रार यांच्या पिया बीनावर झालेली चर्चा भरकटत असल्याचा अनेकांना खेद झाल्याने नविन धागा चालु केला आहे.
प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 16:22
रार,
बरेच दिवसांनी लिखाण पाहून बरे वाटले.
खर तर अशी अनेक उदा. आहेत जिथे रचना विसंगती म्हणता येईल पण शेवटी तुला हे माहित आहेच की संगीत -त्यातही एखाद्या दृष्यासाठी चित्रपटात दिलेले, पार्श्वसंगीत अन वाद्यांसकट- हे subjective आहे.
पिया बिना बासिया बाजे ना यातला जो जोगिया, उदास, बेचैन, मूड आहे त्याला बासरी हे वाद्य खूप सशक्तपणे अधोरेखित करतं असं मला वाटतं. किंबहुना त्या काळात बासरी, सॅक्सोफोन, सरोद, सतार, ऑर्गन ही प्रामुख्याने वापरली जाणारी वाद्ये असल्याने याही गाण्यात बासरीचा वापर तितका खटकत नाही.
त्यामूळे निव्वळ शब्द अन त्यामागून काय वाद्य वाजले पेक्षा त्या एकंदर रचनेचा दृक्-श्राव्य परिणाम हा बासरी (सारख्या) वाद्याने, अन रचलेल्या सुरावटीने तितका आपल्या पर्यंत पोचत असेल तर मला वाटतं technically विसंगत असूनही आपल्याला ते आवडते.
असो.
मला वाटतं हिंदी मधेही बंसिया हा शब्द योग्य आहे. वर कुणितरी लिहील्याप्रमाणे बंसुरिया वरून बांसिया शब्द आला असावा पण "बसिया" शब्दाशी एकंदर ईथे जवळचा संबंध दिसत नाही कारण नंतर "बाजे ना" आल्याने, बासरीबद्दलच उल्लेख आहे. "
गीतात तो शब्द बंसिया (जे हिंदी व्याकरणातही योग्य आहे) असा असेल तर लताच्या गाण्यात मात्र बासिया असे ऐकू येते. गीतात शब्द बंसिया असला तरी गाताना तो बासिया म्हणायचा असा काही हिंदी व्याकरणिक नियम आहे का हे तपासून पहायला हवे. बर्मन दादा व लतादीदी दोघेही अशी चूक करतील असे वाटत नाही. तेव्हा नक्क्की काय ते लतादीदींनाच विचारावे लागेल (दोन्ही बर्मन हयात नाहीत!)
बंसिया या शब्दाजागी बासुरिया असे गीतात म्हटले तरी तालात अडचण येणार नाही पण ऐकताना थोडे खटकेल, कारण गीतातील ईतर शब्दांपेक्षा हा शब्द त्या जागी थोडा पटकन म्हणावा लागेल. मला याचे ताल, मात्रा, विभाग सहीत स्पष्टीकरण देता येईल पण माझ्या मते ते अनावश्यक आहे. एरवी या गीतातील बहुतांशी शब्द दोन वा तीन अक्षरी आहेत.
याऊलट "मेरा कुछ सामान" मधे पंचमदांनी निव्वळ बासरी न वापरता अधुनिक जवळ जवळ सर्व वाद्यांचा (तरिही प्रामुख्याने सरोद, बेस गिटार, क्सायलोफोन, सतार) चा वापर करून त्या गाण्याचा अस्वस्थ करून सोडणारा मूड ज्या प्रकारे संगीतातून प्रकट केला आहे त्याला तोड नाही. किंबहुना गुलजारच्या नेहेमीच्या वापरातील शब्द जे अन्यथा गीतात तसेच वापरायचे तर संगीतकाराचा गोंधळ उडू शकतो असे शब्द पंचमदांनी न बदलता देखिल तसेच ठेवून कुठेही गाण्याचा तोल वा मूड सुटू दिलेला नाही निव्वळ या एकाच बाबतीतही ते ईतरांपेक्षा महान ठरतात.
आणि जुन्या कॅसेट तंत्राचे म्हणशील तर ते बहुतांशी analogue monotonic कींव्व mono sterio असल्याने त्याचे अलिकडे mp3 digital sterio reproduction करताना मूळ आवाजातील मार्दव, माधुर्य, बरेच वेळा compromise केले जाते. याचे मुख्ख्य कारण म्हणजे frequency mapping. हा एक अतिशय रंजक विषय आहे आणि नेट्जालावर याविषयी माहिती उपलब्ध आहे.
असेच एक आवर्जून audio cassette वर ऐकायचे गाणे म्हणजे "रैना बिती जाये.."
प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 16:31
तेरे बिना झिंदगी से शिकवा या गाण्यात पहिल्या कड्व्यानंतर जे संवाद आहेत संजीव कुमार व सेन बाईंच्या तोंडी ते मात्र नंतर मुद्दामून गाण्यात घात्ले असावेत अशी नेहेमी शंका येते.
कुणाला काही कल्पना/माहिती?
याचे कारणः
१. एकतर ते संवाद संपल्यावर पुन्हा म्युझिक चालू होते ते खूप abrupt वाटते, अगदी आयत्या वेळी एखादी special bogie शेवटी गाडीला जोडली जावी तसाच हिसका बसतो..
२. त्या संवादात "ये जो चांद है ईसे रात मे देखना... "वगैरे उल्लेख झाल्यावर मग तिसरे कडवे "तुम जो केहेदो तो आज की रात चांद डूबेगा नही..." येते. ते justify करायला हे संवाद लिहील्यागत वाटतात.
सर्वात मह्त्वाचे, कुणीतरी संवादातील ही ओळ डीकोड करा रे. अजूनही नक्की कळलेले नाही..
ये जो फुलोंकी बेले नजर आती है दर असल ये अरबी मे xxxxxxxxx...
काय आहे नक्की ते वाक्य?
प्रतिसाद swaatee_ambole | 3 November, 2009 - 22:56
ये अरबी मे आयतें (कुराणातील ओळी) हैं - इन्हें दिन में देखना - साफ नजर आतीं हैं..
प्रतिसाद mansmi18 | 3 November, 2009 - 19:39
ये जो फुलोंकी बेले नजर आती है दर असल ये अरबी मे xxxxxxxxx...
---------------------------------------------------------
ये जो फुलोंकी बेले नजर आती है दर असल ये अरबी मे "आयते" लिखी है..
प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 22:31
स्वाती,
अगदी बरोबर... तेच ऐकू यायचे.. धन्यवाद!
थोडक्यात, त्या एकमेकात गुंफलेल्या वेली म्हणजे जणू अरबीतील आयते आहेत अशी कल्पना आहे तर. छान! शेवटी गुलजारच
प्रतिसाद swaatee_ambole | 3 November, 2009 - 22:50
कल्पना नाहीये योग. माझ्या आठवणीप्रमाणे कुठल्यातरी पडझड झालेल्या वास्तूच्या (खंडहर) भिंतींवर वेलबुट्ट्यांसारख्या दिसणार्या आकृत्या या खरंतर आयता आहेत असं तो सांगतो आहे. (ताजमहालाच्या भिंतींवरही आहेत अशा आयता.)
खालच्या फोटोत लाल लंबवर्तुळात दिसतायत तशा.
(फोटोचा प्रताधिकार माझाच )
प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 22:55
खरच की. बरोबर आहे तुझं.. फोटो पाहून ट्यूब पेटली.
(संवादात तो म्हणतो देखिल, "इन्हे दिन मे देखना साफ नजर आयेगी..").
पण एकंदरीत संवादाबद्दल काय वाटतं? नंतर घुसडल्या सारखा?
प्रतिसाद swaatee_ambole | 3 November, 2009 - 23:19
संवाद त्या प्रसंगासाठी (ते नऊ वर्षांनी इतके निवांत भेटतायत) घुसडला आहे हे खरंच, आणि ते एकवेळ क्षम्य आहे, पण त्यात त्याने 'रोज निकलता है, पर बीचमें अमावस आ जाती है.. वैसे तो अमावस पंद्रह दिन की (??!!) होती है, मगर इस बार बहुत लंबी रही' असं म्हणायचं आणि त्यावर तिने 'नौ बरस लंबी थी ना?' असं विचारायचं हे प्रेक्षकांना जरा फारच स्पूनफीडिंग झालं. गुलजारने हे करायची गरज नव्हती असं वाटतं.
पण त्या गाण्यांसाठी ये भी मंजूर है!
ता. क. : रार, तुझी मूळ चर्चा भरकटवण्यात हातभार लावल्याबद्दल क्षमस्व.
प्रतिसाद shonoo | 3 November, 2009 - 23:24
पण ते म्हणताना तिचा आवाज काय मस्त कापलाय! नऊ वर्षांचा विरह, आठवणी, व्याकुळता सगळं त्या एका वाक्यात आहे. मला तो डायलॉग फार आवडतो..
प्रतिसाद ashwini | 4 November, 2009 - 01:56
मला पण खूप आवडतो. कॉलेजमध्ये असताना एका नाटकात तो आम्ही घेतला होता. त्या संवादासाठी व्हीडीओ आणून आँधी पाहीला होता आणि पुन्हा पुन्हा तेव्हढा भाग पाहून मी तो कापरा आवाज आणण्याचा प्रयत्न केला होता. आँधीतली सगळीच गाणी अप्रतिम होती! अजूनही ते गाणं आणि त्यातला तो संवाद लागला की कॉलेजचे दिवस आठवतात.
cinderella | 4 November, 2009 - 02:09
सलाम किजिए गाणं सोडल्यास सगळी गाणी मस्त आहेत
प्रतिसाद deepanjali | 4 November, 2009 - 02:45
याचे कारणः
१. एकतर ते संवाद संपल्यावर पुन्हा म्युझिक चालू होते ते खूप abrupt वाटते, अगदी आयत्या वेळी एखादी special bogie शेवटी गाडीला जोडली जावी तसाच हिसका बसतो..
<<<<
उलट मला तर ज्या प्रकारे ते गाणं जातं तेच आवडतं !!
तो मधला किर्र रात्रीचा फीलसकट येणारा डॉयलॉग (आणि हे गाणं पण बरोबर रात्री बेला के फूल ला बरेचदा लागायचं:)) , त्या साठी अचानक गाणं थांबणं आणि नंतर अचानक सुरु होण हेच तर गाण्याची 'जान' वाटतं ( तस् पण पूर्णं गाणं हे बॅक्ग्राउंड ला आहे, फिल्मी स्टाइल संजीव कुमार्-सुचित्रा सेन गात नाहीत, त्यामुळे गाणं म्हणजे फक्त त्या दोघांच् मनोगत! )
तुम जो केहेदो तो आज की रात चांद डूबेगा नही..." येते. ते justify करायला हे संवाद लिहील्यागत वाटतात.
<<< Well, असेलही.
पण अगदीच डॉयलॉग संपल्यावर नाही येत ते कडवं.
त्या डॉयलॉग नंतर आधी " जी मे आता है तेरे दामन मे सर झुकाके हम रोते रहे रोते रहे, तेरे ही आंखोमे ऑसूआँकी नमी तो नही " हे येतं मग धृवपद आणि मग संजीव कुमार चं आय मीन किशोर कुमार चं कडवं आहे .
प्रतिसाद bee | 4 November, 2009 - 08:55
मला देखील दीपांजली सारखचं वाटतं. तो संवाद तर गाण्याचा खराखुरा प्राण आहे.
प्रतिसाद bee | 4 November, 2009 - 08:56
पण ती अभिनेत्री सेन ही मालासिन्हा सारखीच दिसते. मला अलिकडेच माहिती पडले की ती माला सिन्हा नाही तर सेन आहे
प्रतिसाद madhavm | 4 November, 2009 - 09:00
सिंड्रेलाला १०० मोदक. इतक फालतू गाण का घातलय तेच कळत नाही. त्यातली सगळी मस्त गाणी आर.डी. ने किशोरला दिली आहेत आणि हे मात्र रफीला.
प्रतिसाद yog | 4 November, 2009 - 10:14
DJ,
>तो मधला किर्र रात्रीचा फीलसकट येणारा डॉयलॉग (आणि हे गाणं पण बरोबर रात्री बेला के फूल ला बरेचदा लागायचं:)) , त्या साठी अचानक गाणं थांबणं आणि नंतर अचानक सुरु होण हेच तर गाण्याची 'जान' वाटतं
तसं असेलही... पण (मला) गाण्याची लय तुटल्या सारखी वाटते.
असो. रार, तुझ्या मूळ लेखाला चांगलच भरकटवलं.. दिलगीर!
>> Submitted by अमा on 17
>> Submitted by अमा on 17 July, 2020 - 12:29
धन्यवाद. चित्रपट पूर्ण बघितलेला नाही. पण तुमच्या प्रतिसादामुळे गाण्याचे चित्रण थोडेफार कळून आले.
>> एक मजेशीर गाणं आठवलं ते
>> एक मजेशीर गाणं आठवलं ते म्हणजे - कुणीतरी अशी पटापट गंमत आम्हा सांगेल काय. विशेषतः त्यातले ते संवाद. म्हणजे आता मला तो चित्रपट अजिबात आठवत नाहीयेत त्यामुळे त्यातला संदर्भ असेल.
>> Submitted by मामी on 16 July, 2020 - 22:41
कोणीतरी अशी फटाफट... गर्भितार्थ असलेले गाणे आहे. "सामना" चित्रपट. गाण्यात टोपीखाली कोंबडीचे पिलू, साखर लपवलेली दाखवली आहे.
चित्रपटात निळू फुलेंची नकारात्मक भूमिका आहे. टोपी घातलेला खलनायक. त्यांचे साखर कारखाने पोल्ट्री हे उद्योग असतात.
जब प्यार किस्से होता है..
जब प्यार किस्से होता है.. टायटल साँग.
पहली पहली बार जब प्यार किसीसे होता है.
होता है ये हाल जब प्यार किसी से होता है..
माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक आहे. कुमार सानूचा आवाज, उडत्या चालीचं मस्त गाणं...!
प्यार मे करू बेवफाई, ऐसा नही मै हरजाई
लाखो हसीनोंको देखा, तुही पसंद मुझे आयी.
असं वाटतं प्रेमात आकंठ बुडालेल्या नायकाने आपल्या नायिकेसाठी म्हटलेलं गाणं आहे.
पण अरेरे.. गाणं टायटल साँग आहे आणि त्यात सलमान एकटाच अनेक तरूणी सोबत नाचतोय. म्हणजे गाण्याच्या बोलांना काही अर्थ च नाही.!!
चांदणी रात है, तू मेरे साथ है
चांदणी रात है, तू मेरे साथ है
यात सलमानच आहे आणि तोही सूर्याकडे बघत हे गाणे गातोय

हुजूर इस कदर भी ना इतरां के
हुजूर इस कदर भी ना इतरां के चलिये ....
https://youtu.be/wM1kBO2lrYQ
चांदणी रात है, तू मेरे साथ है
चांदणी रात है, तू मेरे साथ है
यात सलमानच आहे आणि तोही सूर्याकडे बघत हे गाणे गातोय
>>> हे वाचून गाणे शोधून पाहिले... नाही हो.. रात्र आहे संपूर्ण गाण्यात... आणि शेवटी दहा सेकंद गाणे संपायच्या आधी रात्र संपून पहाट होते...
https://youtu.be/rC4BaGN0vCI
https://m.youtube.com/watch?v
https://m.youtube.com/watch?v=ULiCtjGRyNY
रंगीला रे तेरे मन में....प्रेमपुजारी
out of place वाटतो काय माहिती का.
घट्ट साडी वरचा नाच
हुजूर इस कदर भी ना इतरां के चलिये ....धन्यवाद च्रप्स.
आहे बरं का गाणं
आहे बरं का गाणं
कधीकाळी पाहिला होता पिक्चर.
युट्युब आवृत्तीत काटलं असेल.
लेकर हम, दीवाना दिल - गाणं
लेकर हम, दीवाना दिल - गाणं तुफान गाजलंय. पण नीतू सिंग चे कपडे (लाल बॅकग्राऊंड वर लाल तोकडे कपडे), आणी नाच ह्या नावाखाली केलेले माकडचाळे (एकदा तर ती स्वतःचे केस ओढते) ह सगळाच प्रकार असह्य आहे.
ती लोळते पण ना त्या रंगीला
ती लोळते पण ना त्या रंगीला गाण्यात.(अर्थात दारू प्यायल्याचा सीन असल्याने ते योग्य आहे
)
प्यार में कभी कभी ऐसा हो जाता
प्यार में कभी कभी ऐसा हो जाता है ..
विशाल आनंद नावाचा ठोकळा आणि सिम्मी गिरेबाल आणि शैलेन्द्रचा वाईट आवाज. लता आणि नाझनीन (कुंती) त्यातल्या त्यात बर्या.
हुजूर इस कदर भी ना इतरां के
हुजूर इस कदर भी ना इतरां के चलिये ....>>> चांगलं आहे की चित्रीकरण. पार्टीतलं, एकदम रीलॅक्स मूडमध्ये असणार्या दोन मित्रांनी खट्याळपणा करत म्हटलेलं गाणं.
सुरेश वाडकर आणि उषा मंगेशकरांचं हे अप्रतिम गाणं. नुसतं ऐकलं तेव्हा 'mesmerize' व्हायला झाले होते. गाणं पाहिल्यावर हताश झाले
हुजुर इस कदर यूं ना... असं
हुजुर इस कदर यूं ना... असं वाचलं होतं की हे गाणं दिग्दर्शकाने पूर्णपणे कलाकारांवर सोपवलं होतं. कलाकारांनी त्यांना हवे तसे हावभाव, actions, नाच करावा अशा instructions दिल्या होत्या म्हणे.
तसेच ते तेरे लिये पलकोंके
तसेच ते तेरे लिये पलकोंके झालर बुनू गाण्याबद्दल... रणधीर कपूर मुळे गाणे बघवत नाही.
आयुष्यावर बोलू काही >>लोल
आयुष्यावर बोलू काही >>लोल
आयुष्यावर बोलू काही >>लोल Lol
आयुष्यावर बोलू काही >>लोल Lol
ही मोटरबाईक, मधे काही क्षण मोबाईल आणि मग गॉगलची जाहिरात वाटते
फुल्ल गे वाटतायत दोघे...
फुल्ल गे वाटतायत दोघे...
पिंजरा, नवरंग, झनक झनक पायल
पिंजरा, नवरंग, झनक झनक पायल बाजे, दो आंखे बारह हाथ अशा सिनेमात अनेक सुरेल, अविस्मरणीय गाणी आहेत. राम कदम, सी रामचंद्र, वसंत देसाई अशा दिग्गज संगीतकारांनी चाली बांधलेल्या आहेत आणि लता मंगेशकर, उषा मंगेशकर, आशा भोसले, महेन्द्र कपूर, हेमंत कुमार हे गायक. पण पडद्यावर संध्याला बघणे नको वाटते. भयानक मेकप, भयानक ड्रेस आणि बटबटीत हावभाव. अगदी कुरूप. इतक्या चांगल्या गाण्यांची वाट लावली आहे पडद्यावर!
सुरेश वाडकर आणि उषा
सुरेश वाडकर आणि उषा मंगेशकरांचं हे अप्रतिम गाणं. नुसतं ऐकलं तेव्हा 'mesmerize' व्हायला झाले होते. गाणं पाहिल्यावर हताश झाले >>> बापरे हे अतिभयाण आहे. बघितलं नव्हतं तेच बरं होतं. तो उकडलेला बटाटा कोण आहे?
उकडलेला बटाटा >>>
उकडलेला बटाटा >>>
कोणजाणे. नेटवर विजेंद्र मित्तल आणि मधुमालिनी अशी नावं दिसत आहेत.
"माना हो तुम बेहद हसीन, ऐसे
"माना हो तुम बेहद हसीन, ऐसे बुरे हमभी नही " ईतक्या गोड रोमँटिक गाण्याचा व्हिडिओ बघितला का? कसला फनी आहे!
https://www.youtube.com/watch?v=Pu3c5WntSgo
त्यातल्या हिरोने पूर्ण गाण्यात एक हात हलवत अॅक्टिंग (?) करुन गाण्याच्या मस्त रोमँटिक माहोलची 'एक हाती' माती केली आहे.
सर्वात फनी चित्रित गाणं
सर्वात फनी चित्रित गाणं जियाला मधलं एका गझल चं रूपांतर असलेलं कल चौदवी की रात थी
)
https://youtu.be/k4VgBvYQc3Q
तसे अभिनय करून दोघांनी मनापासून एक्सप्रेशन दिलेत.पण एक्सप्रेशन पेक्षा दात जास्त लक्षात राहतायत. तसेच मध्ये लग्नाच्या व्हिडिओत असतं तसं एकाच माणसाचे 10 चेहरे वालं ग्राफिक पण आहे.
(आय्यो सॉरी ते गाणं अप्रतिम नाहीये हे आता आठवलं. म्हणजे या धाग्यावर नाही पाहिजे
प्यार में कभी कभी ऐसा हो जाता
प्यार में कभी कभी ऐसा हो जाता है .. Happy विशाल आनंद नावाचा ठोकळा आणि सिम्मी गिरेबाल आणि शैलेन्द्रचा वाईट आवाज. लता आणि नाझनीन (कुंती) त्यातल्या त्यात बर्या>>>> अगदी बरोबर . त्या गाण्यात नाझनीनच्या चप्पला बदलल्या आहेत आणि काय तो घरगुती शिवलेला हाल्टर नेक पिवळा वनपीस गाऊन.
यांना हो तुम मध्ये तो शेखर
यांना हो तुम मध्ये तो शेखर कपूर आहे.
सोबत शबाना
>> पिंजरा, नवरंग, झनक झनक
>> पिंजरा, नवरंग, झनक झनक पायल बाजे, दो आंखे बारह हाथ अशा सिनेमात अनेक सुरेल, अविस्मरणीय गाणी आहेत. राम कदम, सी रामचंद्र, वसंत देसाई अशा दिग्गज संगीतकारांनी चाली बांधलेल्या आहेत आणि लता मंगेशकर, उषा मंगेशकर, आशा भोसले, महेन्द्र कपूर, हेमंत कुमार हे गायक. पण पडद्यावर संध्याला बघणे नको वाटते. भयानक मेकप, भयानक ड्रेस आणि बटबटीत हावभाव. अगदी कुरूप. इतक्या चांगल्या गाण्यांची वाट लावली आहे पडद्यावर!
>> Submitted by shendenaxatra on 22 July, 2020 - 04:34
पिंजरा, दो आंखे बारह हाथ मधल्या गाण्यांचे मला तरी खूप चांगले चित्रीकरण वाटते. उदाहरणार्थ सैया झूटोंका बडा मध्ये संध्याच आहे. पण तरीही खूप खूप गोड वाटते ऐकायला/पाहायला. साधे पण सुंदर चित्रण. तीच गोष्ट तुम्हावर केली मी मर्जी बहाल सारख्या पिंजरा मधल्या गाण्याची. पण हो शांतारामांच्या नंतरच्या काळातल्या काही चित्रपटांत मात्र पडद्यावर संध्याला बघणे नको वाटते हे अगदी खरे आहे. शांतारामांचा फार वचक असायचा. तो नंतर खूपच वाढला असावा. तो चित्रीकरणात जाणवतो. उदाहरणार्थ नवरंग मधल्या "आधा है चंद्रमा..." इत्यादी गाण्यांत तो हिरो अक्षरशः टरकलेला दिसतो. जराही मोकळेपणा नाही. संध्याचा हिरो आहे का तिचा घरगडी असे भाव आहेत.
(ता. क. हो, एक शक्यता आहे कि तो संध्याचा हिरो नसेल. कारण मी चित्रपट बघितलेला नाही. पण गाण्याच्या शब्दांनुसार विचार केल्यास तसे हावभाव व अवघडलेली देहबोली तिथे अपेक्षित आहेत असे वाटत नाही)
तो ( महिपाल ) कवी आहे.
तो ( महिपाल ) कवी आहे.
ती - त्याच्या काव्याची प्रेरणा असलेली कल्पनेतील स्त्री.
संध्याचे नाच असलेली गाणी
संध्याचे नाच असलेली गाणी आवडतात.
व्ही शांताराम त्यात काही ना काही चमत्कृती आणायचे.
तू छुपी है कहा, मैं तडपता यहा
तू छुपी है कहा, मैं तडपता यहा..
अप्रतिम गाणे व तितकेच अप्रतिम चित्रीकरण. नवरंगची गाणी चांगली चित्रित केलीत.
पिंजरामध्ये त्यांची काही गाणी खटकतात कारण तमाशाच्या बोर्डावर तोवर नऊवारी नेसून टिपिकल लावणी नाचणारी कलावंतीण बघितली होती. पण पिंजरामध्ये वेगळी केशभूषा वेशभूषा केलेली कलावंतीण दिसते ते जरा ऑड वाटते. अर्थात व्यक्तिशः मला तिथे जयश्री गडकरला बघायला जास्त आवडले असते. संध्या अभिनयात चांगली होती. पिंजरा मध्ये तिची पाले तोडली जातात त्या प्रसंगात तिने अगदी खऱ्याजवळ जाणारा अभिनय केला आहे.
पण चेहऱ्यावर भावना ठळक दिसायला हव्यातच हा शांतारामांचा हट्ट असावा. त्यामुळे संध्याची काही गाणी श्रणवीय असली तरी प्रेक्षणिय अजिबात नाहीत. भयंकर बोलू नये पण मला काही गाणी भयंकर वाटलीत

>> तो ( महिपाल ) कवी आहे.
>> तो ( महिपाल ) कवी आहे.
>> ती - त्याच्या काव्याची प्रेरणा असलेली कल्पनेतील स्त्री.
>> Submitted by भरत. on 22 July, 2020 - 13:15
धन्यवाद भरत.
छुपके छुपके मधल्या सारेगामा
छुपके छुपके मधल्या सारेगामा गाण्यात अमिताभ आणि धर्मेंद्र खूप मोठी मोठी तोंडं उघडतात.
Pages