मार्केट टॉक - आउटलूक

Submitted by केदार on 27 January, 2010 - 13:28

सेन्सेक्स आज ४९० पाँईटसने घसरला. पुढे काय?

१. २० ऑगस्टला मार्केट पडले पण २१ ला मार्केट गॅपने उघडले (१०४) व सुरु झालेली रॅली ( १४९२१) आक्टो १७ ला १७३२६ ला थांबली. (मध्ये एकदा दोन तीन दिवस पडून १५३९८ लेव्हल ला सपोर्ट घेऊन परत ही रॅली झाली.
२. नंतर तिथून खाली येऊन १५९०४ पर्यंत परत एकदा मार्केट खाली आले. (नोव्हे ३)
३. नोव्हे ३ पासून परत मार्केट वर गेले नोव्हे २५ पर्यंत १७१९८.
४. नोव्ह २७ ला गॅप डाउन ने मार्केट ओपन झाले. ( ओपन १६७१८ , हाय १८७१८, लो १६२१०, क्लोज १६६३२)
५. नंतर साईडवेज कधी वर कधी खाली करत ६ जानेवारीला हायस्ट पाँईट म्हणजे १७२९० ला गेले.

ह्या सर्व डेटाचा टेक्नीकल अ‍ॅनॅलिसिस केला तर बर्‍याच कन्फुझिंग लेवल्स सापडतात. पण नेमका ह्यावेळी मग इतिहास लक्षात घेऊन मागे मार्केट मध्ये काय घडले ह्यावर विचार केला. दर जानेवारीत गेले ५-६ वर्षे मार्केट पडते.

दिड-दोन आठवड्यांपूर्वी मी आणि उपास बोलताना त्याने विचारले की नंतरच्या लेवल्स काय असतील. त्याचाशी बोलताना मार्केट लवकरच खूप पडुन फर्स्ट सपोर्ट लेव्हल १६२०० वर जाईल असे सांगीतले होते. तेंव्हा मार्केट १७,७०० च्या आसपास होते, व १६,२०० कुठेही बोर्डवर येतील असे दिसत नव्हते. पण आज मार्केट १६,२८९ ला आहे.

उद्या एक्सापरीचा गुरुवार असल्यामुळे त्याचाही परिणाम होणार.

पुपुवर गेल्या आठवड्यात लिहीले होते की पैसे गोळा करा. आता ती वेळ येऊ घातली आहे. कालचा फॉल १६,२०० ला टच झाला नाही म्हणजे ह्या सपोर्ट लेव्हल तो थांबेल का? हे पाहायला आणखी दोन तीन दिवसांची गरज आहे पण इथे जर लगेच सपोर्ट मिळाला नाही तर नंतरचा सपोर्ट साधारण १५,३०० ते १५,५०० आहे असे वाटते.

पैसे असतील तर अनेक चांगले सेक्टर्स - मेटल्स, इन्फ्रा आणि फार्मा हे चांगले वाटत आहेत, जर अजून खाली घसरले तर नक्कीच ह्यात नक्कीच गुंतवणूक करायला सुरु करावी.

* हे सर्व माझे अंदाज आहेत, जे चुकीचेही असू शकतात. (असतात) आपले पैसे निट विचार करुन गुंतवा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

MMTC LTD.

BSE quote : 30,387.00 / -83.20 / -0.27%

Ex Date :29 Jul 2010 (Stock Split from Rs. 10/- to Re. 1/- & BONUS 1:1)

केदार n All ,
२९/०७/२०१० ला MMTC LTD. १५०० च्या आसपास घ्यावा का ? ( मिळाला तर Happy )

ICICI ने Gold ETF चा NFO काढलेला आहे. उद्या शेवटचा दिवस आहे. हा issue गुंतवणूक करण्यायोग्य आहे का?

गोल्ड ETF चांगला ऑप्शन आहे. दिर्घकालावधी साठी घेणार असाल तर घ्या.

मामी निकिताने सांगीतले तसा डिमॅट बॅलन्स पाहा. तिथे ५० दिसत असतील व पोर्टफोलियो मध्ये दिसत नसतील दोन गोष्टी करता येतील.

१. ट्रेड केला तेंव्हाच्या तारखा टाकून ट्रेड पाहा व अ‍ॅड वर क्लिक करा किंवा
१. पोर्टफोलिओ मध्ये डावीकडे अ‍ॅड असे बटन आहे तिथून टाका. इथे तुम्हाला सर्व लिहावे लागेल.

MMTC वर सांगने अवघड आहे. पण घ्यायचा(च) असेल तर आधी घे कारण बोनस मिळेल. कालच्या बातमीनुसार फायद्यात ३४ टक्के वाढ झाली आहे पण ५४ करोड म्हणजे मला फार वाटत नाही. पण शॉर्ट टर्म साठी त्या दिवशी घेऊन १००, १५० चा फायदा होईल असे वाटत असेल तर घे. टेक्नीकल्स स्प्लिटला काही सांगत नाहीत.

डबल डिप रेसिशनची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतो >>

भारतीय अर्थव्यवस्थेवर काही परिणाम होणार नाही. आपली स्वतःची ग्रोथ भरपुर असल्यामुळे जर खरोखर युरोप रिसेशन मध्ये गेले तर २००८ सारखे फार तर एक वर्ष भर आपला इंडेक्स खाली जाईल. आणि असे झाले तर माझ्याकडे असलेले सगळे पैसे मी गुंतवेन कारण ऑर्गॅनिक ग्रोथ. २००८ च्या वेळी पण मी पुण्यातले पुणेकर वर अनेकदा लिहले होते की दुसर्‍या व तिसर्‍या तिमाहीनंतर भारतीय मार्केट खूप वर जाईल. ऑगस्ट, सप्टे नंतर मार्केट भरपुर वर गेले व अमेरिकन मार्केट पेक्षा जास्त रिटर्न्स दिले. डबल डिपची भिती जेवढी दाखविन्यात येत आहे तेवढी प्रत्यक्षात उतरेल असे मला अजिबात वाटत नाही.
मार्केट जेंव्हा जेंव्हा खूप पडेल तेंव्हा तेंव्हा गुंतवणूक करण्यास मी तयार राहिल कारण येते तीन-चार वर्षच आपण ७ ते ९ टक्यांनी ग्रो होऊ. नंतर ग्रोथ कमी होउन ती ५-६ टक्यांवर जाईल. तिथे मात्र लाँगटर्म मार्केट कन्सॉलिडेशन मोड मध्ये जाईल. पण तो पर्यंत ... चिंग चिंग Happy

धन्यवाद निकीता व केदार. करून बघते.

एका साइट वर अनेक डेवलपड नेशन्स चे कर्जाचे प्रमाण पाहिले. अति भयानक आकडे आहेत. ह्यामुळे मेल्ट डाउन होउ शकतो कि नाही?

मार्केट जेंव्हा जेंव्हा खूप पडेल तेंव्हा तेंव्हा गुंतवणूक करण्यास मी तयार राहिल कारण येते तीन-चार वर्षच आपण ७ ते ९ टक्यांनी ग्रो होऊ. नंतर ग्रोथ कमी होउन ती ५-६ टक्यांवर जाईल.>> उत्तम निरीक्षण.

दोन कारणं.
१. रिलायन्स च्या CFO रिलायन्स के जी डी ६ इथून उत्पादन होणार नाही कारण पूर्ण रिव्ह्यू व्हायचा आहे असे सांगीतले आहे. हा रिव्ह्यु व्हायला ६ ते ८ महिने लागू शकतात. के जी डी ६ अजून दोन विहिरी बांघन्यात येणार आहेत.

२. बॉम्बे डाईंगचे लॉस मेकींग पॉलिएस्टर डिव्हीजन रिलायन्सने विकत घेतले. त्याचा परिणाम बॉटम लाईनवर येते काही महिने दिसेल.

घेउन ठेवावा का?
नक्कीच. पुढच्या महिन्यात तसेही काही न्युज नसतात. ( रिझल्ट वगैरे) तेव्हा १००० च्या खाली पण येऊ शकतो. रिलायन्स ला मेजर रेसिस्टन ११०० च्या आसपास आहे. गेल्या ८ महिन्यांपासून तो ९७० ते ११०० च्या रेंज मध्ये आहे. ह्या तिमाहीत खूप चांगले रिझल्टस पण आले आहे, माझ्यामते भरपुर कन्सॉलिडेशन झाले आहे. बॉम्बे डाईंगचा लॉस रिलायन्सला फार काही जास्त नाही तसेच ते डिव्हीजन आता टर्नअराउंड होऊन नफ्यात येण्याची शक्यता मला जास्त वाटते. पुढच्या तिमाहीनंतर (सप्टे) रिलायन्स वर जायला हवा. ह्या तिमाहीदेखील उत्पादन विक्रमी झाले आहे. के जी डी ६ च्या दोन विहिरींनंतर आणखी उत्पादन वाढेल त्याचा फायदाच होईल. त्यामुळे माझे रेटींग - बाय ऑन डिप्स.

ह्यामुळे मेल्ट डाउन होउ शकतो कि नाही? >> ग्लोबल मेल्ट डाउन नाही होणार असे वाटते. भारत सरकार दर तीन महिन्यांनी रिपोर्ट प्रसिद्ध करते. ह्या तिमाहीचा आला नाही अजून पण तो आला की तो रिपोर्ट इथे देईन. मागच्या रिपोर्ट मध्ये तरी मला आल इज वेल वाटत होते. पण इंटरनॅशनल डेटचा परिणाम ह्या दृष्टीने खूप अभ्यास केला नाही, थोडाफार केला त्यावरुन भारताला अडचण दिसत नाही, पण आता तुम्ही मुद्दा लिहला आहे तर नक्कीच ह्यावर वाचन करुन लिहतो. Happy

सई ५४७५ हा हाय आहे, त्यामुळे सिझनच्या शेवटी तो ब्रेक होईल असे वाटत नाही. मी सध्या ५३५० ते ५४५५ ही रेंज धरत आहे. कारण ५४५५ च्या आसपास दोन तीन सेशन इंडेक्स होता, तसे ५३३० + ला खूप काळ रेंगाळत होता.

अ‍ॅक्टीव्ह व्होलटाईल मार्केट मध्ये रेसिस्टन्स हे सपोर्ट लेवल होतात व सपोर्ट लेवल रेसिस्टन्स होतात. त्यामुळे मागचा रेसिस्टन्स ह्या वेळी सपोर्ट होईल असे वाटते. ही थेअरी ९० टक्के बरोबर असते. १० टक्के काही सांगता येत नाही, त्यामुळे सध्या स्टॉप लॉस ५३५० हाच वाटतो. Happy

केदार
५३५० ते ५४५० रेंज असेल तर ५५०० चा ऑगस्ट चा कॉल ठिक वाटतो. सध्या त्याला intrinsic value शून्य आहे. त्या मूळे आहे ती कॉस्ट हि टाइम value होते. ती काल क्लोझ ला ५७ होती.चार दिवसा पुर्वि मार्केट ५४४० ला असताना त्या ने ९८ दाखवला होता. जर ६५ पर्यन घेतला तर २५% मिळ्वणे होवू शकते. लॉजिक योग्य आहे का?

Book Value (BV) बद्दल तुला विचारले होते. त्या एकोनोमिक टाइमस व्रर दिसल्या आहेत. त्या बद्दल नंतर लिहीतो.

केदार
BV व प्राइस बद्दल थोडे.
२००८ मार्च, २००९ मार्च, २०१० मार्च, च्या BV बघितल्या. त्या वर्षा चे हाय व लो घेतले. त्या त्या वर्षाच्या हाय व लो ला त्या त्या BV ने भागले. हाय चे ३ रेशो मिळाले. त्या चे average काढले. तसेच लो चे केले. सध्या जी BV आहे त्याला हाय व लो रेशो च्या average ने गुणले. त्याने त्या शेअर ची वरची व खालची किमत (रेंज) मिळाली. २ उदाहरण देतो.
Reliance.
BV (५४२.८३, ७२७.७८, ३९२.५१) H/L (१६२६/६५२, १३५३/४६५, १२४५/७४८) जून ला BV ३९२.४७
हाय चे average २.६७. लोचे average १.२५. ३९२.४७ X २.६७ = १०४७ व ३९२.४७ X १.२५ = ४९०.
१०४७ ते ४९० ही रेंज झाली.
Dalmia Cement. हा कारण ८ कोटि capital व १३०० कोटि reserves.
BV(१३२.९४, १४८.९३, १६५.८७) H/L(६२०/२६१, ३५५/६७.२०, २६८७/७८.५०) आजचा BV १६३.५३
हाय चे average २.८८ लो चे average ०.९६. ह्या वरुन ४७०.९ ते १५७.३ हि रेंज येते. सध्या प्राइस २०८.५०

SBI - काल मस्त वर गेला. मला नाही वाटत शॉर्ट टर्म मध्ये अजून फार जाईल. फारतर १ टक्का. आता थोडेफार प्रॉफिट बुकींग सुरु होईल त्यामुळे उलट पडेलच. ( १८ जुलैला मी हा इथे घ्या म्हणून सुचवले होते, त्या आधी तो २४४० ला बंद झाला, आज २५८१. रु १४० चा फायदा प्रति शेअर तो ही केवळ दोन आठवड्यात.)

हिंदालको १६८-७० च्या रेंज मध्ये जाईल असे वाटते. तिथून परत वापस १६० +.

Dalmia Cement ची अकाउंटस मी पाहिले नव्हते. आता पाहतो.

केदार
एका वेळी किती शेअर जवळ असावेत? ५ ते ५० पर्यंत आकडे वाचनात आले. तसेच कधी विकावेत ह्या साठी काही थंब रूल? हल्लि सर्व जण बफॅटचे नांव घेत असतात व ब्रोकर ५% वाढले की सेल चा SMS पाठवतो.

अगदी बरोबर सुरेश मी साधारण ८-९ च्या वर जात नाही. कधी विकावे ह्यासाठी थंब रुल नाही, पण हवा असलेला परतावा मिळाला की विकावेत. मी साधारण २० + टक्के आले की विकायचा विचार मनात सुरु करतो आणि पार्शल प्रॉफिट बुक करतो.

बफॅटचे तत्वज्ञान व त्यावर बोलने ही बाजारातली गेले कित्येक वर्षे फॅशन आहे. Happy आणि हे ओरडणारे टेक्नीकल फॅन पण आहेत, बफेट टेक्नीकल फॅन कधीही नव्हता. तो व्हॅल्यू इन्वेस्टर आहे.

परवा मार्केट वर गेले. तिथे ते काल कन्सॉलिडेट झाले. आज उद्या जर + / - १५-२० मध्ये राहिले म्हणजे कॅन्सॉलिडेशन पूर्ण होईल आणि लगेच नेक्स्ट मुव्ह ५५०० ची होईल, ती पण लवकरच असे मला वाटत आहे. मार्केट पडले तर गो लॉन्ग ऑन निफ्टी.

काल म्हणल्याप्रमाणे स्टेट बॅन्क .६ टक्के वाढला आता प्रॉफिट बुकींग व्हायला पाहिजे, झाले की लगेच गो लॉन्ग. २७०० दुर नाहीत, एक दोन महिन्यात येतील.

>>बफॅटचे तत्वज्ञान व त्यावर बोलने ही बाजारातली गेले कित्येक वर्षे फॅशन आहे.
अगदी अगदी !

मी पण पार्शल प्रॉफिट बुक करुन मुद्दल सेफ करतो, पण चान्गले स्टॉक्स बहुतेक विकत नाही, कमी आला की अजुन घेतो.

केदार, तुमच्या सल्ल्याचा फायदा होतो. तुम्ही आता डेली कॉलम लिहायला सुरवात कराच ! Happy

सिद्धार्थ धन्यवाद.

खरे तर तुम्हा सर्वांचेच धन्यवाद. एक तर हे पैसे आहेत, व तुम्ही इथे लिहलेले वाचून ते घेता, त्या बद्दल मीच आभार माणायला हवेत तुम्हा सर्वांचे. बर्‍याच जनांनी ह्या बाफ वर फायदा झाला हे लिहले तसेच काही जनांनी इ मेल वर पण लिहले. कित्येक लोकं तर मला ओळखतही नाहीत पण इथे लिहल्यामुळे पोझिशन्स घेतात, फायदा तोटा होतो. (तोटा लिहलेला पाहिला नाही कोणी पण होत असेल Happy ) ह्या विश्वासामुळे जबाबदारी वाढते ह्याची जाणीव आहे मला. Happy

डेली कॉलम लिहणे तसे फार अवघड नाही. तो पण एक पॅटर्नच असतो. एक ठराविक टेम्लेट एक्झ्क्युट केली की झाले. एक सेक्टर घेऊन त्यावरच्या काही स्टॉक्सवर लिहता येईल. पण अडचण आहे ती वेळाची. (ऑफकोर्स मी माबोवरचा टिपी कमी केला तर तो ही मिळेल.पण मग मनोरंजन कधी करणार. Happy ) रोज नाही लिहले तरी आठवड्यातून दोनदा लिहायला सुरुवात केली पाहिजे. पण आता खरोखर विचार करायला पाहिजे. त्या दृष्टीने उद्युक्त केल्याबद्दल धन्यवाद. माझी वेद सिरीज संपली की ह्यावर काही तरी करतो. Happy

Exide हा स्टॉक पण चांगला वाटत आहे. ११६ वर असताना इनिशियल रिसर्च केला होता, घ्यावा न घ्यावा मध्ये लिहायचा राहून गेला. अ‍ॅटो इन्डस्ट्री सध्या बुम मध्ये असल्यामुळे Exide व अपोलो टायर्स मला आवडले आहेत. दोन्ही स्टॉक १ वर्षात चांगला परतावा देतील. Exide साधारण १८० च्या रेंज मध्ये जाउ शकतो.

अपोलो टायर्सच्या मार्च २०१० अकाउंटचा वार्षिक EPS २.३० होता. जुनच्या पहिल्या तिमाही मध्येच .८० EPS आहे. ही तिमाही अपोलोला मस्त गेली व अ‍ॅटो अजूनही तेजीत असल्यामुळे वर्षभरात हेच रिझल्ट कायम राहिले तर ३ रुच्या आसपास EPS जाईल म्हणजे टारगेट परत ५२ विक हाय कडे म्हणजे ८०+ कडे जाऊ शकते. डेफिनेट बाय.

अ‍ॅटो बद्दल बोलत आहोतच तर टाटा मोटर्स मी इथे मागे रिकमन्ड केला होता ६८० च्या आसपास. तो आज ८४० च्या आसपास आहे. २५ टक्के रिटर्नस!! ते ही अवघ्या काही महिन्यात. काल मी पार्शल प्रॉफिट बुक केला, ज्या कोणी घेतला असेल त्यांनी पण पार्शल प्रॉफिट बुक करावा. आता ह्या शेअर मध्ये एन्टर करु नये. करायचे असेल तर थोडी वाट पाहून ७८० सब लेवलला करावे. आरिया, प्रायमा आणि आणखी काही गाड्या हिट झाल्या तर हा शेअर ९०० च्या वर जाईल.

केदार
धन्यवाद.
बरीच किल्मिशे दूर झाली.

निफ्टी मी कधि बरेच दिवस घेवून ठेवला नाही. मी जास्त ऑप्शन करतो. आता तू ह्या कॉलम मध्ये सुचवल्याप्रमाणे करून तुला फिड back नक्की देइन. एक विचारतो.

परवा मार्केट वर गेले. तिथे ते काल कन्सॉलिडेट झाले. आज उद्या जर + / - १५-२० मध्ये राहिले म्हणजे कॅन्सॉलिडेशन पूर्ण होईल आणि लगेच नेक्स्ट मुव्ह ५५०० ची होईल, ती पण लवकरच असे मला वाटत आहे. मार्केट पडले तर गो लॉन्ग ऑन निफ्टी.>>>>>>

ह्याचा अर्थ मार्केट ५४०० च्या आसपास आले तर निफ्टी बाय करून वर जाई पर्यंत होल्ड करणे असा होतो का? ५४०० च्या आसपास स्ट्रॉंग सपोर्ट आहे का? निफ्टि ची सर्व रिस्क मी जाणतो.

नाही. ५४०० सपोर्ट नाही.

जेंव्हा मार्केट मध्ये अप मुव्ह होत असते तेंव्हा वर गेल्यावर तो परत थोडा खाली येतो. निफ्टी ५४७५ ला टच करुन खाली आला. तिथे मग हे कन्सॉलिडेशन सुरु होते. म्हणजे जर मार्केट खरच तेजीत असेल तर, ते जिथे खाली येऊन थांबते, त्याचा आजूबाजूला काही दिवस रेंगाळते, तिथून पडले नाही की मग चांगल्या बातम्यांवर परत वर जाते किंवा रॅली सस्टेन नाही झाली तर रिट्रॅक्ट होते. (प्रेशर). उदाहरण द्यायचे तर पिशवीतून डब्यात तांदूळ, डाळ भरताना डबा भरला की आपण हलवतो, मग परत जागा निर्माण होते व परत आपण डाळ भरतो. त्या हलवन्यालाच कन्सॉलिडेशन म्हणू.

जिथे कन्सॉलिडेट होते तिथे सपोर्ट लेवल तयार होईल असे नसते. तर त्या मागच्या कन्सॉलिडेशन लेवलला ती असू शकते, पण ती मागच्या रेसिस्टन्स लेवलला असतेच असते. मागच्या वेळी ५३५० च्या आसपस ही लेवल तयार झाली आहे. त्यामुळे येथून मार्केट पडले तर ते ५४०० ला थांबेल असे नाही, तर ते सरळ खाली जाईल, ५३५० +/- टेस्ट करुन बघेल. तसेच अपसाईडला पहिल्या रेसिस्टन्स लेवलला टेस्ट केले (किंवा त्या आजूबाजूला गेले) तर ती लेवल पार होईल.

तुम्ही निफ्टीचा एक वर्षाचा चार्ट मांडा (गुगल किंवा याहू फायनान्स) आणि दरवेळी मार्केट कुठे थांबले, कुठून वर गेले ह्यावर आडव्या रेषा मारत चला, काही वेळाने तुम्हाला मी वर काय लिहतोय ते लगेच समजेल. वाटल्यास मी उद्या निफ्टी चार्ट टाकून लेवल मार्क करेन.

हो त्याचा अर्थ एकदा तुम्ही फ्युचर विकत घेतले की इत्सिप्त लेवल पर वर जायला वाट बघने हा आहे, पण वर न जाता खाली जात असेल तर लॉस पण योग्य वेळी बुक करावा लागतो, फ्युचर्स मार्केट हे कॅश सेगमेंट असल्यामुळे खूप धोकादायक आहे. स्पेशली मार्केट खाली जाताना. ही रिस्क घ्यायची तयारी असेल तरच कृपया फ्युचर्स घ्या. अन्यथा स्लो बट स्टेडी शेअर्स चांगले.

केदार, ओरीएंटल बँक ४०५ !!! तू दिलेल्या टारगेटला पोहोचला. मी प्रॉफीट बूक केला!
खूप खूप धन्यवाद!!! माझ्याकडून तुला एक पार्टी लागू! Happy

केदार>>बलरामपुर चिनी सध्या १२० ला आहे. तो FY११ अर्निंग्स वर १७० च्या आसपास जाईल. लाँग टर्म साठी मला आवडला व मी आजच घेतला.

आज हा ८५ ला आहे...घ्यावा का??

केदार ,
तुम्ही खरच आठवड्यातुन २ वेळा तरी लिहीत जा , तुमच्या सल्ल्याचा खुप फायदा होतो.
मी आज Bank Nifty Futures short केली आहे १०४५० ला, साधारण कधि cover करावी?
सई

केदार
धन्यवाद. चार्ट बघेन. जमले तर तो चार्ट टाक म्हणजे चुकीचे बघत नाही हे कळेल.
फ्युचर्स मार्केट हे कॅश सेगमेंट असल्यामुळे खूप धोकादायक आहे. स्पेशली मार्केट खाली जाताना. ही रिस्क घ्यायची तयारी असेल तरच कृपया फ्युचर्स घ्या. अन्यथा स्लो बट स्टेडी शेअर्स चांगले.>>>>
सर्व धोके पूर्ण माहित आहेत. कधिही कोणालाही माझ्ह्या निर्णयाबद्दल दोष देणार नाही. तेंव्हा सल्ले तसेच चालू ठॅव.

ओके. Happy

सई मार्केट आज वर गेले आहे, ५५०० ला जाण्याचे चान्सेस आहे. आत्ता ५४८२ ला आहे, म्हणजे रि टेस्ट चालू आहे. ५५०० जाईल तेंव्हा बॅन्क निफ्टी पण वर जायला पाहिजे, त्यामुळे शॉर्ट असेल तर कव्हर करावा असे वाटते. पण तुमच्या कडे कन्फर्म बातमी असेल तर हरकत नाही. Happy

बलरामपुर चिनी मध्ये माझा अंदाज चुकला. सध्यातरी साखरेपासून दुर राहा. ह्यावर अजून काही मिळाले तर ते पाहून सांगतो.

Pages