आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"
अमानवीय...?
Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आज सकाळी ऑफिसला येताना असाच
आज सकाळी ऑफिसला येताना असाच एक भुताचा किस्सा ऐकला आणि माबो उघडल्यावर हा धागा समोर..
दुपारपासुन २२ पाने वाचलीत आता जाम टरकलीय, रात होने को है.... काय करु देवा
सकाळचा किस्सा उद्या सांगेन
नाही! आत्ताच सा.न्गा.
नाही! आत्ताच सा.न्गा.:फिदी:
माझ्या बाबांनी सांगितलेला
माझ्या बाबांनी सांगितलेला त्यांच्या तरूणपणीचा किस्सा -
हि १९६५-६६ सालाची गोष्ट आहे. बाबा कॉलेजच्या सुट्टीत घरी आलेले होते. एक दिवस मित्राबरोबर पिक्चरला जायचा बेत ठरला. रात्रीचा शो पाहून निघेपर्यंत बारा वाजून गेलेले होते. अलिबाग-नागाव ही पाच मैलांची वाट. दोघं गप्पा मारत चालत असताना रस्त्याच्या कडेला एक म्हातारा माणूस अचानक उगवल्यासारखा दोघांना दिसला. निर्मनुष्य रस्त्यावर आणि दोन्ही बाजूला कुठेही घरं नसताना अचानक प्रगटलेला माणूस पाहून काय प्रकार असावा याचा अंदाज बाबांना आला होता.
" ए बाबा, मला काड्याची पेटी दे रे "
दोघं जवळ पोचताच बाबांकडे म्हात-याने मागणी केली. बाबांच्या तोंडात सिगारेट होती.
" नाही देत जा "
इतंकच बोलून बाबांनी मित्राचा हात धरला आणि ते पुढे निघाले.. दोन पावलं जातात तोच मागून आवाज आला
" यावेळी सोडतोय, पुन्हा लक्षात ठेव "
दोघांनी मागे वळून पाहिलं तो म्हातारा गायब ! दोघे घरी नागावला पोहोचले. बाबांच्या मित्राला काहीच कळलं नव्हतं. त्याने बाबांना म्हाता-याला काडी न देण्याचं कारण विचारलं तेव्हा बाबांनी तो म्हातारा नसून भूत असल्याचं त्याला सांगीतलं. जर त्याला काड्यापेटी दिली असती तर त्याने नक्कीच बाबांना 'धरलं' असतं असं त्यांचं मत होतं
(१९४७ साली गटारी अमावस्येला मुंबई हून रेवसला जाणारी रामदास बोट काशाच्या खडकावर आपटून फुटली. बोटीवरच्या सहाशेच्यावर प्रवाशांना जलसमाधी मिळाली. बाबांच्या मते तो म्हाताराही त्या प्रवाशांपैकीच असावा!)
कालची रात्र घाबरत घाबरत गेली
कालची रात्र घाबरत घाबरत गेली तरी आज ऑफिसल्या आल्या आल्या हा धागा घेतला वाचला. काय ती हौस मेली. ओके तर मी काल ऐकलेला किस्सा हा असा...
गावावरुन माझी वहिनी काही दिवस आईकडे राहण्यासाठी आली आहे.तिचा भाऊ (आकाश) २३-२४ वर्षाचा ४-५ महिन्यांपुर्वी एका जबरदस्त अपघातात वारला. तर वहिनी सांगत होती.. तिचा भाऊ राहायला, जेवायला, झोपायला त्यांच्या एका नातेवाईकांकडेच असायचा, तेही गावातच राहतात. तो मेल्यावर काही दिवसांनंतर एका रात्री तो त्या घरातील बाईला दिसला. तिने पाहिले तो आला आणि त्याच्या नेहमी झोपण्याच्या जागेवर म्हणजे माळ्यावर गेला. माळ्यावर आणखी दोघेजण झोपले होते. तिने लगेच नवर्याला उठवले तोपर्यंत माळ्यावरुन झोपलेल्यांपैकी एक (उमेश) धावत खाली आला आणि सांगु लागला की आकाश माझ्या शेजारी येऊन झोपला होता. ते बोलत असतानाच आकाश खाली आला आणि एका कोपर्यात जाऊन गुडघ्यात मान घालुन बसला आणि लगेच गायब झाला.
काही दिवसांनी पुन्हा एका रात्री त्या बाईला दरवाजा ठोकण्याचा आवाज आला तेव्हा तिच्या नवर्याने तिला दरवाजा उघडण्यास मनाई केली तर तो (आकाश) खिडकीच्या गजावर चढुन माळ्यावर गेला.
बाप रे!
बाप रे!
मग काय झालं?
मग काय झालं?
त्यानंतर अजुन तरी तो त्यांना
त्यानंतर अजुन तरी तो त्यांना दिसला नाहीये कदाचित त्यांनी काहितरी "बंदोबस्त" केला असेल.
२००७ मध्ये हरिश्चंद्र
२००७ मध्ये हरिश्चंद्र गडाच्याच पायथ्याशी पहाटे ३:१५ ला घेतलेला फोटो. भूत आहे का फोटो चुकला असावा?
हाच फोटो दाखवून दुसर्यांदा हरिश्चंद्र किल्ल्यावर जाताना मी लोकांना घाबरवले. तेव्हा त्यांनीही टिंगल केली आणि पहाटे ४ ला सुरु केलेला ट्रेक चकवा लागून ९ वाजले तरी टोलार खिंड पण आली नव्हती.
( फोटो का दिसत नाहीये काय माहित? भुताचा असल्याने Invisible असावा. जाऊदे.
https://plus.google.com/u/0/photos/104678855081644041237/albums/58124493... )
आता दिसला फोटो. मला वाटतं एका
आता दिसला फोटो. मला वाटतं एका विशिष्ठ रंगाचा अतिरेक झाल्याने असा आला असावा फोटो. काढताना तिथे टेबलापाशी कुणीही नव्हतं का?
बापरे! आकाश आणि सुज्ञ माणुसचा
बापरे! आकाश आणि सुज्ञ माणुसचा फोटो ड्यांजर
कुठला फोटो?
कुठला फोटो?
सुज्ञ माणूस चा फोटो एकदम
सुज्ञ माणूस चा फोटो एकदम भारी! पण त्या फोटोतल्या भुताची सावली सुद्धा दिसतेय.... भुतांची सावली पडत नाही म्हणे....????
कुठाय फोटो???????????? कोणी
कुठाय फोटो????????????
कोणी स्क्रिन शॉट पेस्ट करा ना..
भुताची सावली दिसत आहे, पण
भुताची सावली दिसत आहे, पण टेबलाची सावली मात्र दिसत नाहीये. आणि सावली पडली म्हणजे प्रकाशाच्या मध्ये काहीतरी solid पाहिजे पण ती आकृती तर transparant आहे. मागची भिंत आणि टेबलावरची बाटली पण दिसते आहे त्याच्या मागची.
पण,फोटोच चुकला असावा असा वाटतोय. हा मित्राने काढला होता. मी खाली बघा, डोक्यावरून पांघरूण घेऊन झोपलो आहे. 'देव' गण असल्याने भुताने मला 'दर्शन' दिले नसावे.
https://lh3.googleusercontent.com/-IAzs6KBf3d4/UpRin4qIKJI/AAAAAAAAEJs/I...
फोटोतल्या भुताच्या छाती आणि
फोटोतल्या भुताच्या छाती आणि पोटात एका भुताच मुन्डकं दिसतय.
बहुतेक भुतभक्षक (नरभक्षकच्या चालीवर) भुत दिसतय.
सुज्ञ माणसाने काढलेले इतर फोटोही मस्त वाटत आहेत.
ते बघेन निवांतपणे
त्या फोटोत मधली एक जागा
त्या फोटोत मधली एक जागा आत्ताच खाली झाल्याचे दिसत आहे … तसेच झोपला आहे त्या माणसाच्या चेहेर्यावर पण बांधलेले दिसत आहे…. नेमका भूत कुठला कळत नाहीये…
मी भूत आहे का? कोणाला माझे
मी भूत आहे का?
कोणाला माझे पोस्ट्स का नाही दिसत ..
मला फोटो दिसत नाहिये...
वरची लिंक ओपन केली की एक अल्बम ओपन होतोय
एक्झॅक्ट फोटो ची लिंक द्या ना..
मी खाली बघा, डोक्यावरून
मी खाली बघा, डोक्यावरून पांघरूण घेऊन झोपलो आहे>> पहिल्यान्दाच फोटु पाहिला की ते सुज्ञ भुत असावं अस वाटतय, तोंडाला बांधल्यामुळे.
फोटो उचलायला ( व पचायला) जड
फोटो उचलायला ( व पचायला) जड असल्याने वा भुताचे वजन वाढले असल्याने इथे उमटत नाहीये. लिंक घ्या.
https://plus.google.com/u/0/photos/104678855081644041237/albums/58124493...
https://lh3.googleusercontent.com/-IAzs6KBf3d4/UpRin4qIKJI/AAAAAAAAEJs/I...
ह्म्म धन्यवाद .. बघितला
ह्म्म धन्यवाद .. बघितला फोटो..
सुज्ञ माणूस, >> भुताची सावली
सुज्ञ माणूस,
>> भुताची सावली दिसत आहे, पण टेबलाची सावली मात्र दिसत नाहीये.
टेबलाची सावली दिसत्येय. सर्वात डावीकडील पायाखाली आहे. दिवा थेट टेबलावर आल्याने सावली अगदी टेबलाच्या पायाशी पडलीये.
आ.न.,
-गा.पै.
मेल्यांनो, माझ्या जीवावर बरीच
मेल्यांनो, माझ्या जीवावर बरीच मजा केलीत की... आता बघतेच एकेकाला... सगळ्यांना अंगाई नाही ऐकवली तर नावाची गानू आजी नाही !
गानु आजी....आम्हा गरिबांवर
गानु आजी....आम्हा गरिबांवर असा अन्याय नका हो करु....तुम्हाला चिखल भात देउ.......
अनिश्का... चिखलभाताचे दिवस
अनिश्का... चिखलभाताचे दिवस गेले गो आता... आता आजीला रक्तं पाहिजे... ते पण ताजं ताजं.. चला व्हा तयार
अरे वा, समर्थाघरचे आयडी सहज
अरे वा, समर्थाघरचे आयडी सहज तयार होतात की

ईईईईईईईई
ईईईईईईईई रक्त................... पळा.........
गानू आज्जी चिखल भाताऐवजी
गानू आज्जी चिखल भाताऐवजी काँक्रीट खा ...परत भूकच लागायची नाय
गानू आज्जी चिखल भाताऐवजी
गानू आज्जी चिखल भाताऐवजी काँक्रीट खा ...परत भूकच लागायची नाय>>
गानु आजी भ्य्याआआआ
गानु आजी भ्य्याआआआ
अगं ऐकतेस का...इथे माबोवर
अगं ऐकतेस का...इथे माबोवर टीपी करण्यापेक्षा माझा चष्मा आणि काठी शोधुन दे तेवढी...आपल्याला तिकडे रेडीमिक्स काँक्रीट भात खायला जायचे आहे तिथे तुझ्या जिभेचे पण ट्रीमिंग करु ,मग दोघे सरपर्णीत मातीचे घर बांधू व त्यात काँक्रीट भात खाऊ कसे...
चेटकोबा आज्जो गानू कुलोत्पन्न
Pages