मार्केट टॉक - आउटलूक

Submitted by केदार on 27 January, 2010 - 13:28

सेन्सेक्स आज ४९० पाँईटसने घसरला. पुढे काय?

१. २० ऑगस्टला मार्केट पडले पण २१ ला मार्केट गॅपने उघडले (१०४) व सुरु झालेली रॅली ( १४९२१) आक्टो १७ ला १७३२६ ला थांबली. (मध्ये एकदा दोन तीन दिवस पडून १५३९८ लेव्हल ला सपोर्ट घेऊन परत ही रॅली झाली.
२. नंतर तिथून खाली येऊन १५९०४ पर्यंत परत एकदा मार्केट खाली आले. (नोव्हे ३)
३. नोव्हे ३ पासून परत मार्केट वर गेले नोव्हे २५ पर्यंत १७१९८.
४. नोव्ह २७ ला गॅप डाउन ने मार्केट ओपन झाले. ( ओपन १६७१८ , हाय १८७१८, लो १६२१०, क्लोज १६६३२)
५. नंतर साईडवेज कधी वर कधी खाली करत ६ जानेवारीला हायस्ट पाँईट म्हणजे १७२९० ला गेले.

ह्या सर्व डेटाचा टेक्नीकल अ‍ॅनॅलिसिस केला तर बर्‍याच कन्फुझिंग लेवल्स सापडतात. पण नेमका ह्यावेळी मग इतिहास लक्षात घेऊन मागे मार्केट मध्ये काय घडले ह्यावर विचार केला. दर जानेवारीत गेले ५-६ वर्षे मार्केट पडते.

दिड-दोन आठवड्यांपूर्वी मी आणि उपास बोलताना त्याने विचारले की नंतरच्या लेवल्स काय असतील. त्याचाशी बोलताना मार्केट लवकरच खूप पडुन फर्स्ट सपोर्ट लेव्हल १६२०० वर जाईल असे सांगीतले होते. तेंव्हा मार्केट १७,७०० च्या आसपास होते, व १६,२०० कुठेही बोर्डवर येतील असे दिसत नव्हते. पण आज मार्केट १६,२८९ ला आहे.

उद्या एक्सापरीचा गुरुवार असल्यामुळे त्याचाही परिणाम होणार.

पुपुवर गेल्या आठवड्यात लिहीले होते की पैसे गोळा करा. आता ती वेळ येऊ घातली आहे. कालचा फॉल १६,२०० ला टच झाला नाही म्हणजे ह्या सपोर्ट लेव्हल तो थांबेल का? हे पाहायला आणखी दोन तीन दिवसांची गरज आहे पण इथे जर लगेच सपोर्ट मिळाला नाही तर नंतरचा सपोर्ट साधारण १५,३०० ते १५,५०० आहे असे वाटते.

पैसे असतील तर अनेक चांगले सेक्टर्स - मेटल्स, इन्फ्रा आणि फार्मा हे चांगले वाटत आहेत, जर अजून खाली घसरले तर नक्कीच ह्यात नक्कीच गुंतवणूक करायला सुरु करावी.

* हे सर्व माझे अंदाज आहेत, जे चुकीचेही असू शकतात. (असतात) आपले पैसे निट विचार करुन गुंतवा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केदार
टाटा मोटर्स १०३५ ते १०७० पर्यंत आला आहे, १०७० ब्रेक झाल्यावर नक्कीच सब ११००.>>>
मी टाटा मोटर्स ११०० साठी लाँग जायला सांगीतले होते, आज ११०९ वर जाउन सध्या ११०० वर आहे. स्वेअर ऑफ करा>>>>>

काही प्रश्न?
१. टाटा मोटार्स कुठल्या लेवल्स ला लाँग केलास.
२. ते बघताना स्पॉट बघितलास की फ्युचर चा रेट?
अजून कधी मी स्टॉक मध्ये लाँग केले नाही म्हणून विचारले?

फ्युचर्स. १०६० आणि १०३५ (कारण तो पडला). आणि आज स्वेअर ऑफ १०८९. चार्ट टाटा मोटर्स स्पॉटचा पाहायचा, त्यावरुन फ्युचर्स प्रिमियम किंवा डिस्काउंट कळतो, प्रिमियम किंवा डिस्काउंट वरुन मार्केट सेंटिमेंट कळते.

टाटा मोटर्स १०३५ ते १०७० पर्यंत आला आहे, १०७० ब्रेक झाल्यावर नक्कीच सब ११००.>>>
केदार गुरुजी ,
१०० % निकाल.........:)
मी miss केला.........

केदार
हेज स्ट्रॅटेजी वर थोड्या वेळात लिहतो.>>>
वेळ मिळेल तेंव्हा आमच्या ज्ञानात थोडी भर घाल.

केदार,
निफ्टी परत ५८०० पर्यन्त यईल का शॉर्ट टर्म मध्ये? जर खाली आली तर कुठे सपोर्ट आहे? कोणत्या लेवल ला बाय करावी?
माझ्याकडे मारुती सुझुकी चे शेअर्स आहेत थोडे आत्ता प्रोफीट बू़क करावे का थाबावे थोडे ?

सई

सुझुकी काल अपसाईड ब्रेकाउट झाला आहे, आजची वाट पाहा, आज जर अगदी ५-१० रु ने कमी गेला तर नका करु, उद्या परत असेच करता येईल. मारुतीने चांगले रिटर्नस दिले आहे. मी इथे १२०० लेवलला मारुती पण सजेस्ट केला होता. २०० + रु चा रिटर्न. Happy

निफ्टीचा आजचा अभ्यास बाकी आहे, करुन सांगतो.

सई, ५८२५-५० लेवलला सपोर्ट आहे असे तर म्हणता येत नाही पण प्रेशर पॉंईटंस तिथे साथ देतील. मला वाटतं ५९०४ पर्यंत एकदा येउन गेला तर मग परत ६१०० सहज शक्य आहेत. पण आधी लिहल्यासारखे मार्केट ओव्हरब्रॉट आहे. कालचा दिवशी रिव्हर्सल झाले, ही सुरुवात आहे का? हे आज कळेल. इथे लाँग जायचे झाले तर प्रत्येक तासावर लक्ष ठेवावे लागणार. आधिच्या पोझिशन्स असतील तर होल्ड करा, पण आत्ता निदान मी तरी अ‍ॅग्रेसिव्ह राहणार नाही, आज ५९५० जर दिसले तर उलट मी पोझिशन्स स्वेअर ऑफ करेल. ५९०० लेवल नंतर परत थोडी रॅली होईल त्यासाठी ५९०० ची वाट पाहिल.

खरे तर आत्ता मला काहीही सांगता येत नाही, हे मात्र म्हणावे लागेल. Happy कन्सॉलिडेशन इज द मंत्रा. वेट अ‍ॅन्ड वॉच इज द स्ट्रॅटेजी.

सतीश, इन्फीला परत २९६० लेवल पर्यंत शॉर्ट करायचे असेल तर करु शकतोस. Happy तिथे सपोर्ट आहे. मे बी मागच्या वेळेपेक्षा जास्त फायदा ही होऊ शकतो.

केदार, NTPC मध्ये गुंतवणुक केलीय, पण हा स्टॉक फारच मंद गतीने मूवमेंट्स करतोय. आत्ता भविष्यात या स्टॉकला काही मूवमेंट असेल काय? नाहीतर या स्टॉकमधून बाहेर पडावे अशा विचारात आहे.
२०४.८७ ल खरेदी केलीय व सध्या २१०.३५ भाव आहे.

भेल व L&T मध्ये सध्या आणखीण खरेदी करावी की थोड्या करेक्शनची वाट पाहावी?

केदार,

ICICI चा put option घेतला. 30 सप्टे. ची exp आहे.
ICICI विषयी काही comment लिहाल का ?

केदार
D,W,M,Q MACD अजून बुलिश आहेत.
निफ्टी जर ५९३० ला आला तर लाँग करावे का?
Glaxo, ३ सेशन्स वाढला आहे. ह्या (२०७७) लेव्हलला कसा आहे? ह्याला मी २२३० ला July मध्ये सोडला होता. खालि घेइन म्हणून. १८५० ला आला होता. पण मी विसरलो.

हो सुरेश लाँग असायला (काळजीपूर्व) हरकत नाही. काल आणि आज थोडे कन्सॉलिडेशन होत आहे असे वाटते. पण तरीही काळजी घ्यायला हवी.

ICICI - भरपुर वर गेल्यामुळे स्टिम कमी झाली आहे. पुट विकला आहे की विकत घेतला आहे? कोणत्या लेवलचा? १०९६ ला सपोर्ट आहे, व आत्ता (आज सकाळी) ११०० म्हणजे सपोर्टला ट्रेड करत आहे. नंतरचा मायनर सपोर्ट १०२१ च्या आसपास आहे.

टाटा मोटर्स फ्युचर्स वर परत लक्ष ठेवा. तो परत १०७० कडे गेला आहे, मार्केट अपट्रेन्ड मध्ये आले व टाटा परत १०५०-१०४० लेवलला गेला (जो गेले १५ दिवस पॅटर्न आहे) तर परत फ्युचर्स मध्ये १०८० साठी लाँग जायला हरकत नाही. रेंज मस्त आहे. मार्केट जर (यदाकदाचित) ६१०० क्रॉस झाले तर टाटा ११५० ला सहज जाईल.

हे वाचा. २००८ चा क्रिसिस भारताने कसा हाताळला याची कथा. छान लेख.
लाखो लोकांच्या आयुष्यावर परिणाम करणार्‍या गोष्टींचे निर्णय कसे घेतले जातात त्याचे विवर्णन. मनमोहन, चिदंबरम आणि मोंटेक या त्रिकूटा बद्दलचा आदर अजून बळावला. हे तिघे एकाच वेळेस निर्णय प्रक्रियेत असण हे आपल सुदैव.
http://www.indianexpress.com/news/how-they-saved-the-india-story/683133/0

निफ्टी...... भविष्यात डोकावणे.
निफ्टी ६००० खरच गाठेल काय? (मनिक्ट्रोल वर वाचले). >>>
निफ्टीने ६००० पार केले. तेंव्हा पुढे काय घडु शकेल ते इलियट ने बघावेसे वाटले.होइल असे नाही. पण नाही असे पण नाही. शेवटी भविष्यच....

२००३ जुन ला निफ्टी ९५० होता. तेथून वेव्ह सुरु झालि ती जानेवारी २००८ ला ६३५७ ला संपली. हि जर 1st वेव्ह मानली तर ती साधारण ५४०७ पाँइट ची होती. ५४ महिन्याची. ह्यात मग बर्याच छोट्या वेव्ह आल्या. पण संपूर्ण काळात मार्केट बुलिशच होते. MACD positive.

ह्याची दुसरी वेव्ह ही करेक्शनची असते व होती. हि ६३५७ ला जाने. २००८ ला चालू झाली व डिसेंबर २००८ ला २२५२ ला संपली. ह्या काळात MACD -ve होता. हे करेक्शन ४१०५ चे होते.

ह्या नंतरची तिसरी व्हेव आता सुरु आहे. हि परत बुलीश असते व थोडी फास्ट असते. हि जर पहिल्या वेव्ह एवढी (१००%) धरली तर निफ्टीची वॅल्यू येते ७६५९ व १.६२ धरली तर ती वॅल्यू येते ११०११. आजच्या क्षणाला निफ्टी लाँग टर्म पॉझिटीव्हच आहे.

भविष्य फक्त धुसर वाट दाखवेल. खरे कोटे काळ ठरवेल. पण केदार सारखा वाटाड्या असताना आपण चुकणार नाही हे नक्की.

पण केदार सारखा वाटाड्या असताना आपण चुकणार नाही हे नक्की. >> बापरे, खूप मोठी जबाबदारी. धन्यवाद. Happy

इलियट साठी कुठले सॉफ्टवेअर वापरत आहात कारण अनेक सॉफ्टवेअर व्हेव दाखवताना चुकीची दाखवतात. मी देखील चांगल्या इलियट व्हेव सॉफ्टवेअर शोधात आहे.

मला २००७ चा सप्टे, ऑक्टो आठवत आहे. कारण तेंव्हा मनिकंट्रोलवर निफ्टी १५००० अन सेन्सेक्स ५०००० अश्या पोस्ट पडत होत्या. मार्केट आउटपरफॉर्म झाले की त्याकडून होप्स वाढतात आणि सामान्य गुंतवणूकदार इथेच मार्केट मध्ये येतात, आणि एके दिवशी मार्केट पडते. अजूनही रिटेल इतके वाढलेले नाही. रिटेल वाढल्यावर मार्केट अजून २०० पाँईट्स वाढेल. कृपया सावध राहा.

मी दोन अतिशय चांगले पुस्तक इथे सजेस्ट करु इच्छितो ते प्रत्येक ट्रेडरने वाचायलाच हवेत.

The Options Course - George A Fontalills
How To Make Profits Trading In Commodities - W D Gann

विक्रम लेखासाठी धन्यवाद. Happy

केदार
रिटेल वाढल्यावर मार्केट अजून २०० पाँईट्स वाढेल. कृपया सावध राहा.>>>
नक्कीच. कुठलाही आकडा डोक्यात न नोंदवता. मार्केट चा हात व दिशा पकडूनच चालेन.
इलियट साठी कुठले सॉफ्टवेअर वापरत आहात कारण अनेक सॉफ्टवेअर व्हेव दाखवताना चुकीची दाखवतात>>>
इलियट साठी वेगळे वापरत नाही. इलियट्ची च्या फक्त आकड्यांचा कधी कधी उपयोग करतो. करेक्शन किती असेल ते दाखवायला ते चांगले काम करतात. सर्व भर फक्त MACD, EMA ६,३०, RSI व stochastic वर देतो.

Trading साठी dev credit bank, Dwarkesh sugar, Gitanjali, Piramal life व wockhard कसे आहेत? सर्व चार्टवर अप ट्रेंड मधे आहेत.

केदार,
मी एनएच् पीसी च्या आय पी ओ मधे इन्वेस्ट केले होते. सध्या माझ्याकडे ३६६ शेअर्स आहेत ३६ च्या भावाने. काय करु? विकू कि होल्ड करु? त्याशिवाय काहि आर एन आर एल पण आहेत, ६८ वर घेतलेले, वाढ्ण्याचे काहि चान्सेस आहेत काय?

धन्यवाद.

क्षितीज
चार्टस वरुन एनएच् पीसी व आर एन आर एल बद्दल जे वाटले ते लिहीत आहे.
एनएच् पीसी : ह्याला ३३.६ ला एक स्ट्राँग रेझीस्टन्ट आहे. एखाद दोन दिवस त्या वर क्लोझ झाला तर आधि चा हाय ३६.४५ गाठण्याची व नवा हाय करण्याची पॉसिबिलीटी निर्माण होइल.

आर एन आर एल : वाढला तर ४५ दाखवू शकेल. तो पार केला तर ५०. पण हे तितके सोपे जाणार नाही, कारण कंपनीला स्वःताचे भविष्य नाही.

केदार आणि सुरेश१, आपल्या प्रतिसादां मध्ये मार्केट वरील सॉफवेअर वर वाचले,
त्याविषयी सविस्तर माहिती द्याल का ?

केदार आणि सुरेश१,
मार्केट मध्ये करेक्शन येइल असे वाटते का तुम्हाला? कुठल्या लेवलवर?
मनिकंट्रोलवर वाचले होते की हा बबल आहे म्हणून.....

केदार आणि सुरेश१, आपल्या प्रतिसादां मध्ये मार्केट वरील सॉफवेअर वर वाचले,
त्याविषयी सविस्तर माहिती द्याल का ?

Pages