इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.
काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.
तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू. 
याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.
गियर्सचं झंझट का वाटतं? मला
गियर्सचं झंझट का वाटतं?
)
मला तरी गियर्समुळे गाडी आपल्या कंट्रोलमधे राहते असं वाटतं. (हा नुसताच फिलगुड फॅक्टर असू शकतो म्हणा!
गियर्सचं झंझट का वाटतं? >>>
गियर्सचं झंझट का वाटतं? >>> मुंबईत वाढल्यामुळे गाडी शिकले भारताबाहेर गेल्यावर. बिना गियर्सची. ऑटोमॅटिक आधी चालवली की मॅन्युअल झंझट वाटते. शिवाय ड्रायव्हिंगची मुळात आवड नाही. नवर्याने भारतात भरपूर गाडी चालवली होती तर त्याला काहीच फरक पडत नाही. भारतात लँड झाल्याक्षणी गाडी चालवायला लागतो
हेलबॉय, तसेच वाटते आहे.
ऑर्किड, मघाशी लिहायचे राहिले. सँट्रोत पुढे-मागे एकाच वेळी उंच माणसांना बसणे कठीण जाते ( तसे ते कुठल्याही छोट्या गाडीत होत असणार. ) पुढच्या सीटवरचा उंच नसेल तर मग मागे स्पेस मिळते.
ह्म्म मी उसगावात एकदाच १०
ह्म्म मी उसगावात एकदाच १० मिनिटे चालवली होती ऑटोमॅटिक. ते काही धरण्यासारखं नाही. कदाचित ती सवय असती तर मलाही वाटले असते असेच.
नवीन व्हिस्टा चांगली आहे.
नवीन व्हिस्टा चांगली आहे. टाटाच्या ASS चे काही वाटत नसेल तर ती नक्कीच एक रिलायेबल कार आहे.
तसेच टाईम टेस्टेड आय २० चांगली आहे. जागाही थोडी जास्त मिळेल. त्यातही ऑटो ट्रान्स घेतली की साधारण एक लाख जास्त द्यावे लागतील. मग त्या किमतीत अमेझ आणि सन्नी बेस पण मिळेल. ऑटो मध्ये तू नक्कीच निसानची मायक्रा चालवून बघ. लव्हली कार.
माफ कर केदार पण मायक्रा
माफ कर केदार पण मायक्रा केवढीश्शी आहे. मी ज्या मायक्रात बसलेय त्यात मला पण मागच्या सीटवर बसल्यावर लेगरूम इनफ मिळत नाही.
सध्या तरी ऑटोमॅटिक नाही घेणार
सध्या तरी ऑटोमॅटिक नाही घेणार आहोत.
निस्सान मायक्रा बघते
नीरजा, मी आत्ता लिहिता लिहिता थांबले कारण युकेत दिसणार्या मायक्रा खरंच खूप लहान आहेत. इन फॅक्ट कूपे आहे ती. पण कारदेखो वर वाचलं तर मायक्राचे डायमेन्शन्स मी बघत असलेल्या इतर मॉडेल्सपेक्षा फार वेगळे नाही वाटले. प्रत्यक्ष बघून जास्त कळतं हे नक्कीच
बेसिकली आम्हाला आल्या आल्या गाडीची निकड भासणार आहे त्यामुळे दोन-तीन मॉडेल्स शॉर्टलिस्ट करायची आणि आल्या आल्या लगेच टेस्ट ड्राईव्ह घेऊन डिसिजन घ्यायचा असा बेत आहे. फार वेळ लागेल नाहीतर
अगो , बरोबर तसेच होते.सँट्रो
अगो , बरोबर तसेच होते.सँट्रो घेतली त्यावेळी झेन सुद्धा बघितली पण तिच्या पुढच्या सीट वर घरातल्या सर्वात उंच (६.३ फुट) ड्रायव्हरला नीट बसता आले नाही म्हणून कॅन्सल.
उंची, स्पेस, लेगरूम या
उंची, स्पेस, लेगरूम या संदर्भाने मी तुला मायक्रा नको असे सुचवेन.
गाडीचे इंजिन आणि इतर स्पेसिफिकेशन्स कितीही ग्रेट असली तरी त्यात बसण्याचा, चालवण्याचा कम्फर्ट मिळत नसेल तर काय फायदा!
माफ कर केदार पण मायक्रा
माफ कर केदार पण मायक्रा केवढीश्शी आहे >>> त्यात माफ काय. तो तुझा व्हियू असू शकतो. मोठ्या गाडीशी कम्पेअर केल्यावर ती छोटी वाटेन.
हे बघ. त्या सेगमेंट मध्ये ती मोठी आहे. पण इंजिन मात्र स्विफ्टचे मोठे आहे.
मी मायक्रा किंवा सन्नी बरेचदा सुचवतो कारण मी निसानला बायस आहे. त्यांच्या गाड्या मला नेहमीच चांगल्या वाटल्या आहेत. अर्थात इव्हालिया सोडून.
माझे मत व्हिस्टा
माझे मत व्हिस्टा ला.
कारणे:
१. टाटा फॅन.
२. मजबूत. स्पेशिअस.
३. एक्स्टेन्सिव्ह सर्व्हिस नेटवर्क. माझा अनुभव उत्तम
४. लो मेन्टेनन्स कॉस्ट. ह्युंडाई वाले सालटी काढतात स्पेअर्स अन सर्विस ला.
५. उत्तम रिसेल किम्मत.
६. नवी गाडी प्रमोट करताहेत म्हणून स्वस्तात लै (छोटे छोटे, बेल्स व्हिसल्स टाईप) फीचर्स देताहेत. अगदी फुकट जीपीएस नॅव्हिगेशन सिस्टीम सह.
७. टाट फॅन.
त्या सेगमेंट मध्ये ती मोठी
त्या सेगमेंट मध्ये ती मोठी आहे. <<
हॅचबॅकच म्हणतोयस ना? मग माझा अनुभव वेगळा आहे. मी मोठ्या गाडीशी कशाला कंपेअर करेन. तेवढं समजतं मला.
लिवा किंवा स्विफ्टच्या तुलनेत तीची स्पेस लहानच जाणवते.
हॅचबॅकच म्हणतोयस ना? मग माझा
हॅचबॅकच म्हणतोयस ना? मग माझा अनुभव वेगळा आहे. मी मोठ्या गाडीशी कशाला कंपेअर करेन. तेवढं समजतं मला. >>>
हॅचबॅक मध्ये ही सेगमेंट आहेत. अल्टो, आय १०, स्विफ्ट, आय २० ह्या सर्व हॅच असून सुद्धा वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये आहेत.
इतकेच काय BMW 1 पण हॅचच आहे. टोटली वेगळ्या सेगमेंट मध्ये.
बर.
बर.
खरेतर मला हॅच मध्ये सगळ्यात
खरेतर मला हॅच मध्ये सगळ्यात जास्त अल्टो आवडते. सगळ्या सेगमेंट मध्ये जागा थोडी फार कमी जास्त असते आणि पावर. के १० घेऊन फुल्ली लोडेड घेतली की चार लाखाच्या आत गाडी घरी. आणि टोटली बेस्ट.
तसेही बेल्स आणि व्हिसल्स ६ लाखामध्येही तेवढे मिळत नाहीत, मग ६ का खर्च करा? चार मध्ये व्हिस्टा किंवा अल्टो घेऊन बाकी दोन लाखाचे वेकेशन.
अल्टो डिझेल की पेट्रोल?
अल्टो डिझेल की पेट्रोल?
माझं वै मत वॅगन आर ला... नविन
माझं वै मत वॅगन आर ला... नविन वाली आताच माझ्या बाबांनी घेतलिये. भरपूर जागा, माझ्यासारखा ६.१ ताड आत सहज जातो आरामात बसतो अगदी मागच्या सीट वर पण. + याच्या मागच्या सीट्स फुल फ्लॅट होतात, म्हणजे एखादवेळेस जास्त सामान पण नेता येतं. टॉप मॉडेल तीन महिन्यांपूर्वी ४.७५ लाखात घेतलय... एसी, + बाकी सगळ्याच गोष्टी मलातरी ओके वाटल्यात. अॅवरेज पण बरंय... सिटीत १५+...
इब्लिसदा, ऑल्टोत डीझेल नाही
इब्लिसदा, ऑल्टोत डीझेल नाही मिळत...
डिझेल ४ लाख - अजून आली नाही.
डिझेल ४ लाख - अजून आली नाही. जून मध्ये येईल बहुदा. तसेही पेट्रोल ब्लॉक घेतला तरी ४ लाखातील ४०००० वाचतात. आणि अल्टो ८०० LXI तर २९९ + टॅक्स.
व्हिस्टा डिझेल मात्र ६ लाखाच्या आसपास. मग आय २० चे ऑप्शन ओपन होते. अर्थात व्हिस्टा आणि अल्टो एका सेगमेंट मध्ये नसल्यामुळे तसे कम्पेअर करता येत नाही. मी चार मध्ये वर व्हिस्टा लिहिले ते चूक आहे.
नव्या डिझायर डिझेल बद्दल
नव्या डिझायर डिझेल बद्दल लिवा.
अरेरे चार चार दिवस इथे कुणी
अरेरे चार चार दिवस इथे कुणी काही लिहीत नाही...
लोक्स मी रिसेल मध्ये वॅगन आर
लोक्स मी रिसेल मध्ये वॅगन आर घेतली.
इकडे मदत करणार्यांचे आभार.
भुन्ग्याने तर मेल देखील केली.
हूडा, नवी डिझायर म्हणजे ती
हूडा,
नवी डिझायर म्हणजे ती डिकी छोटी करून लेन्ग्थ मधे छोटी करून किम्मत कमी वाली का?
चांगली आहे. आमच्या एका मित्राकडे आहे.
मला पर्सनली डिझायर आवडत नाही. तिला डुबरी मारुती म्हणतात आमच्यात
नवीन वॅगन आर मस्त आहे..
नवीन वॅगन आर मस्त आहे.. नुकतीच एका मित्राने घेतली.. लेग स्पेस उत्तम आहे.. मागे बसणार्याला ही व्यवस्थित बसता येते.
अरे वा , माझा निर्णय बरोबर
अरे वा , माझा निर्णय बरोबर म्हणायचा, पाडव्याला वॅगन आर घेतली.
योकु + १ अगो, वॅगन आर का नको
योकु + १
अगो, वॅगन आर का नको म्हणते आहेस?
शोरूमला जाऊन नवं मॉडेल बघून या.
नवी वॅगन आर VXI आम्हाला तरी एकदम परफेक्ट वाटली.
रॉबिनहुड - नवीन डिझायर चांगली
रॉबिनहुड - नवीन डिझायर चांगली आहे. (एक शेप सोडला तर) आणि ते ही रिलेटिव्ह आहे. त्यामुळे जर आवडली असेल तर गो फॉर इट.
पण पाठीमागच्या सीट वर मला तरी लेग स्पेस फार कमी वाटतो. ( तुलना - मांझा, इटिऑस सेगमेंट मध्ये) पण ह्याच सेगमेंट मध्ये होण्डाची अमेझ आहे तर ती पण चालवून पाहा.
झकासराव, योकु, विप्रा,
झकासराव, योकु, विप्रा, हार्दिक अभिनंदन!!!
मंजुडे, घे लवकर.
मी पण आता या यादित सामील होईन.
रामनवमीला वॅगन आर cng बुक
रामनवमीला वॅगन आर cng बुक केली.
अभिनंदन मुग्धानंद
अभिनंदन मुग्धानंद
अभिनंदन मुग्धानंद
अभिनंदन मुग्धानंद
Pages