मार्केट टॉक - आउटलूक

Submitted by केदार on 27 January, 2010 - 13:28

सेन्सेक्स आज ४९० पाँईटसने घसरला. पुढे काय?

१. २० ऑगस्टला मार्केट पडले पण २१ ला मार्केट गॅपने उघडले (१०४) व सुरु झालेली रॅली ( १४९२१) आक्टो १७ ला १७३२६ ला थांबली. (मध्ये एकदा दोन तीन दिवस पडून १५३९८ लेव्हल ला सपोर्ट घेऊन परत ही रॅली झाली.
२. नंतर तिथून खाली येऊन १५९०४ पर्यंत परत एकदा मार्केट खाली आले. (नोव्हे ३)
३. नोव्हे ३ पासून परत मार्केट वर गेले नोव्हे २५ पर्यंत १७१९८.
४. नोव्ह २७ ला गॅप डाउन ने मार्केट ओपन झाले. ( ओपन १६७१८ , हाय १८७१८, लो १६२१०, क्लोज १६६३२)
५. नंतर साईडवेज कधी वर कधी खाली करत ६ जानेवारीला हायस्ट पाँईट म्हणजे १७२९० ला गेले.

ह्या सर्व डेटाचा टेक्नीकल अ‍ॅनॅलिसिस केला तर बर्‍याच कन्फुझिंग लेवल्स सापडतात. पण नेमका ह्यावेळी मग इतिहास लक्षात घेऊन मागे मार्केट मध्ये काय घडले ह्यावर विचार केला. दर जानेवारीत गेले ५-६ वर्षे मार्केट पडते.

दिड-दोन आठवड्यांपूर्वी मी आणि उपास बोलताना त्याने विचारले की नंतरच्या लेवल्स काय असतील. त्याचाशी बोलताना मार्केट लवकरच खूप पडुन फर्स्ट सपोर्ट लेव्हल १६२०० वर जाईल असे सांगीतले होते. तेंव्हा मार्केट १७,७०० च्या आसपास होते, व १६,२०० कुठेही बोर्डवर येतील असे दिसत नव्हते. पण आज मार्केट १६,२८९ ला आहे.

उद्या एक्सापरीचा गुरुवार असल्यामुळे त्याचाही परिणाम होणार.

पुपुवर गेल्या आठवड्यात लिहीले होते की पैसे गोळा करा. आता ती वेळ येऊ घातली आहे. कालचा फॉल १६,२०० ला टच झाला नाही म्हणजे ह्या सपोर्ट लेव्हल तो थांबेल का? हे पाहायला आणखी दोन तीन दिवसांची गरज आहे पण इथे जर लगेच सपोर्ट मिळाला नाही तर नंतरचा सपोर्ट साधारण १५,३०० ते १५,५०० आहे असे वाटते.

पैसे असतील तर अनेक चांगले सेक्टर्स - मेटल्स, इन्फ्रा आणि फार्मा हे चांगले वाटत आहेत, जर अजून खाली घसरले तर नक्कीच ह्यात नक्कीच गुंतवणूक करायला सुरु करावी.

* हे सर्व माझे अंदाज आहेत, जे चुकीचेही असू शकतात. (असतात) आपले पैसे निट विचार करुन गुंतवा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही ICICI Direct भारतातही थकल्यासारखीच आहे का? मला कालही अडचणी आल्या, आजही येत आहेत. माठ लोकं आहेत.

नाहितर काय. अ‍ॅक्टीव ट्रेडर्स आणि डे ट्रेड्रर्स चा खरा तोटा होत असतो. मिनिटागणीक पोझीशन बदलते.

मला कालही पोझिशन स्व्केअरऑफ करायला मिळाली नाही, आज एक करुन एक घेतली, तर लगेच बंद. दुसरी करायची वाट पाहतोय पण लॉग इन होत नाहीये. Infy चे लोक काय गोंधळ घालतात काय माहित? आर्किटेक्टला बडबायला पाहिजे. लोकांचे करोडो रु चे नुकसान होत असेल.

Infy चे लोक काय गोंधळ घालतात काय माहित? आर्किटेक्टला बडबायला पाहिजे. >> Happy
लोकांचे करोडो रु चे नुकसान होत असेल.>> हे खर. वाईट चिडचिड होत असेल.

Infy चे लोक काय गोंधळ घालतात काय माहित? आर्किटेक्टला बडबायला पाहिजे. >>>> आयला फक्त infyवालेच वेंडर असतील असं काय नाय हं.. DB कुणाकडे आहे बघा, आणि काही तरी प्रॉब्लेम असेल..

टण्या हो. पण तो प्रॉब्लेम आर्किटेक्टनी सोडवायला पाहिजे. त्याला भार पेलवत नाहीये बहुदा. तो ICICI वाला पण असू शकतो.

प्रितीभुषण - नाही हो. अमेरिकेत राहून भारताच्या वेळेला डे ट्रेडिंग करने शक्य होत नाही. मी फार कमी वेळेस डे ट्रेडिंग करतो, कधी करायचे हे रियल टाईम म्हणजे त्या सकाळी जागतीक बाजारपेठेतिल उलाढाल, मार्केट ट्रेन्ड हे पाहून ठरवतो. पण मी अ‍ॅक्टीव्ह ट्रेडर आहे. ऑप्शन व फ्युचर्स मध्ये रोज पोझिशन असल्याशिवाय दिवस जात नाही. Happy

मी शेअर बाजारात गुंतवणुक करत आहे. ऑनलाईन ट्रेडिंग अकाउंट आहे.
माझा यात अभ्यास नाही.... नेटवर वाचुन माहिती घेत आहे!
कुठे गुंतवणुक करावी, कुठले शेअर्स घ्यावेत... कोणी मार्गदर्शन करु शकेल का?

केदार,
आज निफ्टी ५४०० ला गेली, आता अजुन किती वर जाउ शकते आणी खाली आली तर कुठे सपोर्ट आहे? अमेरिकन मार्केट ची Earning Season ची तर चान्गली सुरुवात झालि आहे.

सई

हो सई.
नेक्स्ट मुव्ह नीट कळायला आजचा दिवस जावा लागणार. पण माझ्यामते आता सपोर्ट लाईन वर येऊन मागच्या रेसिस्टन्स मध्ये म्हणजे ५३२५-४० मध्ये जाणार. वर ५४७५ आले तर हे कन्फर्म होईल.

ACC माझ्यामते अजून घसरणार नाही. जुन तिमाहीला पण फारसे चांगले उत्पन्न नाही. त्यामुळे धसरला पण ते आता ऑलरडी किमतीत आले आहे त्यामुळे जास्त किमतीचा असेल तर होल्ड करा. पुढच्या तिमाहीत पर्यंत वर जाईल.

शितल इथे येत राहा नियमीत. अनेक शेअर्सबद्दल इथे लिहले जाते. एक दोन दिवसात काही स्टॉक टाकतो, जे पुढच्या ६ महिन्यात चांगले रिटर्न्स देतील.

सिद्धार्थ २६०० येईल की नाही माहित नाही, पण सध्या इन्फीचा रिपोर्ट काही चांगला नाही. शिवाय डॉलर विरुद्ध रुपया ह्यात रुपया गेन झाला आहे गेल्या काही दिवसात, त्यामुळे त्याचाही फरक पडेल. एन्टर करायचे असेल तर ह्या लेवला २०%, २७५० +/- ला ४० टक्के असे करा. मार्केटने प्रॉफिट बुकींग सुरु केले तर मार्केट अजून खाली येईल त्यामुळे आणखी दिड ते दोन टक्के डाउनसाईड आहे असे नक्की वाटते.

केदार,
धन्यवाद. मागे इन्फी काढुन टी सी एस घेतला, टी सी एस मधे अजुन इन्वेस्ट करयला नको वाटते आहे, म्हणुन इन्फीचा विचार करतो आहे. इन्फीचे मार्केट मधे आजुन काही दिवस तरी खाली येत राहणार, तुमचा सल्ला योग्य आहे. Happy

Thanx kedar,
my portfolio
name-- quantity--purchase price
ABANLOYD -- 10-- 883.55
BHARTI -- 10-- 303.10
GLENMARK -- 10-- 278.05
HDIL-- 13-- 271.60
JINDSTL --30 -- 638.25
L&T -- 5 --1838.00
RANBAXY-- 4 -- 462.20
SHIVVANI -- 2-- 468.20
SUZENER --20-- 73

can u pls suggest on my portfolio as I buy and sell shares without any pattern.
Now I want to do some study and follow patterrn. pls help.....
shital

केदार,
५३६० ला Nifty १३/०७/२०१० घेतला आहे.....n Trend seem Up (मलाही असच वाट्ते)
What you say?
Sharekhan say target for Nifty is 5500 , Do u see reports of icicidirect ? below 5300 they always recommended "SHORT" on Market.

ABANLOYD - तुम्ही हा शेअर कधी धेतला? जुन मध्ये अगदी ७०० च्या खाली पण मिळत होता. तेंव्हा अ‍ॅव्हरेज करायला हवा होता. पण नेक्स मुव्ह मध्ये हा ९०० क्रॉस करु शकेन. सध्यातरी फाय काही चांगल भविष्य (अति शॉर्टटर्म) दिसत नाही. पण होल्ड करा.

BHARTI - सध्या टेलकॉमला थोडा प्रॉब्लेम आहे. पण येत्या ६ महिन्यात नक्कीच चांगला परतावा मिळेल. त्याआधी तो तुमच्या किमतीपेक्षा कमीला मिळत असेल तेंव्हा घ्या.

GLENMARK चांगला शेअर आहे. होल्ड करा. सध्या रेंज मध्ये अडकला आहे. नक्कीच चांगले रिटर्नस मिळतील.

HDIL - रियॅलिटी पॅक अंडरपरफॉर्मर आहे. २५० + / - लेवलला येईल तेंव्हा परत घ्या. सहा एक महिन्यात एकदा तरी ३२५ पर्यंत जाईल असे वाटत आहे.

JINDSTL पेक्षा मला टाटा जास्त आवडते. पण जिंदालही चांगलेच आहे. मेटल्स मध्ये पण प्रॉब्लेम आहे, पण नेक्स्ट बिग मुव्ह परत मेटल्सची असण्याची शक्यता मला वाटत आहे, कारण मेटल सेक्टर मध्ये खूप जास्त करेक्शन झाले, त्यामुळे इंडेक्स जर २०,००० कडे जायचा असेल तर मेटल्स हेवीवेटनी परफॉर्म करने जरुरी आहे. होल्ड करा. बाय ऑन डिप्स. टाटा स्टिल कडे पण लक्ष द्या.

L&T - तुम्ही खूप महागात घेतलात. माझे ह्या वर्षीचे टारगेट १८०० ते १९०० आहे, पण असुद्यात. पैसे वाया नाही जाणार. करेक्शन झाले सगळ्यात आधी L&T विकत घ्या. व जास्त संख्येत विकत घ्या. तुमच्या रिटायरमेंटचे पैसे ह्यात टाकले तरी हरकत नाही.

RANBAXY - ४५० च्या रेंजमध्ये आहे. तुम्ही पण त्याच रेंज मध्ये घेतला. होल्ड करा ऑगस्ट मध्ये वर जाईल असे वाटत आहे.

SHIVVANI - ४७५-७८ मध्ये खूप मोठा रेसिस्टन्स आहे. मला नाही वाटत तो ह्याला भेदून ५००+ रेंज मध्ये जाईल. कारण वर न्यायला व्हॉल्यूम लागतो. शिवानी इतके फेमस नसल्यामुळे ५००+ रेंज जरा अवघड वाटत आहे.

सुझलॉन रेंज बाउंड आहे. १०० क्रॉस करणे फार अवघड आहे.

सतिश, होल्ड कर. अप मुव्ह नंतर कन्सॉलिडेशन चालू आहे. ५४०० ला परत गेल्याशिवाय वापस यायचे नाही, त्यामुळे डाउनसाईड लिमिटेड आहे. ICICI चे लॉन्ग टर्म रिपोर्टस मी पाहतो. ते डेली रेंज वगैरे वर मला त्यांचाबाबत भरवसा नाही. कित्येकदा मी इथे लिहलेल्या रेंज जास्त बरोबर येतात असे गेल्या चार्-पाच महिन्याच्या लिखीत अनुभवावरुन वाटते, त्यामुळे त्यांचे डेली रिपोर्ट मी इन्गोर करतो. Happy

नम्स्कार केदार
धन्यवाद तुमच्या मार्गदर्शनाचा खुप उपयोग होतो. अजुन काहि नविन स्टॉक कधि घ्यायचे ते सान्गाल का?

केदार, सगळ्यांकडे चहा-पाण्याला गेलास तर एक महिना नक्कीच सुटेल नां? निदान सध्यातरी. Wink

केदार

५३०० चा ११४, जुलै चा घेतलेला कॉल मी मार्केट ५४०० वर असताना १४९ ला काढला. (हि किंमत मी रोज ठेवत होतो. १३ जुलै ला हिट झाली. त्या दिवशीचा हाय १५२.४ गेला. Next day ला १७२ दाखवला.
३०% परतावा दिला. गेले ३ महिने २५% परतावा दिला.

महिन्याच्या १ तारखेला, मार्केटच्या दिशे प्रमाणे इन मनि कॉल असेल त्या भावात घ्यायचा. त्या नंतर लगेच २५ ते ३०% टाकून विकायला ठेवायचा. हिट होइ पर्यंत रोज continue करायचा. त्या नंतर वर गेला तर ते दुसर्‍याचे. २००७ पासून २७ महिन्याचे चार्ट बघितले. २३ वेळा हे सफळ झाले.

मला मार्केट मधले काही कळत नाही. माझ्या एका मित्राने vertex चे शेअर्स घेतलेत. आता कुठे जरा वाढायला लागलाय म्हणतो. तुम्हाला काही कल्पना आहे का या कंपनी बद्दल. Uhoh

सुरेश१ सही स्टॅटेजी आहे. Happy बॅकटेस्ट करावी लागेल.
सतिश काल लिहल्याप्रमाणे एकदा ५४०० टच झाला. तू काढलेस का? नसले तरी काही अडचण नाही. Happy

रंगाशेट हो.
vertex सेक्युरिटी का? १३ ते १०० असा गेला आहे. मस्तच. पुढे जाईल असे वाटत नाही,

शितल सध्या रिचर्स करतोय. मामींनी पण विचारले आहे. टाकतोच दोन तीन दिवसात. त्या वेदांमुळे फुरसत मिळत नाहीये. Happy तुम्ही बाराच्या गटगला येणार का? http://www.maayboli.com/node/16365 न्यु जर्सी ग्रूप.

केदार
धन्यवाद. टेस्ट केलेस कि सांग.

माझे मे चे निफ्टिचे टार्गेट ५५१४ आहे व क्वारटरचे ५६१८. त्या प्रमाणे लोअर टार्गेट Q चे ५०९५ आहे. व महिन्याचे ५२२४. गेले २Q वरचे टार्गेट दाखवले नाही पण खालचे दाखवले.

बघू काय घडते ते.
क्वारटर संपायला खूप वेळ आहे.

केदार ,
मी ५३९३ ला Nifty कढला Happy
नंतर ५३६२ ला घेनार होतो पण नाही जमल....आज बघतोय भेटतोय का Happy

सुरेश
Strataergy n Targets सही आहे....

केदार धन्यवाद मी तेवढ्यात लायाबिलिटी पेऑफ केल्यापण थोडया बहुत. आता ७५ के हातात आहे कोई जल्दी नही बॉस. अच्छे अच्छे स्टॉकां निकालो तुम्हारे पिटारेमेंसे. नैतर रॉयल एन्फील्ड्वर जाणार ते. Happy

Pages