सेन्सेक्स आज ४९० पाँईटसने घसरला. पुढे काय?
१. २० ऑगस्टला मार्केट पडले पण २१ ला मार्केट गॅपने उघडले (१०४) व सुरु झालेली रॅली ( १४९२१) आक्टो १७ ला १७३२६ ला थांबली. (मध्ये एकदा दोन तीन दिवस पडून १५३९८ लेव्हल ला सपोर्ट घेऊन परत ही रॅली झाली.
२. नंतर तिथून खाली येऊन १५९०४ पर्यंत परत एकदा मार्केट खाली आले. (नोव्हे ३)
३. नोव्हे ३ पासून परत मार्केट वर गेले नोव्हे २५ पर्यंत १७१९८.
४. नोव्ह २७ ला गॅप डाउन ने मार्केट ओपन झाले. ( ओपन १६७१८ , हाय १८७१८, लो १६२१०, क्लोज १६६३२)
५. नंतर साईडवेज कधी वर कधी खाली करत ६ जानेवारीला हायस्ट पाँईट म्हणजे १७२९० ला गेले.
ह्या सर्व डेटाचा टेक्नीकल अॅनॅलिसिस केला तर बर्याच कन्फुझिंग लेवल्स सापडतात. पण नेमका ह्यावेळी मग इतिहास लक्षात घेऊन मागे मार्केट मध्ये काय घडले ह्यावर विचार केला. दर जानेवारीत गेले ५-६ वर्षे मार्केट पडते.
दिड-दोन आठवड्यांपूर्वी मी आणि उपास बोलताना त्याने विचारले की नंतरच्या लेवल्स काय असतील. त्याचाशी बोलताना मार्केट लवकरच खूप पडुन फर्स्ट सपोर्ट लेव्हल १६२०० वर जाईल असे सांगीतले होते. तेंव्हा मार्केट १७,७०० च्या आसपास होते, व १६,२०० कुठेही बोर्डवर येतील असे दिसत नव्हते. पण आज मार्केट १६,२८९ ला आहे.
उद्या एक्सापरीचा गुरुवार असल्यामुळे त्याचाही परिणाम होणार.
पुपुवर गेल्या आठवड्यात लिहीले होते की पैसे गोळा करा. आता ती वेळ येऊ घातली आहे. कालचा फॉल १६,२०० ला टच झाला नाही म्हणजे ह्या सपोर्ट लेव्हल तो थांबेल का? हे पाहायला आणखी दोन तीन दिवसांची गरज आहे पण इथे जर लगेच सपोर्ट मिळाला नाही तर नंतरचा सपोर्ट साधारण १५,३०० ते १५,५०० आहे असे वाटते.
पैसे असतील तर अनेक चांगले सेक्टर्स - मेटल्स, इन्फ्रा आणि फार्मा हे चांगले वाटत आहेत, जर अजून खाली घसरले तर नक्कीच ह्यात नक्कीच गुंतवणूक करायला सुरु करावी.
* हे सर्व माझे अंदाज आहेत, जे चुकीचेही असू शकतात. (असतात) आपले पैसे निट विचार करुन गुंतवा.
रोज नाही लिहले तरी आठवड्यातून
रोज नाही लिहले तरी आठवड्यातून दोनदा लिहायला सुरुवात केली पाहिजे. पण आता खरोखर विचार करायला पाहिजे. >>>>
धन्यवाद.आपण अगोदर सुचवलेले
धन्यवाद.आपण अगोदर सुचवलेले शेअर्रस सध्या फारच जास्त कीमतीत आहेत आणी त्यांनी त्यांची उच्च कीमंत घेतली आहे.मला साधारण आजच्या भावात घेण्या सारखे काही शेअर्रस सुचवाल का?
दोन ते तीन महिन्याच्या
दोन ते तीन महिन्याच्या कालावधी करीता NMDC खरेदी करा .... १०% ते २०% रिटर्नस मिळु शकेल ..
धन्यवाद.मला जवळपास १.५ लाख
धन्यवाद.मला जवळपास १.५ लाख रुपया पर्यंत खरेदी करायची आहे.अजूनही काही नावे सुचवल्यास आवडेल.
केदार , धन्यवाद. मी अजुन माझि
केदार ,
धन्यवाद. मी अजुन माझि पोझिशन तशीच ठेवली आहे. आज Bank Nifty Futures बन्द होताना मी short केल्या पेक्शा कमी ने बन्द झाला आहे. Stop loss लाउन ठेवला आहे. अजुन थोडी वाट बघीन.
सई
केदार , धन्यवाद. ब्लु चिप
केदार ,
धन्यवाद.
ब्लु चिप क्म्पन्यान्चे शेअर्रस सध्या फारच जास्त कीमतीत आहेत. आजच्या भावात घेण्या सारखे काही शेअर्रस सुचवाल का? जे दोन ते तीन महिन्याच्या कालावधी नन्तर वर जातील....
केदार मार्केट consolidation
केदार
मार्केट consolidation चा वर्षाचा ग्राफ टाकायला वेळ मिळेल काय?
तू पेनी स्टॉक बघतोस का?
विकली चार्ट बघताना, ५३७० ला स्ट्रॉंग रेझिटंट वाटत आहे, व मार्केट परत एकदा ५५०० टच करायचा प्रयत्न करेल असे वाटते. ५३९९ सारखा कदाचीत थोडा सायकॉलॉजीकल फॅक्टर आड येईल. बंद भाव ५४३९. खाली ओपन झाले तर निफ्टी घेईन. मार्केट ५३९० ला जर आले तर स्टॉक्यास्टिक ३०% वर यायला पाहिजे.
इतके दिवस मी निफ्टि केला नाही. श्री गणेशा करेन.
५३७० ला सपोर्ट आहे. शब्द आधि
५३७० ला सपोर्ट आहे. शब्द आधि चुकला.
केदार, Indian Overseas Bank
केदार,
Indian Overseas Bank (Current Price - Rs. 125.70), IRB Infra (Current Price - Rs. 284) and GVK Power (Current Price - Rs. 43.80) हे गुंतवणूकीसाठी योग्य आहेत का?
केदार, माझ्याकडे इतर
केदार,
माझ्याकडे इतर शेअर्सव्यतिरिक्त
270 RIL (Avg. buying price: 947),
1800 RNRL (Avg. buying price: 68.50) आणी
23 RPower (Avg. buying price: 146.30) आहेत.
हे सर्व long-term साठी घेतले आहेत. पण सध्या रिलायन्स ग्रूप चे सगळेच शेअर्स घसरतायेत (specially after RNRL/RPower swap news). केवळ यामुळे पोर्टफोलिओ डाऊन होतोय
काय अंदाज आहे तुमचा रिलायन्स ग्रूप शेअर्सबद्दल? Please guide.
केदार, तुम्ही सान्गीतल्या
केदार,
तुम्ही सान्गीतल्या प्रमाणे निफ्टी आता ५५०० ला टच करेल. पण पुढे निफ्टी कुठे जाईल? ५५०० च्या पुढे जाईल का? आणि खाली आलि तर किती खाली येईल?
सई
मास्तुरे icicic चे लॉन्ग टर्म
मास्तुरे icicic चे लॉन्ग टर्म रिपोर्टस ह्या शेअर बद्दल वाचले. मला बरोबर वाटत आहेत. फक्त GVK Power बद्दल थोडी शंका आहे, पण हरकत नसावी. व्हॅल्युएशन तरी चांगले वाटत आहे.
Pals25 - RNRL बद्दल अभ्यास नाही, पण रिलायन्स बद्दल काळजी नका करु. होल्ड करा. तुम्हाला हवे असतील तर १०४० रेंज मध्ये काही काढा पण १ वर्षासाठी नक्कीच १५ टक्के रिटर्न्स मिळायला हरकत नाही असे मला वाटते.
सई ५५०० च्या खूप पुढे जाणे अवघड आहे वाटते, गेला तरी तिथून वापसच येणार. तिथे राहायचे असेल तर सप्टे रिझल्टस यावे लागतील. त्यामुळे तो तिथे रेंजबाउन्ड होऊन कन्सॉलिडेट व्हायला पाहिजे, तर पुढे ५७०० सप्टे - डिसे २०१० मध्ये येतील.
मी इथे टाटा मोटर्स बद्दल
मी इथे टाटा मोटर्स बद्दल बरेचदा लिहले होते. ह्या तिमाहीचा निकाल लवकरच समोर येईल. कदाचित टाटा मोटर्स अजून थोडा वर जाण्याची शक्यता आहे.
Tata Motors is set to announce its results for the quarter ended June 2010. According to CNBC-TV18 estimates, its consolidated profit after tax (PAT) is expected to be at Rs 1000 crore as against net loss of Rs 330 crore, (YoY).
Revenues are seen going up at Rs 27000 crore from Rs 16396 crore
Revenues to grow due to good growth in key segments of CV, LCV and PV (PV sales driven by Nano volumes scaling up and Indigo manza sales)
कोणती गाडी घ्यावी ह्या बाफवर मी टाटा बद्दल मत नोंदवले होते. गेल्यावर्षीच्या ३९० करोड लॉस ह्या आकड्या ऐवजी १००० करोडचा प्रॉफिट होत आहे. आणि अंदाजीत नफा हा खर्या नफ्यापेक्षा कमी असू शकतो अशी बातमी आहे. इतकेच नाही तर टाटांनी जॅग, लॅन्ड रोव्हर ह्या दोन्ही लॉस मेकींग कंपन्यांना पण टर्नअराउंड केले आहे. (निदान गेल्या सहा महिन्याच्या डेटा नुसार.)
ज्या कोणी हे शेअर्स घेतले असतील त्यांनी ९२० च्या आसपास नफा नोंदवून परत सप्टेबरच्या सुरुवातीला घ्यायला हरकत नाही. किंवा निदान थोडा नफा तरी बुक करा. येत्या सहा महिन्यात नक्कीच १००० क्रॉस होणार. (आधी ९००+ लिहले होते, आता रिव्हाइज
)
धन्यवाद, केदार
धन्यवाद, केदार
सहा महिने सोडा, टाटा मोटर्सने
सहा महिने सोडा, टाटा मोटर्सने १००० आजच क्रॉस केले.

खरा नफा अंदाजित नफ्यापेक्षा दुप्पट म्हणजे १९३८ करोड रु आहे. व्हॉव -३६९ टू + १९३८, रतन टाटा तुम्ही महान आहात.
मी काल घेतले..BTST मध्ये. ते
मी काल घेतले..BTST मध्ये. ते मला delivery मध्ये convert करता येतील का?
नका करु. प्रॉफिट घ्या. काही
नका करु. प्रॉफिट घ्या. काही दिवसात थोडा खाली आला की परत घेता येईल. जाणार कुठे?
इतका प्रॉफिट एका दिवसात, तो एन्जॉय करा.
Thank you
Thank you
टाटा मोटर्स १०५० ला टच करेल
टाटा मोटर्स १०५० ला टच करेल का? ९०४.५० ला घेतला एक . निदान थोडा नफा तरी बुक करावा का?
Asian Paints, Container Corp,
Asian Paints, Container Corp, Balakrishna Industries, Yes Bank ह्या शेअर्स मध्ये long term गुन्तवणुकी बद्दल आपले काय मत आहे ?
ओवी, १०५० चे सांगता येत नाही.
ओवी, १०५० चे सांगता येत नाही. हो नफा बुक करावा असे वाटते. ९४०,९६०,९८० ह्या रेंज चे खूप पुट सेल्स झाले आहे. त्यामुळे थोडा खाली येण्याची शक्यता जास्त आहे. मायनर मार्केट ट्रेन्ड सध्या निगेटिव्ह झाला आहे, त्यामुळे उद्या काय होईल ते सांगता येत नाही.
Yes Bank मी इथे २३०-४० लेवल वर रिकमंड केला होता. सध्या ३०० आहे म्हणजे २५ टक्के रिटर्नस दिले आहेत. अजून वर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, उलट मला हा ही आवडतो, सध्या थोडा दुर्लक्षित आहे पण एकदाका पुढचे रिझल्टच किंवा थोडी गुड न्युज येईल तेंव्हा सटोडिये उचलून १० टक्यांनी वर नेउ शकतील.
बाकी वर पण लिहतो.
केदार, आज निफ्टी ५४२० ला बन्द
केदार,
आज निफ्टी ५४२० ला बन्द झाली,उदया पण कदाचीत खालिच येईल, खालि कुठे सपोर्ट आहे निफ्टी ला? आणि अमेरिकन मार्केट मध्ये s&p ला खाली कुठे सपोर्ट आहे?
आणि SBI चा उदया रीझल्ट आहे, कुठे जाईल SBI, कुठे सपोर्ट आहे SBI ला?
बरेच प्रश्ण एकदम विचाले आहेत sorry.
सई
S&P - 1120 वाटत होता. आज
S&P - 1120 वाटत होता. आज ब्रेक झाला. १०८८ एक लेवल आहे, पण तो सपोर्ट वाटत नाही. प्रिडिक्ट करने अवघड आहे. उद्या बाउन्सही होउ शकतो. सध्या तो मुव्हिंग अॅव्हरेजच्या लोअर रेंज मध्ये गेला. ट्रेड करण्यासाठी तो एक इंडिकेटर आहे, पण फॉलिगं नाईफ आहे.
निफ्टी - ५३७० +/- चांगला सपोर्ट वाटत आहे, पण ट्रेन्ड निगेटिव्ह झाला आहे.
SBI प्रिडिक्ट करणे अवघड. न्युजमुळे तो आधीच १५० ने वर गेला आहे, तिथून परत वर जाईल असे वाटत नाही. २६०० लेवल वर कन्सॉलिडेट व्हायला हवा. होईलच असे नाही, ग्लोबल मार्केट मुळे उलट पडेल असे वाटत आहे.
केदार ५३७० जर सपोर्ट असेल, तर
केदार
५३७० जर सपोर्ट असेल, तर ५३७० ते ५४९२ (आधिचा डबल टॉप) ही नवी रेंज तयार होते का? त्या लेव्हल ला निफ्टी घ्यावा का?
हो जरुर, पण स्टॉपलॉस ठेवून.
हो जरुर, पण स्टॉपलॉस ठेवून. ग्लोबल मार्केट पण रोज बघा, कारण अर्निंग सेशन संपत आल्यामुळे आता मार्केट ग्लोबल क्लु कडे पाहते.
मी दिर्घकालावधी मध्ये मार्केट वर जाईल ह्याच मताचा आहे.
धन्यवाद केदार.
धन्यवाद केदार.
>>SBI प्रिडिक्ट करणे
>>SBI प्रिडिक्ट करणे अवघड
केदार,
SBI माझा long term साठीचा आवडता स्टॉक आहे. (Avg. buying price: १५००).
long term चा फेरविचार करावा का?
का आता काढुन परत घ्यावा? थोडे कन्फुजन आहे
सिद्धार्थ १५०० ला घेतला असेल
सिद्धार्थ १५०० ला घेतला असेल तर प्रॉफिट बुक कर. २६०० + मस्त किंमत आहे, अजून वाढला तरी फारतर २८५०, ते ही अनेक महिन्यांनंतर. त्यापेक्षा आत्ता बुक कर, २४०० च्या आसपास परत घे. टाटा मोटर्स, SBI हे स्विंग टॉप आहेत. तिथे ते जास्त दिवस टिकतील असे वाटत नाही, खाली येऊन परत रिट्रेस करणार. तरच ते टॉप टेस्ट होतील. (अनुभव व थेअरी वरुन
) म्हणून पूर्ण नाही तरी थोडा नफा नक्कीच बुक करायला हवा.
काय योगायोग आहे. S&P 1088
काय योगायोग आहे. S&P 1088 थांबला. सकाळी ब्लड बाथ मध्ये असताना, मी १०८९ ही एक लेवल आहे असे लिहले होते.
>>म्हणून पूर्ण नाही तरी थोडा
>>म्हणून पूर्ण नाही तरी थोडा नफा नक्कीच बुक करायला हवा.
केदार..धन्यवाद!!
Pages