चित्रपटातील अप्रतिम पण खटकलेली गाणी

Submitted by कांदापोहे on 4 November, 2009 - 00:09

रार यांच्या पिया बीनावर झालेली चर्चा भरकटत असल्याचा अनेकांना खेद झाल्याने नविन धागा चालु केला आहे. Happy

प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 16:22
रार,
बरेच दिवसांनी लिखाण पाहून बरे वाटले.
खर तर अशी अनेक उदा. आहेत जिथे रचना विसंगती म्हणता येईल पण शेवटी तुला हे माहित आहेच की संगीत -त्यातही एखाद्या दृष्यासाठी चित्रपटात दिलेले, पार्श्वसंगीत अन वाद्यांसकट- हे subjective आहे.
पिया बिना बासिया बाजे ना यातला जो जोगिया, उदास, बेचैन, मूड आहे त्याला बासरी हे वाद्य खूप सशक्तपणे अधोरेखित करतं असं मला वाटतं. किंबहुना त्या काळात बासरी, सॅक्सोफोन, सरोद, सतार, ऑर्गन ही प्रामुख्याने वापरली जाणारी वाद्ये असल्याने याही गाण्यात बासरीचा वापर तितका खटकत नाही.
त्यामूळे निव्वळ शब्द अन त्यामागून काय वाद्य वाजले पेक्षा त्या एकंदर रचनेचा दृक्-श्राव्य परिणाम हा बासरी (सारख्या) वाद्याने, अन रचलेल्या सुरावटीने तितका आपल्या पर्यंत पोचत असेल तर मला वाटतं technically विसंगत असूनही आपल्याला ते आवडते.
असो.

मला वाटतं हिंदी मधेही बंसिया हा शब्द योग्य आहे. वर कुणितरी लिहील्याप्रमाणे बंसुरिया वरून बांसिया शब्द आला असावा पण "बसिया" शब्दाशी एकंदर ईथे जवळचा संबंध दिसत नाही कारण नंतर "बाजे ना" आल्याने, बासरीबद्दलच उल्लेख आहे. "
गीतात तो शब्द बंसिया (जे हिंदी व्याकरणातही योग्य आहे) असा असेल तर लताच्या गाण्यात मात्र बासिया असे ऐकू येते. गीतात शब्द बंसिया असला तरी गाताना तो बासिया म्हणायचा असा काही हिंदी व्याकरणिक नियम आहे का हे तपासून पहायला हवे. बर्मन दादा व लतादीदी दोघेही अशी चूक करतील असे वाटत नाही. तेव्हा नक्क्की काय ते लतादीदींनाच विचारावे लागेल (दोन्ही बर्मन हयात नाहीत!)

बंसिया या शब्दाजागी बासुरिया असे गीतात म्हटले तरी तालात अडचण येणार नाही पण ऐकताना थोडे खटकेल, कारण गीतातील ईतर शब्दांपेक्षा हा शब्द त्या जागी थोडा पटकन म्हणावा लागेल. मला याचे ताल, मात्रा, विभाग सहीत स्पष्टीकरण देता येईल पण माझ्या मते ते अनावश्यक आहे. एरवी या गीतातील बहुतांशी शब्द दोन वा तीन अक्षरी आहेत.

याऊलट "मेरा कुछ सामान" मधे पंचमदांनी निव्वळ बासरी न वापरता अधुनिक जवळ जवळ सर्व वाद्यांचा (तरिही प्रामुख्याने सरोद, बेस गिटार, क्सायलोफोन, सतार) चा वापर करून त्या गाण्याचा अस्वस्थ करून सोडणारा मूड ज्या प्रकारे संगीतातून प्रकट केला आहे त्याला तोड नाही. किंबहुना गुलजारच्या नेहेमीच्या वापरातील शब्द जे अन्यथा गीतात तसेच वापरायचे तर संगीतकाराचा गोंधळ उडू शकतो असे शब्द पंचमदांनी न बदलता देखिल तसेच ठेवून कुठेही गाण्याचा तोल वा मूड सुटू दिलेला नाही निव्वळ या एकाच बाबतीतही ते ईतरांपेक्षा महान ठरतात.

आणि जुन्या कॅसेट तंत्राचे म्हणशील तर ते बहुतांशी analogue monotonic कींव्व mono sterio असल्याने त्याचे अलिकडे mp3 digital sterio reproduction करताना मूळ आवाजातील मार्दव, माधुर्य, बरेच वेळा compromise केले जाते. याचे मुख्ख्य कारण म्हणजे frequency mapping. हा एक अतिशय रंजक विषय आहे आणि नेट्जालावर याविषयी माहिती उपलब्ध आहे.

असेच एक आवर्जून audio cassette वर ऐकायचे गाणे म्हणजे "रैना बिती जाये.."

प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 16:31
तेरे बिना झिंदगी से शिकवा या गाण्यात पहिल्या कड्व्यानंतर जे संवाद आहेत संजीव कुमार व सेन बाईंच्या तोंडी ते मात्र नंतर मुद्दामून गाण्यात घात्ले असावेत अशी नेहेमी शंका येते.
कुणाला काही कल्पना/माहिती?
याचे कारणः
१. एकतर ते संवाद संपल्यावर पुन्हा म्युझिक चालू होते ते खूप abrupt वाटते, अगदी आयत्या वेळी एखादी special bogie शेवटी गाडीला जोडली जावी तसाच हिसका बसतो..
२. त्या संवादात "ये जो चांद है ईसे रात मे देखना... "वगैरे उल्लेख झाल्यावर मग तिसरे कडवे "तुम जो केहेदो तो आज की रात चांद डूबेगा नही..." येते. ते justify करायला हे संवाद लिहील्यागत वाटतात.

सर्वात मह्त्वाचे, कुणीतरी संवादातील ही ओळ डीकोड करा रे. अजूनही नक्की कळलेले नाही..
ये जो फुलोंकी बेले नजर आती है दर असल ये अरबी मे xxxxxxxxx...
काय आहे नक्की ते वाक्य?

प्रतिसाद swaatee_ambole | 3 November, 2009 - 22:56
ये अरबी मे आयतें (कुराणातील ओळी) हैं - इन्हें दिन में देखना - साफ नजर आतीं हैं..

प्रतिसाद mansmi18 | 3 November, 2009 - 19:39
ये जो फुलोंकी बेले नजर आती है दर असल ये अरबी मे xxxxxxxxx...
---------------------------------------------------------
ये जो फुलोंकी बेले नजर आती है दर असल ये अरबी मे "आयते" लिखी है..

प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 22:31
स्वाती,
अगदी बरोबर... तेच ऐकू यायचे.. धन्यवाद!
थोडक्यात, त्या एकमेकात गुंफलेल्या वेली म्हणजे जणू अरबीतील आयते आहेत अशी कल्पना आहे तर. छान! शेवटी गुलजारच

प्रतिसाद swaatee_ambole | 3 November, 2009 - 22:50
कल्पना नाहीये योग. माझ्या आठवणीप्रमाणे कुठल्यातरी पडझड झालेल्या वास्तूच्या (खंडहर) भिंतींवर वेलबुट्ट्यांसारख्या दिसणार्‍या आकृत्या या खरंतर आयता आहेत असं तो सांगतो आहे. (ताजमहालाच्या भिंतींवरही आहेत अशा आयता.)

खालच्या फोटोत लाल लंबवर्तुळात दिसतायत तशा.

(फोटोचा प्रताधिकार माझाच )

प्रतिसाद yog | 3 November, 2009 - 22:55
खरच की. बरोबर आहे तुझं.. फोटो पाहून ट्यूब पेटली.
(संवादात तो म्हणतो देखिल, "इन्हे दिन मे देखना साफ नजर आयेगी..").
पण एकंदरीत संवादाबद्दल काय वाटतं? नंतर घुसडल्या सारखा?

प्रतिसाद swaatee_ambole | 3 November, 2009 - 23:19
संवाद त्या प्रसंगासाठी (ते नऊ वर्षांनी इतके निवांत भेटतायत) घुसडला आहे हे खरंच, आणि ते एकवेळ क्षम्य आहे, पण त्यात त्याने 'रोज निकलता है, पर बीचमें अमावस आ जाती है.. वैसे तो अमावस पंद्रह दिन की (??!!) होती है, मगर इस बार बहुत लंबी रही' असं म्हणायचं आणि त्यावर तिने 'नौ बरस लंबी थी ना?' असं विचारायचं हे प्रेक्षकांना जरा फारच स्पूनफीडिंग झालं. गुलजारने हे करायची गरज नव्हती असं वाटतं.

पण त्या गाण्यांसाठी ये भी मंजूर है!

ता. क. : रार, तुझी मूळ चर्चा भरकटवण्यात हातभार लावल्याबद्दल क्षमस्व.

प्रतिसाद shonoo | 3 November, 2009 - 23:24
पण ते म्हणताना तिचा आवाज काय मस्त कापलाय! नऊ वर्षांचा विरह, आठवणी, व्याकुळता सगळं त्या एका वाक्यात आहे. मला तो डायलॉग फार आवडतो..

प्रतिसाद ashwini | 4 November, 2009 - 01:56
मला पण खूप आवडतो. कॉलेजमध्ये असताना एका नाटकात तो आम्ही घेतला होता. त्या संवादासाठी व्हीडीओ आणून आँधी पाहीला होता आणि पुन्हा पुन्हा तेव्हढा भाग पाहून मी तो कापरा आवाज आणण्याचा प्रयत्न केला होता. आँधीतली सगळीच गाणी अप्रतिम होती! अजूनही ते गाणं आणि त्यातला तो संवाद लागला की कॉलेजचे दिवस आठवतात.

cinderella | 4 November, 2009 - 02:09
सलाम किजिए गाणं सोडल्यास सगळी गाणी मस्त आहेत

प्रतिसाद deepanjali | 4 November, 2009 - 02:45
याचे कारणः
१. एकतर ते संवाद संपल्यावर पुन्हा म्युझिक चालू होते ते खूप abrupt वाटते, अगदी आयत्या वेळी एखादी special bogie शेवटी गाडीला जोडली जावी तसाच हिसका बसतो..
<<<<

उलट मला तर ज्या प्रकारे ते गाणं जातं तेच आवडतं !!
तो मधला किर्र रात्रीचा फीलसकट येणारा डॉयलॉग (आणि हे गाणं पण बरोबर रात्री बेला के फूल ला बरेचदा लागायचं:)) , त्या साठी अचानक गाणं थांबणं आणि नंतर अचानक सुरु होण हेच तर गाण्याची 'जान' वाटतं ( तस् पण पूर्णं गाणं हे बॅक्ग्राउंड ला आहे, फिल्मी स्टाइल संजीव कुमार्-सुचित्रा सेन गात नाहीत, त्यामुळे गाणं म्हणजे फक्त त्या दोघांच् मनोगत! )

तुम जो केहेदो तो आज की रात चांद डूबेगा नही..." येते. ते justify करायला हे संवाद लिहील्यागत वाटतात.

<<< Well, असेलही.
पण अगदीच डॉयलॉग संपल्यावर नाही येत ते कडवं.
त्या डॉयलॉग नंतर आधी " जी मे आता है तेरे दामन मे सर झुकाके हम रोते रहे रोते रहे, तेरे ही आंखोमे ऑसूआँकी नमी तो नही " हे येतं मग धृवपद आणि मग संजीव कुमार चं आय मीन किशोर कुमार चं कडवं आहे .

प्रतिसाद bee | 4 November, 2009 - 08:55
मला देखील दीपांजली सारखचं वाटतं. तो संवाद तर गाण्याचा खराखुरा प्राण आहे.

प्रतिसाद bee | 4 November, 2009 - 08:56
पण ती अभिनेत्री सेन ही मालासिन्हा सारखीच दिसते. मला अलिकडेच माहिती पडले की ती माला सिन्हा नाही तर सेन आहे

प्रतिसाद madhavm | 4 November, 2009 - 09:00
सिंड्रेलाला १०० मोदक. इतक फालतू गाण का घातलय तेच कळत नाही. त्यातली सगळी मस्त गाणी आर.डी. ने किशोरला दिली आहेत आणि हे मात्र रफीला.

प्रतिसाद yog | 4 November, 2009 - 10:14
DJ,

>तो मधला किर्र रात्रीचा फीलसकट येणारा डॉयलॉग (आणि हे गाणं पण बरोबर रात्री बेला के फूल ला बरेचदा लागायचं:)) , त्या साठी अचानक गाणं थांबणं आणि नंतर अचानक सुरु होण हेच तर गाण्याची 'जान' वाटतं
तसं असेलही... पण (मला) गाण्याची लय तुटल्या सारखी वाटते.
असो. रार, तुझ्या मूळ लेखाला चांगलच भरकटवलं.. दिलगीर!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol..प्रिया राजवंश वरून आठवलं Proud
Ma'm tussauds मधला ऐश्वर्या राय चा पुतळा प्रिया राजवंश + राखि सावन्त सारखा बनलाय Biggrin

ऐश्वर्या राय चा पुतळा प्रिया राजवंश + राखि सावन्त सारखा बनलाय

नो वंडर... ऐश्वर्याचा चेहराही या दोघींसारखाच अगदी एकाच बॅचमधल्या टाकाऊ प्लॅस्टीकने बनवल्यासारखा वाटतो.

ती हम दिल.. मधली सुंदर ऐश्वर्या कुठे हरवली देव जाणे.. Sad

मला अतिशय खटकणारं अप्रतीम गाणं म्हणजे झनक झनक तोरी बाजे पायलिया...मेरे हुझूर चित्रपटाचं हे अतिशय सुंदर गाणं चित्रीत केलं गेलयं तवायफ च्या कोठ्यावर. नायक (राजकुमार) मुसलमान आहे हे दाखवून पूर्ण चित्रपटात तो उर्दूतून संवाद म्हणतो आणि ह्याच एका गाण्यात अगदी शुद्ध हिन्दी! त्यावर त्या साईड हिरोईन्स ने जो काय हिडीस नृत्य केलाय तो अगदी कळस आहे. त्यात ही गाण्याची सिचुएशन काय तर नायिकेने त्याला नाकारलय आणि त्याचा दिल वगैरे तूटल्या मुळे तो गम गलत करायला कोठ्यावर आलाय.

एका अप्रतीम गाण्याची ह्याहून जास्त विटंबना ती काय व्हावी असं वाटतं ते गाणं पाहून!

http://www.youtube.com/watch?v=0qpIQygF-VQ

'रात कली एक ख्वाब मे आयी' : अत्यंत वाइट दिसतं बघायला !
कसली ती कली(!) आणि तो नवीन निश्चल Sad

जानेमन जानेमन तेरे दो नयनः
ऐकायला अतिशय सुंदर मेलोडियस गाणं पण बघताना 'विद्या सिन्हा'... घोर निराशा !!

बघताना 'विद्या सिन्हा'... घोर निराशा !! >> सध्या 'सजन घर जाना है' ह्या फुटकळ मालिकेत एक फुटकळ रोल करते आहे विद्या सिन्हा .... चेहरा ओळखीचा वाटला म्हणून लक्ष देऊन बघितलं तर तीच होती ,रजनीगंधामुळे लक्षात राहीली होती ....विषयांतराबद्दल् क्षमस्व.
काका,चांगली चर्चा चालू केल्याबद्दल धन्यवाद Happy

मध्यंतरी कुठल्याशा चॅनेलवर 'रणवीर, विनय और कौन?" कार्यक्रमात शंकर एहसान लॉय ची मुलाखत होती. त्यात ते 'ये क्या हो रहा है' सिनेमा विषयी म्हणाले की कष्ट घेऊन गाणी दिली आणि पडद्यावर जेंव्हा पाहिली तेंव्हा काहितरी सेमी पॉर्न असल्यासारखी शूट केली होती त्यामुळे भलती निराशा आली होती...

हिरॉईनने तोंडं वेडीवाकडी ताणून गाण्याची लावलेली वाट ह्यामधे जयाचं (आणि रणधिरचंही) अजून एक गाणं म्हणजे जवानी दिवानीतलं ' जा ने जां.. धूंडता फिर रहा..' आरडीच्या बेस्ट कॉम्पोझिशनचा सत्यानाश केलाय त्या सगळ्याच गाण्याच्या चित्रणात.

अजून एक सध्याच्या काळातलं वर्स्ट पिक्चराईज्ड सॉन्गचं अ‍ॅवार्ड जाऊ शकतं 'धागे तोड लाओ चांदनी से नूरके.. बोल ना हल्के हल्के..' या गुलझारच्या सुंदर लिरिक्स असलेल्या गाण्याला. झूम बराबर झूम नावाच्या टुकार सिनेमात अभिषेक आणि प्रिटी आणि तो कोण जो दिग्दर्शक्/कोरिओग्राफर असेल त्याने का-ही-ही कल्पनाशक्ती न वापरता हे गाण पडद्यावर आणलय.

स्क्सिटिज्-सेव्हन्टीज मधे तर अशी य गाणी आहेत माठ हिरो-हिरॉईन्सने वाट लावलेली. एटीज-नाईन्टीजमधली गाणीच एक से एक सुमार होती काही अपवाद वगळता त्यामुळे काही आठवत नाहीत Proud

गाण्यांच्या पिक्चराय्झेशन मधली दोन दादा माणसं मला आता पटकन आठवताहेत.कितीही माठ अभिनेता/नेत्री असो. एक म्हणजे राज कपूर. आणि दुसरा विजय आनन्द... (आणखीही असतील)

dj, वहिदा, माधुरी दोघीही अतिशय matured चेहर्‍याच्या आणि व्यक्तिमत्त्वाच्या आहेत.
सुचित्रा सेन थोडी माला सिन्हा सारखी दिसते या मताला मोदक.

अजून एक गाणं म्हणजे ' रिम झिम गिरे सावन...". गाणं ऐकतांना कसं काळजात घुसतं. संपूर्णपणे गाण्याच्या ( शब्दांच्या) मूडमधे शिरायला होतं. इतकं सुंदर गाणं पार वाया घालंवलंय शूटींग मधे.

बर हिरो हिरवीणींवर घसरु नका रे. तशी अनेक गाणी निघतील. मलाही रहावले नाही.

तेरी आँखों के सिवा दुनिया में रक्खा क्या है, ये उठें सुबह चले, ये झुकें शाम ढले
>>> गाणारा सुनिल दत्त (उर्फ बनपाव) व आशा पारेख. हीचे डोळे त्यावेळी लालेलाल आहेत.

ऐश्वर्या राय चा पुतळा प्रिया राजवंश + राखि सावन्त सारखा बनलाय >>> Rofl अगदी अगदी. बच्चन तर अलिबाबा व चाळीस चोर कार्टुनमधल्या एका पात्रासारखा दिसतो. Proud

इतकं सुंदर गाणं पार वाया घालंवलंय शूटींग मधे.>>>
Uhoh गिर्‍याची लिंक दिली पाहीजे खर तर. मग हे मत बदलेल.

रफीचं 'पलकोंके पिछे से क्या तुमने कह डाला फिरसे तो फर्माना' ऐकायला अप्रतीम पण तो राजेंद्र कुमार पडद्यावर दिसला की साफ मूड जातो.

मिलो ना तुमको हम घबराये.. हे हिर रांझा मधले राजकुमार- प्रिया राजवंश वर चित्रित केले गेलेल गाणे!>>

मुकुंदाच्या पोस्टमधले हे गाणे (मिलो ना तुम तो) .... This one takes the cake Sad ते हिर रांझा बघून ती प्रेम कथा अपूर्ण का राहिली त्याचा उलगडा होतो Happy

>>मिलो ना तुमको
तुमको??
मिलो ना तुम तो
रॉबिनहूडने मागे अजून तारे तोडलेत 'मिले ना तुमसे तो हम घबराये' म्हणे! (निदान हिंदी तरी बरोबर आहे. :फिदी:)
असे खून करु नका, नाहीतर इथे तेच खटकायला लागेल.

असंच एक गाणं 'ढल गया दिन'. इतकं गोड वाटतं ऐकायला, पण ते काय खेळताहेत बॅकग्राउंडाला? कसला बिन्डोकपणा!

'ढल गया दिन' .. भजी तळताना पण चाललं असतं. Lol

खटकलेलं नाही पण 'धुंद मधुमती...' हे 'किचकवध' मधे पाहिल्यावर माझ्या बालमनाला असला धक्का बसला होता....

विनय Happy

मृ अग ढल गया दिन मधे तो मिस न करता येण्यासारखा 'ट्टॉक' आवाज पण आहे की, ते गाणं त्याच हेतूने बनवलंय अन तिथे टाकलंय. जितूभाय चा खेळ कसाही दिसला तरी गाण्याला मिस्मॅच नाहिये Happy

दस्तक मधले "माई री मै कासे कहुँ पीर अपने जिया की" चे चित्रण खटकले नाही तरी त्या गाण्याएवढे अप्रतिम नाही वाटले.

खटकलेलं नाही पण 'धुंद मधुमती...' हे 'किचकवध' मधे पाहिल्यावर माझ्या बालमनाला असला धक्का बसला होता....

ह्या गाण्याने माझी खुप निराशा केलीय. माझे अतिशय आवडते गाणे आहे हे. मी बरेच दिवस हे गाणे केवळ ऐकलेले. जेव्हा प्रत्यक्ष पाहिले, मुख्य म्हणजे द्रौपदीला पाहिले तेव्हा अक्षरक्ष: पडलेच. हिच्यासाठी कीचक वेडा झाला Uhoh कैच्याकैच...

अमृता ,
जानी हम तो गन्ना खायेंगे , या तो लोहेका पाईप खायेंगे, आपको क्या फर्क पडता है.?

रिमझिम गिरे सावन हे माझ अत्यंत आवडत गाण... लता पेक्षा किशोरच जास्त आवडत.. अतिशय हुरहुर जागवणार गाण. त्याच चित्रीकरण मैफिलीत आहे. त्यातही तिला आधी तो पाठलाग करणारा लोफर वाटलेला असतो आणि भरभर तिच्या पुढे निघुन जातो तो प्रसंग गोड वाटतो. Happy

http://www.youtube.com/watch?v=5VzUxxa0c2I

लताच गाण थोड फास्ट आहे पण चित्रिकरण त्याच सुंदर झालय.
वरच्या लिंक गिरीशने केलेल वर्णन वाचल.. मस्तच.
http://www.youtube.com/watch?v=JKjViN8Jzb0

युट्युब नसत तर इथल आयुष्य किती बोअर झाल असत. Happy

गुलजारची चाहते बरेच आहेत. ह्याच्यावरून एक किस्सा आठवला, माझी एक मैत्रीण जी जरा चांगलीच गाते. ती नेहमी रात्री अशीच घरी मैफील जमली की एकेक फक्त गुलजारची गाणी गायची, आणी अगदी न चुकता दर वेळी राखीच्या नावाने शेवटी शिव्या. का तर, अरे गुलजारजी जैसे गीतकर को उस राखी मे क्या नजर आया करून. रोजचा प्रोग्रॅम असायचा हा. Happy

Pages