अमानवीय...?

Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06

आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्‍या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्‍यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्‍यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वास्तुपुरुष जागृत आहे.. तेच घर विकत घेतलं तर वास्तुशांती करुन घ्या...>> आई अगदी हेच म्हणाली! ती म्हणाली जे कोणी आहे त्याची कृपादृष्टी आहे तुमच्यावर अगदी Happy घर रोज धूप अगरबत्ती लावून पवित्र ठेवत जा... भांडणं, कटकटी, मोठे आवाज यांनी "ते" विचलीत होतात.

बाकी मी राहतेय कारण माझा मुळात विश्वासच नाहीये... आता प्रत्यक्ष अनुभव घेतलाय तरी ते भासच असावेत असं कुठेतरी वाटतंय. (नवर्‍याला आणि बाळाला आलेत अनुभव तरी) म्हणून भीती नाही वाटत. तसंही भीतीदायक नाही काही घडलंय अजून... पण रात्रीची टिव्ही लावून जागरणं कमी झालेत नाही म्हणायला... पुन्हा १टीने गप्पा मारल्या तर नवर्‍याची झोप उडते Happy

dreamgirl, महान आहेस बाई तू !!!!!!!!!!!!
यातला एक जरी भास मला वाट्ला असता तरी मी त्या सेकन्दाला बाहेर पड्ले असते...

निल्सन,

>> 'ते' बापडे तुमचा संडास/बाथरूम वापरत असतील. वापरु देत फक्त त्यांना सांगा पाणी जरा नीट घाला राव

धन्यवाद! Happy खरं तर ते फक्त संडास/मोरीकडे जातं. पुढे काय करतं ते माहीत नाही. आपण माणसे वापरतो तशा अर्थी ते वापरत नसावं! ख.खो. तेच जा.

शिवाय घरी नवनाथ भक्तिसार ग्रंथ आहे. हा ग्रंथ घरी असला की भुतेखेते त्रास देत नाहीत. तसेच घराजवळच्या मोकळ्या मैदानात हा अनुभव आला होता. मग चिंता कसली! Happy

आ.न.,
-गा.पै.

छान अनुभव आहेत प्रत्येकांचे. माझ्या साठ वर्षांच्या आयुष्यात असे अनेक अनुभव मला आले. काही खरे, काही फक्त भास.
आजोबांच्या बाबतीत ते लांज्याला असताना घडलेले प्रसंग ,वडीलांना आलेले प्रत्यय, एक ना एक अनेक अनुभव. नंतर इथेच लिहीन सविस्तर ,मराठी टाईप करायचा फार कंटाळा येतो.

स्वप्ना_राज,

>> ते भूत ख्रिश्चन माणसाचं असेल तर त्याला रामरक्षा, हनुमान चलिसा वगैरे ऐकून आपण घाबरायला पाहिजे
>> असं कसं कळणार?

कोण भूत पोपला विचारतो! ख्रिश्चन वगैरे भेद माणसांत आहेत. बहुतांश भुतांना फक्त गती हवी असते.

आ.न.,
-गा.पै.

dreamgirl, तुम्ही बर्याच धाड्सी अहात पण अस घरातल न दिसणार कुणी सतत अस्तित्व दाखवत असेल तर बर नाही....

मी कोकणातल्या भुताचे किस्से बरेच एकले आहेत. कोकण बहुदा त्याचे माहेर असावे.......कोकणातल्या माझ्या आजीच्या वावरात म्ह्णे अमावस्येच्या रात्री कन्दिल घेतलेला माणूस दिसायचा ... खर खोटे देवजाणे... अजुनही काही अशाच गोष्टी ऐकल्यात....

ड्रीमगर्ल बर्‍याच धाडसी आहेत Happy

मित्राने सांगितलेला अनुभव.
त्यांनी नवीन घर बांधल होतं.
आणि वास्तुशांत व्हायला अवकाश होता.
तो त्या घरी वास्तुशांत व्हायच्या आधीच झोपायला गेला असता त्याला त्याच्या छातीवर कोणीतरी बसुन गळा दाबतोय असा अनुभव आलेला.
टरकुन त्याच रात्री तो परत गावातल्या घरी जिथे सर्वजण रहात होते तिथे गेला परत.

वास्तुशांत होउन गेल्यावर मात्र कसलाही त्रास नाही झालेला त्याला.

>>खरं तर ते फक्त संडास/मोरीकडे जातं

हा खरा अनुभव आहे? मला तर वाटलं होतं की तुम्ही जोक करताय....:-( टीव्हीवर पाहिलेल्या कार्यक्रमानुसार हे आत्मे मरायच्या आधी जी गोष्ट करत असतात तीच भूत झाल्यावर पुन्हा पुन्हा करत राहतात म्हणे. बहुतेक ह्या माणसाचा मृत्यू अतिसाराने झाला असावा Wink ऑन अ सिरियस नोट, कदाचित त्या खोलीत त्याचा/तिचा खून झाला असावा. शहरातल्या लायब्ररीत कदाचित काही माहिती मिळू शकेल....निदान टीव्हीवर पाहिलेल्या कार्यक्रमात तरी लोक तशीच माहिती काढताना दाखवलेत.

>>तो त्या घरी वास्तुशांत व्हायच्या आधीच झोपायला गेला असता त्याला त्याच्या छातीवर कोणीतरी बसुन गळा दाबतोय असा अनुभव आलेला.

हा स्लिप पॅरेलेसिस चा प्रकार असू शकतो.

अहो दिड हजार पोस्टी झाल्या. नया है वह.......... >>>> Biggrin

ड्रीमगर्ल, मी तर म्हणेन की तू लकी आहेस.. म्हणजे दुरून असे म्हणणे जरा अतीच खरे, तरीपण..

मी आमच्या घरात देव्हा-यासमोर श्रीसूक्त पाठ (२१ वेळा करते) (बाकी कुठल्याच धार्मिक कामात नव्हे) म्हणायला बसले की हमखास डाव्या खांद्यावर टॅप केल्याचा भास होतो मला. हेच बाहेर कुठे म्हणाले अगदी गच्चीत पण तरी देखील काहीच असा भास होत नाही.

विनिता, तुझी पोस्ट वाचुन आठवलं , आमच्या जुन्या घरात अनेकवेळा आम्हाला बांगड्यांचे आवाज ऐकु यायचे. आणि स्पष्टपणे ऐकु यायचे.
आम्हालाच नाहीतर दुसरं कोणीही नवं घरात आलं तर त्यालाही ऐकु यायचे.
बर वरच्या घरातुन आवाज येत असेल म्हणावं तर आमचं घर सगळ्यात वरच्या मजल्यावर होतं आणि त्यावर फक्त टेरेस होतं. बांगड्यांचे आवाज आले की आम्ही वर जाऊनही बघायचो की कोणी आहे का तर कोणी नसायचं!
खालच्या घरातून आवाज आले म्हणावं तर खाली बॅचलर मुलं रहायचे आणि बर्‍याचदा घराला कुलुप असायचे.
शेजारी कोणीही रहात नव्हतं!

काय होतं देवजाणे पण त्या घरात अनेक संकटं आली आमच्यावर हेही तितकंच खरं!

dreamgirl __/\__ मी काही अश्या घरात टिकले नसते. सारखं कोणीतरी आपल्याला बघतंय म्हणजे काय.....साला प्रायव्हसी म्हणून नाही की>>> +११

ड्रीग , अगदी प्रामाणिक पणे विचारतेय , तुम्हाला नाही अस कधि नाही वाटल .

सारख कोणीतरी पाळत ठेवून आहे .. मी तर पहिल्या.न्दा घाबरले असते आणि मग जगले वाचले असते तर वैतागले असते Happy

नेहमी आपल " बिग बॉस आपपे नजर रखे है "म्हन्णजे काय ? Sad

>>आई अगदी हेच म्हणाली! ती म्हणाली जे कोणी आहे त्याची कृपादृष्टी आहे तुमच्यावर अगदी

कदाचित त्यांचं म्हणणं बरोबरही असेल. न विचारता सल्ला देऊ नये म्हणतात. पण रहावत नाही म्हणून सांगते की तुम्हाला जी काही शक्ती दिसतेय ती वास्तुपुरुषच आहे असं मानण्याआधी त्या घरात काही दुर्घटना झालेली नाही ना ह्याची एकदा खात्री करून घे प्लीज.

Yo.Rocks Happy रिया बाप रे!

२-३ वर्षांपूर्वी मला आणि आईला एका संध्याकाळी आमच्या घरात एक विचित्र अनुभव आला होता. तो अमानवीय नाही असंच आमचं दोघींचं मत आहे. पण तरी इथे शेअर करते.

आमच्या घराचा दिवाणखाना आणि बाल्कनी ह्यांना जोडणारे लाकडी चौकटीतले काचेचे ४ दरवाजे आहेत. त्यातला दुसरा दरवाजा पहिल्यावर आणि तिसरा चौथ्यावर फोल्ड करून ठेवल्यामुळे दिवाणखाना (मुंबैच्या भाषेत हॉल) आणि बाल्कनी (मुंबैच्या भाषेत गॅलरी) ह्या दोन खोल्यात ये-जा करता येते. दोन्ही खोल्यात एसी नाहिये. बाल्कनीला ह्या काचेच्या दरवाज्यांच्या समोर मोठी खिडकी आहे. तसंच ह्या खिडकीला ९० अंशाच्या कोनात (राईट अ‍ॅन्गल) डावी आणि उजवीकडे दोन छोट्या खिडक्या आहेत. हॉलला खिडक्या नाहीत. पण तिथून बेडरूम आणि किचनला जाणारे दरवाजे आहेत. बेडरुममध्ये एसी आहे.

एके दिवशी संध्याकाळी साधारण ७ च्या सुमाराला माझ्या आणि आईच्या लक्षात आलं की बाल्कनीतून हॉलमध्ये जाताना उजव्या बाजूच्या दरवाज्याकडे एकदम थंड वाटतं. जाणवेल इतपत थंड. ते दिवस उन्हाळ्याचे होते. पण तसं थंड डावीकडच्या दरवाज्याकडे अजिबात वाटत नव्हतं. बाल्कनी किंवा हॉलमध्ये कुठेही असा कोल्ड स्पॉट नव्हता. अगदी बाल्कनीच्या खिडकीजवळ सुध्दा. आम्ही सगळीकडे चालून पाहिलं. त्या दिवशी त्या वेळीच काय पण सकाळपासून बेडरुममधला एसी लावला नव्हता. आम्ही १०-१२ वेळा त्या कोल्ड स्पॉट मधून जाऊन खात्री करून घेतली. जवळपास १५ मिनिटांनी तो स्पॉट गायब झाला. काय होतं कोणास ठाऊक!

माझ्या आईची एक मावशी अनेक वर्षांपूर्वी मलबार हिलला एका बिल्डिंगमध्ये रहायची. त्यांच्या पाचव्या मजल्यावरच्या फ्लॅटच्या बेडरूमची खिडकी समुद्राला फेसिंग होती. एकदा आजी तिच्याकडे रहायला गेली होती. संध्याकाळी ती त्या खोलीत झोपली असताना अचानक तिला जाग आली आणि तिचं लक्ष उघड्या खिडकीकडे गेलं. तिला खिडकीत एक पिंजारलेले केस असलेलं डोकं (मानवी) दिसलं. घाबरून आजीने खोलीच्या बाहेर धूम ठोकली. आम्ही लहान असताना तिने हा किस्सा सांगितला की 'आजीने खिडकी बंद ठेवली असेल आणि तिच्या काचेत स्वतःलाच पाहिलं असेल' किंवा 'ते बिचारं भूत परत एकदा मेलं असणार' वगैरे खूप चेष्टा व्हायची तिची. पण अलीकडे आईने त्या मावशीला फोन केला होता तेव्हा माझ्या सांगण्यावरून तिला पुन्हा एकदा विचारलं तेव्हा मावशी म्हणाली की त्या बिल्डिंगमध्ये समुद्राला लागून असल्याने खूप भुतं होती अशी वदंता होती. गस्त घालणारा एक पोलिस अचानक वारला तेव्हा ही भुतं दिसल्यानेच गेला असंही लोक म्हणत म्हणे. तिथल्या अनेक रहिवाश्यांनी खिडकीत त्या भुताला पाहिलं होतं.

dreamgirl तुम्चा सारखीच मी ही या अनुभवातून सद्द्या जात आहे.मी ज्या घ्ररात रहाते ना त्यात काही वर्षांपूर्वी एका बाई ने जाळून घेतल होत कोणिच त्या घरात टीकेना खूप भाडेकरु नी ति जागा सोड्ली, शेजार्याना पण खूप त्रास देते ती अस जेव्हा मालकाला समजल तेव्हा त्याने वास्तूशांती केली, भट वाढने असा काही सा प्रकार ही केला त्त्याने पण तरीही कोणि भाडेकरु टिकेना , बरेच वर्ष ती रुम बंद्च होती, सद्या मी ५ वर्ष झाली त्या रुम मधे रहाते आहे, मला किंवा माझ्या कुटुंबाला कोणताच त्रास झाला नाही ,पण स्वताच्या घराबद्द्लचा कोणताही व्यवहार मी या रुम मधे केला कि तो पुर्ण होत नाही,

मानसी अगं !
भिती नाही का गं वातत? Uhoh
स्वतःच्या घराचा व्यवहार बाहेर कुठे तरी करत जा मग!
बाप्रे, इतकं सगळं कळत असुन तुम्ही तिथे रहाता म्हणजे खरच तुम्ही महान आहात Sad

रीया भिती नाही वाट्त आता,
आणि व्यवहाराच बोलण तर होतच घरी थोड्फार, शेजारी पाजारी कधि त्या बाई चा विषय नीघाला की मग सगळी मीठ मसाला लाउन सांगतात कीती जळली होती, घरात कुठे पड्ली होती, कशी बाहेर काढली मग मात्र जाम टरकते

>>शेजारी पाजारी कधि त्या बाई चा विषय नीघाला की मग सगळी मीठ मसाला लाउन सांगतात कीती जळली होती, घरात कुठे पड्ली होती, कशी बाहेर काढली मग मात्र जाम टरकते

बाप रे! ह्या आत्म्यांची शांती करायचा काहीच उपाय नसतो का? Uhoh

अरे बाप्रे एवढ्या पोस्ट्स?? Happy पण माझ्या धाडसाला वगैरे अज्जीबात महत्व नाहीय. कारण मुळात भासांव्यतिरिक्त काहीच त्रास नाही. आणि टिव्ही बंद करा असा दम देण्याव्यतिरिक्तः)
स्वप्ना, चौकशी केली होती. घरमालक साऊथ इंडियन आहे. त्याने इन्ह्वेस्टमेंट साठी हा फ्लॅट घेतला होता, बांधकाम झाल्या झाल्या!! वास्तूशांती केली होती. त्यानंतर काही महीने बंदच होता. आम्हाला मिळाला तो नवा कोरा! नवर्‍याचा या सगळ्यावर खूप विशास आहे त्यामुळे पटकन भितो. पण या घरात तो अगदी एकटाही आरामात राहू शकतो, अज्जीबात न घाबरता. माझा तर विश्वास नाहीच त्यामुळे भीती वगैरे वाटण्याचा प्रश्नच नाही.

असं वाटतं की त्याने त्याचं घर आम्हाला शेअर करायला दिलंय, ते फक्त स्वच्छ ठेवण्याच्या (कारण मध्ये काही महीने दुसरा भाडेकरू राहत होता, याने सगळीकडे खिळे मारून आणि होमहवन करून खूप खराब केल्या होत्या भिंती! आम्ही आल्यावर मी त्या पूर्ण भिंती धुतल्या. एरवी मी स्वच्छतेच्या बाबतीत जरा आळशी आहे पण या घरात का कोणास ठाऊक छान ठेवावसं वाटतं स्वतःहून, चकचकीत :)) आणि रात्री आवाज न करण्याच्या अटींवर. मग ठीक आहे ना. पाळतो आम्ही त्या झालं. Happy बाकी दिवसभर कसलाही भास वगैरे होत नाही. तसेही आम्ही सहा दिवस नसतोच, फक्त रविवारीच असतो दिवसभर. त्यामुळे रात्रीच्या या भासांची भीती वाटत नाही. फक्त मलाच तो प्रत्यक्ष दिसलाय (आणि आईला) पण भीतीदायक असं त्याचं मुळीच रूप नाही. सर्वसामान्य मध्यमवयीन गृहस्थसारखा. शांत आणि तटस्थ!! घरभर फिरतो. विशेषतः बेडरूममध्ये (कारण आम्हा तीघांनाही बेडरूममध्येच जास्त भास झालेत.) हल्ली ते सुद्धा कमी झालेत. त्यामुळे खरंतर आम्ही त्या घरातल्या अज्ञात शक्तीचे आभारच मानायला हवेत. कारण इथे आल्यापासून आमच्या बाबतीत सगळ्या चांगल्याच गोष्टी झाल्यात आणि इथे नवीन आलेल्या कोणालाही कसलाही विपरीत त्रास झाला नाही, अगदी पाहुणे मंडळींनाही!

हा विषय फार जिव्हाळ्याचा आहे त्यामुळे कुठेही गेले की तिथल्या खास भुतावळींच्या किस्स्यांची पोतडी उघडायला लावतेच. बरेच किस्से आहेत असे ऐकलेले... वेळ मिळेल तसे पोस्टेन Happy

! आशिका,
दुसरा अनुभव मस्त!
dreamgirl
मानलं तुला.घाबरण्यापेक्षा / घाबरण्यानंतर आपल्यावर नजर ठेऊन कोणीतरी आहे याचा कंटाळा येत नाही का?
मी तुझ्याजागी असते तर या गोष्टीवरून माझी खूप चिडचिड झाली असती.

आपल्यावर नजर ठेऊन कोणीतरी आहे याचा कंटाळा येत नाही का?
मी तुझ्याजागी असते तर या गोष्टीवरून माझी खूप चिडचिड झाली असती.>> कशाला? तो दिवसभर आम्हाला त्रास देत नाही. आम्ही रात्री त्याला त्रास देत नाही. मागे कोणीतरी म्हटल्याप्रमाणे प्रायव्हसी वगैरे काही डिस्टर्ब झाल्यासारखी वाटत नाही. कदाचित आम्हीच त्याची प्रायव्हसी डिस्टर्ब करत असू, अचानक एका रूम मधून दुसर्‍या रूम मध्ये बागडत गेल्याने किंवा झप्पकन लाईट ऑन केल्याने Happy कधी कधी मोठ्याने खिदळून... Happy

Pages