मार्केट टॉक - आउटलूक

Submitted by केदार on 27 January, 2010 - 13:28

सेन्सेक्स आज ४९० पाँईटसने घसरला. पुढे काय?

१. २० ऑगस्टला मार्केट पडले पण २१ ला मार्केट गॅपने उघडले (१०४) व सुरु झालेली रॅली ( १४९२१) आक्टो १७ ला १७३२६ ला थांबली. (मध्ये एकदा दोन तीन दिवस पडून १५३९८ लेव्हल ला सपोर्ट घेऊन परत ही रॅली झाली.
२. नंतर तिथून खाली येऊन १५९०४ पर्यंत परत एकदा मार्केट खाली आले. (नोव्हे ३)
३. नोव्हे ३ पासून परत मार्केट वर गेले नोव्हे २५ पर्यंत १७१९८.
४. नोव्ह २७ ला गॅप डाउन ने मार्केट ओपन झाले. ( ओपन १६७१८ , हाय १८७१८, लो १६२१०, क्लोज १६६३२)
५. नंतर साईडवेज कधी वर कधी खाली करत ६ जानेवारीला हायस्ट पाँईट म्हणजे १७२९० ला गेले.

ह्या सर्व डेटाचा टेक्नीकल अ‍ॅनॅलिसिस केला तर बर्‍याच कन्फुझिंग लेवल्स सापडतात. पण नेमका ह्यावेळी मग इतिहास लक्षात घेऊन मागे मार्केट मध्ये काय घडले ह्यावर विचार केला. दर जानेवारीत गेले ५-६ वर्षे मार्केट पडते.

दिड-दोन आठवड्यांपूर्वी मी आणि उपास बोलताना त्याने विचारले की नंतरच्या लेवल्स काय असतील. त्याचाशी बोलताना मार्केट लवकरच खूप पडुन फर्स्ट सपोर्ट लेव्हल १६२०० वर जाईल असे सांगीतले होते. तेंव्हा मार्केट १७,७०० च्या आसपास होते, व १६,२०० कुठेही बोर्डवर येतील असे दिसत नव्हते. पण आज मार्केट १६,२८९ ला आहे.

उद्या एक्सापरीचा गुरुवार असल्यामुळे त्याचाही परिणाम होणार.

पुपुवर गेल्या आठवड्यात लिहीले होते की पैसे गोळा करा. आता ती वेळ येऊ घातली आहे. कालचा फॉल १६,२०० ला टच झाला नाही म्हणजे ह्या सपोर्ट लेव्हल तो थांबेल का? हे पाहायला आणखी दोन तीन दिवसांची गरज आहे पण इथे जर लगेच सपोर्ट मिळाला नाही तर नंतरचा सपोर्ट साधारण १५,३०० ते १५,५०० आहे असे वाटते.

पैसे असतील तर अनेक चांगले सेक्टर्स - मेटल्स, इन्फ्रा आणि फार्मा हे चांगले वाटत आहेत, जर अजून खाली घसरले तर नक्कीच ह्यात नक्कीच गुंतवणूक करायला सुरु करावी.

* हे सर्व माझे अंदाज आहेत, जे चुकीचेही असू शकतात. (असतात) आपले पैसे निट विचार करुन गुंतवा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केदार,

लौन्ग टेर्म साठी NTPC मध्ये गुनतवनुक करावी का? का थोडे थाम्बावे?

धन्यवाद

थोडे निफ्टी विषयी.
३० जुन ला (निफ्टी क्लोझ ५३१२) Quarterly चार्ट वरुन Q3 ची टार्गेट काढली होती. लो ५०९५ व हाय ५६१८ दाखवले होते. त्यानंतर प्रत्येक महिन्याचा व विकचा आढावा घेत होतो. ३१/८ ला संपलेला महिना व ३/९ ला संपलेला आठवडा खालिल सांगतो. क्लोझ ५४७९
मार्केट अजून बुलिश आहे.
गेले ४ महिने मार्केट महिन्याला साधारण ९० पॉइंट ने वर गेले. (हाय ३१/५ ५२७८, ३०/६ - ५३६६, ३०/७ ५४७७ ३१/८ ५५४९ सप्टेंबर कदाचीत ५६३९??? )
मार्केट चे सपोर्टस ५४६०, ५४४० व ५३७०
मार्केटची वरची टार्गेटस. ५४९७, ५५१६, ५५६१ व ५६०३
आज तरी खाली यायचे कुठलेही संकेत नाहित.
वर जाणार असेल तर कुठले सेकटर्स मदत करतात ते बघुया.

मार्केटची वरची टार्गेटस. ५४९७, ५५१६, ५५६१ व ५६०३
>>>>
कोनीतरी Reliance ला देखील घेऊन जा रे.............:(
Chart showing weakness only.........

मार्केटची वरची टार्गेटस. ५४९७, ५५१६, ५५६१ व ५६०३
>>>>
कोनीतरी Reliance ला देखील घेऊन जा रे.............:(
Chart showing weakness only.........

केदार, सतीश... निफ्टी कॉल काढला ९५ ला. (३ दिवसात १५%) Happy तिथून तो बराच वर गेलाय पण नो रिग्रेटस्. याच्या पुढील निफ्टीची रेंज,मूव्हमेंट कशी असेल?

केदार
आत्ता मार्केट बघितले. ५५७८. वर जोरात गेले आहे. थोडे करेक्शन देईल का?
मार्केटने करेक्शन दिले तर at least ५५३४ पर्यन्त ची लेव्हल दाखवेल. थोडेसे शॉर्ट जाण्याचे घेण्याचे धेर्य होत नाहिये, कारण दोन कॉल मध्ये मार खाल्लाय.

केदार
Apollo, CEAT वाढले आहेत. अपोलोत एन्ट्रि आहे. Additional purchase साठि अजुन दोनही योग्य आहेत का? का आता महाग झाले आहेत?

केदार ,
काल Reliance future 951ला विकला (bought 944.35)........:)
Reliance Chart is looking not so weak now.
What you say?

सतीश
Reliance Chart is looking not so weak now.>>
शॉर्ट टर्मला ते बरोबर आहे. पण मिड टर्म व लाँग टर्म अजून विक आहे. अडथळे बरेच आहेत. क्लोझ ९६१
रेझिस्टन्स ९७५, ९९२, १००३, १०१८
म्हटले तर रिलायन्स साठि फार लांब नाहीत. तरी पण सर्व रेझिसन्स म्हणून काम करणार आहेत, कारण मॅकडि पण विक आहे.

तीन दिवस बाहेर होतो. इकडेही पाहिले नाही

रिलायन्स साठी सुरेश म्हणतो ते बरोबर वाटत आहे. पण आज बघू काय होते, त्यावरुन मी ठरवेल विकायचा की नाही ते. मी निफ्टीवर शॉर्ट आहे ५५९० पासून. मला वाटतं मार्केट ७० पॉईंटनी मागे जाईल. ५५५० च्या खाली विकेल. बघू काय होते ते. ५६१५ चा स्टॉप लॉस ठेवून शॉर्ट करता येईल.

केदार्,सुरेश१,
निफ्टी ५७००-५७५० टेस्ट करेल काय? मार्केट येवढे वर गेले आहे, करेक्शन झाले तर किति खाली येईल?

सई

सई
चार्टस येणार्‍या विक साठि खालील सांगतायत.
क्लोझ ५६४०. सपोर्ट ५६००, ५५७५, ५५४०, ५५००. (५५७५ व ५५०० स्ट्राँग सपोर्टस आहेत)
रेझिस्टन्स. ५६७०, ५७०० (हा सायकॉलॉजिकल), ५७२४ व त्या वर ५८०८.
दोन पॉसबलिटि.
मार्केट प्रथम खालि आले तर ५५७५ चा सपोर्ट घेवुन परत ५६४० दाखवू शकेल. ५६४० मग परत कधि तोडतो त्या वर ५७०० कधी गाठेल ते ठरेल.
क्लोझ (५६४०) हाय (५६४७) च्या जवळ आहे. तेंव्हा आधी ५७०० गाठले तर सर्व शॉर्ट वाले लॉस घेवून बाहेर पडतील. मग मोठे प्लेअर्स प्रॉफिट बुक करतील. हे जर मंगळवार पर्यंत घडले तर ५५९०-७५ पर्यंत तरी करेक्शन येवू शकते.

सुरेश , केदार
Reliance बद्दल thanks !!!!!!!!
मी ३ दिवस बाहेर आसल्याने मार्केट व हा बीबी बघितलाच नाही........
मार्केट न Reliance मला confuse करतायेत...........
What you people Say?

मार्केट मला कन्फुज करत आहे हे नक्कीच. मी इथे मागच्या महिन्यात निफ्टी ५७६० दाखवेल हे लिहले होते. (PE चे गणित अ‍ॅनॅलिस्ट कसे करतात ह्या मुद्याच्या वेळी) आता एकदम टॉप PE वर आहे. १ सप्टे ला २३.०२ वर असणारा पिई आज २४.३२ वर आहे. मला हे रिस्की वाटत आहे.

खरी गंमत म्हणजे मी रिलायन्सवर लाँग व निफ्टीवर शॉर्ट होतो. (का असे केले मलाच माहित नाही,क किंवा निफ्टीने विचार करायला वेळच दिला नाही असे म्हणने संयुक्तीक ठरेल. Happy ) इथेच मी रिलायन्स ड्र्ग करत होता हे लिहिले होते, रिलायन्स जसा जसा वाढला तसे तसे निफ्टी गेला. मला वाटतं मी लिहलेले रिलायन्स्चे १०३० चे टारगेट येईल, पण त्या आधी मार्केट थोडे पडावे लागेल. तरच कन्फर्मेशन होऊ शकेल. सध्या व्हेव येत नाहीये ही धोकादायक बाब ठरु शकते. कारण व्हिक्स पण १८ च्या वर गेले आहे.

निफ्टीची २०० पाँईटची रॅली होताना मला फारसा फायदा झाला नाही, ९० ने रॅली झाल्यावर मी पोझिशन स्वेअर ऑफ केली. पण रिलायन्स मध्ये लाँग असल्यामुळे तोटा नाही झाली. (एक प्रकारचे मार्केट हेजींग झाले असे म्हणून लॉस पचवला. Happy )

आता आज अभ्यास करुन परत इथे लिहिन.

केदार,
खरच मार्केट सध्या खुप कन्फ्युज करत आहे. मला तर काहिच कळत नाहिये काय चाललय. खरच तुम्ही आज लिहा , निफ्टी ६००० खरच गाठेल काय? (मनिक्ट्रोल वर वाचले).

सई

Nifty_Sep13.gif

५३६४ च्या आसपास चालू झालेली रॅलीने मागच्या जुलै ते सप्टे रॅलीच्या १३३ टक्के ऑलरेडी परफॉर्म केले आहे. जनरली रॅली ५० टक्यानंतर चालू होते ती परत ७५ च्या वेळी हॉल्ट घेते. चार्ट कडे पाहा. ७५, १०० आणि १३३ ह्या प्रेशर पाँईटमध्येच रॅलीने त्या दिवसापुरती धाव घेउन परत दुसरे दिवशी चढन चढली आहे. आजही १३३ वर थांबली आहे.

आज मार्केट १५० % च्या पाँईटला म्हणजे ५८२३ ला पण टच करु शकते असे वाटत आहे. कारण कालचे ओपन, लो, हाय पाहिले तर मार्केट मध्ये स्टिम आहे. पण २०० टक्के म्हणजे ५९८९ (पर्यायाने ६०००) येणे थोडे अवघड वाटत आहे, तिथपर्यतं जायचे असेल तर मार्केट रिट्रेस व्हायला हवे.

सध्या मी तरी निफ्टीसाठी केवळ वेट अन वॉच धोरण ठेवले आहे. आज जर मार्केट वर ओपन झाले तर मात्र मी पुढच्या ४० पाँईटसाठी मार्केट मध्ये लाँग जाईल.

व्होलटॅलिटी इतकी वाढली आहे अश्यावेळी उगीच पोझिशन घेउन पैसे गमविण्यापेक्षा धिर धरी धोरण ठेवावे. जर उतरलात तर स्टॉप लॉस शिवाय लाँग जाउ नका. मार्केट पडेल असे सर्वांना वाटत असले तरी ते एकदम आता ५४०० ला येईल असे वाटत नाही.

मार्केट न Reliance मला confuse करतायेत...........
+
केदार >>>>
मार्केट मला कन्फुज करत आहे हे नक्कीच
>>>>>>>>>>>>>>> Happy Sad

Swing trading बाद्दल थोड वाचले होते अन मला हा Swing trading तसा convinced आहे...
eg

If Scrip goes up 4 days in row
& 4th day gain is 2%+
then go short at high of 4th day for target 2% gain
eg Infosys

Date :Closing rate
08/09/2010 :2879.4
09/09/2010 : 2895.0
13/09/2010 : 2836.9
14/09/2010 : 3000 (high +2%)

मी २९९८ ला infy आज विकला २९६० ला कव्हर करेल.....
मी आज प्रथमच टेस्ट करत आहे.

आज इथे पार्टी ना >> नाही ना मामी, रॅली मधून बाहेर असल्यावर कसली पार्टी. Happy पण फ्युचर्स नसले तरी स्टॉक्स आहेत त्यामुळे चहाची तहान कॉफीवर भागली जात आहे पण फ्युचर्स जैसा मजा नही. Happy

वा सतीश सही. तो +४ , -३ / -२ चा फंडा मी पण काही स्टॉक्सना टेस्ट केला आहे, दरवेळी होत असं नाही. फक्त तो रुल इतर सर्व न पाहता फॉलो करु नकोस.

केदार,
सूचनेबद्दल thanks Happy ,
तो "रुल" मी आता अधि सर्व बाबी विचारांत घेउनच वापरेल..........

केदार
क्वारटर, मंथ, विक सर्व वरची टार्गेट मार्केट ने दाखवली. आज ऑक्टोबरचा ५७०० चा पुट ७५ ला ठेवला होता. हाय ११४ होता व लो ८५ दाखवला. मिळाला नाही.
क्वारटरचे दुसरे टार्गेट ५९२५ आहे. पहिले ५६१८ होते. त्याच्या आधी करेक्शन व्हावे. किती व केंव्हा हा प्रश्न?
२००८, २००९ सप्टेंबर पेक्षा ऑक्टोबरला मार्केट खाली गेले. २०१०???
आजच्या डेटा वरून ऑक्टोबर पर्यंत ५५४९ दाखवावे??
शॉर्ट टर्म ला ५७३५पर्यंत यावे.

केदार,

इन्फोसिस का वर जातोय? यु.एस. मधे तर आउट सोर्सिन्ग च्या विरूध्द काय काय सुरु आहे....... ते इन्फोसिस च्या फेवर मधे नाहीये ना? मग? की एकूणच वरचा ट्रेन्ड आहे?

काल लिहल्याप्रमाणे निफ्टीने १५०% ला म्हणजे ५८२३ ला पार केले आहे. मला वाटतं आता मार्केट पडणार नाही, थोडेसे पडून परत वर जायला वाव मिळावा, मुख्य गरज आहे ती मार्केट कन्सॉलिडेट व्हायला पाहिजे. काल पासून रिटेल पण वाढले आहे, व्हॉल्युम भरपुर आहे, त्यामुळे सगळं कसं गुडी गुडी दिसत आहे.

माझे आजचे ट्रेड :
टाटा मोटर्सला ११०० साठी लाँग, स्टॉपलॉस १०३० - आजपर्यंत माझा टाटाचा गेस चुकला नाही, मे बी ह्यावेळेस पण बरोबर येईल. Happy
निफ्टी - काल लिहल्या प्रमाणॅ मी लाँग आहे. एक दोन दिवस पडले तरी लाँग राहून अ‍ॅव्हरेज करणार. अगदी ५६०० आले तर मात्र विचार करेन. पण सध्या तरी ५७०० पर्यंत काळजी करणार नाही. तिथे अ‍ॅव्हरेज करेन. पहिले तीन दिवस FII वर घेउन गेले, काल पासून लोकल मनी बाजारात येत आहे, त्यामुळे सध्यातरी लाँगच. Happy

ओरियन्टल पण मस्त वर जात आहे. ४९० पण सहज शक्य दिसत आहेत, आज ठरवेल फ्युचर्स घ्यायचे की नाही.
ONGC एकदम ल्युक्रिटिव्ह दिसत आहे. एक दिवस ह्यावर वाट पाहणार.
रिलायन्स आज विकेल, काल नंतर १०३० पर्यंत सर्ज करेल असे वाटत होते, पण तसे झाले नाही, त्यामुळे वाट नाही पाहणार. ऑलरेडी ९२० ते १००० पर्यंत रॅली झाली, त्यात समाधानी.

ओवी, इन्फी, टिसीएस, विप्रो हे स्टॉक आणखी वर जातील कारण US मध्ये सध्या प्रोजेक्ट मिळने परत सुरु झाले आहे, त्याचा फायदा ह्या कंपन्याना होणार.
बँक सेक्टर ऑलरेडी आउटपरफॉर्म झाले आहे. आयटी, मेटल्स, इन्फ्रा गेले ४ महिने अन्डरपरफॉर्म करत आहे, आता वरचा लेग ह्या सेक्टर पैकी एखाद दोन सेक्टर आणतील, त्यातील बॉन्ड कंपन्या म्हणजे वरील तीन, त्यामुळे सटोडिये दोन दिवसांपासून IT कडे वळले आहेत.

हम्ममम..... इन्फोसिस विकायची घाई केली Sad पण त्यात समाधानी!

चहाची तहान कॉफीवर भागली जात आहे <<<<< आम्हाला कॉफी च आवडते! Happy स्टॉक्स वर कमी बोलता आज काल तुम्ही लोक! Happy

Pages