मार्केट टॉक - आउटलूक

Submitted by केदार on 27 January, 2010 - 13:28

सेन्सेक्स आज ४९० पाँईटसने घसरला. पुढे काय?

१. २० ऑगस्टला मार्केट पडले पण २१ ला मार्केट गॅपने उघडले (१०४) व सुरु झालेली रॅली ( १४९२१) आक्टो १७ ला १७३२६ ला थांबली. (मध्ये एकदा दोन तीन दिवस पडून १५३९८ लेव्हल ला सपोर्ट घेऊन परत ही रॅली झाली.
२. नंतर तिथून खाली येऊन १५९०४ पर्यंत परत एकदा मार्केट खाली आले. (नोव्हे ३)
३. नोव्हे ३ पासून परत मार्केट वर गेले नोव्हे २५ पर्यंत १७१९८.
४. नोव्ह २७ ला गॅप डाउन ने मार्केट ओपन झाले. ( ओपन १६७१८ , हाय १८७१८, लो १६२१०, क्लोज १६६३२)
५. नंतर साईडवेज कधी वर कधी खाली करत ६ जानेवारीला हायस्ट पाँईट म्हणजे १७२९० ला गेले.

ह्या सर्व डेटाचा टेक्नीकल अ‍ॅनॅलिसिस केला तर बर्‍याच कन्फुझिंग लेवल्स सापडतात. पण नेमका ह्यावेळी मग इतिहास लक्षात घेऊन मागे मार्केट मध्ये काय घडले ह्यावर विचार केला. दर जानेवारीत गेले ५-६ वर्षे मार्केट पडते.

दिड-दोन आठवड्यांपूर्वी मी आणि उपास बोलताना त्याने विचारले की नंतरच्या लेवल्स काय असतील. त्याचाशी बोलताना मार्केट लवकरच खूप पडुन फर्स्ट सपोर्ट लेव्हल १६२०० वर जाईल असे सांगीतले होते. तेंव्हा मार्केट १७,७०० च्या आसपास होते, व १६,२०० कुठेही बोर्डवर येतील असे दिसत नव्हते. पण आज मार्केट १६,२८९ ला आहे.

उद्या एक्सापरीचा गुरुवार असल्यामुळे त्याचाही परिणाम होणार.

पुपुवर गेल्या आठवड्यात लिहीले होते की पैसे गोळा करा. आता ती वेळ येऊ घातली आहे. कालचा फॉल १६,२०० ला टच झाला नाही म्हणजे ह्या सपोर्ट लेव्हल तो थांबेल का? हे पाहायला आणखी दोन तीन दिवसांची गरज आहे पण इथे जर लगेच सपोर्ट मिळाला नाही तर नंतरचा सपोर्ट साधारण १५,३०० ते १५,५०० आहे असे वाटते.

पैसे असतील तर अनेक चांगले सेक्टर्स - मेटल्स, इन्फ्रा आणि फार्मा हे चांगले वाटत आहेत, जर अजून खाली घसरले तर नक्कीच ह्यात नक्कीच गुंतवणूक करायला सुरु करावी.

* हे सर्व माझे अंदाज आहेत, जे चुकीचेही असू शकतात. (असतात) आपले पैसे निट विचार करुन गुंतवा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केदार
धन्यवाद. निफ्टी घेतला आहे. ५३७५ ला. स्टॉप लॉस लावला आहे. ५४२५ ला. थोडा लांबचा लावला आहे. विकली मॅकडी अजून बुलिश आहे.

केदार कमोडिटीज मधे इंटरेस्ट असला तर गव्हाच्या आणि त्या मुळे इतर धान्यांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. चेक करा.

केदार ,

nifty "got" yesterday @ 5436......:(
hopes nifty bounce from 5370.....

TATA-Motor DVR is going strong.... माझी second entry (SIP) 539 ला आहे...
M&M , i like 2 get in 600...

केदार,
धन्यवाद!! आज टाटा मोटर्स १००१.९५ Sad ..... थोडा नफा बुक केलाच. ब्रोकरेज पण जाते ना?! असो. "बोहनी" वाईट नाही! Happy मार्केट बद्दल जिव्हाल्याने बोलायला हा ग्रुप सापडला ते बरे झाले!!

केदार,
आज SBI १८५ ने वाढला, आता रीझल्ट चान्गला लागला आहे तर अजुन वर जाईल काय? आणि परत १-२ वीक मध्ये खाली २५०० ला येईल का?

सई

निफ्टीने काल लिहल्याप्रमाणे ५३७० + ला सपोर्ट घेतला. माझ्यामते ही लेवल क्रूशल होती. ती होल्ड केली आहे.

SBI माहित नाही. Happy इतक्या जबरदस्त vix मुळे चार्ट निट काही सांगत नाही .

ओवी ब्रोकरेज जाते हे बरोबर आहे, पण तो खाली पडला तर नफाही जाईल. येत जा इथे. Happy

महिन्द्रा ह्या रेंज मध्ये चांगला आहे. रेनॉच्या नविन गाड्या येतील तेंव्हा नक्कीच फायदा होईल. पण ह्याचे डिटेल्स बघून लिहतो.

विक्रम कमोडिटीज मध्ये मी अजून लक्ष दिले नाही, त्यामुळे थोडावेळ लागेल, पण चार्ट आणि बातम्यांवरुन काही लेवल्स सापडल्या तर नक्की लिहतो. Happy

केदार
सपोर्ट लेव्हल चा एक year चा ग्राफ टाकता येईल का?
कॅमलीन बद्दल जमले तर लिही. सध्या भाव ४०.
ह्या साईट ग्राफ कसा टाकायचा?

हो टाकतो.

SBI ला मी पुट बाय केले आहे. मला वाटतं हा स्टॉक नको तेवढा वर गेलेला आहे. आज सेटल व्हायला पाहिजे, कारण गेले दोन तीन सेशन वर जातोय, पण झाला नाही, म्हण़जे जी काही खरेदी चालू आहे, ती शॉर्ट कव्हरींग आहे असे माणन्यास वाव आहे. त्यामुळे मी बियरीश. बघू काय होते ते. सप्टे २८०० आहे, त्यामुळे ५ आठवढे आहेत पडायला. तो पडेल. Happy

केदार, मला नकोय, एक माहिती मिळाली त्याचा तुम्हाला किंवा इतरांना उपयोग होईल म्हणून फक्त लिहील.

अमेरिकेहून बातम्या फारशा चांगल्या येत नाहीत अस दिसतय. Sad

आमच्या क्षेत्रात (बायो फ्युएल्स) सुद्धा अजून ही कुठल्याच रिजन मधे क्लायंटस ची इन्व्हेस्ट्मेंटची तयारी नाही.

बायो फ्युएल्स मध्ये भारतात जरा प्रश्नचिन्हच आहे. म्हणजे गुंतवणूक करायची तर वितरण इ इ प्रश्न पडू शकतात. त्यामुळे असावे. तसे अमेरिकेतही बायो वर जास्त बोललेच जाते, केले काहीच नाही. ब्राझिल मध्ये जोरदार आहे बहुदा.

ब्राझिल मध्ये जोरदार आहे बहुदा >> नाही. कुठेच नाही. अमेरिकेत तर पॉलिसीच क्लियर नाही. भारतात फूड वि. फ्युएल हा ईश्यू. ब्राझिल मधे सगळे बँक रप्ट त्यामुळे एम अँड ए. जास्ती. नविन इन्व्हेस्ट्मेंट कमी.

केदार
तुम्ही ,SBI ला मी पुट बाय केले आहे,
मी पण २८०० चे सप्टेंबरचे पुट ९० ला बाय केले आहे.
कीती भाव देऊ शकेल असे वाट्ते?

भाव किती येईल हे माहित नाही. पण स्टॉक जसा जसा पडेल तसा फायदा होईल. पडावा, नाहीतर स्टॅडल करा. म्हणजे २८०० चे कॉल ऑपश्न पण बाय करा, वाटल्यास कमी किमतीला म्हणून ३००० चे करा. म्हणजे दोन्ही पैकी कुठे एकाकडे फायदा.
पण मी तरी १०,५०० सध्या गॅम्बल करतोय. गेले जर गेले. Happy ८००० पेक्षा कमी झाले तर मात्र विकेन, म्हणजे २५०० चा नेट लॉस. लक्ष ठेवा रोज.

केदार
निफ्टी ५३७५ ला घेतला व ५४७० ला square off केला. SBI २८०० सप्टेंबर पुट ८१ ला घेतले. SBI चे थोडे अ‍ॅनॅलिसीस करायचा प्रयत्न केला आहे.
SBI चे D, W, M, Q सर्व चार्टवर बुलीश आहे. निफ्टी ५५१२ - ५५५० ला गेला तर SBI वर जावू शकतो.
SBI क्लोज २८४९. क्लोज, हाय (२८७९) च्या जवळ त्या मुळे अजून ताकद बाकी आहे.
वर गेला तर २८९८ , २९४७ व २९९८ ह्या लेव्हलस दाखवत आहे.
खाली आला तर पुढच्या आठवड्या साठी २७८१, २७१४ हे सपोर्ट दाखवतायत.
9/7/10 (लो २२६२) पासून हि मूव्ह चालू झाली. तो जर २९९८ पर्यंत गेला व वळला तर ३८% करेक्शन २५४१ येते.
थोडक्यात. निफ्टी चा प्रवास पण बघायला लागेल. २९०० च्या वर हातातले ५०% शेअर विकेन व २४४६ ला परत घेइन. जे पुढच्या ३ महिन्यात यावे. बघू काय घडतेते.

RNRL क्लोझ ३८.५ च्या आसपास आधिचा लो ३४.७. पुढील ३ महिन्यात ४७ ते ५० दाखवेल. ह्या काळात फक्त मर्जिंग झाले नाही तर.

केदार,
या थ्रेडवर मी गेल्या आठवड्यापासूनच यायला लागले आहे.
दोन-अडीच महिन्याआधी मी SBI, Tata Motors/M&M, Tata Steel/SAIL असे काही शेअर्स थोड्या क्वांटिटी मध्ये घ्यायचे ठरवले होते, पण नेमके त्यावेळी पैसे इतरत्र गुंतल्यामुळे घेणे झाले नाही. आता SBI व Tata Motors तर बरेच वर गेले आहेत.
१. आता हे दोन्ही शेअर्स परत साधारण कुठ्ल्या किमतीला आल्यावर घ्यावे?
२. स्टील सेक्टरचे शेअर्स असावेत का पोर्टफोलिओमध्ये? Tata Steel किंवा SAIL घ्यावे का?
३. याव्यतिरिक्त गुंतवणूकीसाठी चांगल्या ब्ल्यूचिप कंपन्या सुचवू शकता का? (Infy, TCS, Wipro, RIL सोडून)

सुरेश१,
SBI चे D, W, M, Q सर्व चार्टवर बुलीश आहे.............

जरा सोप्या भाषेत सान्गाल का SBI बद्दल? आणी ICICI कसा वाटतो?

ओवी
एखादा स्टॉक (किवा निफ्टी) एकतर्फी वर जायला लागला की काही काळाने थोडे करेक्शन करतो. बरेच वेळा ते ३८%, ५०% वा ६२% असते. उदा. SBI ने हे वर जाणे ९/७ (२२६२) पासून चालू केले. त्यानंतर त्याने २२६२ दाखवला नाही. १३/८ चा त्याचा २८७९ हा ह्या मूव्ह चा हाय धरला. तर ३८% हे करेक्शन त्याला (२८७९-२२६२) च्या ३८% म्हणजे २६४५ ला आणते. ह्याचा अर्थ २८७९ हा खरोखर हाय ठरला तर SBI २६४५ पर्यन्त खाली येईल. किती दिवसात. तर ७ ते १० दिवसात (working days)
SBI निफ्टी चा स्टॉक असल्याने त्याची मुव्हमेंट नजरे आड करता येणार नाही. ICICI चा ग्राफ बघितलेला नाही.

मास्तुरे
वोकहार्टचा शेअर आज एकदम एवढा वर कसा काय गेला?>>
फंडामेंटली मला माहीत नाही. त्यात मी झिरो. पण टेक्निकलि ११/८ ला RSI व स्टॉक्यास्टिकेने बाय दिला होता. वॉल्यूम पण आटून ४९,००० झाले होते. क्लोझ १५४.५. १२/८ ल ओपन १५२.२. फार जास्त नाहि. १३/८ वॉलूम १.६७ लाख. आज वॉल्यूम १६.५ लाख. कारण कळले नाहि. केदार ने phama बद्दल लिहिले होते, तेंव्हा थोडे घेतले. खरे तर ग्राफने ११/६ ला १३४ ला पहिला क्लियर बाय दिला होता.

केदार
क्षमस्व. हल्लि थोडे जास्त लिहीले गेले.

मला शेअर्स मधे डिलींग सुरू करायचय, पण त्यासाठी सुरुवात कशी करावी?
इथे हा प्रश्न विचारणं योग्य आहे का?
म्हणजे मार्केटचा अंदाज कसा घ्यावा आणि जर दर महिन्याला काहि रक्कम ठरवून इन्वेस्ट केली तर योग्य ठरेल का?
अर्थात जर कोणी एजंट पाहिला तर हे काम होऊ शकत. पण मला स्वःताला थोडफार जाणुन घ्यायची इच्छा आहे..:)

केदार,
आज bank nifty १०७७० ला बन्द झाली आहे, अजुन किती वर जाउ शकेल? आज निफ्टी खाली होती तरी Bank nifty वर का गेली काही समजले नाही, तुम्ही सान्गु शकाल का?

सई

सई काल मार्केट पाहिले नाही, आज सकाळी उलट चित्र दिसत आहे, तो शोध घेतो अन लिहतो.

रानडे ,

डिलींग सुरू करायचय म्हणजे काय? गुंतवणूक की ट्रेडिंग? ह्यावर उत्तर अवलंबून असेल. Happy

अर्थात जर कोणी एजंट पाहिला तर हे काम होऊ शकत >> उत्तर हो अन नाही दोन्ही आहे. तुम्ही अनुभवी असाल तर एजंटची मदत घेणार नाही, अनुभवी नसाल तर एजंटला पैसे देउन एकतर पैसेही कमवू शकता वा फसू ही शकता, दुसरी शक्यता जास्त आहे. Happy

गुंतवणूक करायची वा ट्रेडिंग करायची असेल तर इथे नक्कीच या. दोन्ही प्रकारची लोकं इथे आहेत. Happy

Pages