इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.
काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.
तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू. 
याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.
काही वर्षांपुर्वी माझं धारावी
काही वर्षांपुर्वी माझं धारावी आगारासमोर "राम नाम सत्य है" झालं असतं. रिक्षाने सायनला जात असताना आगारासमोर एका बेस्टबस ने डावीकडे आगारात जाण्यासाठी सिग्नल न देतात जोरात डावीकडे बस घेऊन माझी रिक्षा दाबली. रिक्षा आणि बस डिव्हायडरजवळ थांबल्या तेव्हा डिव्हायडर आणि बसमधून रिक्षा एक इंचही पुढे मागे घेता येत नव्हती. मी आत थरथरत बसले होते. तेव्हापासून मागे किंवा शेजारी बस दिसली की रिक्षावाल्याला 'त्याला जाऊ दे पुढे' असं सांगून स्लो करायला किंवा साईड द्यायला सांगते. मागच्या खिडकीतून चिकटलेलं बसचं धूड दिसलं की रिक्षातून उतरावंसंच वाटतं.
इब्लिस, आगाऊ हायवेवर गाडी
इब्लिस, आगाऊ
हायवेवर गाडी चालवण्याचे एटिकेट्स (त्यात परत परराज्यामधले वेगळेच) आणि सिटीमधे गाडी चालवण्याचे एटिकेट्स पूर्ण भिन्न अस्तात. हायवेवर समोरचा रमत गमत जात असेल पण आपण त्याला ओव्हरटेक करायचा प्रयत्न केला की लगेच त्याला पण घाई सुरू होते.
'आपल्याकडचं ओव्हटेकिंग' हा
'आपल्याकडचं ओव्हटेकिंग' हा फारच मोठा, प्रबंधाचा विषय असेल. 'बघतोस काय रागाने, ओव्हरटेक केलंय वाघानं' अशी संतवचनं उगाच का आली?
मुग्धानंद आणि इतर सर्व गाडी घेतलेल्यांचं अभिनंदन, शुभेच्छा. हॅपी मोटरिंग.
त्या छापायला द्यायच्या स्टिकरवर मायबोलीचा लोगो छापा फारतर. आणि खाली 'मेरी गाडीपे मायबोली, तो तेरी क्यु जली!' असं लिहा झोकात. 
केश्विनी, मला आधी वाटलं तू रिक्षा घेतलीस. ('डावीकडे बस घेऊन माझी रिक्षा दाबली. रिक्षा आणि बस डिव्हायडरजवळ थांबल्या तेव्हा डिव्हायडर आणि बसमधून रिक्षा एक इंचही पुढे मागे घेता येत नव्हती. मी आत थरथरत बसले होते..' इत्यादी कथा वाचून) नंतर रिक्षावाल्याचा उल्लेख केलास ते बरं केलंस.
साजिरा
साजिरा
'मेरी गाडीपे मायबोली, तो तेरी
'मेरी गाडीपे मायबोली, तो तेरी क्यु जली!' >>> साजिरा, क्या बात है! मस्तच.
केश्विनी, मला आधी वाटलं तू रिक्षा घेतलीस. >>>>
केश्वीचा काय भरोसा, घेईलही! 
माबोवर रीक्षावाल्यांची कमी
माबोवर रीक्षावाल्यांची कमी आहे का ?
(No subject)
बागुलबुवा ने टेनर मारला.
बागुलबुवा ने टेनर मारला.
'मोसम, खुशी, दाबली' ... कसले भन्नाट शब्द आहेत हे ड्रायव्हिंग जगातले.
<'मेरी गाडीपे मायबोली, तो
<'मेरी गाडीपे मायबोली, तो तेरी क्यु जली!'<> खास,:हहगलो: साजिरा धन्स...
@मुग्धानन्द, तुम्ही
@मुग्धानन्द, तुम्ही घेतलेल्या Wagon R LXi कार कार + accessories ची किंमत किती आहे. कोणकोणत्या accessories extra घ्याव्या लागल्या. pls replay as I want to deside which one to buy VXI or LXI
CNG कारचा वापर जर रेग्युलर
CNG कारचा वापर जर रेग्युलर नसेल तर त्या कारच्या ईंजिंनला काही प्रॉब्लेम होऊ शकतो का? जाणकारानीं प्लिज मार्गदर्शन करावे
वरची सगळी चर्चा वाचली... अफाट
वरची सगळी चर्चा वाचली... अफाट माहिती आहे. आता मला मदत करा लोक्स..
सेडान घ्यायची आहे. ६ ते ७.५/८ चं बजेट आहे.
मान्झा, अमेझ (या गाडीविषयी वर काहीच चर्चा नहिये का? की माझ्याकडून मिस्लिये?), डिजायर, सन्नी,रॅपिड ...? यापैकी कुठली सुचवाल?
ओळखीच्या मेकॅनिक ने टाटा वर फुल्ली मारायचा सल्ल दिलाय. म्हणे, मांझा ५०००० किमी मध्येच कामं काढतेय आणि स्कोडाचं म्हणे बन्गळूरात सर्विस टिन्पाट आहे...
क्या करूं??
मी परवा एकाला ठोकता-ठोकता
मी परवा एकाला ठोकता-ठोकता राहीलो. बिचारा फारच आरामात बागेत रमत-गमत चालला होता. हॉर्न देवुनही ऐकेना. शेवटी मी पण गाडी अगदी त्याच्या मागे नेवून, त्याला जवळ जवळ चिकटवली आणि मग अजुन एकदा जोरात हॉर्न दिला.

रच्याक मी नुकतीच शेवरोलेची 'बीट' घेतली, डिझेल मॉडेल
साजिर्या, NCT
साजिर्या, NCT
प्लीज माझ्या प्रश्नाचं उत्तर
प्लीज माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या.
मि पण अल्टो ८०० LXI (CNG आहे)
मि पण अल्टो ८०० LXI (CNG आहे) घ्यायचा विचार करत आहे, ऑन रोड ४,१२,०००.
मुग्धानन्द तुम्हाला कितिला पडली वॉगन र.
<> मला पण हेच विचरायचे होते.
i10 गाडी अक्श्य त्रुतीयेच्या
i10 गाडी अक्श्य त्रुतीयेच्या दिव्शी बुक केली आहे रिव्युव्ज द्या प्लिज
@गोगो- तुम्हाला पेट्रोल गाडी
@गोगो-
तुम्हाला पेट्रोल गाडी हवी आहे, की डिजेल? तुम्ही कुठे राहता? गाडीचा वापर किती असणार आहे? तुम्ही स्वतः चालवणार की ड्रायव्हर?
अशा काही मुद्द्यांवर गाडी ठरवता येईल.
तुम्ही दिलेल्या पर्यायांपैकी मला 'डिजायर' उत्तम वाटते. टिक्स मोस्ट बॉक्सेस.
अमेझ मी पाहिली नाही, पण रिव्यूज चांगले आले आहेत, त्यामुळे नक्की टेस्ट ड्राईव करा.
सनी/स्काला घेणार असाल तर निस्सान/रेनॉची सर्विस तुम्ही राहता तिथे उपलब्ध आहे किंवा नाही, हे महत्त्वाचे आहे.
रॅपिड बहुधा बजेटच्या बाहेर जाईल.
नवी टोयोटा इटिऑसही बघा.
गोगो, सेडान का घ्यायची
गोगो,
मग २ लाख जास्त देऊन एबिसीडी घ्यायला वाईट वाटत नाही. शिवाय हप्त्याने द्यायचे आहेत. लाखाला फार झालं तर २००० हप्ता असतो. २ लाख वाढले तर ४ हजार महिना वाढेल मॅक्स.
सेडान का घ्यायची आहे?
मी सध्या मांझा एलान वापरतो. I am TATA fanboi. मांझा घेणार असाल तर बिन्धास्त घ्या. १३०-१४० तर आरामात चालते ती. पण त्या स्पीडला तितके सेफ्टी फीचर्स हवेतच. नुसती मांझा ऑरा, इंजिन तेच अन सेफ्टी नाही ये बात हजम नही होती है. आपटलात तर डॉक्टरचं बिल किती येईल + रोजगार किती बुडेल तो हिशोब करा
सेडान अन तुम्ही म्हटलात ते बजेट, यांत सेफ्टी फीचर्स बसत नाहीत.
छोटी डिझायर, किंवा छोटी इंडीगो वापरू शकता. किमानएयरबॅग हव्यातच.
इटिओस देखिल बरी आहे. पण तरीही बॉटम मॉडेल निवडून सेडानच हवी असे म्हणू नका, असे सुचवू इच्छितो. ९०%वेळा आपण एकटे असतो गाडीत. जिवाला मोल द्या
मला वॅगन आर, ऑन रोड,
मला वॅगन आर, ऑन रोड, (इन्स्युरन्स- १००% डेप्रि., अॅक्सेसरीज, ई. मिळुन) ५,१०,००० ला मिळाली.
५,१०,००० >>> सीएनजी वाली
५,१०,००० >>> सीएनजी वाली का??
तुम्हाला त्यांनी काहितरी ऑफरचे डिस्काउन्ट दिले नाहीत का?
हो. दिले. वर काही अॅक्सेसरिज
हो. दिले. वर काही अॅक्सेसरिज फ्री दिल्या.
मी सहा महिन्यापुर्वी घेतलेली
मी सहा महिन्यापुर्वी घेतलेली वॅगन-आर ४३५००० ला पडली ( अॅक्सेसरीज वेगळ्या ) माझा पत्ता ग्रामीण भागातला दिल्याने जकात वाचली (जवळपास ९०००) ,
मला सांगताना ४८५००० मुळ किंमत - डिस्कॉउंट असा ४३५००० व ( अॅक्सेसरीज रु २७०००)
जाने २०१३ नंतर वाढलेल्या किमती
वॅगन आर ५१०००० मात्र डिस्काउंट मिळतो जवळपास ३००००
वॅगन-आर सीएनजी एल एक्स आय
वॅगन-आर सीएनजी एल एक्स आय शहरामध्ये चांगली आहे मात्र काही ड्रॉबॅक्स आहेत
१) सीएनजी सिलींडर मुळे डीकीतील स्पेस संपतो एक सुटकेस सुद्धा बसत नाही
२) सीएनजी भारण्यासाठी पुण्यात रांग लावावी लागते साधारण २ तास जास्त वेळ जातो
३) हायवे ड्रायविंग - एबीएस नसल्यामुळे जास्तीत जास्त १०० किमी त्यापेक्षा वेग वाढविल्यास बॅलन्स नाही.
४) पेट्रोलवर चालविल्यास जवळपास ५ रुपये प्रतिकिमी खर्च करावा लागतो
फोर व्हीलरचे एव्हरेज कसे
फोर व्हीलरचे एव्हरेज कसे काढायचे???
@झकासराव- आधी टाकी फुल्ल
@झकासराव-
आधी टाकी फुल्ल भरायची. किलोमीटर लिहून घ्यायचे. गाडी फिरवायची. पुन्हा फुल्ल करायची. किती इंधन बसले ते नोट करायचे, आणि पुन्हा आताचे किलोमीटर लिहायचे. नंतरच्या किमी मधून आधीचे किमी वजा करायचे. तेवढ्या किमी फिरण्याला किती इंधन लागते, त्यावरून मायलेज काढता येतो.
ओहो अस करावं लागेल काय.. ४
ओहो अस करावं लागेल काय..

४ चाकीला पण रिजर्व्हचा एक नॉब पाहिजे राव.
@झक्या... गाडी रिझर्व्हला आली
@झक्या... गाडी रिझर्व्हला आली की ट्रीप मीटर झीरो सेट करायचा.. त्यानंतर ठराविक लीटर पेट्रोल/डिझेल भरायचे.. आणि मग परत रिझर्व्ह ला गाडी आली की झालेले रनिंग भागिले लीटर मधले पे/डि.. तुला अॅव्हरेज मिळेल..
गाडी रिझर्व्हला आली की
गाडी रिझर्व्हला आली की इंडीकेटर असतो की झकास...
गाडी रिझर्व्हला आली की
गाडी रिझर्व्हला आली की इंडीकेटर असतो की झकास...>> E लिहिलेलं म्हणजे एम्प्टी ना?
त्यावरच्या थोड्याशा वेगळ्या रन्गाच्या खुणेत ब्घायच???
की पेट्रोल पम्पाचा सिम्बॉल स्पीडो कन्सोल मध्ये झळकला की समजायच??
अरे देवा, मी मॅकॅनिकल इन्जिनीअर आहे. आणि लइच बावळट प्रश्न विचारतोय..
Pages