आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"
अमानवीय...?
Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
असाम्या `रक्तशपथ' का रे ?
असाम्या `रक्तशपथ' का रे ?
नाहि रे 'शपथ' मायगावचा जयराम
नाहि रे 'शपथ' मायगावचा जयराम गोवंडे आणि त्याचे चार मित्र वगैरे. अधिक लिहिले तर मजा जाईल. रक्तशपथ वेगळी आहे.
त्यात एक मैत्रीणही आहे ना ?
त्यात एक मैत्रीणही आहे ना ?
असाम्या, धारपांची 'सैतान' पण
असाम्या, धारपांची 'सैतान' पण वाचली तरी चालेल. सध्या माझ्या हातात ३ पुस्तकं आहेत - दस्त, झाकलेला चेहरा आणि आनंदमहल. मज्जानी लाईफ.
कचा - हो. त्यात एक मैत्रीण पण आहे. अशीच गोष्ट असणारी एक 'वो' नावाची मालिका पूर्वी बहुधा झी वर लागायची. सेम 'शपथ' ची स्टोरी.
रमड, पहिली दोन्ही पाठव.
रमड, पहिली दोन्ही पाठव. पहिले वाचलय पण माझे fav आहे नि तिसरे माझ्याकडेही आहे.
शपथ Stephen King च्या एका कादंबरीवर आधारीत आहे.
मुळीच पाठवणार नाही पहिलं आणि
मुळीच पाठवणार नाही
पहिलं आणि तिसरं माझंही फेव. दुसरं नवीन आहे. वाचतेय. छान आहेत स्टोरीज.
अनिल रघुनाथ कुलकर्णी हे
अनिल रघुनाथ कुलकर्णी हे चांगले लेखक होते. नवल मध्ये त्यांच्या गूढकथा प्रकाशित झाल्या आहेत. नवल आणि किर्लोस्करचे अंक जपून ठेवणारी कुटुंबं पाहण्यात आहेतच. अ.र यांच्या नदीकाठच्या सावल्या आणि सांजसूर या कादंब-या प्रकाशित आहेत. पण विपुल लेखन केलेलं आढळत नाही. लिखाणाचं अंग असूनही व्यापामुळे न जमलेले असे अनेक लेखक असू शकतील. त्यांच्याबद्दल खूप थोडी माहिती नेटवर उपलब्ध आहे.
http://www.manase.org/maharashtra.php?mid=68&smid=21&did=0&dsid=0&pmid=0...
( प्रिय बालक वैवकु यास - जेव्हां तू पुस्तकांच्या स्टॉलवर वर दिलेल्या पुस्तकांची चौकशी करशील तेव्हां बालांसाठी कुबड्या खवीसची आई आणि महिलांसाठी असलेलं अहोंचा टाहो या पुस्तकांची देखील चौकशी कर. त्यामुळे विक्रेत्यांकडे मागणी वाढून ते प्रकाशकांकडे चौकशी करतील आणि एकातरी प्रकाशकाला त्या मागणीच्या रेट्यान माझी ही दोन्ही पुस्तके प्रकाशित करावी लागतील. तेव्हां हे करशील ना गड्या > )
तुम्ही रत्नाकर मतकरींच्या कथा
तुम्ही रत्नाकर मतकरींच्या कथा नाही वाचल्या का? जरूर वाचा खास करून "जेवणावळ".
भारी आहेत त्यांच्याही कथा.
वाचल्यात. जवळजवळ सगळ्याच.
वाचल्यात. जवळजवळ सगळ्याच. मतकरी आणि धारप सर्वांनी वाचलेत हे गुहीतच धरलेलं असतं.
सुशिंची समथिग छान आहे.
अरे कोणीतरी त्या गानुआज्जीलाच
अरे कोणीतरी त्या गानुआज्जीलाच अंगाई म्हणून झोपवा एकदाची
१) खवीसची आई २) अहोंचा
१) खवीसची आई
२) अहोंचा टाहो
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
ओके किरण्यके
पण मला ही नावे लक्षात रहायला हवीत त्याआधी मी पुस्तके विकत घ्यायला दुकानात जायला हवे त्याआधी मला पुस्तके विकत घ्यावीशी वाटली पाहिजेत(म्हणूनच तर लोकाना मी लिंक्स मागत फिरत असतो हल्ली ) त्या आधी मला ती वाचावीशी वाटली पाहिजेत !!!
प्रयत्न करतो
अरे कोणीतरी त्या गानुआज्जीलाच अंगाई म्हणून झोपवा एकदाची <<<<<<
>>तिला कोणी तरी छातीवर बसुन
>>तिला कोणी तरी छातीवर बसुन गळा दाबतय असं वाटायला लागलं, ओरडता येईना, श्वास घेता येईना
रिया, हे Sleep Paralysis मुळे होऊ शकतं. मी परदेशात असताना एकदा लागोपाठ दोन रात्रीत मिळून ३ वेळा मला असा अनुभव आला होता. जाम टरकली. अक्षरशः अर्ध्या रात्री बाहेर बर्फ पडत असताना स्वतःचं अपार्टमेन्ट सोडून ओळखीच्यांकडे निघून गेले होते. ४-५ दिवस तिथेच राहिले होते. मग एका मित्राने ह्याबद्द्ल सांगितलं.
ओह! अग असु शकतं हेही.
ओह! अग असु शकतं हेही. बर्याचदा आपण माहीत नसलेल्या अनेक गोष्टींचा संदर्भ अमानविय शक्तीशी लावुन मोकळे होतो. पण हे असं पुन्हा कधी झालं नाही तिला.
लिंक बद्दल धन्स! पहिल्यांदाच कळालं मला हे असलं काही तरी
बाप्रे... किती किती वेगाने
बाप्रे... किती किती वेगाने धावलाय हा धागा.... आत्त्ता वाचून झाले किस्से ... थरारक..
नुकताच ऐकिवात आलेलाकिस्सा
माझ्या बहिणी च्या नणंदेचे मिस्टर ४ वर्षांपूर्वी कॅन्सर ने गेले. तीन वर्षांपूर्वी नणंदेच्या मुलीला अमेरिकेत जुळ्या मुली झाल्या. या वर्षी बहीण अमेरिकेला या पुतणीकडे कडे गेलेली असता तिला आणी बहिणीला मुलींचे जोरजोरात हसणे ऐकू आले. त्या जुळ्या बहिणींची खोली बेसमेंट मधे आहे. त्या दोघी काय करताहेत ते पाहायला म्हणून या त्यांच्या खोलीत गेल्या तेंव्हा एक पोरगी म्हणाली, एक पांढर्या वेषा तील एक म्हातारा ,'मॅन' त्यांच्याशी काहीतरी गमतीदार बोलत होते. वर्णनावरून ते नणदेचे मिस्टर असावेत अशी या दोघींची खात्रीच पटली. त्यांनी पोरींना चाचरतच विचारले कि तुम्हाला भीती वाटली का..त्यावर त्या म्हणाल्या ,' नो... ही वॉज सच अ नाईस मॅन.."
नणदेची मुलगी आपल्या वडिलांची फार लाडकी होती,पण आजारपणामुळे त्यांना कधीच अमेरिकेला येता आले नव्हते . ते शेवटी फक्त पांढरा पायजामा आणी पांढरा कुडता हाच वेष घालत.
ते गेल्यावर घरात कधी विषय काढून त्यांच्याविषयी कुणी बोलतही नसत. अमेरिकेत जन्मलेल्या या पोरी आता तीन वर्षाच्या आहेत त्यामुळे त्यांच्याशी ही आजोबांबद्दल कुणीच बोलत नाहीत किंवा घरी त्यांचा फोटोही ठेवलेला नाही
तिला कोणी तरी छातीवर बसुन गळा
तिला कोणी तरी छातीवर बसुन गळा दाबतय असं वाटायला लागलं, ओरडता येईना, श्वास घेता येईना
रिया, हे Sleep Paralysis मुळे होऊ शकतं.>> राहत्या घरात, हॉल मध्ये एकदा अशी स्थिती अनुभवली होती.
बाबौ, लै वाट लागते.
दुसर्या दिवशी नेट वर बरच काही वाचलं.
योगायोगाने, मि पा वरच गविची एक पोस्ट वाचली.
त्यात अशा अव्स्थेचं डिटेल वर्णन होतं. मग हुश्शं झालं.
त्या पोस्टची लिंक माझ्या
त्या पोस्टची लिंक माझ्या विपुत डकवता का?
ते Sleep Paralysis (असं
ते Sleep Paralysis (असं म्हणतात ते आज ठाउक झालय)अनुभवलय.. लै डेंजर ! झोपेचे खोबर होत ते वेगळ . कितीही जोर लावला तरी बाहेर पडता येत नाही.. !!
ती गानुआजीची स्टोरी बेस्ट एकदम !
झकोबा, Sleep Paralysis
झकोबा, Sleep Paralysis म्हन्जे काय? प्यारालिसिस म्हण्जे भयन्करच की, माणूस उठलाच नै तर काय होत?

की त्या परिस्थितीचे डिट्टेलवार वर्णन देऊन त्याला कैतरी सिन्ड्रोमफिन्ड्रोम संबोधून कैतरी विन्ग्रजी नाव दिले की ते सायन्टिफिक रिसर्च होते का?
नै, मला ठाऊक नै म्हणून विचारतोय.
माझ्या माहितीत अन अनुभवाप्रमाणे तरी विशिष्ट जागी/खोलित/आढ्याखालि वगैरे झोपले अस्ता हा अनुभव बर्याच जणान्ना येऊ शकतो. सातारच्या गिते बिल्डिन्गमधे विशिष्ट ठिकाणच्या कॉटवरच हा अनुभव तिघा/चौघान्नी घेतला होता, बर एकेकदा नाही तर दोनतिनदा! इतर ठिकाणी मात्र असा अनुभव येत नसे. वरल्या सायन्टिफिक थेरीप्रमाणे मी, माझा भाऊ, माझी आई, माझा मित्र असे सगळेजणच Sleep Paralysis ने ग्रस्त होते की काय?
कितीही जोर लावला तरी बाहेर
कितीही जोर लावला तरी बाहेर पडता येत नाही.. !!>>>
अरे मला बाजुला बायको होती तिला बोलवता येत नव्हतं का हात हलवता येत नव्हता.
आता वाटलं खिडकीतुन आलं आमचं विमान (इतक्यातच).
खिडकीत पांढरट भास झालेला.
मग डॉळे मिटुन मनातल्या मनात जय हनुमान म्हणालो आणि मग कुठे हालचाल करता आली.
बरं हे सगळं रात्री १-१.५ वाजता..
रि मिपा सध्या बंद आहे. सुरु झालं की देइन ती लिन्क शोधुन.
झक्या इथेच दे.. मलाही
झक्या इथेच दे.. मलाही वाचायचाय काय प्रकार असतो ते,
माझ्याबाबतीत पण असे एकदा झाले
माझ्याबाबतीत पण असे एकदा झाले होते. बेड खिडकीच्या बाजुला होता आणि रात्री भास झाला की कोणीतरी खिडकीतुन हात घालून माझा गळा दाबतोय. मी जिवाचा आकांताने ओरडत होतो, पण मला वाटत होते की घश्यातून काही आवाजच येत नाही.
वास्तविकतः माझ्या ओरडण्याने घरातले सगळे जागे झाले होते आणि मला हालवून जागे करत होते.
असं मलाही एकदा दोनदा झालं
असं मलाही एकदा दोनदा झालं आहे.
मला एक स्वप्न नेहमी पडतं
मला एक स्वप्न नेहमी पडतं ज्यात माझा आत्मा शरीरातून वेगळा होऊन वेगवेगळ्या लोकांचे गळे दाबतो
मला एक स्वप्न नेहमी पडतं
मला एक स्वप्न नेहमी पडतं ज्यात माझा आत्मा शरीरातून वेगळा होऊन वेगवेगळ्या लोकांचे गळे दाबतो>>
:
वाचली मी ती गानूआज्जीची
वाचली मी ती गानूआज्जीची गोष्ट. मला भीतीदायक नाही वाटली एव्हढी. पण खूप अभद्र वाटली. आता काही दिवस तरी लहान पोरं पाहिली की ती भयाण अंगाई आठवेल.
स्वप्ना, अगदी बरोबर. मला हे
स्वप्ना, अगदी बरोबर. मला हे नेमके शब्द सापडत नव्हते. 'अभद्र' .. spot on.
शनिवारी मित्राच्या फार्महाऊस
शनिवारी मित्राच्या फार्महाऊस वर रात्री १२:३० वाजता, बाहेर मुसळधार पाऊस पडत असताना, किड्यांचे चित्रविचित्र आवाज येत असताना गानू आज्जींच्या कथेच वाचन केलं. धम्माल आलेली.
त्याच्या आधी फार्महाऊसवर येताना एक "मोठ्ठी शेकोटी" नदीच्या काठी, भर पावसात (अंधारामुळे वरची शेड दिसली नाही) धडधडत पेटताना दिसली. एका मित्राने ते काय आहे म्हणुन विचारलं, सांगितल्यावर त्याची चांगलीच तंतरलेली आणि त्यात पुन्हा रात्री "गानू आज्जी". 
वाचली मी ती गानूआज्जीची
वाचली मी ती गानूआज्जीची गोष्ट. मला भीतीदायक नाही वाटली एव्हढी. पण खूप अभद्र वाटली.>>> +१०००
<<"मोठ्ठी शेकोटी<<< मला आता
<<"मोठ्ठी शेकोटी<<<
मला आता कळला याचा अर्थ!!
आर्ये सरदार आहेस
आर्ये सरदार आहेस
Pages