मार्केट टॉक - आउटलूक

Submitted by केदार on 27 January, 2010 - 13:28

सेन्सेक्स आज ४९० पाँईटसने घसरला. पुढे काय?

१. २० ऑगस्टला मार्केट पडले पण २१ ला मार्केट गॅपने उघडले (१०४) व सुरु झालेली रॅली ( १४९२१) आक्टो १७ ला १७३२६ ला थांबली. (मध्ये एकदा दोन तीन दिवस पडून १५३९८ लेव्हल ला सपोर्ट घेऊन परत ही रॅली झाली.
२. नंतर तिथून खाली येऊन १५९०४ पर्यंत परत एकदा मार्केट खाली आले. (नोव्हे ३)
३. नोव्हे ३ पासून परत मार्केट वर गेले नोव्हे २५ पर्यंत १७१९८.
४. नोव्ह २७ ला गॅप डाउन ने मार्केट ओपन झाले. ( ओपन १६७१८ , हाय १८७१८, लो १६२१०, क्लोज १६६३२)
५. नंतर साईडवेज कधी वर कधी खाली करत ६ जानेवारीला हायस्ट पाँईट म्हणजे १७२९० ला गेले.

ह्या सर्व डेटाचा टेक्नीकल अ‍ॅनॅलिसिस केला तर बर्‍याच कन्फुझिंग लेवल्स सापडतात. पण नेमका ह्यावेळी मग इतिहास लक्षात घेऊन मागे मार्केट मध्ये काय घडले ह्यावर विचार केला. दर जानेवारीत गेले ५-६ वर्षे मार्केट पडते.

दिड-दोन आठवड्यांपूर्वी मी आणि उपास बोलताना त्याने विचारले की नंतरच्या लेवल्स काय असतील. त्याचाशी बोलताना मार्केट लवकरच खूप पडुन फर्स्ट सपोर्ट लेव्हल १६२०० वर जाईल असे सांगीतले होते. तेंव्हा मार्केट १७,७०० च्या आसपास होते, व १६,२०० कुठेही बोर्डवर येतील असे दिसत नव्हते. पण आज मार्केट १६,२८९ ला आहे.

उद्या एक्सापरीचा गुरुवार असल्यामुळे त्याचाही परिणाम होणार.

पुपुवर गेल्या आठवड्यात लिहीले होते की पैसे गोळा करा. आता ती वेळ येऊ घातली आहे. कालचा फॉल १६,२०० ला टच झाला नाही म्हणजे ह्या सपोर्ट लेव्हल तो थांबेल का? हे पाहायला आणखी दोन तीन दिवसांची गरज आहे पण इथे जर लगेच सपोर्ट मिळाला नाही तर नंतरचा सपोर्ट साधारण १५,३०० ते १५,५०० आहे असे वाटते.

पैसे असतील तर अनेक चांगले सेक्टर्स - मेटल्स, इन्फ्रा आणि फार्मा हे चांगले वाटत आहेत, जर अजून खाली घसरले तर नक्कीच ह्यात नक्कीच गुंतवणूक करायला सुरु करावी.

* हे सर्व माझे अंदाज आहेत, जे चुकीचेही असू शकतात. (असतात) आपले पैसे निट विचार करुन गुंतवा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Namaskar Mandali,
Ya group madhe prathamach sahabhagi hot ahe. Marathi letters lihinyacha prayatna kela. Pan ajun marathi letters ani tyanchay Keys chi saway nasalyane gondhal zala.

Mala Demat account openning baddal mahiti havi ahe. Which DP is better (RMoney, ICICI, SBI, HDFC, others) in regards with a) Account Charges, b) Brokerage, c) Online trading simplicity, d) reliability

केदार, Lakshmi Energy and Foods Limited कसा आहे दिर्घकालीन गुंतवनुकीकरता?

संदिप
सॉफ्टवेअर पेड व ऑन लाइन वर फ्री अशी दोनही आहेत. ऑन लाईन वर quotetracker नावाचे एक आहे. पेड मध्ये intra day व end of the day आहेत. मी end of the day वापरतो.

पाल्स
बबल आहे की नाही माहित नाही. पण FII पैसे टाकतायत व निफ्टी गेले ४ आठवडे वर जात आहे हे मात्र सत्य आहे. अजुन तरी बुलीश आहे. जोर आहेच तर कदाचीत ६३५७ वर नेवुन ऑल टाइम हाय करतील. करेक्शन त्याच्या आधी का नंतर हे गेस करणे व्यर्थ आहे. करेक्शन वाटेल तेंव्हा लिहीनच. जे थोडे टेक्नीकल कळते त्यावरून ह्या क्वार्टर मध्ये निफ्टी ५६१९ दाखवेल. क्वार्टर सुरू होवून फक्त दोन दिवसच झाल्येत व हा प्रवास टप्या टप्याने घडेल. केदार ने सांगितल्या प्रमाणे मी कुठलाही आकडा मनात न ठेवता जे रोज सत्य दिसेल त्या प्रमाणे वागत आहे. माझी एक ६१५० ला घेतलेली, निफ्टीची लाँग पोझिशन आहे. ६०७६ ला स्ट्रोंग सपोर्ट आहे. ६०५० पर्यंत होल्ड करेन.

केदार,
Apollo tyres 82 च्या रेन्ज मधे घ्यायला कसा राहिल?
IDFC Infrastructure Bond बद्द्ल तुमचे काय मत आहे?

धन्यवाद
क्षितिज

NHPC, Provogue, GPIL, MRF बद्दल काय मत आहे तुमचं?
थोडाफार अभ्यास करून आणि सजेशन्स घेऊन सुरुवात तर केल्ये मी थोडी.. Happy

भरत सही आहे. Happy आता एकवेळा थेअरीला प्रुव्ह करुन बघन्याचा प्रयत्न ऑस्ट्रेलिया वनडे नंतर करेन. हारलो तर दुसर्‍या दिवशी शॉर्ट. पण त्या लेखातील शेवटचे वाक्य अगदी बरोबर आहे. मार्केट हे मुडस वर चालते, आर्थिक रिपोर्टस वर कमी अन सेंटिमेंटवर जास्त. Happy

सुश्री : आपले स्वागत. नियमीत येत राहा. Happy रिलायन्स मनी किंवा ५ पैसा हे स्वस्त आहेत, पण मी वापरले नाहीत. सर्व ब्रोकर्सची तुलना अजून पर्यंत मी ही केली नाही, पण मी हे चांगले असावेत. अकाउंट उघडताना खालील गोष्टी विचारात घ्या.

१. वापरायची प्रणाली किती सोपी (युझर फ्रेन्डली) आहे.
२. पैसे लगेच (रियल टाईम) ट्रान्सफर करता आले पाहिजेत.
३. तुम्ही वापर कसा करणार? ट्रेडर म्हणून की इन्वेस्टर. ट्रेडर म्हणून करायचा असेल तर इतर टुल्स उपलब्ध आहेत की नाही (उदा चार्टिंग इ इ) हे पण पाहा.
४. महत्वाचे किती पैसे ब्रोकर लोक घेणार ह्याची तुलना करा.

अपोलो : मी इथे ६० च्या रेंज मध्ये रेकमंड केला होता. ८० + ला कन्सॉलिडेट होत आहे. खरेतर तो आत्ता महाग होत चालला. त्याची व्हॅल्यु ८० बरोबर आहे, पण मार्केट अप ट्रेन्ड मध्ये असल्यामुळे इथून पुढे ब्रेक झाला तर सहज ९५ च्या घरात जाऊ शकतो. तसेच जर पडला तर परत वापस ७० च्या रेंज मध्ये. त्यामुळे लाँग टर्म साठी घेणार असाल तर फेज मध्ये घ्या. आत्ता २० टक्के, कमी झाल्यावर ४० वगैरे. शेअर वाईट नक्कीच नाही.

सुरेश ५९५७ चांगला सपोर्ट आहे त्यामुळे जर पोझिशन लॉस मध्ये असेल तर डबल करु शकता. सध्यातरी ६१०० ते ६२०० ह्या रेंज मध्ये आहे असे दिसतेय. एकदम पडेल असे वाटत नाही.

NHPC : फायनान्शियली एकदम मस्त. चांगली गुंतवणूक आहे, पण शेअर रेंज मध्ये अडकला आहे, सटोडियांकडून दुर्लक्षिलेला. गेल्या जुलै पासून सेन्सेक्स प्रचंड वाढला पण NHPC मध्ये केवळ ४ रु ची वाढ झाली आहे. त्यामुळे बाजार वाढीच्या फायदा ह्या समभागाला होत नाही असे दिसते. अगदी परवाही ब्रेक आउट झाला, पण काल लगेच बियरीश एनगल्फिंग पॅटर्ण आला त्यामूळे गुंतवणूकदार सध्यातरी ३४ च्या वर कॅश आउट करत आहेत. डिव्हीडंड साठी चांगला शेअर आहे, पण मागच्या वर्षीपासून उतरती कळाच लागली आहे, प्रत्येक ब्रेकाऔटला सेलींग प्रेशर आहे. ३० च्या लेवल वर घ्या. Happy

GPIL : मागचे आर्थिक वर्ष फार चांगले नव्हते. एप्रिल हाय नंतर घसरन लागली आहे ती अजूनही चालूच आहे. मागच्या वेळी सटोडियांनी १४० ते ३०० अशी सहल घडवून आणली. आता त्यातली स्टिम संपली आहे. सध्या तरी स्टे अवे. नंतर बघू.

थोड्यावेळात सर्वच टाकतो.

MRF बढिया आहे, पण एक मेख आहे, मार्केट कोसळले तर सरळ ८००० च्या खाली. त्या पेक्षा CEAT चा विचार करु शकता.

Gujarat State Petronet Ltd : रेसिस्टन्सला जात आहे. वाट पाहून १०५-१०७ लेवलला एन्टर करता येईल. अपसाईड कॅप १२० ला आहे. लक्ष ठेवा. पण सध्या नका घेऊ.

>>> डिव्हीडंड साठी चांगला शेअर आहे,

NHPC ने नुकताच ५.५% (५५ पैसे प्रति समभाग) डिव्हिडंड वाटलेला आहे.

धन्यवाद केदार.. Happy
विशेष टिपणीबद्दल आभार, लक्ष ठेवतो आता ह्या २ स्क्रिप्ट्स कडे. Happy
NHPC ने नुकताच ५.५% (५५ पैसे प्रति समभाग) डिव्हिडंड वाटलेला आहे.> होय मास्तुरे.

मारुती सुझुकी सध्या रिट्रेस होत आहे. २५ टक्के झाले, त्यामुळे उद्या, परवा लक्ष ठेव. १५२० रेंज मध्ये गेला की परत १५९० साठी घ्यायला हरकत नाही. (मार्केट अपट्रेन्ड कायम राहिला तरच १५९० येईल.)

सेल परत २१५ रेंज मध्ये येईल असे वाटते. बुल्स गेले चार सेशन वर न्यायच्या प्रयत्न करत आहेत, पण विक्री करणारे त्याला डे हाय वरुन लगेच खाली आणतात. तो लोअर टॉप्स मध्ये आहे. शॉर्ट करण्यासाठी चांगला दिसतोय. गुंतवणूक करण्यासाठी २१०-१५ रेंज.

शॉर्ट टर्मसाठी सध्या घेण्यालायक काही शेअर्स सुचवणार का?? >> साधना अवघड आहे. कारण अजूनही सर्व त्या फॉलची वाट पाहत आहेत. तुम्ही ट्रेड करा. (फ्युचर्स मध्ये) त्यात जास्त नफा (आणि तोटापण) आहे, शॉर्टटर्म मध्ये मार्केट दोलायमान आहे, त्याचा फायदा घेता येईल. मी इथे रेंज लिहत असतो.

तरिही थोडे शेअर सांगतो. Happy

तुम्ही ट्रेड करा. (फ्युचर्स मध्ये) त्यात जास्त नफा (आणि तोटापण) आहे,

करायची इच्छा आहे, पण जरा धास्ती आहे आणि कसे कराय्चे नीट माहित नाही. परत एकदा तुमचे लेख वाचुन काढायला हवेत.

केदार,

can you suggest some books for studying technical levels from beginers level.
And also suggest some books which elaborates balance sheet details.

केदार
निफ्टीची ५९०० ते ६२०० ही रेंज फॉर्म होत आहे का? का अजुन कनफरम नाही?
भारता बाहेरील लोकाना मार्केट मध्ये डायरेक्ट इनवेस्ट करायचे प्रपोझल विचारात आहे.

सध्यातरी आधी लिहल्यासारखे ६१०० ते ६२०० रेंज आहे. सपोर्ट ५९५७. त्यामुळे स्टे लाँग.

yogeshd4u - काही पुस्तकं लिहितो.

rajeshexpo, suzlon , gitanjali, delta shares बद्दल काय मत आहे तुमचं?

suzlon ला ह्या लेवलला ६० भरपुर रेसिस्टन्स आहे. मला वाटत नाही तो ब्रेक होईल.
rajeshexpo - ११० पर्यंत परत जाईल. तिथे भरपुर रेसिस्टन्स दिसतोय.
gitanjali - आधीचा अप ट्रेन्ड आता बदलला आहे. २५० क्रॉस होईल असे वाटत नाही. पण २५० पर्यंत घ्यायला हरकत नाही.

delta कॉर्प shares - गुंतवणूकीसाठी ६५ लेवल चांगली आहे. ८० वरुन तो वापस येण्याची शक्यता आहे.

केदार, मला एक वेगळी शंका आहे.
एखादा शेअर ओव्हरबॉट आहे, हे नेमके सांगणारे इंडिकेटर कोणते आहेत? ( त्यांचा आधार घेऊन शॉर्ट करता येईल का? )

जामोप्या असे अनेक इंडिकेटर्स असतात. उदा ओपन इंट्रेस्ट किती वाढला किती कमी झाला, पुट कॉल रेशो, बोलिंगर बॅन्डची अपर रेंज, एल्डर ने निर्माण केलेला व्हॉल्युम फोर्स, फिबॉन्सी प्रेशर पाँईट्स, गान थेअरी, फ्युचर्स मध्ये प्रिमियम वा डिस्काउंट, त्या समभागाचे रेसिस्टन्स पाँईट्स एक ना अनेक. पण एकही इंडिकेटर १०० % यश देऊ शकत नाही. त्यांचा आधार घेउन शॉर्ट मात्र करता येते. पण शॉर्ट करताना मुख्य ट्रेन्ड मध्ये बदल झाला आहे का हे पाहिले पाहिजे. अन्यथा शॉर्ट मुळे आपल्याला शॉट बसू शकतो. त्यामुळे मुख्य इंडिकेटर मार्केट वा त्या समभागाचा ट्रेन्ड म्हणून ट्रेन्ड व रेसिस्टन्स-सपोर्ट पाँइट माहीत झाले की इतर इंडिकेटर काम करु शकतात. तेच महत्वाचे.

शॉर्ट करणे आणि विकत घेणे ह्यात फारसा फरक नाही. दोन्हीत एकदा विकत घेउन एकदा विकावे लागते, पण शॉर्ट म्हणलं की लोकं उगीच घाबरतात असा अनुभव आहे. चित्र सरळ पाहिलं की लाँग आणि उलट पाहिलं की शॉर्ट इतके सोपे आहे.

अरे तो RSI सुद्धा वापरतात ना यासाठी? त्यात तो RSI 70 च्या वर गेला की ओव्हरबॉट होतो आणि ३० च्या खाली गेला की ओव्हरसोल्ड होतो. म्हणजे मी असे वाचले आहे.

हो. RSI मी पण वापरतो. पण मला असे सांगायचे आहे की कुठलाही एक इंडिकेटर मार्केट प्रिडिक्ट करु शकत नाही.

5 August, 2010 - 06:53

दोन ते तीन महिन्याच्या कालावधी करीता NMDC खरेदी करा रु.२६० /- .... १०% ते २०% रिटर्नस मिळु शकेल ...

चालु बाजार भाव रु. २९० /- ...... नफा घेवु शकता ........

लोक शॉर्टला घाबरत नाहीत, त्याना हे माहीत नसते, शिवाय समजा माहीत असलेच, तरी एक तर हे डे ट्रेडिंगला करणार, नाहीतर एफ ओ मध्ये... थोडे फार पैसे घालून डिलिवरी घेणे, यात शॉर्टचा प्रश्न उद्भवत नाही... ओव्हर बॉट बद्दल मला अधिक माहिती हवी आहे. किमान इंडिकेटर्स आणि त्यांचे प्रेडिक्शन सांगितले तर सर्वानाच उपयोगी ठरेल..

जामोप्या लोक शॉर्टला घाबरत नाहीत ही माझ्यासाठी नवीनच माहिती आहे. Happy आजपर्यंत इतक्या वर्षात मी कोणाही मित्राला नेकेड शॉर्ट सांगीतल्यावर त्याने आ वासूनच पाहिले आहे. अर्थात मी खालचा प्यारा फक्त तुमच्यासाठी नाही तर जनरल लिहला होता.

ओव्हरब्रॉट साठी आपण हे इंडिकेटर्स पाहावेत.

१. Relative Strength Index (RSI) - कुठल्याही स्टॉक, इंडेक्स साठी हा मोमेंटम दाखवणारा इंडिकेटर आहे. ह्यात नजिकच्या काळातील (उदा १० दिवस) मार्केट मधील गेन (वर जाणे) व लॉस (उतरणे) हे लक्षात घेतले जाते. ह्याची रेंज ० ते १०० आहे. ह्यात जर RSI 70 च्या वर गेला तर मार्केट ओव्हरब्रॉट असे म्हणले जाते व परत ३० च्या खाली इंडिकेटर आला तर ओव्हरसोल्ड असे म्हणले जाते.

पण आधी लिहल्यासारखे ट्रेन्ड कंटिन्यु असेल तर (उदा टाटा मोटर्स ७८० वरुन ११५०) RSI फसवा ठरु शकतो कारण मार्केट अनेक दिवस ओव्हरब्रॉट किंवा ओव्हरसोल्ड राहू शकते. फक्त ह्या इंडिकेटर वरुन त्यामुळेच शॉर्ट पोझिशन घेता येत नाही.

२. Stochastic Oscillator - ह्यात मार्केटची क्लोज लेवल (हाय आणि लो सोबत) काढली जाते. थोडक्यात हा वरच्यापेक्षा वेगळा. हा पण ० ते १०० च्या रेंज मध्ये असतो व ह्यालाही मोमेंटम इंडिकेटर म्हणतात. इथे मात्र ८० च्या वर गेला तर तो स्टॉक ओव्हरब्रॉट होतो व २० च्या खाली गेला तर तो ओव्हरसोल्ड.

३. ओव्हरब्रॉट -ओव्हरसोल्ड इंडिकेटर (मार्केट ब्रेड्थ) ह्यासाठी मार्केट मधील रोजचे अ‍ॅडवान्सेस व डिक्लाईन्स लक्षात घेऊन त्याचे १० डे मुव्हींग अ‍ॅव्हरेज काढले जाते. हे पूर्ण मार्केटसाठी आहे, एका विशिष्ट स्टॉक साठी नाही तर पूर्ण मार्केटसाठी हे इंडिकेटर आहे.

Bank of America is in serious trouble...watch out in November it is going to be a nightmare...if possible invest in gold and silver... From August 23 gold has gone up by $150 and it will continue.

Pages