, HDFC हे हेविवेट पण घ्यावेत.
लार्सन - कन्सॉलिडेट झाला / होतो आहे. १७०० लेवल एकदा टेस्ट करायला हवे म्हण्जे कन्फर्मेशन होईल. वाट पाहा मार्केट पडले तर तिथेच येईल तो.
Suzlon च नक्कि काय होतय >> तो ४५ च्या खाली जाईल असे दिसतेच आहे. त्याचे कारण चार्ट नाही तर फंडामेंटल आहे. मार्च २०१० मध्ये कंपनीला लॉस झाला. मार्च ९ मध्ये पण होता, पण ह्यावेळी कंपनीची स्थिती फार आशादायक नाही. एकुण २००० मेगा वॅट पेक्षा जास्त विज विकली तरच ही कंपनी ब्रेकइव्हन होईल, त्याची शक्यता अजिबात दिसत नाही, शिवाय गेल्या वर्षी रॉ मटेरियल च्या किमती वाढल्या, त्यामुळे भविष्यात जर जास्त विज निर्माण करुन विकली नाही तर ही घसरण चालूच राहिल. मागच्या वर्षी निदान ही कंपनी कॅश प्रॉफिट मध्ये होती. ( पॅट + घसारा इ इ) पण ह्यावषी कॅश लॉस मध्ये असल्यामुळे घसरण आहे. येत्या वर्षात जर आणखी ५००+ मेगावॅट विज उत्पादन केली तर कदाचित ब्रेक इव्हन होईल.
जर ४० च्या आसपास आला तर घ्यायला हरकत नाही, फंडामेंटल साठी नाही, तर रिव्हर्सल बाउन्स बॅक साठी. त्यात थोडा फायदा होऊ शकतो. पण सुझलॉन माझ्या लिस्ट वरुन ७० च्या खाली गेल्यावर मी काढून टाकला. मुख्य कारण वर दिले आहे.
केदार, आलोक इंडस्ट्रीजला काही
केदार,
आलोक इंडस्ट्रीजला काही भवितव्य आहे का? सध्या आणि गेले बरेच महिने तो २० ते २१ च्या दरम्यान घोटाळत आहे. वसंतराव पटवर्धन गेली अनेक वर्षे का शेअर रेकमेंड करत होते. पण तो २०-२१ या रेंजमधून हालतच नाही.
मास्तुरे, आलोक इंडस्ट्रीज खरे
मास्तुरे,
आलोक इंडस्ट्रीज खरे तर वर जायला हवा. मागच्या तिमाहीत ४५ टक्यांनी नफा वाढला आहे, तो वाढत नाही कारण त्यांचावर असलेले २४ मि डॉलरचे कर्ज. पण मे मध्ये त्यांनी त्याला शेअर्स मध्ये रुपांतरीत करुन घेतले व हे टायप एका अमेरिकी कंपनी बरोबर झाले आहे. त्यांचा रिटेल ब्रॅन्ड "स्टोअर २१" आता एक्झ्पान्शन मोड मध्ये आहे. पश्चिमी देशात पण हे स्टोअर्स निघतील. आणि कदाचित त्यामुळेच पटवर्धन हा शेअर रेकमंड करत होते, मुख्य अडचण होती ती त्या २४ मि डॉ कर्जाची. आता ती गेली आहे. ह्या स्टॉक मध्ये व्हॅल्यू आहे हे नक्की. पण वर जायला व्हॅल्यू सोबत व्हॉल्युम लागतो, तो ह्या शेअर कडे नाही, शिवाय रिटेल व टेक्स्टाईल मध्ये दुसरे शेअर ह्यापेक्षा चांगले परफॉर्म करत आहेत त्यामुळे सटोडियांचे लक्ष ह्याकडे नाही. जेंव्हा जाईल तेंव्हा हा शेअर ३५ पर्यंत सहज जाउ शकतो.
केदार ह्या लेवल्स ला बँकिंग
केदार
ह्या लेवल्स ला बँकिंग मध्ये एन्ट्री करावी का? का थोड्या करेक्शन ची वाट पहावी.?
वाट पाहाने चांगले. कॅश मध्ये
वाट पाहाने चांगले. कॅश मध्ये राहने वा जमा करणे हा पर्याय मला बरा वाटतो. जर १५० पाँईटने करेक्शन झाले तर खरेदी करता येईल, वर जरी गेला तर ५५५० नंतर परत विचार करता येईल असे वाटते. सप्टे महिना तसाही फार चांगला नसतो, परत नोव्हे डिसे मध्ये जास्त रिटर्न मिळायला सुरुवात होते. (काही सप्टे अपवाद)
केदार धन्यवाद. सप्टेंबर साठी
केदार
धन्यवाद. सप्टेंबर साठी थोडी कॅश ठेवेन.
धन्यवाद, केदार,सुरेश१,मास्तुर
धन्यवाद,
केदार,सुरेश१,मास्तुरे
suzlon थोडा loss मधे का असेना काढावा असे या सगळ्यावरुन वाटते आहे..
आपल्या सर्वांची मते खूपच उपयुक्त असतात ..तेंव्हा हा बाफ हलता ठेवावा
केदार, धन्यवाद. आलोकचे खूपच
केदार,
धन्यवाद. आलोकचे खूपच सोप्या शब्दात विश्लेषण केलेत. त्यामुळे अनेक शंका दूर झाल्या.
खरचं केदार , धन्यवाद ,
खरचं केदार , धन्यवाद , माझ्याकडे आहेत आलोकचे शेअर्स २० ला घेतलेले , अजून थोडे दिवस ठेवीन
केदार ऑप्शनच्या टाईम व्हॅलू
केदार
ऑप्शनच्या टाईम व्हॅलू साठी काही थंब रूल आहे का?
केदार, Shrenuj & Company चा
केदार,
Shrenuj & Company चा शेअर आज ५४ पर्यंत खाली आलेला आहे. ह्यात अल्पकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल का?
Pages