मार्केट टॉक - आउटलूक

Submitted by केदार on 27 January, 2010 - 13:28

सेन्सेक्स आज ४९० पाँईटसने घसरला. पुढे काय?

१. २० ऑगस्टला मार्केट पडले पण २१ ला मार्केट गॅपने उघडले (१०४) व सुरु झालेली रॅली ( १४९२१) आक्टो १७ ला १७३२६ ला थांबली. (मध्ये एकदा दोन तीन दिवस पडून १५३९८ लेव्हल ला सपोर्ट घेऊन परत ही रॅली झाली.
२. नंतर तिथून खाली येऊन १५९०४ पर्यंत परत एकदा मार्केट खाली आले. (नोव्हे ३)
३. नोव्हे ३ पासून परत मार्केट वर गेले नोव्हे २५ पर्यंत १७१९८.
४. नोव्ह २७ ला गॅप डाउन ने मार्केट ओपन झाले. ( ओपन १६७१८ , हाय १८७१८, लो १६२१०, क्लोज १६६३२)
५. नंतर साईडवेज कधी वर कधी खाली करत ६ जानेवारीला हायस्ट पाँईट म्हणजे १७२९० ला गेले.

ह्या सर्व डेटाचा टेक्नीकल अ‍ॅनॅलिसिस केला तर बर्‍याच कन्फुझिंग लेवल्स सापडतात. पण नेमका ह्यावेळी मग इतिहास लक्षात घेऊन मागे मार्केट मध्ये काय घडले ह्यावर विचार केला. दर जानेवारीत गेले ५-६ वर्षे मार्केट पडते.

दिड-दोन आठवड्यांपूर्वी मी आणि उपास बोलताना त्याने विचारले की नंतरच्या लेवल्स काय असतील. त्याचाशी बोलताना मार्केट लवकरच खूप पडुन फर्स्ट सपोर्ट लेव्हल १६२०० वर जाईल असे सांगीतले होते. तेंव्हा मार्केट १७,७०० च्या आसपास होते, व १६,२०० कुठेही बोर्डवर येतील असे दिसत नव्हते. पण आज मार्केट १६,२८९ ला आहे.

उद्या एक्सापरीचा गुरुवार असल्यामुळे त्याचाही परिणाम होणार.

पुपुवर गेल्या आठवड्यात लिहीले होते की पैसे गोळा करा. आता ती वेळ येऊ घातली आहे. कालचा फॉल १६,२०० ला टच झाला नाही म्हणजे ह्या सपोर्ट लेव्हल तो थांबेल का? हे पाहायला आणखी दोन तीन दिवसांची गरज आहे पण इथे जर लगेच सपोर्ट मिळाला नाही तर नंतरचा सपोर्ट साधारण १५,३०० ते १५,५०० आहे असे वाटते.

पैसे असतील तर अनेक चांगले सेक्टर्स - मेटल्स, इन्फ्रा आणि फार्मा हे चांगले वाटत आहेत, जर अजून खाली घसरले तर नक्कीच ह्यात नक्कीच गुंतवणूक करायला सुरु करावी.

* हे सर्व माझे अंदाज आहेत, जे चुकीचेही असू शकतात. (असतात) आपले पैसे निट विचार करुन गुंतवा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केदार, तू युएसमध्ये गोल्ड वगैरे मध्ये गुंतवणूक करतोस का? जरा ह्याबद्दल माहिती सांग ना प्लीज.
डीपसी, तुम्हीही सांगा हो. गुंतवणूक करायची म्हणजे नक्की काय करायचं? इथे गोल्ड ETF घ्यावा लागतो ना?

फचिन मी गोल्ड मध्ये गुंतवणूक करत नाही. पण गोल्ड ETF हा पर्याय चांगला आहे, तसेच गोल्ड नाणी पण चांगला पर्याय आहे. (ऑफकोर्स बँकेत लॉकर असेल तर). Happy

काही स्टॉक्स शॉर्टटर्म साठी. (निदान १ महिना, रिझल्ट कॅलेन्डर)

१. ओरियन्टल बँक - एस्टीमेटेड प्रॉफिट २८ टक्क्यांनी वाढला आहे. मागे ४२५ चे टारगेट अचिव्ह झाल्यावर मी इथे ५५० असे टारगेट लिहले आहे. तो ५२५ क्रॉस करुन आला आहे, सध्या ४९५ ला आहे. रिझल्टच्या वेळी वर जाईल.

२. येस बँक - एस्टीमेटेड प्रॉफिट ४४ टक्क्यांनी वाढला आहे. अजुन १० टक्के सहज मिळावेत.

३. मारुती सुझुकी - दिवाळी मध्ये खूप लोकं कार घेत असतात. मारुती नेहमीच सेकन्ड क्वार्टर मध्ये परफॉर्म करतो. डिलेव्हरीसाठीच्या कार्स सप्टे मध्ये बाहेर येत असतात, त्यामुळे आत्ताचा किमतीत ५ टक्के वाढ सहज होऊ शकते.

४. टाटा मोटर्स - परत एकदा. Happy १२५० सहज शक्य दिसतात. मागच्या महिन्यात मी ११५० साठी लाँग जायला सांगीतले होते, पण ह्या महिन्यात एस्टीमेटेड प्रॉफिट ४५ टक्के आणि एस्टीमेटेड सेल्स ४४ टक्क्यांनी वाढला आहे.

जर खाली आले तर स्टॉक वा फ्युचर पोझिशन घ्याव्यात. (घेतल्या असतील तर डबल कराव्यात असे मला वाटते.) महत्वाचे म्हणजे जर हे सर्व शेअर्स घेतले तर रोज रिझल्टवर लक्ष ठेवून रिझल्ट जाहीर झाल्यावर विकावेत.

गोल्ड ETF चे मार्गदर्शन मला पण हवेय.. तसे भारतामध्ये ६ - ७ च आहेत ना... सगळेच सारखे वाटताहेत..
की आत्ता मार्केट हाय असल्याने इथे पण थाम्बून वाट पाहायची?
मार्केट इतके हाय आहे की आता बहुदा दिवाळी नन्तरच आमची बोहनी होणार असे दिसतेय.... Sad

गुंतवणूक म्हणून नाही पण ट्रेड म्हणून बोहनी आत्ताच करा कारण दिवाळी नेहमीच चांगली असते. दुसर्‍या तिमाहीचे निकाल लागतात. म्हणून रोज पोझिशन घेणे, निकालानंतर स्वेअर ऑफ करणे. भरपुर कमवाल. Happy फक्त बाजारातील बातम्यांकडे (आपण घेतलेल्या) खूप लक्ष द्यावे लागेल. बोहनी करायला कुठलिही PSU बँक घ्या, फायदाच होईल.

Happy खरे आहे हो! खूप दिवस झाले नुस्ते बारकाईने निरीक्शण आणी "अभ्यास" सुरु आहे. आता जरा रिस्क (ट्रेड म्हणून बोहनी) घ्यायलाच हवी!
फायद्यानन्तर तुम्हाला कमिशन नक्की!! Happy

Happy कमिशनचे जाउदेत. तुमचा (वाचकांचा) आर्थिक फायदा हेच ह्या बाफचे उदिष्ट्य.

रिस्क घेण्या आधी पेपर ट्रेड करा. वर्ड वा एक्सल मध्ये तुम्हाला हवी ती किंमत व तो जाईल तिथपर्यंतची किंमत लिहा. (अंदाज, वा मी वर लिहलेल्या) आणि सलग काही दिवस पाहा. (वरचे शॉर्ट टर्म रिझल्ट पर्यंत) आणि मग हळूहळू स्वतःवर व मार्केट वर विश्वास निर्माण होईल तेंव्हा रिस्क घ्या. त्या आधी कितीही वेळ घेतला तरी चालेल. मार्केट कुठेही जाणार नाही. पण पुरेश्या तयारी आधीच आलात तर आपले पैसे मात्र जातील. इथे पण दुर्घटनासे देर भली चालेल. Happy पण एक दोन दुर्घटना (छोट्या) व्हायला मात्र हव्यात, त्यातून खूप शिकता येते.

केदार, मनीकंट्रोल मध्ये वॉच लिस्ट नावाचा प्रकार आहे. त्यामध्ये ट्रॅक ठेवता येतो. आपले अकाउंट तिथे काढल्यावर वॉच लिस्ट तयार कराता येते.
वर्ड वा एक्सल मध्ये तुम्हाला हवी ती किंमत व तो जाईल तिथपर्यंतची किंमत लिहा. >> हा अंदाज कसा बांधायचा हे मला कळत नाही ( म्हणजे खरतर बेसीक गोष्टच समजत नाही :फिदी:)

केदार धन्यवाद. मी तरी सध्या डे ट्रेडिंगवरच लक्ष द्यायचे ठरवलेय. f &o वाचतेय पण अजुन सगळे लक्षात येत नाहीय. शिवाय रिस्कही मोठी आहे त्यात... Happy डे ट्रेडिंग करताना जरा धास्ती वाटली की लगेच आपले पैसे तरी काढुन घेता येतात....

वर्ड वा एक्सल मध्ये तुम्हाला हवी ती किंमत व तो जाईल तिथपर्यंतची किंमत लिहा

मी माझ्या एचडिएफ्सीच्या ट्रेडींग मध्येच टेस्ट पोर्टफोलिओ बनवुन मी न घेतलेले पण इतरांनी सजेस्ट केलेले शेअर्स कसे परफॉर्म करताहेत ते पाहते. किती तारखेला काय झाले तेवढे लक्षात ठेवते.

साधना डे ट्रेडिंग ही एक्पर्ट पायरी आहे. बहुतांश ट्रेडिंग करणारे लोक डे वरुन सुरु करुन कॅपिटल गमावतात. कारण तेच तुम्ही लिहलेलं ( जरा धास्ती वाटली की लगेच आपले पैसे तरी काढुन घेता येतात). माझा अनाहुत सल्ला समजा पण सुरुवात डे ट्रेड पासून नका करु. ४ मिनिट, १५ मिनिट १ अवर असे चार्ट तिथे वाचावे लागतात, त्याची तयारी करणे फार अवघड आहे.

अर्थात तयारी असेल तर उतरा. पण ५० टक्के डे ट्रेडर्सना हे चार्ट कसे वाचायचे हे पण माहित नसते. उलट डे पेक्षा F & O मध्ये कमी रिस्क आहे कारण भाव कमी वा जास्त व्हायला तितके दिवस मिळतात. तुर्तास नका करु इतकेच म्हणेन.

सुरुवात म्हणून तुम्ही निफ्टी वर लक्ष ठेवा आणि ६१०० ( + / -) आले की एक फ्युचर घ्या. ते पण नोव्हेचे. वाटल्यास मी सांगेन कधी घ्यायचे ते.

स्वाती, रकमेचा अंदाज बांधने ही फार पुढची स्टेप आहे. मी अंदाज बांधतो तो तुम्ही तिथे लिहा. वाटल्यास ५ टक्के पुढची रक्कम लिहा. (मी इथे लिहलेल्या शेअर्स वर.) मुख्य मुद्दा हा की आजची, उद्याची, परवाची किमंत लक्षात राहायला हवी.

गाणे गायचे असेल तर ताल माहित हवेत. शेअर्स घ्यायचे असतील तर रोजच्या किमती लक्षात असायला हव्यात, सवयीने मेमरी कालच्या किमतीलाच लक्षात ठेवते, आधिच्या रिसेट करते, एक किंवा दोन शेअर बाबतीत हे करुन पाहा.

सुरुवात म्हणून तुम्ही निफ्टी वर लक्ष ठेवा आणि ६१०० ( + / -) आले की एक फ्युचर घ्या. ते पण नोव्हेचे. वाटल्यास मी सांगेन कधी घ्यायचे ते.

प्लिज सांगा. कारण माझे पैसे गेलेले आहेत डे ट्रेडींगमध्ये. Happy मी त्याचे वाईट वाटुन घेत नाही. जे माझ्याकडुन गेले ते गेले.. रडत बसण्यात पॉईंट नाही...

माझ्या एका मित्राचे फ्युचर्समध्ये गेले होते, त्याने मला 'कधीही ह्या भानगडीत पडु नकोस' शेअर्स घे, रोज बघत बस आणि १०-१५% प्रोफिट झाला की विक असा सल्ला दिलेला. त्याचे नुकसान पाहुन मला धास्ती बसलीय फ्युचर्सबद्दल Happy

रच्याकने, मला चार्टमधले काहीही कळत नाही. कॉमर्स ग्रज्युएट असुनही मला झाडाचे पान दाखवलं तर त्या झाडाची फॅमिली सांगेन लगेच पण रेशो आणि चार्टमधले काहीही कळत येत नाही.... Proud

गेले ते गेले.. रडत बसण्यात पॉईंट नाही >> नाही नाही रडायचे नाही, पण का गेले? हे तपासायचे. त्याचे उत्तर मिळाले की पुढचे पैसे जात नाहीत. (अर्थात असे होत नाही पण कमी जातात.)

मला चार्टमधले काहीही कळत नाही. >> मी सगळ्या इंडिकेटर्सची इथे तोंडओळख करुन देण्याचा प्रयत्न करत आहे, होईल तसे टाकेन. पण एक टेक्नीकल अ‍ॅनॅलिसिसचे पुस्तक घेउन या व पाहा. ट्रेड करायचे असेल तर चार्ट माहिती हवेत. Happy

त्याचे नुकसान पाहुन मला धास्ती बसलीय फ्युचर्सबद्दल >> असं होत असतं. मागे मी इथे माझेच उदा दिले होते. Happy

४ मिनिट, १५ मिनिट १ अवर असे चार्ट तिथे वाचावे लागतात, त्याची तयारी करणे फार अवघड आहे. >>>>>>>>>
चार्ट कसे, कोठे वाचावे, मागे मी सॉफ्ट्वेअर विषयी विचारले होते, केदार, ह्या विषयी सविस्तर लिहाल का?

संदिप हे चार्ट कुठेही मिळत नाही, त्यासाठी लाईव्ह डेटा फिड घ्यावा लागतो. ( रु ९००० ते २५००० वार्षिक फी). मेटास्टॉक, प्रॉफिटसोर्स ह्या कंपन्या हे सॉफ्टवेअर विकतात, त्यांची किंमत देखील २५००० ते कितीही असू शकते.

भारतात http://www.viratechindia.com/ हे मेटास्टॉक सॉफ्टवेअर विकते.

आणखी एक http://www.idslindia.com/

https://www.profitsource.com/

आणखी खूप आहेत. पण लाईव्ह डेटा फिड असल्याशिवाय डे ट्रेड करु नये. पण एन्ड ऑफ द डे डेटा मिळत असेल तर रेग्युलर फ्युचर्स ऑप्शन्स साठी भरपुर झाले. फ्युचर्स ची पोझिशन घेउन दर मिनिटाला बघायची गरज नाही. Happy

बरेच ठिकाण्या उदा. याहू, गुगल इथे एन्ड ऑफ द डे चा डेटा फ्रि मिळतो, एखादे प्लगईन शोधून ते हव्यात्या सॉफ्टवेअर मध्ये लावता येईल.

मायबोलीकर उपासने एक सॉफ्टवेअर तयार केले आहे, ते मी पाहिले, डेटा तो असाच डाउनलोड करत आहे, पण खूप इंडिकेटर्स नाहीत. आम्ही विचार केला होता की काही इंडिकेटर्स टाकावेत, पण तो प्रोजेक्ट अर्धवटच राहिला आहे. कधीतरी पूर्ण करु. Happy

एक्सल मध्ये तुम्हाला हवी ती किंमत व तो जाईल तिथपर्यंतची किंमत लिहा >>>
मी अंदाज बांधतो तो तुम्ही तिथे लिहा. वाटल्यास ५ टक्के पुढची रक्कम लिहा. ( >>>

साधना... वर केदारने सांगितल्या प्रमाणे मी २००६ पासून ही स्ट्रॅटेजी वापरत आहे... २००६च्या सुरवातीला केदारने जुन्या माबोवर RIL, LNT, ONGC, ITC हे शेअर सुचविले होते... त्या वेळी मार्केट वर जात असल्यामुळे ७०% फायदा झाला होता... डे ट्रेडिंग पेक्षा डिलीव्हरी कधीही सेफ गेम... १०% ते २०%चा मार्जिन फॉर्मुला वापरून ट्रेड करावे... फक्त वाट बघायची तयारी ठेवायची... F&O ची मजा डिलीव्हरी मधे नाही मिळणार...

गोल्ड मध्ये गुंतवणूक करण्याचे २ options आहेत.
१)गोल्ड ETF - it is used for trading(less comission/and charges)
२) गोल्ड मनी account - http://goldmoney.com?gmrefcode=1goldsilver1 (Long term)
मी २ वषा पासुन long term purchase साठी वापरत आहे.

कमिशनचे जाउदेत. तुमचा (वाचकांचा) आर्थिक फायदा हेच ह्या बाफचे उदिष्ट्य.
>>
Happy सही रे केदार, एकदम क्रेमरसारखाच म्हणालास. क्रेमर हे जे म्हणतो ते आवडते मला फार -
Welcome to Cramerica! Other people want to make friends, I want to make you some money. My job is not only to entertain you, but also to teach and coach you.

फक्त entertainment सोडलं तर बाकी सगळं खरं आहे तुझ्या बाबतीतसुद्धा. तुझ्यामुळे खरंच पुष्कळ फायदा झाला आहे मला. तू पण आता क्रेमरसारखं, पण शुध्द मराठीत, एक स्लोगन तयार कर. Proud

Lol क्रेमर मलाही आवडतो. Happy खरं आहे फ्रेन्ड भरपुर ठिकाणी असतातच.

बाकी सगळं खरं आहे तुझ्या बाबतीतसुद्धा >> अबब. लिजंड लोकांचा अपमान होईल मला त्यांचा रांगेत बसवलस तर. पण तरीही धन्यवाद. नफा झाल्यावर मजा येते खेळाची. Happy

क्रेमरने एकदा १०३ मिलियन गमावले. ( २०० + चा फंड ९८ वर आला) पण वर्षाअखेरीस तोटा ५० टक्यांवरुन फक्त ३ टक्यांवर गेला. त्याने सगळा तोटा भरुन काढला. मला तोटा झाल्यावर मी हे लक्षात ठेवतो. तसाही निफ्टी काल परवा पडला आणि मी लाँग आहेच. ह्या बाबतीत मॅड असण्याचा हा फायदाच. Happy

कोल इंडियाचा आयपीओ कसा आहे? लावावेत का?

IDFCचे बाँन्ड्स आणि L&T Infra चे बॉन्ड्स पण मार्केट मध्ये आहेत सध्या. त्याबद्दल काही माहिती?

केदार आणि अन्य जानकार,
लक्ष्मि येर्नजी, नेक्टर लाईफ आणि डेक्कन क्रोनो लौन्ग टर्म करता कसे आहेत?

कोल इंडियाचा आयपीओ चांगला आहे, तो मल्टिटाईम्स सबस्क्राईब होणार त्यमुळे मार्केट लिक्विडिटी कमी होणार आहे कारण ती एक चांगली कंपनी आहे व सर्वच लोक त्याला १ लाखाने अप्लाय करणार. हे अगदी २००८ च्या रिलायन्स सारखे होणार आहे, पण सिल्वर लायनिंग अशी आहे की लिक्वीडिटी कमी झाल्यामुळे फ्रंन्ट लायनर्स विकत घेता येतील.

भाऊ थोड्यावेळाने लिहितो.

जामोप्या सॉरी नाहीये, फार नाही. थोडाफारच. स्ट्रॅटेजी म्हणून मी फक्त ८ ते १० स्क्रिप्ट मध्ये व इंडेक्स मध्येच लक्ष देतो, इतरांकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही व लक्ष दिले तर सगळ्यांचा एकत्रीत अभ्यास होऊ शकणार नाही.

>>चार्ट कसे, कोठे वाचावे (लाइव्ह डेटासाठी)
संदीप, केदार ने वरती म्हटल्याप्रमाणे, मी एक वेबसर्व्हिस सबस्र्काईप केलेय, जावा मध्ये. http://www.trutech.com.au/MarketWatch/MarketWatch.asmx?wsdl इथून डेटा घ्यायचा.. सध्या तरी मी एन्ड ऑफ द डे घेतोय पण गरजेनुसार सॉफ्टवेअर लिहीणं सहज शक्य आहे. तर मी ही वेब सर्व्हीस वापरुन डेटा घ्यायचो आणि मला हव्या त्या शेअरचा डेटा माझ्या एक्सेल मध्ये उतरवायचो... विंडोज मध्ये डेली टास्क शेड्युल करुन सगळ ऑटोमेट केलं होतं.. हे मी केवळ गंमत म्हणून केलं, पण मला स्टॉक ची मुव्हमेंट समजायला फायदा झाला... असे कॉल्स दिवसातून कैक वेळा मारुन लाईव्ह डेटा पण घेता येत असावाच.. पण सॉफ्टवेअर खूप प्रिसाईज आणि एक्क्ञुरेट असण आवश्यक आहे त्यासाठी. डायरेक्ट स्टॉक एक्सेंज कडूनही डेटा पब्लीश होत असणारच.. सगळ्यात चांगलं म्हणजे मार्केट वॉच ची ही वेब सर्विस वापरायला चकटफु आहे.. Wink आणि हो एकदा तुमच्याकडे डेटा आला एक्सेल मधे की चार्टींग तुम्ही हवं तसं करु शकता. असो, केदार म्हणाला तसं, पुन्हा वेळ झाला की लक्ष घालेन यात, दरम्यान कुणी जावा डेव्हलपर इंटरेस्टेड असेल तर मी मार्गदर्शन करु शकेन ह्यात.

एस बी आय चे बॉन्ड ९.२५% च्या दराने [१० वर्षासाठी] १९-ऑक्टो. पासुन उपलब्ध आहेत.
ह्याच्या परताव्यावर टी.डी.एस. नाही कापला जाणार.

इथे पहा.

केदार
तसाही निफ्टी काल परवा पडला आणि मी लाँग आहेच. ह्या बाबतीत मॅड असण्याचा हा फायदाच.>>>>>
निफ्टी ने दोन विक बार रिव्हरसल दाखवलाय (लाँग टर्म चित्र बुलिशच आहे). तू कधि पर्यंत होल्ड करणार?
रेंज काय वाटते?

स्ट्रॅटेजी म्हणून मी फक्त ८ ते १० स्क्रिप्ट मध्ये व इंडेक्स मध्येच लक्ष देतो>>>>>
ह्यात इनव्हेस्टमेंट अ़सते का? का त्या स्क्रिप्ट वेगळ्या असतात? बघता बघता माझ्याकडे २० स्क्रिप्ट झाल्या म्हणून
प्रश्न?

Pages