मार्केट टॉक - आउटलूक

Submitted by केदार on 27 January, 2010 - 13:28

सेन्सेक्स आज ४९० पाँईटसने घसरला. पुढे काय?

१. २० ऑगस्टला मार्केट पडले पण २१ ला मार्केट गॅपने उघडले (१०४) व सुरु झालेली रॅली ( १४९२१) आक्टो १७ ला १७३२६ ला थांबली. (मध्ये एकदा दोन तीन दिवस पडून १५३९८ लेव्हल ला सपोर्ट घेऊन परत ही रॅली झाली.
२. नंतर तिथून खाली येऊन १५९०४ पर्यंत परत एकदा मार्केट खाली आले. (नोव्हे ३)
३. नोव्हे ३ पासून परत मार्केट वर गेले नोव्हे २५ पर्यंत १७१९८.
४. नोव्ह २७ ला गॅप डाउन ने मार्केट ओपन झाले. ( ओपन १६७१८ , हाय १८७१८, लो १६२१०, क्लोज १६६३२)
५. नंतर साईडवेज कधी वर कधी खाली करत ६ जानेवारीला हायस्ट पाँईट म्हणजे १७२९० ला गेले.

ह्या सर्व डेटाचा टेक्नीकल अ‍ॅनॅलिसिस केला तर बर्‍याच कन्फुझिंग लेवल्स सापडतात. पण नेमका ह्यावेळी मग इतिहास लक्षात घेऊन मागे मार्केट मध्ये काय घडले ह्यावर विचार केला. दर जानेवारीत गेले ५-६ वर्षे मार्केट पडते.

दिड-दोन आठवड्यांपूर्वी मी आणि उपास बोलताना त्याने विचारले की नंतरच्या लेवल्स काय असतील. त्याचाशी बोलताना मार्केट लवकरच खूप पडुन फर्स्ट सपोर्ट लेव्हल १६२०० वर जाईल असे सांगीतले होते. तेंव्हा मार्केट १७,७०० च्या आसपास होते, व १६,२०० कुठेही बोर्डवर येतील असे दिसत नव्हते. पण आज मार्केट १६,२८९ ला आहे.

उद्या एक्सापरीचा गुरुवार असल्यामुळे त्याचाही परिणाम होणार.

पुपुवर गेल्या आठवड्यात लिहीले होते की पैसे गोळा करा. आता ती वेळ येऊ घातली आहे. कालचा फॉल १६,२०० ला टच झाला नाही म्हणजे ह्या सपोर्ट लेव्हल तो थांबेल का? हे पाहायला आणखी दोन तीन दिवसांची गरज आहे पण इथे जर लगेच सपोर्ट मिळाला नाही तर नंतरचा सपोर्ट साधारण १५,३०० ते १५,५०० आहे असे वाटते.

पैसे असतील तर अनेक चांगले सेक्टर्स - मेटल्स, इन्फ्रा आणि फार्मा हे चांगले वाटत आहेत, जर अजून खाली घसरले तर नक्कीच ह्यात नक्कीच गुंतवणूक करायला सुरु करावी.

* हे सर्व माझे अंदाज आहेत, जे चुकीचेही असू शकतात. (असतात) आपले पैसे निट विचार करुन गुंतवा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केदार
काल मार्केट खाली यायल्या लागल्यावर निफ्टी लाँग ची पोझिशन काढली. लॉस २०००/-.
निफ्टीची नवी रेंज काय असेल?
ग्राफ बघितले. डेलित विक असला तरी विक व मंथने अजून कनफर केले नाही.
क्लोझ ५४०८. सपोर्ट ५३३०-५३५०, रेझिस्टनस ५४६५.
SBI २७५० दाखवेल से वाटते.

सुरेश ५३७० पहिला चांगला सपोर्ट आहे. पण आज ग्लोबल मार्केट वर आहेत. त्यामुळे ट्रेन्ड रिव्हर्सलची शक्यता जास्त आहे. मार्केट वर जाईल असे वाटते.

केदार
SBI च्या २८०० पुट ला काही टारगेट ठरवले आहेस का?
SBI विकली वरून २७४५ व ऑगस्ट संपला असे धरले तर मंथली वरून २६१८ (निफ्टी पडला तर) दाखवते.

विकली बेस वर २७०० (-) चे टारगेट ठेवले आहे. सध्या पडझड चालू झाली आहे, पण अजून तितका पडला नाही, उलट भारतीय मार्केट सपोर्ट लेवल कायम ठेवते असे दिसत आहे. आजही ५३७० ब्रेक झाला नाही अजून. दुपारी इकॉनॉमीचा रिपोर्ट येणार आहे त्यामुळे उलट वर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज मार्केट कसे रिअ‍ॅक्ट होते त्यावर SBI चे टारगेट ठरवेन. (लिहिताना ५३८७)

केदार
Thanks
महिना उद्या चालू होइल. ३०% थेअरी टेस्ट करण्यासाठी ५४०० चा पुट घेइन. अत्ता भाव ११४ आहे. ८० च्या आसपास घ्यायचा प्रयत्न करेन. थोडे बाउंस ब्याक झाले तर येइल.

केदार
नाही, अॅकटयुअल ३०%. निफ्टी चा डायन ट्रेंड राहिला तर इन मनी ३०% देउन जाइल. निफ्टीचा मिड टर्म विकनेस फ्रायडेला कनफर्म होइल. १०५ ला जरि मिळाला तरी हा पुट १३७ दाखवेल हि आशा आहे.

निफ्टी ने लो टेस्ट केले आहे. मला वाटतं अजून ४० एक पाँईटची रॅली व्हायला हवी. तिथे आल्यावर परत अंदाज घेता येईल. आत्ता लगेच मार्केट पडेल ही भिती मला तरी वाटत नाही. दोन एक सेशन रॅलीचे होणार.
सध्या रिलायन्स निफ्टीला ड्रॅग करत आहे. रिलायन्सला काल नविन साठा मिळाला, कदाचित १ % ची रिकव्हरी उद्या परवा झाली तर निफ्टी सहज ५४४०+ रेंज मध्ये येईल.

SBI लोअर टॉप मध्ये आहे.तो उद्या आणखी पडला तर पुट काढायला हरकत नसावी. सद्या ११० + रेट चालू आहे, नफ्यातच विकला जाईल.

मी काल टाटा मोटर्सची पोझिशन घेतली आहे. मागे ९८०-९० रेंज मध्ये येईल तेंव्हा खरेदी करा असे इथे लिहले होते, काल व परवा काही वेळ तो ९९० रेंज मध्ये होता. १०३० पर्यंत गेल्यावर फ्युचर्स स्वेअर ऑफ करेल.

तसेच काल निफ्टीच्या लाँग पोझीशन्स मी लोअर लेवलला (आधिच्या रेसिस्टन्स वर ५३६५ - ) घेतल्या आहेत. ८० पाँईटची रेंज ठेवली आहे.

केदार
उद्या परवा झाली तर निफ्टी सहज ५४४०+ रेंज मध्ये येईल.>>>
अल हमदुलिल्ला. आजच ५४६० गाठला.
SBI चे आता काय होइल?

केदार
आत्ता लगेच मार्केट पडेल ही भिती मला तरी वाटत नाही. दोन एक सेशन रॅलीचे होणार.>>>
धन्यवाद.
३०% थेअरी मंथली चार्टवर होती. डे चार्ट मध्ये पडझड झाल्याने. पुट घ्यावासा वाटत होता. पण मंथली चार्ट बुलिश होता. तुझा सल्ला वेळेवर आला.

केदार, सुरेश
भारतातल्या शेअरस मध्ये मोठी करेक्शन (१० %) अपेक्षित आहे असे काल एका चॅनेलवर ऐकले. दोन कारणे. १. ओव्हर व्हॅल्यूएशन २. अमेरिकन इकॉनॉमी.

केदार,
तुमचा अन्दाज एकदम बरोबर होता,निफ्टी ५४७१ ला बन्द झालि आज, आता अपसाईड ५५०० पर्यन्त असेल का त्याच्या वर जाईल? करेक्शन झाल्यावर निफ्टी ला खाली कुठे सपोर्ट आहे?

सुरेश च्या थेअरी प्रमाणे आता ५४०० चा पुट घ्यावा का ६३ ला आहे ? sbi चा पुट ८५ ला आहे घ्यावा का?

सई

सई
आज थोडा विचार करत होतो. मार्केट ५५४८ वरुन ३१/८ ला ५३४८ ला खालि आले. डेलि चार्टचा एक भाग मार्केट खालि (short term) जाइल असे दाखवत होते. त्या वेळि वर जाइल असे दुसरा भाग सांगत होता. पण माझे मन बायस झाले व मला काय दिसते ह्या व्रर विचार करण्यापेक्षा मला काय वाटते त्याने ताबा घेतला. असे घडणे योग्य नाही. काळजी नक्कि घेतलि जाईल. (केदार ने मार्केट वर जाइल हे सांगितले होते.) पुट कॉल आजच्या वेळेला योग्य नाही. मार्केट डेलित अजुन विक असले तरी विक व मंथ मध्ये बुलिश आहे.
सप्टेंबर चे खालचे टार्गेट ५४३१ दाखवते व वरचे ५५०२, (५५४८ आधिचा हाय) व त्या नंतर ५६०२. आजचि राइझ हि करेक्शन नसेल (२४/८ हाय ५५४८ - ३१/८ लो ५३४८ च्या ६२% = ५४७२) तर ह्या rally त परत ५५५० दाखवण्याची ताकद असू शकते.

निफ्टी डेली बार चार्ट

NIfty.gif

जीथे मी ते काळे बाण टाकलेत तिथे नीट लक्ष देउन पाहा. त्या सर्व लेवल्स ५४८० ते ८३ मधिल आहे. कालची रेंज पण त्याला अपवाद नाही. तसेच खाली पाहिले ते एकुण चार वेळा ५३६० च्या आसपास निफ्टी आले, तिथून वर गेल.

आता थोडे फिबॉन्सी रिट्रेसमेंट कडे येऊ. मी जिथून सुरुवात केली तो पॉईंट ० पकडून, तिथेच ही मोठी रॅली सुरु झाली. निफ्टी ५२३४ आणि संपली तिथे १०० पकडू, म्हणजे ५५४५ च्या आसपास. ७५ + टक्के आले की मोठा रेसिस्टन्स दिसतो. (५४८०) तिथे मार्केट आज आले आहे. म्हणजे तेवढे रिट्रेस झाले. तिथून नेहमी सारखे पडायला पाहिजे, पण उद्या पडेलच ह्याची शाश्वती नाही कारण आज अमेरिकन मार्केट आउट परफॉर्म करत आहे. म्हणजे जर १ टक्के फरक पडला तर मार्केट ५५२५ क्रॉस करेन. शॉर्ट टर्म मध्ये (उद्या, परवा) साठी माझे हे टारगेट. १०० टक्के आले तर मार्केट परत वापस येईल असे जरी पकडले तरी पोझीशन्स ठेवायला हरकत नाही. फारतर ५५२५ ला क्लोज करुन परत उलटे २५ झाल्यावर एन्टर करावे.

असे घडणे योग्य नाही. काळजी नक्कि घेतलि जाईल. >>> सुरेश चालत हो. ह्यातूनच शिकता येत. Happy माझे देखील सगळे अंदाज बरोबर येत नाहीत. ६० टक्के बरोबर आले तर यू बिट द मार्केट. त्यामुळे चुक्या तो चुक्या. रिलायन्स मध्ये माझी चुक झाली आहे. मी एक दिवस वर गेल्यावर पोझीशन घेतली, आज ती लॉस मध्ये आहे, पण निफ्टी, टाटा मोटर्स भरपुर फायद्यात आहेत त्यामुळे ६६ % सक्सेस रेशोतच आनंद मानतोय.

६६.२ वगैरे आकडे कुठले? गान फॉलो करता का?

भारतातल्या शेअरस मध्ये मोठी करेक्शन (१० %) अपेक्षित आहे असे काल एका चॅनेलवर ऐकले. दोन कारणे. १. ओव्हर व्हॅल्यूएशन २. अमेरिकन इकॉनॉमी. >>

विक्रम त्याला अ‍ॅनॅलिस्ट स्प्रेड म्हणायचे. म्हणजे मार्केट तिथे गेले तर तो अ‍ॅनॅलिस्ट म्हणायला मोकळा, मी म्हणालो होतो की नाही म्हणून. Happy

६०० ते ९०० पाँईटने निफ्टी पडेल ( १० ते १५ टक्के) असे मला खरच वाटत नाही, पण मी चुकही असू शकतो. मार्केट सप्टेबर मध्ये पडते तसे पडले तरी सब ५२०० लेवल मला जास्त योग्य वाटतात. वर चार्ट मध्ये दिल्या प्रमाणे ५२३४ पर्यंत १०० टक्के करेक्शन (रेंजच्या) होईल आणि तेवढे योग्य वाटते. (जर असे झालेच तर!)

मुख्य म्हणजे मार्केट वर गेले ते बँकींग/फायनान्स, अ‍ॅटो आणि फार्मा मुळे. फायनान्स मधिल स्टिम संपली आहे, असे म्हणायला हरकत नाही, आता त्यातून १०० टक्के रिटर्नस मिळणार नाहीत. (शॉर्टटर्म मध्ये) व अ‍ॅटो मध्ये टाटा आउटपरफॉर्म करतोय. आता वर जायला न्युज नाही, पाउस तसा बरा पडतोय त्यामुळे त्या फ्रंटवर काही वाईट नाही, मग फक्त ग्लोबल न्युजच कारणीभूत ठरु शकेल.
अमेरिकेत परत मंदी आली (डबल डिप) तरी मार्केट पडुन परत वर ५२०० + ला येऊन थांबेल हे मात्र मला निश्चित वाटते.

ओव्हर व्हॅल्युएशन मात्र थोडे आहे. मागे काही दिवसांपूर्वी मी इथे लिहले होते की आता मार्केट ओव्हरब्रॉट आहे, लोक अंदाधुंदपणे गुंतवणूक करत आहेत. निफ्टी ऑलरेडी २३ + च्या पिई वर ट्रेड करत आहे हा त्यातला त्यात एक वाईट सिग्नल पण त्याचवेळी इंडिया विक्स (वोलटॅलिटी इंडेक्स) कमी पण झाला आहे, ही चांगली बातमी.

ह्या लेवल्स वर गुंतवणूक न करता जर चांगला प्रॉफिट झाला असेल तर बुक करुन काही दिवस पैसे हातात ठेवावेत ह्या मताचा मात्र मी ही आहे. वेळोवेळी इथे तसे लिहले आहे. पण अश्या मार्केट मध्ये ट्रेडिंगच्या संधी भरपुर निर्माण होतात त्यामुळे फ्युचर्स मध्ये असणार्‍यांनी पण थोडे जपून, लक्ष देऊन मार्केटमध्ये उतरावे. मार्केट पडायला सुरुवात झाली तरी परत ५३७० लेवलला टेस्ट होउ द्यावे, तिथे बाउन्स झाले तर दुपटीने वरच्या पोझीशन्स घ्यायला सुरुवात करावी. (मी परवा रात्री अगदी हेच केले.)

माझं पण रिलायन्स लॉस मध्ये आहे पण अरे मुकेश भाईंनी काल १:१ बोनस शेअर इश्यु घोषित केला आहे. तीच आमची राखी अन भाउबीज त्यामुळे मी खुशीत.

अरे मी नाही वाचली बातमी. शोधतो.

टाटा मोटर्स बद्दल मी परवा लिहले होते, शॉर्टटर्म टारगेट १०३०. ते आज पूर्ण झाले. (फ्युचर्स मध्ये). पुढच्या वेळी टाटा मोटर्सवर लक्ष ठेवा. ९८०-९० लेवल वर जबरदस्त सपोर्ट फॉर्म होतोय, ह्या लेवल मध्ये आला की ट्रेन्ड पाहून फ्युचर्स विकत घ्या.

निफ्टीने ५५१५ दाखवला. माझे आज दुपारचे टारगेट ५५२५ पर्यंत होते. १० पाँईट इकडे-तिकडे. पण निफ्टी ५५०० वर राहत नाहीये. (अजून तरी.) माझ्यामते आज प्रॉफिट बुकींग मोड आहे. गेले अर्धा तास विकत घेण्यासाठी साठी ४ ते ५ लाख ऑर्डर्स तर विकन्यासाठी १० ते ११ लाख! त्यामुळे निफ्टी डळमळीत दिसतोय, मी पण पोझिशन्स स्वेअर केल्या. परत ५० पाँईट खाली जाळे लावून ठेवणार.

ऑगस्टच्या सुरुवातीला मी इथे अपोलो टायर्स बद्दल लिहले होते. ICICI चे रिकमंडेश होते पण मलाही तो आवडला होता. त्यावर एक महिन्याचा आत १६.५ टक्के रिटर्नस मिळाले आहेत.

केदार.. काल SBI चा पुट काढला. १५ दिवसांत २५% फायदा. थँक्स टू यू. कमिशन कुठे पाठवू सांग Happy
मी निफ्टीचा सप्टेंबर ५५०० चा कॉल घेतलाय (७८ ला). थांबू की लगेच काढून टाकू?

मामी.. तुम्ही रिलायन्सची बातमी कुठं वाचली ? मला तर कुठच सापडत नाहिये. त्यांनी नुकताच (नोव्हेंबर २००९) तर दिलाय बोनस १:१. एवढ्यात परत देतील असं नाही वाटत.

थँक्स टू यू >> वेलकम सर, यु आर! कमिशन वैशाली मध्ये योग्य वेळी घेण्यात येईल. Happy
५५०० चा कॉल ची व्हॅल्यू काय आहे? नफ्यात असेल तर काढ. वर लिहल्याप्रमाणे निफ्टी स्ट्रगल चालू आहे.

केदार ,
निफ्टीचे अन मार्केट्चे तुझे मत खूप उपयोगी आहे...as Always !!!!!! Happy
SBI put i got 20% return...:)

Reliance तुला oversold नाही वाटत का ?

हो ओव्हरसोल्ड आहे. खरेतर इथे बाय करायला हवा. फ्युचर घेउ शकता ९२० चा स्टॉपलॉस लावून. पण रिलायन्स ड्रॅग मोड मध्ये असल्यामुळे मी परत पोझिशन घेत नाही. एक बाउन्स मिळाला तर फ्युचर मध्ये एन्टर करेल. मग तिथून रॅली झाली तर निदान ९८० लेवल सहज येऊ शकते. पण तो रिव्हर्सल डे येण्याची वाट पाहतोय.

अरे बापरे. काल इटी नाव वर मुकेश अंबानी यांची मुलाखत होती त्यात त्यांनी सांगितले म्हणून मी इथे लिहीले. मी ही कुठेच दुसरीकडे बातमी वाचली नाही. आता ती मुलाखत जुनीच असेल तर मग चुकीच्या माहिती बद्दल क्षमस्व. चेक करते.

केदार
चांगली माहिती दिलीस. फेबोनासी असे सांगतो. Markets have a high probability tendency of reversing on a Fibonacci number or ratio in all degrees of trend. Common retracements are 38%, 50%, 61.8% or 78.6%. ६२% त्यातले आले.
केदार ह्या साइट वर ग्राफ कसा टाकायचा?
अश्विनीमामी
रिलायन्सने गेल्या वर्षी बोनस दिला. मामी मधुन मधुन केदार ला उसकत रहा. आम्हाला पण फायदा होतो.
मनीष
५५०० च्या कॉल मधुन तुला किती पाहिजेत ते ठरव. कारण ह्यात खुप फ्लकट्युएशन होतात. टाइम तुझ्ह्या बाजुने आहे. तुला २०% हवे असतील तर रोज ९३ ची ऑर्डर ठेवुन दे. कधि कधि वेळ मिळत नाही. त्या नंतर जर निफ्टी आणखीन वर गेला, तर वरचे देवाला.

केदार ,
Fast reply बद्दल thanks !!!!! Happy
आत्तच मी future 944.35 ला घेतला.
मलाही ९२० ची buy लेवल वाटते.......०१/०९/२०१०ला मी buy opportunity missed...
but in cash i am purchasing as a SIP.

सुरेश वर मी Fibonacci ग्राफच टाकला आहे. इथे टाकताना ह्या चौकटी खाली मजकुरात इमेज द्या असे लिहले आहे त्यावर क्लिक करुन अपलोड करायचे, मग सेन्ड टू टेक्स एरिया. मग इथे दिसेल.

मामी मुलाखत जुनी नसेल, त्याने फक्त १:१ बोनस दिला असे म्हणले असेल. मी तरी विचार करत होतो, इतकी महत्वाची बातमी सुटली कस काय. Happy पण चलेगा.

त्या आशूला आत्ताच पाहिल. मुलगी आहे, मला वाटलं कोणीतरी दक्षिण किंवा उत्तर भारतीय मुलगा असावा. Happy

धन्यवाद सुरेश. मी ९५ ची ऑर्डर देउन ठेवली आहे. एका आठवड्यात/महिन्यात २०% म्हणजे लैच भारी आणि माझे टारगेट पण तेच आहे. केदार निफ्टी डळमळीत आहे म्हणाला म्हणून मी तसं विचारलं. जर निफ्टी पुढचे काही दिवस खालीच जाणार असं वाटत असेल तर काढून टाकावा का असा विचार करत होतो.

Pages