इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.
काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.
तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू. 
याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.
पेट्रोल पम्पाचा सिम्बॉल
पेट्रोल पम्पाचा सिम्बॉल स्पीडो कन्सोल मध्ये झळकला कीच समजायच!!!!!
सिम्बॉल स्पीडो कन्सोल मध्ये
सिम्बॉल स्पीडो कन्सोल मध्ये झळकला कीच समजायच!!!!!>> ओक्के.

आता लक्षात ठेवेन रे. धन्यवाद.
अति चिकित्सा वाइट.
जनरली दुचाकी मध्ये पेट्रोलचा जो काटा असतो तो पुर्ण विश्वास ठेवण्यापात्र कॅलेब्रेटेड नसतो.
त्यामुळे चारचाकीत देखील त्या सिम्बॉलवर कितपत विश्वास ठेवायचा ह्यामुळे कन्फ्युजन झाले.
हिम्याची मेथड चांगली आहे कारण
हिम्याची मेथड चांगली आहे कारण मी ही तीच वापरतो
पण ज्ञानेशच्या मेथड मध्ये एक अॅडिशन सुचवू इच्छितो.
टॉप अप मेथड
१ टँक फुल - किलोमिटर नोंद
२. अर्धा टँक आला की परत टॉप अप ( अर्धाच यायला पाहिजे असे काही नाही, अर्ध्याच्या जवळ आला किंवा खाली थोडा गेला तरी चालेल) -
३. अर्धा टँक झाला की परत किलोमिटर नोंद ह्यातून पहिली किलोमिटर नोंद वजा भागिले एकुण भरलेले लिटर
अगदी परफेक्शनला करायचे असेल तर आणखी एकदा १,२ फॉलो करायचे व दोन्हीवेळेसचे किमी / तेल
टँक टू टँक गाडीचे किमी काढण्यात एक गोची होते ती म्हणजे गाडीचे वजन नेहमी कमी होते व मायलेज थोडे वाढल्यासारखे वाटते. पण टॉप अप मेथड मध्ये तसे होत नाही. आपण टँक दोनदा फुल करतो व दोनदा अर्धा होतो व दोन वेळेसचे हे अॅव्हरेज निघते. व गाडीत अर्धा टँक असल्यामुळे "लोड" विचारात घेतला जातो. शेवटी अॅव्हरेज हे वजनावर डिपेंड आहेच.
आमच्या भूतपूर्व टवेराबरोबर जे
आमच्या भूतपूर्व टवेराबरोबर जे साहित्य आले होते त्यात हेच एक्झॅक्टली १०० किमी ला करा असे लिहीले होते. म्हणजे टाकी फुल्ल, १०० किमी जा आणि लगेच पेट्रोल भरा... मग करा भागाकार वगैरे.
फोर्डची नवी अर्बन एस्युव्ही
फोर्डची नवी अर्बन एस्युव्ही इकोस्पोर्ट कशी आहे? मला तिचे लूक्स आणि इंटेरिअर खूप आवड्लेय. बाकी कशी आहे?
.
.
जुनी घेतलेली वॅगन आर नीटनेटकी
जुनी घेतलेली वॅगन आर नीटनेटकी सुरु आहे.
फ्री चेच्क अप कॅम्प मध्ये चेक करुन घेतली होती.
त्यानेही सर्व ठीक आहे. फक्त थोड्याश्या प्रमाणात क्लच शॅटरीन्ग होतं असा रिपोर्ट दिलाय.
त्याने क्लच प्लेट आणि प्रेशर प्लेट बदलुन घ्या असा सल्ला दिलाय.
मला क्लच शॅटरीन्ग क्वचित जाणवतं.
दिवाळीनंतर घेइन बदलुन.
क्लच शॅटरीन्ग म्हणजे काय?
क्लच शॅटरीन्ग म्हणजे काय?
क्लच शॅटरीन्ग म्हणजे काय?>>>
क्लच शॅटरीन्ग म्हणजे काय?>>> हा शब्द त्या सर्व्हीस सेन्टर वाल्याने वापरला बॉ.
पण क्लच सोडुन अॅक्सलरेटर देताना गाडीची थरथर (जास्त प्रमाणात) ह्याला त्याने हा शब्द वापरलाय असं मला वाटतय.
बा द वे, गाडीचं मायलेज चांगलं मिळण्यासाठी गाडी कशी चालवावी?
कोणत्या गीअरला?
मी अजुन बर्यापैकी नवीनच चालक असल्याने मायलेज फार फुसकं मिळतय.
झकासराव, क्लच प्लेट प्रेशर
झकासराव,
(यासाठी मी डीझेल गाड्यांचा फॅन आहे)
क्लच प्लेट प्रेशर प्लेट मिळून बदलायचे रुपये पैसे किती? मायलेज फुसकं म्हणजे किती मिळतं आहे?
शक्य तितक्या लवकर स्वतःला जुने ड्रायव्हर म्हणा, अन हिला काढून नवी गाडी आणा, असा माझा सल्ला. एकदा कामं सुरू झाली, की ग्यारेजखर्चापायी वैताग येईल.
गावातल्या गावात ड्रायव्हिंग असेल, तर १-२-३ च्या वर जाणे कठीण असते. टॉपवर गाडी गेली तर नशीब अन सुपरटॉप म्हणजे डोक्यावरून पाणी. त्यामुळे अॅव्हरेजही कमी मिळते. त्याला इलाज नसतो. यावर उन्हाळा आपल्याकडे वर्षाचे ८ महिने असतो. त्यामुळे गाडी सिग्नलला उभी, किंवा लो गियरला हळूहळू. प्लस एसी चालू = पेट्रोल
(रच्याकने ते क्लच 'चॅटरिंग' आहे. तुम्हाला जाणवणारे व्हायब्रेशन या अर्थी ते आहे हे बरोबर. इथे अधिक माहिती)
क्लच प्लेट प्रेशर प्लेट मिळून
क्लच प्लेट प्रेशर प्लेट मिळून बदलायचे रुपये पैसे किती? मायलेज फुसकं म्हणजे किती मिळतं आहे?>>>
रु ४५०० अंदाजे
आता तर १० च मिळालय.
अर्थात मी तितकीशी सफाइदार पणे चालवत असेन असं वाटत नाही.
तर १-२-३ च्या वर जाणे कठीण असते>>> हो मलाही २-३ वरच जावं लागतं.
काही ठिकाणी सिग्नल आहे तिथे १ वरच.
लिन्क बघतो.
एसी मी फारसा वापरत नाहिये.
पाउस असेल म्हणुन खिडक्या बंद असतील तर नाइलाजानेच.
केटीएम ड्युक ३९०. ख-त-र-ना-क
केटीएम ड्युक ३९०.
ख-त-र-ना-क मशिन आहे. किंमत मोहात पाडतेय. (पण बुलेट घेणे स्वप्न असल्याने सध्या बुलेटसाठी सेविंग करतोय. दोन्ही घेणे सध्यातरी शक्य नाहीये.)
ड्युक घ्यावी का?
खासकरून बुलेटिअर्सचा सल्ला हवाय.
माझ्या एका ओळखीतल्या मुलाने
माझ्या एका ओळखीतल्या मुलाने केटीएम ड्युक बुक केलीये. फेसबुकावर रोज कौतुकमिश्रित फोटो बघतेय मी त्या बाईकचे.
बुक करताच फोटोसेशन?
बुक करताच फोटोसेशन?
तो असे साईटवरचे वै फोटो
तो असे साईटवरचे वै फोटो टाकतोय. पण तो आहे फोटोग्राफरच, त्यामुळे गाडी हातात येताच त्याचेही येतीलच. प्रचंड वेडा आहे तो कार्स आणि बाईकचा.
झकासराव, सीटीत मायलेज मिळत
झकासराव, सीटीत मायलेज मिळत नाही हे वैश्विक सत्य आहे.हायवेला मायलेज वाढवायची एक पद्धत ऐकली होती. टॉप गियरमध्ये गाडी शंभरच्यावर न्यायची, गेअर न्युट्रल करायचा. इंजिन चालुच ठेवायचे व स्पीड खाली येऊ द्यायचे .७५, ८० च्या आसपास स्पीड आले की परत टॉप गियरमध्ये गाडी घ्यायची. याने २ ते ३ कीमी पर लीटर मायलेज जास्त मिळते.
गाडी कुठेही चालवताना चुकूनही
गाडी कुठेही चालवताना चुकूनही न्यूट्रल मध्ये चालवू नये.. गाडी वर कंट्रोल ठेवण्याचा सगळ्यात मोठा ऑप्शन बाद असतो.. गियर चेंज करुन गाडी ब्रेक बरोबरीनेच कंट्रोल करता येते.. त्यामुळे मायलेज मिळाले नाही तरी चालेल.. अॅक्सिडेंट झाल्यावर कसलं मायलेज आणि कसलं काय अशी परिस्थिती व्ह्यायची..
झकास.. वॅगन आर घेतलीस तेव्हा मायलेज काय सांगितले होते विकणार्यानी? म्हणजे अॅव्हरेज तू चालवायला लागल्यापासून कमी झालाय की आधीपासूनच कमी आहे??
गाडी कुठेही चालवताना चुकूनही
गाडी कुठेही चालवताना चुकूनही न्यूट्रल मध्ये चालवू नये..
<<
हजारो अनुमोदने!
ड्युक घ्यावी का? डोळा
ड्युक घ्यावी का? डोळा मारा
खासकरून बुलेटिअर्सचा सल्ला हवाय.>>> माझ्याकडे दोन्ही नाहियेत.
पण तरिही सल्ला देतो.
फुकटच आहे. तुम्हाला फायदा फुकट सल्ल्याचा.
आणि मला फायदा ज्ञान पाजळण्याचा.
दोन्ही गाड्या प्रचंड वेगळ्या क्लास मधल्या आहेत.
एक आहे स्पोर्टी रेसर कम ऑफ रोडर बाइक. (केटीम)
तर एक आहे क्रुजर स्टाइल बाइक. (बुलेट)
केटीम स्पोर्टी रेसर बाइक असल्याने तीचा पर्फॉरम्न्स कर्व्ह त्या हिशेबात असणार.
बुलेट लो आर पी एम गाडी आहे.
आपल्याला काय चालवायला आवडते (रेसर की क्रुजर) त्यानुसार घ्या.
बुलेट सोबत आपली लहाणपणापासुनची स्वप्न जोडली गेल्याने त्याचं पारडं वरचढ झालं तरी मला आश्चर्य वाटणार नाही.
म्हणजे अॅव्हरेज तू चालवायला लागल्यापासून कमी झालाय की आधीपासूनच कमी आहे??>>>> मी चालवायला लागल्यापसुनच कमी आहे. १५ पर्यंत मिळतं शहरात अस त्यानी सांगितलेलं.
याने २ ते ३ कीमी पर लीटर मायलेज जास्त मिळते>>> मरो ते एव्हरेज. ह्या स्पीड (खरतर ४० च्या पुढेच) ला हे फारच डेन्जर आहे.
गाडी कुठेही चालवताना चुकूनही
गाडी कुठेही चालवताना चुकूनही न्यूट्रल मध्ये चालवू नये.. >> +१
क्लच प्लेट प्रेशर प्लेट मिळून बदलायचे रुपये पैसे किती? मायलेज फुसकं म्हणजे किती मिळतं आहे?>>>
रु ४५०० अंदाजे >> ठिक आहे.
बा द वे, गाडीचं मायलेज चांगलं मिळण्यासाठी गाडी कशी चालवावी? >>
1st - 10 KM/Hr
2nd - 20 KM/Hr
3rd - 30-40 KM/Hr
4th - 40-60 KM/Hr
5th - 60-80 KM/Hr
हा सल्ला मारुती कंपनीने दिलेला आहे. त्या नुसार 20 KM/Ltr. असा मायलेज देते.
केटीएम ड्युक ३९०. ख-त-र-ना-क
केटीएम ड्युक ३९०.
ख-त-र-ना-क मशिन आहे. >> +१. किंमतीमध्ये ही बराच फरक आहे बुलेट आणि ड्युकमध्ये. ड्युक - १, ८०, ०००/- ३९० च्या खालची ड्युक पण मस्त आहे.
लुक वरुन ड्युक आणी बुलेटमध्ये माझे मत ड्युक ला.
दोन्ही गाड्या प्रचंड वेगळ्या
दोन्ही गाड्या प्रचंड वेगळ्या क्लास मधल्या आहेत. +१
आपल्याला काय चालवायला आवडते (रेसर की क्रुजर) त्यानुसार घ्या. +१
अजुन ड्युक चालवायचा (पळवायचा) चान्स आला नाही.
आता तर १० च मिळालय >> झकास..
आता तर १० च मिळालय >> झकास.. वॅगन आरला १० म्हणजे फारच कमी झाले. माझी SX4 पन ९-१० पर्यंत द्यायची शहरात. तू कुठल्या पध्दतीनं अॅव्हरेज काढतोयस ते एकदा तपासून घे शिवाय चांगल्या मेकॅनिकला दाखवून बघ एकदा.
गाडी कुठेही चालवताना चुकूनही न्यूट्रल मध्ये चालवू नये >> अगदी...
ड्युक आणी बुलेट झकासराव
ड्युक आणी बुलेट
झकासराव .
२००८ पासून बुलेट वापरत आहे ..८०००० किमी झालेत ... त्या पूर्वी सी बी झी वापरत होतो..
डोळे झाकून बुलेट ला मत आहे..
ऑन रोड ऑफ रोड ..रीलायबल ..आणि लांबच्या प्रवासाला आनंददायक ..
इंस्टंट पिक अप कमी आहे ..पण टॉप स्पीड , बॅलन्स चांगला आहे ..
बायको , मुले आणि फॅमिली मधले इतर कोणीही बसू शकते मागच्या सीट वर ..
ड्युक वर साडी नेसून एखद्या स्त्रीला बसता येईल का ? शंका आहे ..
गाडीचा लाईफः बुलेट घ्या ...२५ वर्षे तरी काळजी नाही ..
आणि शेवटी "फील" ...बुलेट वर बसताना जो फील आहे ना , तो बाकी कशात नाही बघा
मी गेल्या दोन वर्षापासून Ritz
मी गेल्या दोन वर्षापासून Ritz VDI (डीझेल) वापरतो आहे. गाडी बुक केल्यावर ड्रायव्हिंग क्लास लावला होता. त्यापूर्वी क्लच कुठे असतो आणि ब्रेक कसा मारायचा हे सुद्धा माहित नव्हते. असा सगळा उजेड असल्याने सुरुवातीला मायलेज वगैरे काही भानगड ठेवली नव्हती. हात चांगला साफ झाल्यावर भावाच्या सल्ल्याने चांगल्या ड्रायव्हिंग सवयी लावून घेतल्या. (भाऊ डीझेल इंजिन development/testing करणाऱ्या इटालियन कंपनीत R & D चे काम करतो) हायवेवर अतिशय संयमाने, वेगाचे भूत अंगावर न घेता 70 KMPH च्या वेगाने गाडी चालवून 300 किलोमीटर प्रवासात एसी न वापरता मला चार वेळा 26, 26.5 KMPL चे मायलेज मिळाले होते. त्यानंतर मायलेज चेक करणे सोडून दिले, ड्रायव्हिंग सवयी त्याच कायम ठेवल्या आहेत. मला वाटते 70 KMPH ही वेगमर्यादा भारतीय परिस्थितीत आदर्श आहे. सुरक्षित, इंधनस्नेही आणि गाडीची झीजही कमी. बर्याच वेळा 90-100 च्या वेगाने ओवरटेक करून पुढे गेलेली गाडी हायवेवर त्याच प्रवासात पुढे कधीतरी गाठ पडतेच त्यामुळे असुरक्षित वेगाने गाडी चालवून प्रवास लवकर संपतो असेही म्हणता येणार नाही. नाहीतरी घरी लवकर पोचून असे काय तीर मारायचे असतात? पुणे मुंबई द्रुतगती वर सुद्धा 80 KMPH ही अधिकृत मर्यादा असतानाही बहुतेक जण 100 च्या पुढेच असतात. त्यामुळे माझ्यापुरते तरी safety first, 70 KMPH is best!
हायवेला ७० चा वेग मला तरी ३०
हायवेला ७० चा वेग मला तरी ३० असल्यासारखा भासतो काय करावे .(गाडी तीसने चालवल्यास ७०चा भास होईल का?
)
@झकासराव, स्वाती, निवांत,
@झकासराव, स्वाती, निवांत, शाहीर-
सल्ल्याबद्दल धन्यवाद. तसाही माझा कल बुलेटकडे जास्त आहे. दोन्ही गाड्या वेगळ्या सेगमेन्टला अपील करणार्या आहेत, याची कल्पना आहे. ड्युक २०० चालवली होती, आवडली होती. ३९० चालवली नाही अजून. पण जवळपास "पावणेतीनशे बीएच्पी पर टन" असा पावर टू वेट रेशो असल्याने, फक्त १५४ किलो वजन, ३७५ सीसी इंजिन, आणि किंमत जवळपास सारखीच (थंडरबर्ड ५०० सोबत तुलना) असल्याने मोह होतो आहे.
ड्युक इज अ गुड डील, इंडीड.
कदाचित मी ८-१० वर्षांनी तरूण असतो, तर डोळे झाकून ड्युक घेतली असती. (म्हणजे मागीतली असती.. ;))
पण नुकतीच तिशी गाठलीये, (आणि लग्नही झालेय)... तेव्हा बुलेटला प्राधान्य द्यावे म्हणतो !
------------------------------------------------------------
@दादुमामा-
माझ्याकडे पण आहे रिट्स वीडीआय ! मला कायम २० ते २२ च्या दरम्यान मायलेज मिळते.
२६ म्हणजे टू मच ! अभिनंदन तुमचे - हायवेला हातात रिट्स असतांना ७० क्रॉस न करण्यासाठी जो मनोनिग्रह लागतो, त्याबद्दल !
मी नवीन A-star Vxi घेतली आणि
मी नवीन A-star Vxi घेतली आणि ती माझ्या मावस भावाला दिली आणि त्याच्याकडून त्याची Swift Zxi (नोव्हे २००९ ची ) घेतली, Astar चे मी ३ लाख पे केले बाकीचे भावानी दिले म्हणजे मला ती Swift Zxi ३ लाखाला पडली. स्विफ्ट चा पंखा असल्याने घेतली नवीन साठी बजेट नव्हते आणि भावाला कमी पावर आणि मायलेज चांगली देणारी गाडी हवी होती (Astar - 1000 सी सी Swift- १३०० सीसी ) म्हणून हा एक्सचेंज…माझी डील योग्य होती काय ?
चांगली मिळाली की.
चांगली मिळाली की.
इंडीका ई व्ही २ (डीझेल)
इंडीका ई व्ही २ (डीझेल) घेतली ..
४ पॉवर विंडोस..
पॉवर स्टीयरींग , ए सी , हीटर, एलॉय व्हील , इन बिल्ट म्युझिक सिस्टीम , फॉग लँप्स, स्पॉयलर , रीमोट लॉकींग, सेंट्रल लॉकिंग आहे
५,२५,०००
शिवाय अॅक्सेसरीस मध्ये
मॅट्स,
बॉडी कोटींग
ईंजिन कोटींग
साईड पट्ट्या ,
सीट कव्हर,
गाडी कव्हर आणि एअर फ्रेशनर
मिळाल्या ( घेतल्या ...चांगलीच घासाघीस करून )
शिवाय
बंपर टू बंपर इंशुरन्स ( ग्लास आणि फायबर १००% ) अपग्रेड करून घेतला
गाडी टँक फुल्ल ( २५ लि ) मिळाली ..
-------------------------------------------------------
गाडी मध्ये ग्लास होल्डर नाहियेत , रीयर आर्म रेस्ट नाहियेत
बाकी २५ चा अॅव्हरेज सांगितला आहे ..बघु या किती मिळतो ते !!
Pages