मार्केट टॉक - आउटलूक

Submitted by केदार on 27 January, 2010 - 13:28

सेन्सेक्स आज ४९० पाँईटसने घसरला. पुढे काय?

१. २० ऑगस्टला मार्केट पडले पण २१ ला मार्केट गॅपने उघडले (१०४) व सुरु झालेली रॅली ( १४९२१) आक्टो १७ ला १७३२६ ला थांबली. (मध्ये एकदा दोन तीन दिवस पडून १५३९८ लेव्हल ला सपोर्ट घेऊन परत ही रॅली झाली.
२. नंतर तिथून खाली येऊन १५९०४ पर्यंत परत एकदा मार्केट खाली आले. (नोव्हे ३)
३. नोव्हे ३ पासून परत मार्केट वर गेले नोव्हे २५ पर्यंत १७१९८.
४. नोव्ह २७ ला गॅप डाउन ने मार्केट ओपन झाले. ( ओपन १६७१८ , हाय १८७१८, लो १६२१०, क्लोज १६६३२)
५. नंतर साईडवेज कधी वर कधी खाली करत ६ जानेवारीला हायस्ट पाँईट म्हणजे १७२९० ला गेले.

ह्या सर्व डेटाचा टेक्नीकल अ‍ॅनॅलिसिस केला तर बर्‍याच कन्फुझिंग लेवल्स सापडतात. पण नेमका ह्यावेळी मग इतिहास लक्षात घेऊन मागे मार्केट मध्ये काय घडले ह्यावर विचार केला. दर जानेवारीत गेले ५-६ वर्षे मार्केट पडते.

दिड-दोन आठवड्यांपूर्वी मी आणि उपास बोलताना त्याने विचारले की नंतरच्या लेवल्स काय असतील. त्याचाशी बोलताना मार्केट लवकरच खूप पडुन फर्स्ट सपोर्ट लेव्हल १६२०० वर जाईल असे सांगीतले होते. तेंव्हा मार्केट १७,७०० च्या आसपास होते, व १६,२०० कुठेही बोर्डवर येतील असे दिसत नव्हते. पण आज मार्केट १६,२८९ ला आहे.

उद्या एक्सापरीचा गुरुवार असल्यामुळे त्याचाही परिणाम होणार.

पुपुवर गेल्या आठवड्यात लिहीले होते की पैसे गोळा करा. आता ती वेळ येऊ घातली आहे. कालचा फॉल १६,२०० ला टच झाला नाही म्हणजे ह्या सपोर्ट लेव्हल तो थांबेल का? हे पाहायला आणखी दोन तीन दिवसांची गरज आहे पण इथे जर लगेच सपोर्ट मिळाला नाही तर नंतरचा सपोर्ट साधारण १५,३०० ते १५,५०० आहे असे वाटते.

पैसे असतील तर अनेक चांगले सेक्टर्स - मेटल्स, इन्फ्रा आणि फार्मा हे चांगले वाटत आहेत, जर अजून खाली घसरले तर नक्कीच ह्यात नक्कीच गुंतवणूक करायला सुरु करावी.

* हे सर्व माझे अंदाज आहेत, जे चुकीचेही असू शकतात. (असतात) आपले पैसे निट विचार करुन गुंतवा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सतीश हो. पण त्या आधी खालील गोष्टीं पाहा.

१. डे चार्ट ५ मिनिट
२. डे चार्ट १५ मिनिट
३. अ‍ॅव्हरेज
४. मॅकडी Happy MACD

आणि मुख्य म्हणजे मार्केट सेंटिंमेट. ते तुला चार्ट वरुन कळत जाईल. जिथे पॅटर्नस फॉर्म होतील (उदा हेड न शोल्डर) आणि ते ही टॉपला तर तेंव्हा तुझी शॉर्ट पोझिशन घे. डोजी च्या आदल्या दिवशी मार्केट खाली गेलेले असेल तर डोजीच्या दुसर्‍या दिवशी मार्केट खाली असण्याची शक्यता जास्त आहे, ते ही लक्ष दे.
मुख्य म्हणजे ह्या सर्वांची किमान आठवडाभर पेपर प्रॅक्टीस कर, वर मी जे पाँईटचे उदा दिले, तसे तू किती मार्केटच्या जवळ जाऊ शकतोस ते पाहा. मग(च) शॉर्ट कर. नक्की जमेल. शुभेच्छा. काही लागल्यास इथे विचार आपण चर्चा करु. Happy

केदार ,
thanks for you encouraging , Supportive response. as Always !!!!!!

मी निफ्टी २०० DMA च्या खाली बंद झाल्यावर short position घेतली होती , अन त्या ५११० ला कव्हर केल्या ( booked loss) , I am still not So Convinced about "trend" of market......

माझे मत
निफ्टि D, W, M & Q चार्ट मध्ये बुलीश वाटत आहेत. US मार्केट +ve आहे. काल ओपन च्या खाली बंद झाल्याने मार्केट कदाचीत खाली ओपन होइल. खाली ओपन झाले तर काय करता येइल.

When market comes to 5240 (Close was 5262) Buy one nifty (june or july). Target is 5332. If falls down further then it has a support at 5204. Buy another nifty.

Alternatively at 5240 buy 5200 (in money) call. You will get this at approx. Rs. 50/-. If nifty falls further to 5210, get two 5200 calls. This will be available at approx. Rs 16/-.

At 5210 level investment minimum is 50X1 lot of 50 + 16 X 100 (2 lot) Total 4100. avg call price becomes 27

If opens flat or up. This is not applicable,

काय घडते ते उद्या कळेलच.

Pl. use your own judgment while investing.

केदार

Camlin ने नवा हाय केला आहे. ह्या भावात कसा आहे?

Camlin वापस येईल. मे मध्ये पण ३१ च्या वर गेला होता. तिथे रेसिस्टन्स आहे. २८ला सपोर्ट आहे. २८ ते २९ च्या रेंज मध्ये घ्या.

त्या अर्ध्या चौकोनात पासवर्ड टाकायचा आहे त्यामुळे तसे दिसत असावे.

Kedar

How to invest money in the Indian market from US? Either in stocks, MF or F&O? Can we open and maintain ICICI three way account? How?

काही पर्यात आहेत जसे
१. तुम्हाला आई - वडिल कींवा जवळचे नातेवाईक ह्यांचे अकाउंट वापरावे लागेल.
२. फक्त MF साठी सर्व ब्रोकरेज NRI ला परवाणगी देतात. ते तुमच्या नावावर पण करता येईल.
३. काही बॅन्क ओव्हरसिज ट्रेडिंग अकाउंट पण देतात. पण त्याचे फार डिटेल्स मला माहित नाहीत.

केदार,
तुमचा निफ्टी ५३५० च्या पुढे जाणार नाही हा अन्दाज बरोबर होता. आता निफ्टी किति खालि येउ शकते?
आणि खालि कुठे सपोर्ट आहे? आणि वर कुठपर्यन्त जाउ शकते?

सई

धन्यवाद सई Happy

५२०० +/- फर्स्ट स्टॉप. तिथे कन्सॉलिडेट व्हायला पाहिजे. होत नसेल तर परत मार्केट पडेल व ४९०० -५१०० रेंज मध्ये जाईल. पण मला वाटते ५२०० लेवल होल्ड करेन. येत्या तिमाही रिझल्ट्स नंतर ते वर जायला सुरु होईल. काल एक्सपायरी असल्यामुळे मार्केट बरेच पडले.

फ्युचर्स साठी सुवर्णसंधी Happy आज मार्केट पडेल. कदाचित ५२०० लेवल सोडून ५१५० +/- वर जाईल. खाली गेल्यावर फ्युचर्स विकत घेऊन परत चार पाच ट्रेडिंग सेशन वाट पाहून ५३०० लेवलला विकता येतील.

केदार,
मी निफ्टी ५२०० च्या खालि यायची वाट पहात होते, सगळे एशियन मार्केट डाउन असताना आपले मार्केट वर गेले. आता नक्की निफ्टी कुठे जाईल? आत्ता निफ्टी ची रेन्ज काय असेल?

सई

मी त्याचाच शोध घेतोय. रेंज काढन्यासाठी एक दोन सेशन वाट पाहावी लागेल असे दिसते.

मार्केट रिलायन्स इंडस्ट्रीज मुळे जास्त वर गेले. काल रिलायन्सला गुजरात मध्ये नविन तेलाचे साठे सापडल्याची बातमी आली, तिचा वापरकरत लोकांनी रिलायन्सला विकत घेतले. फक्त निफ्टीवर ६६० करोड व सेन्सेक्स वर ११२ करोड इतक्या रकमेची विक्रमी खरेदी झाली. (निफ्टी नं मध्ये नं २ ला बीपीसिएल व त्याची खरेदी फक्त ३९० करोड ) त्यामुळे मार्केट वाढले. खरेतर सुरुवातीला मार्केट पडले होते पण जशी हि बातमी आली तसे लोकांनी / संस्थांनी उत्साहात खरेदी सुरु केली. त्यामुळे मच अँटिसिपेटेड डाउन मुव्ह झाली नाही.

केदार ,
अँटिसिपेटेड डाउन मुव्ह झाली नाही.
>>>> इतर मर्केटची दिशाही भरतीय मार्केटने आज (३०/०६/२०१०) बदलली अस नाही का ?
माझे ट्रेडींग in last 7 days.........
Buy 5352 Sell 5314 then sell 5316 buy 5280............

S&P below 200DMA , What you Say?

सतीश,

तसे नाही वाटतं कारण चायना, ग्रीस/ युरोप ह्यामुळे अमेरिकेवर प्रभाव पडतो, पण भारतावर नाही त्यामुळे ही मुव्ह फारशी महत्वाची नाही वा फॉल्स आहे. (ग्लोबल मार्केट मध्ये)
S&P वरचे टारगेट शोधत आहे, पण व्हेव नीट इंटरप्रिट करणारे सॉफ्टवेअर माझ्याकडे नाही, त्यामुळे नीट काही सांगता येत नाही, म्हणजे हा A धरावा का B ह्यावर माझा गोंधळ उडतोय. येत्या दोन दिवसातील मुव्ह वरुन ते ठरवता येईल. मग नीट टारगेट परत ठरवता येईल.

भारतासाठी मी अजूनही त्याच रेंजला धरुन आहे. ५४०० किंवा वर गेले तर मार्केट माझ्यामते ओव्हरब्रॉट होईल आणि करेक्शन जरुरी ठरेल. पण ग्लोबल मार्केट गेले दोन दिवस पडत आहेत, ते जर परत १ ते २ टक्यांनी वर गेले तर आपण ५३५० क्रॉस करुन ५४०० ला जाण्याचे चान्सेस आहेत. आणि तिथे नक्की मी शॉर्ट करेन. सध्यातरी मी पोझिशन होल्ड करुन ठेवत आहे, नफा बुक करत नाहीये.

सेन्सेक्स पडला शेवटी. निफ्टी १ टक्याने. आता कसं बरं वाटतयं. सकाळी लिहल्याप्रमाणे कालची फाल्स मुव्ह होती. तिच रेंज कायम. Happy
फक्त एक झालं नाही की ५२०० टेस्ट व्हायला पाहिजे होते. तसेही ५२०० ला स्टॉप आहेच पण आज ५२०० टेस्ट झाले असते थेअरी कन्फर्म (परत एकदा) झाली असती.

केदार ,
तुझ्या updates बद्दल आभार !!!!!!!!!!
काल्ची move " False" होती असच काहीस मलाही वाटत होते......

पण मला वाटते ५२०० लेवल होल्ड करेन.
>>>>>>> NIFTY even not touching it

kedar ,
your one more 100 % Accurate prediction !!!!!!!!

केदार,

RBI ने Interest rates वाढवले आहेत त्याचा काय परिणाम होईल Market वर?
सई

सई,
रेपो रेट वाढवले तर मार्केट मधील लिक्विडिटी कमी होते कारण ट्रेडर्सना मार्जिन मनी, फ्युचर्स इ इ वर जास्त व्याज द्यावे लागते. ( कॉस्ट टू कॅरी) त्यामुळे ट्रेडींग कमी होऊन मार्केट स्टेबलाईज व्हायला मदत होते. सध्या आपल्या मार्केट जर वर गेले तर ते मी आधी लिहल्याप्रमाणे ओव्हरब्रॉट मध्ये जाईल. तिथे पडले तर सामान्य गुंतवणूकदारांचे नुकसान होईल. अश्या सिच्युएशन्स येऊ नयेत म्हणून RBI मार्केट पडल्यावर रेपो रेटस कमी करते, व खूप वाढल्यावर स्टेबलाईज करण्यासाठी रेपो रेटस वाढवते. त्याचे कारण त्यांनी इन्फ्लेशनरी मेझर म्हणून दिले तरी अनेक कारणांपैकी वर लिहलेले कारण पण मुख्य असते.

सुरेश.

५३०० + ११४ म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष फायदा ५४१४ क्रॉस झाल्यावर ( + कमीशन) होईल. त्यामुळे ५४२५ बोर्डावर येतील का (एक्सपायरी पर्यंत) हे पाहावे लागेल. माझ्यामते येणार नाही, पण जेंव्हा मार्केट परत ५३०० + टिक करेल तेंव्हा ती काढा. ५३४० पर्यंत मार्केट सहज जाउन वापस येईल. त्याची वाट पाहा.

मला शेअर बाजारात गुंतवणुक सुरु करायची आहे...
माझा यात अभ्यास नाही.... नेटवर वाचुन माहिती घेत आहे!

इंस्टंट मनी नको आहे.... लाँग टर्म गुंतवणुक म्हणुन विचार करत आहे

साधारणत दरमहा ५००० रुपये गुंतवणुक करायची आहे... सुरुवातीला कुठे गुंतवणुक करावी, कुठले शेअर्स घ्यावेत... कोणी मार्गदर्शन करु शकेल का?

सुरुवातीला कुठे गुंतवणुक करावी, कुठले शेअर्स घ्यावेत... कोणी मार्गदर्शन करु शकेल का? >> हो का नाही? तुम्ही आधी एक ऑनलाईन ट्रेडिंग अकाउंट उघडा. वेळोवेळी इथे मी शेअर्स सांगतो तसेच म्युच्वल फंडही सांगेन.

Pages