मार्केट टॉक - आउटलूक

Submitted by केदार on 27 January, 2010 - 13:28

सेन्सेक्स आज ४९० पाँईटसने घसरला. पुढे काय?

१. २० ऑगस्टला मार्केट पडले पण २१ ला मार्केट गॅपने उघडले (१०४) व सुरु झालेली रॅली ( १४९२१) आक्टो १७ ला १७३२६ ला थांबली. (मध्ये एकदा दोन तीन दिवस पडून १५३९८ लेव्हल ला सपोर्ट घेऊन परत ही रॅली झाली.
२. नंतर तिथून खाली येऊन १५९०४ पर्यंत परत एकदा मार्केट खाली आले. (नोव्हे ३)
३. नोव्हे ३ पासून परत मार्केट वर गेले नोव्हे २५ पर्यंत १७१९८.
४. नोव्ह २७ ला गॅप डाउन ने मार्केट ओपन झाले. ( ओपन १६७१८ , हाय १८७१८, लो १६२१०, क्लोज १६६३२)
५. नंतर साईडवेज कधी वर कधी खाली करत ६ जानेवारीला हायस्ट पाँईट म्हणजे १७२९० ला गेले.

ह्या सर्व डेटाचा टेक्नीकल अ‍ॅनॅलिसिस केला तर बर्‍याच कन्फुझिंग लेवल्स सापडतात. पण नेमका ह्यावेळी मग इतिहास लक्षात घेऊन मागे मार्केट मध्ये काय घडले ह्यावर विचार केला. दर जानेवारीत गेले ५-६ वर्षे मार्केट पडते.

दिड-दोन आठवड्यांपूर्वी मी आणि उपास बोलताना त्याने विचारले की नंतरच्या लेवल्स काय असतील. त्याचाशी बोलताना मार्केट लवकरच खूप पडुन फर्स्ट सपोर्ट लेव्हल १६२०० वर जाईल असे सांगीतले होते. तेंव्हा मार्केट १७,७०० च्या आसपास होते, व १६,२०० कुठेही बोर्डवर येतील असे दिसत नव्हते. पण आज मार्केट १६,२८९ ला आहे.

उद्या एक्सापरीचा गुरुवार असल्यामुळे त्याचाही परिणाम होणार.

पुपुवर गेल्या आठवड्यात लिहीले होते की पैसे गोळा करा. आता ती वेळ येऊ घातली आहे. कालचा फॉल १६,२०० ला टच झाला नाही म्हणजे ह्या सपोर्ट लेव्हल तो थांबेल का? हे पाहायला आणखी दोन तीन दिवसांची गरज आहे पण इथे जर लगेच सपोर्ट मिळाला नाही तर नंतरचा सपोर्ट साधारण १५,३०० ते १५,५०० आहे असे वाटते.

पैसे असतील तर अनेक चांगले सेक्टर्स - मेटल्स, इन्फ्रा आणि फार्मा हे चांगले वाटत आहेत, जर अजून खाली घसरले तर नक्कीच ह्यात नक्कीच गुंतवणूक करायला सुरु करावी.

* हे सर्व माझे अंदाज आहेत, जे चुकीचेही असू शकतात. (असतात) आपले पैसे निट विचार करुन गुंतवा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मागे मी इथे ओरियन्टल बँकेला रिकमन्ड केले होते. साधारण २८०-९० आणि परत ३२० च्या दरम्यान. माझे टारगेट ४०० आहे असेही त्यात लिहले होते. सध्या तो ३७५+ मिळतोय. टारगेटला जाईलच पण फक्त ४ महिन्यात जवळपास २८ टक्के रिटर्न (अ‍ॅब्सोल्युट व्हॅल्यु मध्ये ८० + रु प्रतिशेअर) परतावा मिळाला आहे. ज्यांनी घेतला त्यांनी पार्शल प्रॉफिट बुक करावा. मार्केट नेहमी एवढे रिटर्न देत असे नाही. सुपर्ब अपसाईड मुव्ह!

ह्याच बाफवर मी लुपिन बद्दल लिहले होते. माझे टारगेट १९००+ ऑलरेडी आले आहे. ज्यांनी घेतला त्यांनी प्रॉफिट बुक करावा.

लार्सन पण पार्शल प्रॉफिट बुक.

मी शेअर लिस्ट करायला घेतली आहे, पण सध्या माझ्या दृष्टीन मार्केट ओव्हरब्रॉट आहे त्यामुळे टाकत नव्हतो. सल्ला देताना तुमचे भांडवल सुरक्षित राहावे हा विचार होता, पण अ‍ॅग्रेसिव्ह रिस्क टेकर्स लोकांसाठी माझे पहिल्या पसंतीचे शेअर्स हे आहेत:

Axix bank, SBI, Maruti, Hero Honda, Tata Motors, , Glen Pharma, GE Shiping

साउथ इंडियन बॅंक पण मी घ्या असा सल्ला दिला होता. शेअर्स घेतले असतील तर अ‍ॅड करा. २३० नक्की येतील.

कन्झरवेटिव्ह लोकांनी ह्यातील Axix bank, Glen Pharma,Tata Motors घ्यायला हरकत नाही.

नाही हो. अजिबात नाही. मी दर तीन महिन्यांनी हे करतोच. आणि दर महिन्याने मी घेतलेल्या शेअर्सचा परत आढावा घेणे असतेच, त्यामुळे रुटिन. Happy

L & T चा स्टॉक कोड काय आहे NSE वर?
मी LT, L&T असे काही काही सर्च केले, पण हवा तो मिळाला नाही.

साखरे कंपन्यांचे शेयर इतक्यात वर जातील असे वाटत नाही. साखरेचे भाव वर जाणार नाहीत अजून एक वर्ष तरी. भारतात ओव्हर प्रॉडक्शन अपेक्षित आहे.

केदार, सतीश व सुरेश. खूप छान चर्चा व माहिती. पण सुरेशची स्त्रॅटेजी वापरायची कशी हे कळले नाही. डोक्यावरून गेले. मला टेक्निकल कळत नाही. काय वाचावे बरे.

केदार >>>>
माझ्या दृष्टीन मार्केट ओव्हरब्रॉट आहे ? >> मी गेले तीन महिने युरोपच्या भितीने काठावर आहे. करेक्शन अपेक्षित आहे का?

केदार,
IT sector मधले Infy, TCS कितीला घेणे फायदेशीर ठरू शकेल?
Zensar मधे गुंतवणूक करावी का?

बारिशकर हे बघ. http://nseindia.com/marketinfo/equities/cmquote.jsp?key=LTEQN&symbol=LT&...
LARTOU हा लार्सन साठी आयसिआयसिआयचा कोड आहे.

लार्सन ने १९०० गाठले. १०० % टारगेट डन. Happy

IT sector इन्फी पेक्षा TCS बरा आहे, अजून ८०, ९० रु वर जाऊ शकतो. ८०० च्या रेंज मध्ये घे.
झेनसारवर पाहून सांगतो.

सुरेश, साखरेबाबत विक्रम म्हणतो ते बरोबर आहे. सेक्टर फार नाही वर जाणार, पण त्यातल्या त्यात श्री रेणूका बरा वाटतोय, बजाज हिंदूस्थान पण बरा आहे. ह्यावर लिहतो.

मी गेले तीन महिने युरोपच्या भितीने काठावर आहे. करेक्शन अपेक्षित आहे का? >>> नाही आता नाही. काल ५४०० टच करुन परत वापस आले. गेले ५-६ सेशन ह्या ५३५५ ते ५४०० ही रेंज आहे, त्यामुळे आता खूप करेक्शन होणार नाही. झाले तरी ५३३० ला सपोर्ट आहे. परकिय गुंतवणूकदार भरपुर भांडवल आणत आहेत. व पहिल्या तिमाहीचे उत्पन्न चांगले झाले आहे. वल्ड बँकेने काही दिवसांपूर्वीच परत एकदा भारत १० टक्यांनी वाढेल असे सांगीतल्यामुळे परकिय चलन भरपुर येणार. सध्या त्यांनी फार्मावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे कॅडिला हेल्थकेअर, लुपिन, ग्लॅक्सो, वगैरे अगदी १०० टक्के रिटर्न्स देताना दिसत आहेत.

मी ओव्हरब्रॉट व्हॅल्यू इन्वेस्टिंगच्या दृष्टीने म्हणत आहे. टेक्निकलच्या नाही. उदा लार्सन किंवा लुपिन हे दोन शेअर्स ऑलरेडी FY11 च्या अर्निंग्संला ट्रेड होत आहेत. व फक्त एकच तिमाही झाली आहे. व्हॅल्यू इन्वेस्टर्स साठी ह्या किमतीला गुंतवणूक करणे धोक्याचे ठरु शकते, पण ग्रोथ इन्वेस्टर्स साठी नाही.

मार्केट वर जायचे थांबणार नाही असे कालच्या मुव्ह वरुन कन्फर्म होते. माझे नेक्स्ट निफ्टी टारगेट ५५०० च्या आसपास आहे. पब्लीक सेक्टर बँक, फार्मा सेक्टर (कॅडिला, सिप्ला, वगैरे) मस्त परफॉर्म करतील असे वाटते.

>>> सध्या त्यांनी फार्मावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे कॅडिला हेल्थकेअर, लुपिन, ग्लॅक्सो, वगैरे अगदी १०० टक्के रिटर्न्स देताना दिसत आहेत.

केदार,

Wockhardt आज १३८ ला आहे. ह्या लेव्हलला तो घ्यावा का? तो अजून वर जाईल का?

केदार

धन्यवाद

फार्मा मध्ये 2nd लाइनच्या कुठ्ल्या कंपन्या आहेत? कारण काही काळा नंतर त्या पण वाढायला लागतील. मोठ्याना फार स्कोप नसेल तर त्या चांगला परतावा देतील.

शेअरच्या बुक value कुठे मिळतील? २००७-२००८, २००८-२००९ व २००९-२०१० च्या. त्याचे व price चे रिलेशन बघायचे आहे.

बारिशकर
zensar ला माझ्या ब्रोकर ने बाय सांगितले आहे. Target 540. अजून चार्ट बघितले नाहीत.

केदार

५ ते ६ दिवसा नंतर मार्केट ने ५३५० ते ५४०० बॅन्ड तोडला. ५४४२ ला बंद झाले. ह्या जोरा वर उद्या ५५०० दाखवला तर ७०-८० पॉईंटचे करेक्शन देइल का?

धन्यवाद केदार,
acc 836 ला घेतले आहेत ३१ आहेत. अजुन घ्यावेत का?
short term म्हणजे अगदि १ आठवड्यात घेउन विकता येतील असे कोणते shares suggest कराल?
तुमच्या सल्ल्याचा खूप उपयोग होतो.धन्यवाद

बोजड भाषेत सांगायचे झाले तर व्हॅल्यू इन्वेस्टर्स हे त्या शेअरच्या इन्ट्रेंसिक व्हॅल्युकडे लक्ष देऊन गुंतवणूक करतात. ही मार्केट व्हॅल्यू पेक्षा कमी असते. असे शेअर्स मार्केट मध्ये अंडरव्हॅल्युड असतात. सोप्या शब्दात ..
जीथे त्या शेअर्सला जास्त भाव मिळायला पाहिजे, पण अजून मार्केटचे त्या दुलर्क्ष आहे अश्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करणे म्हणजे व्हॅल्यु इन्वेस्टिंग.

ग्रोथ मध्ये त्या कंपनीच्या भविष्यातील अर्निंग्सवर लक्ष केंद्रित केले जाते. समजा आज तुम्ही लार्सन घेतला, तर तो fy11 च्या अर्निंग्स ऑलरेडी गेला आहे, पण तुम्हाला असे वाटते की अजूनही हा थोडा वर जाईल तर त्याला ग्रोथ इन्वेस्टमेंट म्हणतात. थोडक्यात इथे PE किंवा इतर रेशोजचा वगैरेचा संबंध कमी येतो.

ACC तिमाही रिझल्ट मध्ये गडबड त्यामुळे पडला आहे. होल्ड करा. आत्ता घेऊ नका. ८०० च्या खाली गेल्यावर घ्या.

शॉर्ट टर्म मध्ये मी शेअर्स घेत नाही, फ्युचर्स घेतो. तुम्हाला हवे असतील तर तुम्ही निफ्टी इथे लिहल्याप्रमाणे घेत वा विकत चला.

सुरेश, असे प्राईज रिलेशन मिळने थोडे अवघड आहे, कारण आपल्याकडच्या साईट्स इतक्या चांगल्या नाहीत. पण शोधतो, मिळाली तर सांगतो.

वोकार्ट मध्ये दम नाही. सेकन्ड लाईन मध्ये ग्लेनमार्क, सिप्ला, कॅडिला ह्या कंपन्याच बर्‍या दिसत आहेत. सन फार्मा पण चांगली आहे.

काल इथे लिहल्याप्रमाणे परवाची मुव्ह महत्वाची होती. माझा तो अंदाज / व्हियु इन्वेस्टर्सनी लगेच आज सार्थ करुन दाखवला. ६-८ दिवसांच्या कन्सॉलिडेशन नंतर मार्केट वर गेले. अप ट्रेन्ड राहणार. Happy पण ५५०० लगेच येणार नाही असे वाटते, त्यामुळे अगदी हुरळून नको जायला. पण ट्रेन्ड अपमुव्हचा आहे हे लक्षात ठेवा. करेक्शन ८०-१०० चे होईल असे वाटत नाही. (ऑफकोर्स जर एखादी भलतीच बातमी आली तर मात्र काही होऊ शकते. Happy )

महत्वाचे : निफ्टी २२.७५ च्या PE वर ट्रेड होत आहे. त्यामुळे कॉशन. रोज पोझिशन्स परत चेक करत जा. २००८ हाय च्या वेळी निफ्टी २४ ने ट्रेड करत होता. जर मी २४ पर्यंत चार्ट मांडला तर टारगेट येत आहे ५७४१. सप्टे डिसे तिमाही जर चांगली गेली तर निफ्टी डिसे अखेरिस ५७५० ला असेल.

आणि सगळ्यात महत्वाचे आता सगळे अ‍ॅनॅलिस्ट लोक ५५००, ५८०० बिग मुव्ह असे ओरडायला लागतील. दुर्लक्ष करा! ते देखील मी जसे गणित करतो तसेच करतात, थोडेसे सोफेस्टिकेटेड, पण डाउन मुव्ह झाली की लगेच ५२००, ४९०० असेही ओरडतात.

केदार ,
सगळे अ‍ॅनॅलिस्ट लोक ५५००, ५८०० बिग मुव्ह असे ओरडायला लागतील + डाउन मुव्ह झाली की लगेच ५२००, ४९००
>>>>>>> १०० % मान्य !!!!!!!!!
मी Nifty 5376 ला घेतला अन 5394 ला विकला १२ पुर्वी...............:(
Now what to do ?
short or Long....................

स्टे पुट. आज ग्लोबल मार्केट पाहून भारतीय बाजार वर किंवा खाली जाईल. तसेच प्रॉफिट बुक पण होणार. मग दुपार नंतर खाली गेला तर घे. लाँग जा.

मामी फटाके आणा आता. ५४७५ गाठले.

बरं आत्ता मनिकंट्रोल पाहत होतो त्यात मला त्या चुग ने सांगीतलेला कॉस्मो फिल्म्स आवडला. हिस्ट्री पाहिली. माझ्याकडून आधी हुकला तो. पण चांगला आहे. १२० रेंज येते का ते बघा. आत्ता २०%, नंतर ३० असे घ्या. एक दिड वर्षात नक्कीच भरपुर परतावा देईल असे खात्रीने वाटते.

केदार
मी काल युनिटेकचा ९० चा कॉल घेतला ०.३० पैसे ह्या भावानी.
कालच तो ०.४० झाला होता, पण काढला नाही.
क्लोझिंग ०.२५. एक्सपायरी पर्यंत कीती वाढू शकेल?
काही अंदाज?
मला वाटतय की ०.७५ ते ०.८० व्हावा.
काय करु? थांबू का?

hi kedar, I have purchased SUZLON shares few weeks before for Rs.74.31. Unfortunately the price has dropped and still in negative. Will you please advise, do I wait or sell to avoid further loss?
We are new to this blog.

सध्या निफ्टीची पी /ई रेशो खूपच जास्त आहे. हे तितकेसे चांगले लक्षण नाही, आणि सध्या ग्लोबल मार्केट्मध्ये डबल डिप रेसिशनची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतो (मागील अनुभव गृहित धरता) ??

उजू
युनिटेक चा call घेताना टेक्निकल चार्टस पाहिले होतेस का? स्टॉक मध्ये F & O साठि तो एक चांगला मार्ग आहे. त्या वरुन बराच अंदाज येवु शकतो. Unitech weak वाटतो.

केदार बॉसू ( तेलुगु स्टाइलने Happy

इप्का लॅब चे ५० शेअर २७९ भावाने आहेत. पण आय्सीआयसी आय च्या स्टेट्मेन्ट मध्ये ते १०च शेअर दिसत आहेत. ते १० चे ५० चेंज कसे करायचे सिस्टिम मध्ये. कारण का कि १० असल्याने उगीचच लॉस जास्त दिसतो आहे. काही लिंक असेल तर द्यावी.

बाकी आम्ही सध्या ठेविले अनंते Happy

Pages