मार्केट टॉक - आउटलूक

Submitted by केदार on 27 January, 2010 - 13:28

सेन्सेक्स आज ४९० पाँईटसने घसरला. पुढे काय?

१. २० ऑगस्टला मार्केट पडले पण २१ ला मार्केट गॅपने उघडले (१०४) व सुरु झालेली रॅली ( १४९२१) आक्टो १७ ला १७३२६ ला थांबली. (मध्ये एकदा दोन तीन दिवस पडून १५३९८ लेव्हल ला सपोर्ट घेऊन परत ही रॅली झाली.
२. नंतर तिथून खाली येऊन १५९०४ पर्यंत परत एकदा मार्केट खाली आले. (नोव्हे ३)
३. नोव्हे ३ पासून परत मार्केट वर गेले नोव्हे २५ पर्यंत १७१९८.
४. नोव्ह २७ ला गॅप डाउन ने मार्केट ओपन झाले. ( ओपन १६७१८ , हाय १८७१८, लो १६२१०, क्लोज १६६३२)
५. नंतर साईडवेज कधी वर कधी खाली करत ६ जानेवारीला हायस्ट पाँईट म्हणजे १७२९० ला गेले.

ह्या सर्व डेटाचा टेक्नीकल अ‍ॅनॅलिसिस केला तर बर्‍याच कन्फुझिंग लेवल्स सापडतात. पण नेमका ह्यावेळी मग इतिहास लक्षात घेऊन मागे मार्केट मध्ये काय घडले ह्यावर विचार केला. दर जानेवारीत गेले ५-६ वर्षे मार्केट पडते.

दिड-दोन आठवड्यांपूर्वी मी आणि उपास बोलताना त्याने विचारले की नंतरच्या लेवल्स काय असतील. त्याचाशी बोलताना मार्केट लवकरच खूप पडुन फर्स्ट सपोर्ट लेव्हल १६२०० वर जाईल असे सांगीतले होते. तेंव्हा मार्केट १७,७०० च्या आसपास होते, व १६,२०० कुठेही बोर्डवर येतील असे दिसत नव्हते. पण आज मार्केट १६,२८९ ला आहे.

उद्या एक्सापरीचा गुरुवार असल्यामुळे त्याचाही परिणाम होणार.

पुपुवर गेल्या आठवड्यात लिहीले होते की पैसे गोळा करा. आता ती वेळ येऊ घातली आहे. कालचा फॉल १६,२०० ला टच झाला नाही म्हणजे ह्या सपोर्ट लेव्हल तो थांबेल का? हे पाहायला आणखी दोन तीन दिवसांची गरज आहे पण इथे जर लगेच सपोर्ट मिळाला नाही तर नंतरचा सपोर्ट साधारण १५,३०० ते १५,५०० आहे असे वाटते.

पैसे असतील तर अनेक चांगले सेक्टर्स - मेटल्स, इन्फ्रा आणि फार्मा हे चांगले वाटत आहेत, जर अजून खाली घसरले तर नक्कीच ह्यात नक्कीच गुंतवणूक करायला सुरु करावी.

* हे सर्व माझे अंदाज आहेत, जे चुकीचेही असू शकतात. (असतात) आपले पैसे निट विचार करुन गुंतवा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगं मागे मे मध्ये पण काही सुचवले होते जसे मारुती, टाटा मोटर्स. टाटाने ऑलरेडी १६ % नफा एका महिन्यात दिला आहे, तर मारुतीने ९ नक्के. ( दोन महिन्यात. नॉट बॅड ). तसेच इतर काही पण मे च्या पोस्ट मध्ये आहेत जसे ओरियन्टल, येस बँक इ इ.

हो रिलायन्स सध्या बॅड पॅच मध्ये आहे. बट डोन्ट वरी. स्टे इन्वेस्टेड. सब १००० लेवलवर घेत राहा. दोन वर्षांनी थँकू म्हणशील. Happy

सायली / आडो लार्सन वर अर्धा प्रॉफिट बुक करा. ( आणी हो जरा ते कमिशनच काय ते बघा. जरा चहा बिहा पाजवत जा Lol )

सायली / आडो लार्सन वर अर्धा प्रॉफिट बुक करा. ( आणी हो जरा ते कमिशनच काय ते बघा. जरा चहा बिहा पाजवत जा ) >>>
नक्की केदार Happy

अरे आम्ही जेवायला बोलवायच्या विचारात आहोत आणि तू चहाच पिऊन जायचं म्हणतोयस. Wink

पांशा मोड ऑन : केदार हे प्रॉफिट बुक करा म्हणजे काय ते सांगशील कां? या बाबतीतलं माझं ज्ञान फारच कमी आहे. ही भाषा माझ्या पटकन लक्षातही येत नाही. :पांशा मोड ऑफ

प्रॉफिट बुक करा>> म्हणजे शेअर्स विका.
उदा. रु. १०० ला शेअर घेतला. आत्ता त्याची किंमत रु.१२० दिसतीये तर रु. २० चा प्रॉफिट आहे पण अ‍ॅक्चुअल प्रॉफिट तेव्हाच आहे जेव्हा तुम्ही ते शेअर विकाल तेव्हा.

प्रॉफिट बुक करने म्हणजे नफ्यात असलेले समभाव विकून तो पेपरवरचा फायदा खर्‍या पैश्यात बदलने. पार्शल म्हणजे जर १० असतील तर ५ विकने.

जनरली नफा जेंव्हा होत जातो तेंव्हा माणूस लालची होतो, १७ शे चा १८०० अन नंतर १९००, २००० होईल असे वाटत राहते अन नेमके त्यावेळेस मार्केट पडून भाव परत १५०० वर जातो. म्हणजे नफा तर मिळाला नाहीच उलट तोटा झाला. म्हणून योग्य वेळी पैसे वळते करुन घेतले अकाउंट नफ्यात राहायला लागतं. फार डिसीप्लिन्ड ट्रेडर्स असतात ते ठरलेल्या टारगेट वर पैसे काढून घेतात, मग मार्केट पुढे कितीही वर गेले तरी. ट्रेड काय परत करता येतोच. मार्केट कुठे जात नाही.

ह्म्म.. मी पण लार्सन घेतलेले २० ते काल विकले.
माझा अनुभव असा की मी विकले की लगेच शेअर अजुन वर धावायला लागतो... Happy

फार डिसीप्लिन्ड ट्रेडर्स असतात ते ठरलेल्या टारगेट वर पैसे काढून घेतात, मग मार्केट पुढे कितीही वर गेले तरी. ट्रेड काय परत करता येतोच. मार्केट कुठे जात नाही. >>> Happy

जयप्रकाशने मागच्या एका आठवड्यात ६% दिले...

माझा अनुभव असा की मी विकले की लगेच शेअर अजुन वर धावायला लागतो... >> साधना... एक पण ट्रेडर्/इन्व्हेस्टर असा नसेल की ज्याच्या बाबतीत हे होत/झाले नाही... Happy

निकिता सेम पिंच... Happy

पण आज मार्केट चढतेय, त्यामुळे खरेदी नको असे वाटतेय.. उगाच मी घेतल्यावर धाडकन सगळे पडायचे...

माझा अनुभव असा की मी विकत घेतलेला शेअर धपकन पड्तो >> लोल. तू घ्यायच्या आधी कुठला घेत आहेस ते मला सांग म्हणजे मी तो फ्युचर्स मध्ये शॉर्ट करतो. अर्धा फायदा तुझा. Happy

चला सुगीचे दिवस आले >> Lol

आता आपण ट्रेड सिक्रेटस आणि पॅटर्न पाहू.

मार्केट हे सेंटिमेंटवर चालते, जुन पॅटर्नस परत परत येत राहतात. उदा मी तीन दिवसांमागे लिहले होते की ५३०० टॉप पर्यंत ट्रेड रेंज घ्या. ५३०० च का ह्याचे कारण त्यापाठीमागे लिहले होते. काल मार्केट ५३०१ ला टच करुन मागे आले. ही घटना काय सांगते तर ५३०० आले की प्रो ट्रेडर्स नफा घ्यायला सुरु करतात अन त्यामुळे खूप विक्री होते व मार्केट विक्रीमुळे पडून खाली येते. काल रात्री तुम्हाला पार्शल प्रॉफिट घ्या म्हणताना, मी माझ्या पोझिशन ५२९३ ला विकल्या. ऑफकोर्स मार्केट वर गेले असते तर माझा नफा लिमिटेड राहिला असता, पण जेवढा मिळाला ( ८० पॉईंट्स - ५१०० ला मी सर्व विकले, दुसरे दिवशी नो ट्रेड, त्यापुढचा दिवशी ५२३५ ला मार्केट असताना ५२२०-२२ च्या ऑर्डस टाकल्या होत्या) तेवढा भरपुर होता. म्हणजे ट्रेड रेंज च्या ९०% रेंज मी कव्हर केली.

त्या दिवशीचा मार्केट हाय - मी जेवढ्याला विकत घेतले ती किंमत
५३०१ - ५२२० = ८१
विकला ५३०१ - ५२९३ = ८ पाँईटस ने कमी विकला.
म्हणजे साधारण ८१ पाँईट रेंजपैकी ( ५३०१-५२२०) मी ७३ कव्हर केले. ९०% रेंज. तर इतका रेंज जर ट्रेड मध्ये कव्हर करु शकत असू तर तुम्ही मार्केट पेक्षा पुढे आहात असे गृहित धरले जाते.

तर इथे जे ट्रेड सुरु करु इच्छितात वा जे शेअर्स पण घेतात, त्यांनी तो घेण्याआधी हे सर्व गणित करायला पाहिजे. म्हणजे होमवर्क पक्के असेल तर तो शेअर पडला तरी तेवढा मानसिक त्रास होत नाही. Happy सर्वच गणितं बरोबर येत नसतात.

प्लिज नोट माझ्या सर्वच रेंज ९० टक्के येत नाहीत, उने १५ -२० अश्याही येतात. ह्यावेळेस मी लकी होतो असे म्हणा वाटल्यास.

आता जे लोकं केवळ टिप्स वर विसंबतात किंवा मनिकंट्रोल चे फोरम वाचून सेंटि निर्णय घेऊन गुंतवतात ते हे करतात का? तो शेअर कधी घ्यायचा व कधी विकायचा हे ही त्यांना माहित नसते. आणि ९५ टक्के लोक असे असतात. म्हणून मार्केट मधून ते एक ते दोन वर्षात निघून जातात कारण भांडवल उरत नाही, ते अश्या फसव्या ट्रेडस मध्ये गेलेले असते.

त्यामुळे शेअर्स घेताना ( व ट्रेड करताना) असे होमवर्क करावे, भले मग तो शेअर त्या दिवशी पडो वा ४ टक्क्यांने वर जाओ. आपण केलेली चुक आपल्याला मान्य करायला अवघड जात नाही. Happy

तर इतका रेंज जर ट्रेड मध्ये कव्हर करु शकत असू तर तुम्ही मार्केट पेक्षा पुढे आहात असे गृहित धरले जाते. >>> exactly केदार... Happy

Pages