सेन्सेक्स आज ४९० पाँईटसने घसरला. पुढे काय?
१. २० ऑगस्टला मार्केट पडले पण २१ ला मार्केट गॅपने उघडले (१०४) व सुरु झालेली रॅली ( १४९२१) आक्टो १७ ला १७३२६ ला थांबली. (मध्ये एकदा दोन तीन दिवस पडून १५३९८ लेव्हल ला सपोर्ट घेऊन परत ही रॅली झाली.
२. नंतर तिथून खाली येऊन १५९०४ पर्यंत परत एकदा मार्केट खाली आले. (नोव्हे ३)
३. नोव्हे ३ पासून परत मार्केट वर गेले नोव्हे २५ पर्यंत १७१९८.
४. नोव्ह २७ ला गॅप डाउन ने मार्केट ओपन झाले. ( ओपन १६७१८ , हाय १८७१८, लो १६२१०, क्लोज १६६३२)
५. नंतर साईडवेज कधी वर कधी खाली करत ६ जानेवारीला हायस्ट पाँईट म्हणजे १७२९० ला गेले.
ह्या सर्व डेटाचा टेक्नीकल अॅनॅलिसिस केला तर बर्याच कन्फुझिंग लेवल्स सापडतात. पण नेमका ह्यावेळी मग इतिहास लक्षात घेऊन मागे मार्केट मध्ये काय घडले ह्यावर विचार केला. दर जानेवारीत गेले ५-६ वर्षे मार्केट पडते.
दिड-दोन आठवड्यांपूर्वी मी आणि उपास बोलताना त्याने विचारले की नंतरच्या लेवल्स काय असतील. त्याचाशी बोलताना मार्केट लवकरच खूप पडुन फर्स्ट सपोर्ट लेव्हल १६२०० वर जाईल असे सांगीतले होते. तेंव्हा मार्केट १७,७०० च्या आसपास होते, व १६,२०० कुठेही बोर्डवर येतील असे दिसत नव्हते. पण आज मार्केट १६,२८९ ला आहे.
उद्या एक्सापरीचा गुरुवार असल्यामुळे त्याचाही परिणाम होणार.
पुपुवर गेल्या आठवड्यात लिहीले होते की पैसे गोळा करा. आता ती वेळ येऊ घातली आहे. कालचा फॉल १६,२०० ला टच झाला नाही म्हणजे ह्या सपोर्ट लेव्हल तो थांबेल का? हे पाहायला आणखी दोन तीन दिवसांची गरज आहे पण इथे जर लगेच सपोर्ट मिळाला नाही तर नंतरचा सपोर्ट साधारण १५,३०० ते १५,५०० आहे असे वाटते.
पैसे असतील तर अनेक चांगले सेक्टर्स - मेटल्स, इन्फ्रा आणि फार्मा हे चांगले वाटत आहेत, जर अजून खाली घसरले तर नक्कीच ह्यात नक्कीच गुंतवणूक करायला सुरु करावी.
* हे सर्व माझे अंदाज आहेत, जे चुकीचेही असू शकतात. (असतात) आपले पैसे निट विचार करुन गुंतवा.
केदार/सुरेश१... माझ्याही
केदार/सुरेश१...
माझ्याही प्रश्नाचं उत्तर द्या ना प्लीज...प्रश्न परत टाकतेय..
या थ्रेडवर मी गेल्या आठवड्यापासूनच यायला लागले आहे.
दोन-अडीच महिन्याआधी मी SBI, Tata Motors/M&M, Tata Steel/SAIL असे काही शेअर्स थोड्या क्वांटिटी मध्ये घ्यायचे ठरवले होते, पण नेमके त्यावेळी पैसे इतरत्र गुंतल्यामुळे घेणे झाले नाही. आता SBI व Tata Motors तर बरेच वर गेले आहेत.
१. आता हे दोन्ही शेअर्स परत साधारण कुठ्ल्या किमतीला आल्यावर घ्यावे?
२. स्टील सेक्टरचे शेअर्स असावेत का पोर्टफोलिओमध्ये? Tata Steel किंवा SAIL घ्यावे का?
३. याव्यतिरिक्त गुंतवणूकीसाठी चांगल्या ब्ल्यूचिप कंपन्या सुचवू शकता का? (Infy, TCS, Wipro, RIL सोडून)
केदार SIP वर काही लिहू शकशील
केदार SIP वर काही लिहू शकशील का? कोणते चांगले आहेत वगैरे..
केदार धन्यवाद, पहिल्यांदी
केदार धन्यवाद,
पहिल्यांदी सांगू इच्छितो कि समीर म्हंटलं तर जास्त आवडेल मला..
ट्रेडिंग आणि गुंतवणुक दोन्हित intrested आहे मी पण फक्त इथे येऊन माहिती मिळेल का, जेणे करून इथे दिलेल्या सल्ल्यावरून मी ट्रेडिंग किव्वा गुंतवणूक करू शकतो. का इतर कुठल्या साईटवरून मी थोडा अभ्यास करू शकतो आणि काहि डिसीजन्स घेऊ शकतो?
तसा ह्या बाफवर मी येईनच कारण खरच खूप माहिती आहे, अजुन पुर्ण वाचला पण नाहिये मी. केदार तुम्हि म्हनाल्याप्रमाणे एजंट तर्फे जर गुंतवणूक केली तर दुसरी शक्यता जास्त हे माहित्ये म्हणुनच जरा प्रयत्न करून पहायचाय आणि इच्छा आहे स्वःता, स्वःतापुरती गुंतवणूक करायची.
केदार. SBI @2816 cash ,
केदार.
SBI @2816 cash , closing look weak,,,,,,,,,,,,,,
२८०० च्या खली बंद झाला तर २७०० येन्यास वेळ नाही लागनार.......
मी २८५० सप्टे १०१ ला घेतला आहे........
केदार.. मी SBI चा सप्टेंबर
केदार.. मी SBI चा सप्टेंबर २८०० पुट घेतला आहे ८७ला. SBI त्यानंतर बराच खाली जाउनही पुट वाढत नाहिये फारसा. लिक्विडिटी कमी दिसत आहे तेच कारण असावं का?
केदार/सुरेश१.. Tata Motors आज
केदार/सुरेश१..
Tata Motors आज हाय - १०५५!!!!! कसे काय?
मला वाटले होते आता पडतोय म्हणजे करेक्शन सुरु झालेय. (सुरेश१.. च्याभाषेमधे). आता खालच्या लेव्हल वर स्थिरावेल काही काळ.... पण वाढला की!
केदार, infrastructure
केदार,
infrastructure bondsबद्दल सांगणार का प्लीज? ८०c मध्ये जास्तीची गुंतवणुक करता येइल २० हजाराची. पण कुठला व किती वर्षासाठी ते कळत नाहीये.
आणि यावेळी १-२ वर्षांच्या गुंतवणूकीसाठी कुठले शेयर्स सजेस्ट कराल. प्रेफरन्स ब्लु चिप.
केदार, bank nifty आज १०८९४ ला
केदार,
bank nifty आज १०८९४ ला बन्द झालि आहे. ह्या रेट मध्ये short करावी का? का अजुन वर जाउ शकते?
सई
मी काल रात्री ३४ वर लाँग गेलो
मी काल रात्री ३४ वर लाँग गेलो होतो. आज तो विकेन. आता अपसाईड लिमिटेड आहे असे मला वाटते, त्यामुळे मी वारंवार ट्रेड स्वेअर ऑफ करुन नफा बुक करतोय.
बँक निफ्टी फार वोलटाईल झाला आहे. SBI, ओरियन्टल प्रेशर मध्ये आहेत तर अॅक्सिस कन्सॉलिडेशन नंतर अपसाईडला ब्रेक होतोय. त्यामुळे मिक्स न मॅच दिसतेय. त्यामुळे शॉर्ट करणे योग्य आहे असे वाटते. पण त्यासाठी SBI अजून विक झाला तरच बँक निफ्टी १०० ने खाली येऊ शकतो. अपसाईडला ४० चा स्टॉपलॉस लावून शॉर्ट करा. फायदा होईल असे वाटते.
मनीष, भाव हे व्हॉल्युम असल्यावर वाढतील, मुळात त्या पुटला व्हॉल्युम कमी आहे, काळजी नको, २७०० च्या आसपास गेला की व्हॉल्युम वाढेल. मग ज्यांनी शॉर्ट केला आहे, ते कव्हर करण्याचा प्रयत्न करणार. आत्ता कुठे २८०० ब्रेक होतोय.
जेणे करून इथे दिलेल्या सल्ल्यावरून मी ट्रेडिंग किव्वा गुंतवणूक करू शकतो. का इतर कुठल्या साईटवरून मी थोडा अभ्यास करू शकतो आणि काहि डिसीजन्स घेऊ शकतो? >>
समीर इथे ट्रेडिंग वर सई, सतिश, सुरेश आणी मी नेहमी बोलतो, आजकाल शेअर्स कमी अन फ्युचर्स जास्त असे काहीसे आहे.
सुरेश देखील आताश्याच फ्युचर्स मध्ये येत आहेत.
तू मनिकंट्रोल.कॉम ही साईट पण बघ. फक्त फोरम्स कडे जाउ नको. कारण तिथे सगळेच सगळ्या विषयावर विद्वान! गेल्यावर्षी काही विद्वान निफ्टी १५,००० अन सेन्सेक्स ५०,००० असेही लिहत होते. तस्मात फोरम्सवर अजिबात विसंबू नको.
पण तुला कंपन्यांचे डिटेल्स पाहायला मदत होऊ शकत.
गुगल.कॉम/फायनास किंवा फायनान्स.याहू.कॉम इथेही जा, त्यावर तुला चार्ट पाहायला मिळती.
इन्वेस्टओपिडीया.कॉम वर तुला स्टॉक म्हणजे काय, इ इ ची बेसिक माहिती मिळेल.
आता हे दोन्ही शेअर्स परत साधारण कुठ्ल्या किमतीला आल्यावर घ्यावे? >> पल्स ह्यावर मी लिहले होते, ह्या दोन्ही मध्ये दिर्घकालासाठी यायचे असेल तर आता एन्टर करु नका. टाटा मोटर्स ९५० च्या वर राहील असेच दिसते. त्यामुळे ९८० रेंज मध्ये घ्या.
१०५५!!!!! कसे काय? >>
इन्डिजिनस ग्रोथ सोबत युरोपियन मार्केट मुळे टाटा मोटर्स वर गेला आहे / जात आहे, ह्यात बदल झाला (युरोपियन) की तो पडू देखील शकतो.
SBI ही एक जबरदस्त बँक आहे. हिच्यात केलेली गुंतवणूक कधिही वाया जाणार नाही पण आत्ता तो फार महाग झाला आहे. (महागचा अर्थ इथे पैश्यांनी किंमत वाढने असा होत नाही, ती मार्केट मधली एक वेगळी टर्म आहे, कधी कधी २०००० रुचा शेअर पण स्वस्त असतो
त्यामुळे तो कितीही वर जात असला तरी खाली येईल, वोलटाईल आहे. थांबा, मी इथे कधी घ्यायचा ते लिहतो.
स्टील सेक्टरचे शेअर्स असावेत का पोर्टफोलिओमध्ये? Tata Steel किंवा SAIL >> हो हे दोन्ही सेक्टर चांगले आहेत व गेले चार महिने अंडरपरफॉर्म करत आहेत. नेक्स्ट बिग मुव्ह व्हायची असेल तर ह्या सेक्टरने परफॉर्म करणे आवश्यक आहे, माझी दोन्ही मध्ये गुंतवणूक आहे. सध्या ह्यावर परतावा नाही, पण मी वाट पाहत आहे. टाटा स्टिल ने ब्रेक केले आहे, तो काही दिवंसापूर्वी ४९० रेंज मध्ये होता. पण घई करु नका.
याव्यतिरिक्त गुंतवणूकीसाठी चांगल्या ब्ल्यूचिप कंपन्या सुचवू शकता का? (Infy, TCS, Wipro, RIL सोडून)>>
infrastructure bondsबद्दल सांगणार का प्लीज >>
SIP वर काही >>>
ह्या प्रश्नांची उत्तरे आज इतर बाफ कडे (जास्त न वळता) देण्याचा प्रयत्न करणार.
ओवी Tata Motors आज हाय -
ओवी
Tata Motors आज हाय - १०५५!!!!! कसे काय?>>>
टेक्निकलला स्टॉक बरोबर निफ्टी पण बघायला लागतो. निफ्टी बरोबर तो जात असतो. निफ्टी २.३० नंतर वर गेला. टाटा मोटार ने ३.१० ला १०५५ दाखवले. १०५५ हा हाय सर्वात जास्त आहे. १९९७ पर्यंत पाहिले. तेंव्हा नवा हाय तो काय करेल ते सांगता येत नाही. निफ्टी ने जर ५५०० तोडले, तर Tata Motorsआणखी वर जावू शकतो. उद्या साठी Tata Motor ला पहिला सपोर्ट १०२१ व त्यानंतर १००५. काही काळासाठी ह्याच्या खालि जावून टेस्ट करू शकतो. (मार्केट आज ना उद्या करेक्शन करेलच. तेंव्हा हा ८९० पर्यंत यावा. साधारण ३ महिन्यात)
केदार,
ह्या निफ्टीच्या rally ला फायनान्सने चांगले सपोर्ट केले आहे. निफ्टी १४% वाढला तर बँक निफ्टी २३% ने. बँक निफ्टी चा मंथली चार्ट पाहिला. बुलिश तर आहेच. ३ टार्गेट, १०६२६ (दाखवले), ११०९१ ( आज क्लोझ १०८९४) व त्या नंतर ११५५६. तिसरे टार्गेट फार वेळा दाखवले जात नाही. खाली १०२३२ ला चांगला सपोर्ट आहे.
५४१२ चा निफ्टी अजून धरुन ठेवला आहे.
केदार, धन्यवाद. माझ्याकडे klg
केदार,
धन्यवाद. माझ्याकडे klg systel चे थोडे शेअर्स आहेत, बर्याच दिवस झाले घेउन , पण आज ९६.१० ला बन्द झाला आहे. काय करावे? loss बुक करावा का थोडे दिवस वाट पहावी?
सई
स्टर्लाईट : सध्या मेटल्स
स्टर्लाईट :
सध्या मेटल्स सेक्टर अन्डरपरफॉर्म करत आहे. भरीस भर म्हणजे वेदांत ग्रूपने Cairn ह्या कंपनीला विकत घेण्यासाठी बिड केले आहे, त्याचा परिणाम म्हणून मार्केट मध्ये Cairn ची किंमत वाढली तर कंपनीला जास्त पैसे द्यावे लागतील म्हणून स्टर्लाईटची किंमत घसरण्यास सुरुवात झाली.
गेल्या महिन्यात हिन्दुस्थान झिंक ह्या स्टर्लाईटच्या सबसिडीयरीचे तिमाहीचे रिझल्ट्स आले, कंपनीला नफा झालेला असला तरी मार्केट कडून जेवढी अपेक्षा होती त्याची पूर्तता झाली नाही. कॉपर, झिंक ह्यांचे भाव वाढून म्हणावा तसा फायदा झाला नाही.
टेक्नीकल चार्टस वर स्टर्लाईटला १५१-५२ चा रेंज मध्ये भरपुर सपोर्ट आहे. ह्या वर्षी मे आणि जुन मध्ये स्टर्लाईट जेंव्हा पडला तेंव्हा त्याने १५१-५२ ला सपोर्ट घेऊन रिटेस्ट केले आहे. सध्या तो फारच विक दिसत आहे, त्यामुळे तो अजून खाली जाईल. अपसाईडला १८०-१८५ लेवल वर रेसिस्टन्स आहे, तो कन्फर्म आहे असे जरी पकडले तरी खाली जाउन १४० घरात आला तर तो स्ट्राँग बाय होईल व तिथून येत्या मार्च पर्यंत २५ टक्के रिटर्न्स देईल. त्यामुळे माझ्यासाठी तो बिटन स्टॉक झाला आहे, त्याला व्हॅल्यू मध्ये आहे, रिटर्न्स देईल.
सध्या असेल तर होल्ड, खाली गेला तर मस्ट बाय.
मला सेसा गोवा हा स्टॉक शॉर्ट
मला सेसा गोवा हा स्टॉक शॉर्ट टर्म ट्रेडिंग साठी बुलिश दिसतोय. इन्वेस्टमेंटसाठी पण तो योग्य आहे. ३८० ते ३२० पर्यंत घसरण झाली आहे, आता रिव्हर्सल होण्याची शक्यता. मी लाँग जाणार.
सेसागोवा रॉक्स. इथे आधिच
सेसागोवा रॉक्स.
इथे आधिच ह्यासाठी लिहला की नंतर कोणीही सांगू शकते.
निफ्टी मी स्वेकर ऑफ आता करणार नाही, उद्याची वाट पाहणार.
केदार.. सेसागोवा चा कॉल
केदार.. सेसागोवा चा कॉल (सप्टेंबर किंवा ऑक्टोबरचा) घ्यावा काय?
माझ्याकडे suzlon चे ३२५
माझ्याकडे suzlon चे ३२५ शेअर्स आहेत average rate 64 मी long term साठी घेते. अजुन घ्यावेत का?
केदार्,तू State Bank of India
केदार्,तू State Bank of India बद्दल बोललास की पुढे अजून खाली येऊ शकतो! ICICI Bank Ltd.किंवा HDFC Bank Ltd. च्या तुलनेत त्याचा PE ratio कमी आहे.. तेव्हा यात वाढ्|ईल्ला अजून वाव नाही असे वतते का?
माझ्याकडे २३३० च्य किंमतीने State Bank of India आहेत. सध्या विकावेत का?
तसेच पॉवर फायनन्स बद्द्ल काय वटते? मझ्याकडे २०३ च्य किंमतीने आहेत. मी काही ३३८ च्या आसपास काढ्ले.
केदार्,तू State Bank of India
केदार्,तू State Bank of India बद्दल बोललास की पुढे अजून खाली येऊ शकतो! ICICI Bank Ltd.किंवा HDFC Bank Ltd. च्या तुलनेत त्याचा PE ratio कमी आहे.. तेव्हा यात वाढ्|ईल्ला अजून वाव नाही असे वतते का?
माझ्याकडे २३३० च्य किंमतीने State Bank of India आहेत. सध्या विकावेत का?
तसेच पॉवर फायनन्स बद्द्ल काय वटते? मझ्याकडे २०३ च्य किंमतीने आहेत. मी काही ३३८ च्या आसपास काढ्ले.
केदार धन्यवाद माहितीबद्दल,
केदार धन्यवाद माहितीबद्दल,
तुम्हि दिलेल्या साईटस वर नक्किच जाऊन पहातो. माझ्यासाठी शब्द बरेच कठिण आहेत म्हणजे नक्कि टर्म्स काय आहेत ते समजायला वेळ लागेल बहुदा )उदा. शॉर्ट, लाँग, व्होलाटाइल). सध्या मी ट्रेडिंग अकाऊंट ओपने करून फक्त NHPC चे १० घेतलेत. त्यापुढे काहिच डिलींग केलं नाहिये पण करू इच्छितो त्या संदर्भातहि इथे टिप्स मिळू शकतील का? अर्थात वरच्या तुमच्या पोस्ट्वरून समजलं कि अर्थातच मिळतील टिप्स. नक्किच उपयोग होईल असं वाततय इथे येऊन.
थोडा मोआईना करतो आता तुम्हि दिलेल्या साइट्स चा.
केदार, आज bank nifty भलतीच
केदार,
आज bank nifty भलतीच वाढली, अजुन किती वर जाईल? Nifty पण ५५४० ला बन्द झाली, ५६०० पर्यन्त जाउ शकते का आत्त्ता?
सुरेश तुम्ही लिहीलेल्या टारगेट मधले दुसरे टारगेट Bank nifty ने दाखवले.
सई
How hollow is Indian Stock
How hollow is Indian Stock Market: http://www.moneylife.in/article/72/8312.html
केदार, HDFC, स्प्लीट नंतर
केदार,
HDFC, स्प्लीट नंतर लॉन्ग ट्र्मसाठी कसा आहे?
केदार/सुरेश१, ओहो! असे आहे का
केदार/सुरेश१,
ओहो! असे आहे का हे?! धन्यवाद!! एकूण भन्नाटच दिसतेय हे प्रकरण!! बारीक बारीक गोष्टी ह्ळू ह्ळू समजत आहेत.. (... असे वाटतेय!) बाकी "गुरुविण वाचाळता व्यर्थ आहे..!"
केदार, आभार
केदार, आभार
मला सेसा गोवा हा स्टॉक शॉर्ट
मला सेसा गोवा हा स्टॉक शॉर्ट टर्म ट्रेडिंग साठी बुलिश दिसतोय. >>> केदार धन्यवाद
३८० ते ३२० पर्यंत घसरण झाली आहे, >>> एप्रिल ४७५/- नंतर... जून ३२५/- च्या खाली... जुलै परत वर ३७५/- आणी काल परत ३२५ टच केले...
आता रिव्हर्सल होण्याची शक्यता. >>> म्हणजे १५% का?
केदार सेसागोवा रॉक्स. इथे
केदार
सेसागोवा रॉक्स. इथे आधिच ह्यासाठी लिहला की नंतर कोणीही सांगू शकते. >>
काल ३२७ ला sesa goa घेतला. जून मध्ये पडताना ३६५ ला विकला होता.
मला ग्राफ थोडे वेगळे सांगतायत. D, W, M विक झालाय. Q च्या EMA6 (३१९) च्या आधारावर आहे. थोडा पुल बॅकने ३३८ ला जाईल. पण परत खालि येवून ३१२ (लास्ट विकचा लो) परत टेस्ट करेल. तो तोडला तर ३०५ एक सपोर्ट आहे. त्या नंतर २६३. वरची टार्गेटस क्लियर होत नाहियेत. एक ३५२ दिसतय.
३० जून ला निफ्टी चे टार्गेट काढले होते. ते ५६१८ होते. बघू ५६०० दाखवते काय? खालचे ५०९५ होते. ते स्किप होईल.
स्टेट बँक २७१४ पर्यंत खाली यावा असे विकलि चार्ट सांगतो. (निफ्टीने मदत केली तर.) २७१४ ला २८०० चा पूट १३० ला यावा. ५० टाईम व ८० ईंट्रेंसिक.
सई
निफ्टी वर गेला व ५५४६ क्रॉस केले तर बँक निफ्टी वर जावू शकतो. चार्टवर अजून बुलीश आहे. काल विक संपल्यामुळे परत नवी टार्गेट काढली. क्लोझ ११०३३. वर ११२७३ आणि ११५१३. सपोर्ट १०९५९ व १०८८६.
सुरेश सेसा गोवा त्या
सुरेश सेसा गोवा त्या दिवसासाठी बुलीश होता. मी ट्रेडिंगसाठी शॉर्टटर्म असे लिहले आहे. त्यादिवशी मार्केट सुरु झाल्यावर तो लगेच ३३० पर्यंत गेला होता. ३३० वर मी विकला. ३१९ ते ३३० रेंज त्या दिवसाची. एक लॉट ५०० चा.
लाँग टर्म साठी तो गुंतवणूक म्हणून मात्र चांगला आहे. ट्रेडिंग साठी नाही.
केदार Thanks. माझा वाचण्यात
केदार
Thanks. माझा वाचण्यात काही तरी घोळ झाला. You were right. पण त्या निमित्ताने ग्राफ जरा डिटेल मध्ये पाहिला गेला.
केदार / सुरेश१, klg systel
केदार / सुरेश१,
klg systel बद्दल तुमचे काय मत आहे, ठेवावा का?
केदार, निफ्टी ५५५० च्या पुढे जाईल काय?
सई
सई klg systel चार्टव्रर
सई
klg systel चार्टव्रर short, mid va long term बेअरीश आहे. क्लोझ ९२.९०. कदाचीत एक पुल बॅक येउन टेंपररी ९८ ते १०० दाखवू शकतो. जर दोन एक दिवस क्लोझ ला १०२ वर टिकला, तर ११७ दाखवेल. ती शक्यता कमी वाटते. तेंव्हा ९८- ९९ च्या आसपास सोडावा. खाली ८१ ला मिळू शकेल. वॉल्युम वर पण थोडे लक्ष ठेवा. अश्या शेअर मधे तो बरेच काहि सागतो.
केदारः फंडामेंटल काहि वेगळे सांगते का? तुझे पॅरॅमिटर्स काय सांगतायत?
Pages