मार्केट टॉक - आउटलूक

Submitted by केदार on 27 January, 2010 - 13:28

सेन्सेक्स आज ४९० पाँईटसने घसरला. पुढे काय?

१. २० ऑगस्टला मार्केट पडले पण २१ ला मार्केट गॅपने उघडले (१०४) व सुरु झालेली रॅली ( १४९२१) आक्टो १७ ला १७३२६ ला थांबली. (मध्ये एकदा दोन तीन दिवस पडून १५३९८ लेव्हल ला सपोर्ट घेऊन परत ही रॅली झाली.
२. नंतर तिथून खाली येऊन १५९०४ पर्यंत परत एकदा मार्केट खाली आले. (नोव्हे ३)
३. नोव्हे ३ पासून परत मार्केट वर गेले नोव्हे २५ पर्यंत १७१९८.
४. नोव्ह २७ ला गॅप डाउन ने मार्केट ओपन झाले. ( ओपन १६७१८ , हाय १८७१८, लो १६२१०, क्लोज १६६३२)
५. नंतर साईडवेज कधी वर कधी खाली करत ६ जानेवारीला हायस्ट पाँईट म्हणजे १७२९० ला गेले.

ह्या सर्व डेटाचा टेक्नीकल अ‍ॅनॅलिसिस केला तर बर्‍याच कन्फुझिंग लेवल्स सापडतात. पण नेमका ह्यावेळी मग इतिहास लक्षात घेऊन मागे मार्केट मध्ये काय घडले ह्यावर विचार केला. दर जानेवारीत गेले ५-६ वर्षे मार्केट पडते.

दिड-दोन आठवड्यांपूर्वी मी आणि उपास बोलताना त्याने विचारले की नंतरच्या लेवल्स काय असतील. त्याचाशी बोलताना मार्केट लवकरच खूप पडुन फर्स्ट सपोर्ट लेव्हल १६२०० वर जाईल असे सांगीतले होते. तेंव्हा मार्केट १७,७०० च्या आसपास होते, व १६,२०० कुठेही बोर्डवर येतील असे दिसत नव्हते. पण आज मार्केट १६,२८९ ला आहे.

उद्या एक्सापरीचा गुरुवार असल्यामुळे त्याचाही परिणाम होणार.

पुपुवर गेल्या आठवड्यात लिहीले होते की पैसे गोळा करा. आता ती वेळ येऊ घातली आहे. कालचा फॉल १६,२०० ला टच झाला नाही म्हणजे ह्या सपोर्ट लेव्हल तो थांबेल का? हे पाहायला आणखी दोन तीन दिवसांची गरज आहे पण इथे जर लगेच सपोर्ट मिळाला नाही तर नंतरचा सपोर्ट साधारण १५,३०० ते १५,५०० आहे असे वाटते.

पैसे असतील तर अनेक चांगले सेक्टर्स - मेटल्स, इन्फ्रा आणि फार्मा हे चांगले वाटत आहेत, जर अजून खाली घसरले तर नक्कीच ह्यात नक्कीच गुंतवणूक करायला सुरु करावी.

* हे सर्व माझे अंदाज आहेत, जे चुकीचेही असू शकतात. (असतात) आपले पैसे निट विचार करुन गुंतवा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

Next time I will write in Marathi. Not fully used for software yet. My apology.
Saw 3I infotech chart. It is weak long term. It has a major resistance between 73 and 78. If it did not sustain above 60 then next nearset low is 46. That means it can go upto 46. This is as per chart. Think before squaring off. Money might get locked for long period.

on 31st march I worked my Nifty targets for Q2-2010. Low was 4977. Shown by market. High was 5576. Difficult to obtain.

For the month of June Nifty buying is around 5000. Upper target is 5322. (5399 is previous top)
Happy investing.

केदार नमस्कार,

इंडियाइन्फोलाइन मधून काल माणूस आला होता. त्यांचे एक फास्ट ट्रेडींग साठी अकाउंट आहे त्याची मेंबरशीप देत होते. मिनिमम इन्वेस्ट्मेन्ट ५ लाख आहे. हे उघड्णे वर्थ आहे काय? कारण सध्या मार्केट अगदी दोलायमान अवस्थेत आहे. IIFL PREMIA from indiainfoline.com They are charging 0.5% brokerage. I wanted to open a corporate account to park funds.

केदार,

८-१० दिवसांपूर्वी ११८० ला असलेला मारूती-सुझुकी चा शेअर आज १३३५ झाला. काय कारण असावे?

Lanco Infratech चा शेअर कसा आहे. तो अजून कितीपर्यंत वाढू शकेल?

केदार,
मी Tech Mahindra घेतलाय, Long term साठी ठेवावा का?
धन्यवाद
सई

टेक महिन्द्रा - शॉर्ट टर्म सांठी चांगला दिसत आहे. ३०-४० ने वर गेला तर लगेच काढा. गेले दोन दिवस न्यु हाय मध्ये (म्हणजे पॅटर्नच्या) त्यामुळे ABC पॅटर्न मध्ये येईल का नाही ते सांगता येत नाही, पण शॉर्ट टर्म साठी उपयुक्त. फार लॉन्ग राहू नका. जर सलग दोन दिवस थोडा पडला तर ट्रेन्ड रिव्हर्सल आहे असे समजुन काढा. गेले तीन महिने तरी तो नोझ डाईव्हच घेत आहे.

मारुती -
सर्वच अ‍ॅटो सेक्टर मार्केट परफॉर्मर असेल असे मी मागे लिहीले होते. एप्रिल २०१० पेक्षा १० टक्यांनी जास्त गाड्या मारुतीने विकल्या आहेत. (टॉप टेन सिटीज मध्ये) एकुनच मारुती, टाटा, बजाजला चांगले दिवस आले आहेत. ( अ‍ॅटो हे सेक्टर जॉब रिलेटेड आहे. जॉब मार्केट मध्ये सध्या तेजी आहे, त्याचा चांगला फायदा ह्या सेक्टरला होत राहील.)
मारुती फेबच्या १३३७ च्या सपोर्ट लाईनच्या आजूबाजूला जाउन आला. कन्व्हेश्नल विज्डम प्रमाणे आता ह्याचा रेसिस्टन्स १३४० च्या आजुबाजूस आहे. जर एक दोन दिवस मार्केट तेजीत राहिले तर मारुती हा रेसिस्टन्स ब्रेक करु शकतो. मग १४०० पर्यंत सहज जाउन येईल.

लान्को ने परवा एप्रिल हाय टच केला आहे. काल लोअर लोज रजिष्टर केला आहे. तो रिव्हर्सल मध्ये येउ शकतो. पोझीशन असेल तर कव्हर करा. शेअर्स असतील तर निदान अर्ध्यांवर प्रॉफिट बुक करा. सध्या गेल्या आठवड्यात बर्‍याच ऑर्डर्स मिळाल्या आहेत त्यामुळेही तो वर जात आहे.

मामी
फास्ट ट्रेडिंग जर तुम्ही डे ट्रेड करणार नसाल तर काही उपयोगाचे नाही. सिझन्ड ट्रेडर्सला हे उपयोगाचे आहे. पण तेवढे पैसे गुंतवायचे असतील तर आणखी एक दोन पर्याय आहेत.
PMS (पोर्टफोलीलो सर्व्हिस ज्या मिनीमम भांडवल ५ लाख लागते) हा पैसे असणार्‍यांसाठी खरेतर चांगला पर्याय आहे. रोज अकाउंट बघत बसायला वेळ नसतो व मार्केटची तेवढी माहिती तर नसेतच अश्या सर्वांना PMS हे वरदानच ठरावे. पण PMS मध्ये २००७-२००८ च्या आसपास भरपुर घोटाळे झाले त्यामुळे बर्‍याच लोकांना फटका बसला. पण हा फटका मार्केट मुळे बसायच्या ऐवजी मॅनेजर्स मुळे जास्त बसला आहे. तेजी दिसली की लोकांना वाटते वि आर किंग्स, मग एक पोझिशन घ्यायच्या ऐवजी ४-४ घेतात. आणि ट्रेंड बदलला की सगळंच ओमफस.
मॅनेजर / ब्रोकर चांगला असेल तर जरुर गुंतवा, त्यात लॉक इन पिरेड किती आहे ते बघा. काही काही ६ महिन्यांसाठी आहेत, ते बर्‍यापैकी चांगले आहेत. काहींमध्ये ५ लाखाच्या वरचा फायदा लगेच उचलता येतो, तो पर्याय आहे का ते बघा, व बर्‍याच PMS मध्ये गुंतवायच्या आधी तुम्हाला ते फोन करुन विचारतात की टाकू का नको, हा ऑप्शन असेल तर (खरे तर वरचे तिन्ही) तर PMS मध्ये गुंतवणूक करा.
गुंतवणूक करताना अश्विनी गुजराल टाईप (म्हणजे जे CNBC वर) बकबक करत राहतात त्यांचा कडे करु नका तर एका मोठ्या फायनान्शिअल इन्स्टीट्युट मध्ये करा. ICICI, शेअरखान, कोटक रॅलिगेअर हे सर्व PMS चालवतात. पैसे देण्याआधी त्या PMS ने किती परतावा दिला आहे ते मात्र नक्की बघा. तो परतावा डिसे २००७ पर्यंत दाखवत असतील तर रिजेक्ट करा, पण अगदीच २००९ डिसे पर्यंत डेटा मिळत असेल (रिटर्न %) तर नक्कीच विचार करा.

असाच दुसरा एक फंड म्हणजे PE प्रायव्हेट इक्विटी. इथे पण किमान ५ लाख रु लागतात. काही मोठ्या कंपन्या असे फंड चालवतात. ह्यात ज्या कंपनीत डायरेक्ट गुंतवणूक केली जाते, त्या लिस्टेड नसतात, तर पुढे मागे लिस्टेड होतील अश्या असतात, ज्यांना नफा मिळण्याची व त्या कंपनीचा बिझनेस वाढण्याची शक्यता आहे अश्याच कंपन्यात हे पैसे जातात. पण ह्यावर PMS सारखा आपला कंट्रोल नसतो. एकदा पैसे दिले की फक्त दर तिमाहीला नफा नुकसान कळणार. रॅलिगेअरच्या PE मध्ये मी ऑलमोस्ट गुंतवले होते, पण काही कारणाने ( फ्युचर्स मध्ये टाकायला Happy ) परत वापस घेतले शिवाय ते कागदपत्र सही करायला लागणारा वेळ ह्यावेळी माझ्याकडे नव्हता.

केदार,

Lanco आणि Maruti च्या विश्लेषणाबद्दल धन्यवाद! Lanco मी ३-४ महिन्यांपूर्वी रू. ४९ ला घेतले होते. आता तो ६४-६५ च्या आसपास आहे. Partial Profit Booking मी आधीच केलेले आहे. आता उरलेलेही ६५ च्या आसपास काढून टाकतो.

फारश्या चर्चेत नसलेल्या Timken India Ltd. (Tata Timken) बद्दल आपला काय अंदाज आहे. त्याचा कालचा क्लोजिंग भाव १२३ होता. तो यापुढे वाढण्याची शक्यता वाटते का?

केदार धन्यवाद.

अरे मला पण शंका होती म्हणून तुझे मत घेतले. फारच हार्डसेल करत आहेत. काल त्यांचा एक व्हीपी पण आला व पिडू लागला. बोलता बोलता तो म्हणे कंपनी काय हॉबी म्हणून सुरू केलेली आहे काय? मला एवढा राग आला सांगू. उगीच उचलली जीभ...... मला इंडिविज्युअल व कॉर्पोरेट फायनान्स स्ट्रीम मध्ये क्लीअर ब्रेकप हवा आहे ( टॅक्स च्या द्रुष्टिकोनातून ) असे मी म्हण्ले तर म्हणे तुम्ही बिलिअनेअर थोड्याच आहात? मला ह्या दोन गोष्टी आवड्ल्या नाहीत. परत माझे आयसी आयसी आय मध्ये नीट चालले आहे. ते का उगीच बदलू ह्यांच्यासाठी. जरा संशयास्पद वाट्ले.

केदार,
धन्यवाद , सध्या अमेरीकन market मध्ये आणि युरोप मध्ये जे चालले आहे त्याचा परिणाम आपल्या Indian market वर पण होईल पुढच्या आठवड्या मध्ये. Indian market किति खालि जाउ शकते? आणि कुठे सपोर्ट आहे आपल्या मार्केट ला? अजुन किति दिवस असे चालणार, २००८ सारखे तर होणार नाही ना?

सई

भारतासाठी फंडामेंटल्स बदलले नाहीत. सध्या जागतीक मार्केटमध्ये चाललेल्या पडझडीमुळे VIX खूप जास्त झाला आहे. मागच्या वेळी पडून निफ्टीने ४८०० च्या आसपास सपोर्ट घेतला होता. (वरही मी ४८०० लेवल येईल असे लिहीले होते. ) सेन्सेक्स साठी १५८०० क्रुशल आहे. तिथे सपोर्ट मिळाला आहे त्यामुळे सध्या तरी तिच लेवल मला योग्य वाटते. २००८ सारखे होणार नाही. युरोला प्रॉब्लेम आहे, तो सोडविला जाईल असे वाटते तेंव्हा फारतर येते दोन महिने विक्स मुळे सट्टेबाजांचे फावणार आहे. वेळोवेळी प्रॉफिट बुक करत गेलो व ट्रेन्ड प्रमाणे पोझिशन्स घेतल्या तर खूप नुकसान होणार नाही असे वाटते.

उद्या निफ्टी येत्या ३ दिवसांसाठी १०० पॉइंटसाठी शॉर्ट करणार आहे. लार्सन / मारुती / एसबिआय पण शॉर्ट साठी योग्य कॅन्डीडेट आहेत.*

* फ्युचर्स माहित नसतील तर कृपया हे करु नका. मी इथे बोलतो ते करतो. तुम्ही केलेच पाहिजे असे नाही. नुकसान होऊ शकते.

माझ्या ज्ञाना प्रमाणे, आता जर युरोपात मार्केट पड्ले कि लोकांना पैशाची गरज भासते मग ते जिथे फडताळात पैसे जपून ठेवलेले असतात ( भारतीय मार्केट मध्ये) ते लगेच काढून त्यांच्या कमिट्मेन्ट्स पूर्ण करतात. जे वर खाली होते इथे ते एफाय आय च्या आर्थिक उलाढाली मुळे होते. आपल्या सारख्या रिटेल वाल्यांना धक्का बसतो फक्त. आपल्या पैशांनी इथे ढिम्म हलत नाही सेन्सेक्स. बायकी लॉझिक Happy

एक इझी लाइफ नावाचे सॉफ्ट्वेअर आहे ते फायनान्स मॅनेज्मेन्ट इंडिविज्युअल साठी अतिशय चांगले आहे.
गूगल सर्च केल्यास माहिती नक्की मिळेल.

मग कोणी कोणी घेतले वरचे शेअर्स ट्रेड केले. Happy २ १/२ टक्यांनी मार्केट खाली. आणि मी रिव्हर्स येउन आता लाँग मध्ये, शिवाय थोडा प्रॉफिटही Happy खालच्या स्क्रिन शॉट मध्ये माझ्या तीन पोझीशन दिसतील. त्या आत्ता अत्यंत अल्प नफ्यात आहेत, पण दोन तीन दिवसात भरपुर नफ्यात येतील.

वर काल लिहील्याप्रमाणे हा ट्रेड.

nifty_today_1.png

निफ्टी, मारुती, लार्सन, भेल, स्टेट बॅन्क, अ‍ॅक्सीस बँक, रिलायन्स ह्या सर्वांमध्ये हवी असेल तर लाँग पोझिशन घ्या. ह्याच आठवड्यात विकुन फायदा होईल.

केदार

उद्या निफ्टी येत्या ३ दिवसांसाठी १०० पॉइंटसाठी शॉर्ट करणार आहे.>>>>>>>

आज बाय का केलेस? का तुज्या वाक्याचा अर्थ निफ्टि १०० पॉइंट ने खाली येईल असा होता.

केदार,

फारश्या चर्चेत नसलेल्या Timken India Ltd. (Tata Timken) बद्दल आपला काय अंदाज आहे. त्याचा कालचा क्लोजिंग भाव १२३ होता. तो यापुढे वाढण्याची शक्यता वाटते का?

निफ्टी, मारुती, लार्सन, भेल, स्टेट बॅन्क, अ‍ॅक्सीस बँक, रिलायन्स ह्या सर्वांमध्ये हवी असेल तर लाँग पोझिशन घ्या. ह्याच आठवड्यात विकुन फायदा होईल.>>>>>>

केदार

तुझ्या टर्मिनॅलॉजीला मी अजून फॅमिलीयर झालो नाही. लाँग पोझिशन असेल तर आठवड्यात फायदा कसा?

लाँग पोझिशन असेल तर आठवड्यात फायदा कसा >>> लाँग म्हणजे लाँग कालावधी नाही.

लाँग म्हणजे फ्युचर्स विकत घेणे. शॉर्ट म्हणजे विकने. इंडेक्स सध्या दोलायमान अवस्थेत आहे. जर काल ह्यापैकी काही विकत घेतले असते तर आज त्या सर्व पोझिशन्स मध्ये फायदा दिसला असत्या कारण कालच इंडेक्स नंतर वर गेला. एका आठवड्यासाठी असे लिहीले की इच्छित फायदा येत्या दोन तीन दिवसात होईल असे दिसत आहे, मग विकत घेतलेली पोझिशन विकून तो फायदा बुक करायचा.

निफ्टी पडेल ह्याची खात्री होती म्हणून शॉर्ट (विकने) एकदा पडला की परत तो रेंजबाउन्ड असल्यामुळे वर येईल. म्हणजे साधारण तो ४९५० ते ५१२५ अशी माझी ट्रेड रेंज आहे, रेंजच्या जवळपास गेले की मी पोझिशन बदलतो. ह्याला ट्रेन्ड ट्रेडिंग वा स्विंग ट्रेडिंग म्हणतात. ह्यात पोझिशन्स लगेच विकल्या व विकत घेतल्या जातात.

in the weeks ahead, if nifty future sustains and crosses 5160 then it can go upto 5275 n 5400.if it nt sustain 5160, then it will come down to the level of 4900 n 4750.
if any one is interested can buy SAIL at current market price for target 235 in delivery for medium term.

***these are only prediction not recomandation***

केदार

मार्केट ने दिशा बदलली आहे का? ४९५० ते ५१२५ च्या रेंज बाहेर जाउन ५११० ते ५३००+ मध्ये गेले आहे का? दिवसाचा MACD +ve आहे. आठवड्याचा अजून नाही.

सुरेश / सई
आत्ताच अगदी फर्म काही सांगता येत नाही कारण दोन दिवस सलग मार्केट वर गेले, पण हे वर जाणे म्हणजे बुल मार्केट परत सुरु झाले हे मला वाटत नाही, अजूनही एखादा माइल्ड सेल ऑफ होऊ शकतो, अन मग वर जायला रस्ता मिळेल असे वाटते. आकडेवारी नुसार तरी फर्स्ट रेसिस्टन्स पार झाला आहे, ५१९०+ रेंज मध्ये हा रेसिस्टन्स होता. त्यामुळे मार्केट ५२००+ राहू शकते.
सध्या असणरी रॅली जिथून सुरु झाली ती ५०९३ + लेवल म्हणजे ५१०० ते एप्रिल शेवटाला असणारा हाय म्हणजे ५३०० अशी रेंज घेऊ शकतो. माइल्ड सेल ऑफ झाला तरी ५१०० ब्रेक झाल्यावर लॉस बुक करता येईल.

केदार, माझ्याकडे Rnrl चे बरेच shares आहेत. avg cost price 100.24 Sad .
long term साठी ठेऊ शकते . पण एकुण परिस्थिती पहाता त्याचं काही बरं होऊ शकेल असं वाट्तय का? काय करु?

२८ जानेला मी लार्सनचे टारगेट १७०० दिले होते व तो १९०० पर्यंत सहज जाईल हे ही लिहले होते. आज १८०० आहे. Happy

वर गेस केल्याप्रमाणे निफ्टी ५३०० ला आत्ता आहे, पण इथे मला मार्केट ओव्हरव्हॅल्यूड वाटत आहे. ५३०० /५३५० गेले तरी वर जायला आणखी रस्ता नाही असे आतापर्यंतचा अनुभव सांगतोय. निदान पार्शल प्रॉफिट तरी बुक करा!

केदार, आत्ता हेच लिहीणार होते मी तुला की तू सांगितल्याप्रमाणे लार्सन वर वर चढतोय. काल नवर्‍याने त्याच्याकडचे १० शेअर्स १७८० ला काढले.

घेतला होतास की नाही?

मिडकॅप मध्ये ओरियन्टल बँक असाच शेअर आहे जो मस्त परतावा देईल. तो ३३५ लेवलला कन्सॉलिडेट झाला आहे. इतक्या पडझडीतही तो पडला नाही.

सध्या आयसीआयसीआय.Glenmark Pharmaceuticals , हे पण दिर्घ कालावधी साठी चांगले वाटत आहेत.

Pages