कोणती गाडी घ्यावी?

Submitted by साजिरा on 15 October, 2009 - 07:51

इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.

काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्‍यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.

तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्‍या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू. Happy

याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गॅस (एलपीजी) आणि पेट्रोल दोन्हीवर चालणारी मारुती वॅगन आर. रोजचा प्रवास जास्त असेल तर महिन्याचं फ्युयेलबिल ३०% टक्क्यांनी तरी कमी येतं. पुण्यामुंबईत गॅस व्यवस्थित मिळतोही (ठराविक पंपावर का असेना). गॅस वर अ‍ॅवरेज ही ठीक येतं.

गाडीची utility,स्पेअर पार्टस ची उपलब्धता,सर्व्हिसींग साठी न्यावी लागणारे वर्क शॉप या गोष्टीपण विचारात घ्याव्यात्.डिझेल गाड्यांच्या सर्व्हिसींगचा खर्च जास्त येतो.पेट्रोल गाडीच उत्तम.ड्रायव्हिंग स्किलही तेव्हढच महत्वाचं आहे.माझ्या अनुभवाने हाय वे / एक्सप्रेस वे ला ८०-९० किमी चा वेग असेल तर अ‍ॅव्हरेज चांगला येतो.गेली ६ वर्षे होंडा सिटी /CR-V वापरतोय.त्यामुळे माझी पसंती होंडालाच.

गाडी घेताना आपल्या काय अपेक्षा / गरजा आणि बजेट आहे त्यावर निर्णय अवलंबुन .
पहिला निर्णय डिझेल कि पेट्रोल. हल्लीची डिझेल इंजिन चांगलीच रिफाईन्ड आहेत मात्र जर येकूण रनिंग कमी असेल तर पेट्रोल, डिझेल गाडीच्या किमतीतला फरक+ इंशुरंस, +मेंटेनन्स याची गोळाबेरीज ही डिझेलच्या वापरातुन वाचलेल्या पैशापेक्षा जास्त होते.
भारतात दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे तुम्हाला कार रीसेल व्ह्यॅल्यु हविय कि नको. अजुन तरी भारतात काही ठरावीक ब्रँड्सनाच रिसेल आहे त्यातुन फक्त पेट्रोल कार्सना

तुम्ही गाडि स्वतः चलवणार कि ड्रायव्हर ठेवणार आहत त्यानुसार तुम्हाला ड्रायव्हींग सीट जवळ लेग रुम, अ‍ॅड्जस्टेबल हँडल ( जर नवरा बायको दोघेही ती गाडी चालवणार असतील तर जास्त महत्वाची गोष्ट), बाकिचे कंट्रोल्स याचा विचार करायला हवा. ड्रायव्हर असेल तर मागे किती जागा मिळते ते जास्त महत्वाचे.
मुंबैईत महत्वाचा प्रश्न पार्कींगचा. तुमच्या घरच्या, ऑफीसच्या पार्किंग मधे तुमची कार बसते, व्यवस्थीत मागे पुधे करता येते की नाही हे महत्वाचे. हल्ली बर्‍याच नव्या ऑफिसेस मधे येकावर येक असे पार्किंग लिफ्ट असतात त्यात काही ठरावीक डायमेंशन्सच्या गाड्याच बसतात.
काही नावजलेल्या मॉडेल्स जास्त स्पीड्ला रोड ग्रीप चांगली मिळत नाही ( टायर्स /रीम चेंज करुन हे प्रॉब्लेम दुर करता येतात मात्र खर्च हा आलच) तसेच पुढच्या क्वॉर्टर ग्लास मुळे वळणावर ब्लाईंड व्ह्यु होतो. टेस्ट ड्राईवह मधे हे सगळे तसेच गीर शिफ्ट, सस्पेंशन पाहुन घ्यावे. नेटवर या सगळ्या गाड्यांचे ऑर्कुट कम्युनिटिज, याहु ग्रुप्स असतात , तीथे लोक काय प्रॉब्लेम डिस्कस करतात ते ही पहावेत.

बाकी टेक्निकल डिटेल्स http://www.carwale.com/ किंवा त्यासारख्या अनेक साईट्स वर मिळतीलच

ही माहिती फारच उपयुक्त ठरेल. अपडेट करत रहा रे. पण तू ज्या या गाड्या सुचवल्या आहेस त्याचा जरा तुलनात्मक अभ्यासही लिहावास असं वाटतं. म्हणजे ४ ते ५ लाखात रिट्झच का? कोणते निकष आहेत की जे या निवडीला वरचढ ठरवतात. कदाचित तू ज्या निकषांच्या आधारे गाड्यांना प्राधान्यक्रम देत आहेस, त्यापेक्षा वेगळा विचारही एखादा करु शकतो. तेव्हा निकषांची चर्चा झाली तर ते अधिक उपयुक्त ठरेल. Happy

रिट्झ ही खरे तर स्विफ्टच आहे. ज्यांना स्विफ्ट विनाकारण मोठी आहे असे वाटते, किंवा गर्दीत चालवायला भिती वाटते, त्यांच्यासाठी नवीन आकाराची ही आटोपशीर गाडी. सँट्रोसारखे टॉलबॉय डिझाईन, डिझेल अन पेट्रोल- दोघांतही उपलब्ध, अन अतिशय अभिजात असा ब्रेक-थ्रु म्हणता येईल असा आकार. मागच्या बाजूला बग्गीसारखा केलेला हा आकार सुरूवातीला अनेकांना आवडला नव्हता. आता रस्त्यावर दिसणार्‍या रिट्झ गाड्यांच्या संख्येवरून हा ट्रेंड लोकांनी स्वीकारला आहे, असे दिसते.

बाकी मारुतीचे 'व्हल्यु फॉर मनी', स्वस्त आणि सगळीकडे मिळणारे स्पेअर्स, सगळीकडे होऊ शकणारे सर्व्हिसिंग, कमीत कमी मेंटेनन्स आणि चांगली रिसेल व्हॅल्यु हे 'नेहेमीचे यशस्वी' या गाडीच्या बाबतीतही आहेतच.

मनस्मी, भारतात की इथे?
बाकी भारतातल्या गाड्या नी बाकी कोणती गाडी किती अ‍ॅव्हरेज देते वगैरे काही कल्पना नाही पण मला चालवायला ऑटोमॅटिक बर्‍या पडतात मॅन्युअल पेक्षा. तिथे म्हणते एक हात सतत गियर वरच ठेवावा लागतो नी ती क्लच भानगड काही झेपत नाही मला.

सायोनारा,

भारतातले विचारलेय. इथे बरेच ऑप्शन आहेत.
(क्लच चे मला पण झेपले नाही भारतात जेव्हा लायसन्स घेतले तेव्हा. म्हणुन तर ऑटो बद्दल माहिती हवी आहे),

मी ही तिथे शिकले तेव्हा त्या क्लचच्या भानगडीमुळे गाडी भर रस्त्यात बंदच पडायची. Proud
तिथे जरा मोठी टोयोटा इनोव्हा आहे. पण होंडा सिव्हिकमध्ये ही ५ जण सहज मावतील.

<<ती क्लच भानगड काही झेपत नाही मला.>>
अहो मग तुम्ही फेरारी, लँबर्घिनी नि गेला बाजार आवडी, बीमर या पण ऑटोमॅटिकच घेणार का? मग काय मजा?

त्यापेक्षा होंडा सिव्हिकच बरी. फारतर टोयोटा करोला!

आवडी Lol
ज्यांना स्पीड आवडतो त्यांच्याकरता मॅन्युअलच छान. पण मी तरी आवडी नी बीमर ऑटोच घेणार. रहाता राहिल्या फेरारी, लँबोर्घिनी.. त्या काही माझ्या खिशाला झेपणार नाहीत.

ओ झक्की, अमेरिकेत होंडा सिव्हिक (LX) घेतली तर जास्तीत जास्त २०००० $ ला पडते. म्हणजे भारतातल्या १० लाख रुपयांपेक्षाही कमी. थोडी घासाघीस केली तर १९००० पर्यंत मिळते. नोव्हेंबरनंतर अजून स्वस्त होतील (असे म्हणतात).

भारतात होंडा सिव्हिक वगैरे घेऊ नये असे माझे मत आहे. उगीच अवाच्या सवा किंमत लावतात. गाडी जोरात पळते ह्या निकषाचा भारतात शहरांमध्ये तर काहीच उपयोग नाही. त्यापेक्षा होंडा सिटी घ्यावी.

मारूतीच्या गाड्या ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या मिळतात का? शहरात चालवणार असाल तर त्याच घ्याव्यात. माइलेज थोडे कमी होईल पण पुष्कळ त्रास वाचेल. मॅन्युअल शिफ्टच्या गाड्या लोक शक्यतो गाडी चालविण्याचा आनंद मिळावा म्हणून घेतात. ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल, दोन्ही तितक्याच जोरात जाऊ शकतात. पण शहरात गिअर सारखे बदलावे लागतात. आनंदापेक्षा कटकटच जास्त.

मॅन्युअल शिफ्टच्या गाड्या लोक शक्यतो गाडी चालविण्याचा आनंद मिळावा म्हणून घेतात.
-----------------------------------------------------------------------
मला मुंबई/पुण्यात पॉइंट ए ते बी जायला गाडी हवी आहे.
इथेही मी ६५ लिमिट असेल तर ६० ने जातो..कुठेही कॉप दिसला की ५५ Happy चालवण्याचा आनंद वगैरे भानगडच नाही आहे
लॅंम्बोर्गिनी/फेरारी वगैरे पुढच्या जन्मात पाहु ;))

निषेध. ह्यात स्कॉर्पियो का नाही? अ‍ॅटो वाल्यांना धडक मारायाला बरी Happy

भारतात होंडा सिव्हिक वगैरे घेऊ नये असे माझे मत आहे >> अगदी अगदी. म्हणूनच स्कॉर्पियो / बोलेरो. किंवा टाटा सफारी. सफारीचे सध्या कोणते मॉडेल चांगले आहे?

कोरोला पण इथल्यापेक्षा मोठी आहे, मला स्कोडाच्या गाड्या पण बर्‍या वाटल्या. मध्ये CRV ची किंमत विचारली तर म्हणे २२ लाख!! अलिबागहुन आलेलेच ती गाडी २२ लाखात घेतील.

आवडी.. अलिबागहुन आलेले... Lol
केदार, CRV आता २६ लाखांना आहे. (ऑटोमॅटिक २९ लाख.) Sad
स्कॉर्पियो तर ideal MUV (सध्या तरी). MUV-SUV मध्ये नवीन 'टोयोटा- फॉर्च्युनर' आली आहे. बुकिंग ओपन झाल्यानंतर २ दिवसांत बंदही झाले. प्रचंड मागणी. २० ते २२ लाखांच्या दरम्यान आहे.

सँटिनो, बरोबर. होंडा सिटी म्हणजे लईच गुणाची गाडी आहे. स्मॉल-मिडसाईझ पेट्रोल सेदान मधली आदर्श. (नवीन i-Vtec होंडा सिटीला अ‍ॅलॉय व्हील्स अजूनही एक्स्ट्रॉ घावे लागतात, हे मात्र खटकते.)

पण नवीन आलेल्या 'सिव्हिक' लाही भरपूर मागणी आहे. तिचे आशिक वाढत चालले आहेत वाटते.

मॅन्युअल शिफ्टच्या गाड्या लोक शक्यतो गाडी चालविण्याचा आनंद मिळावा म्हणून घेतात >> अगदी बरोबर. Happy

नवीन 'होंडा जाझ'ला चांगला प्रतिसाद आहे. होंडाची भारतातली पहिली स्मॉल कार. खरे तर स्मॉल कार न म्हणता, small SUV असे म्हणायला हवे. स्पेसचा विचार केला, तर होंडा सिटीपेक्षाही जास्त भरेल. गावगन्ना हिंडणार्‍या सडाफटिंगांसाठी आणि सहलप्रेमी छोट्या कुटूंबासाठी उत्तम. बुट (डिकीस्पेस), मागले सीट्स यांची फ्लेक्झिबल अ‍ॅरेंजमेंट आपल्यसाठी बर्‍याच सोयी करून देते. किंमत मात्र इतर स्मॉल कार्सपेक्षा जास्त, म्हणजे ८ लाख आहे. (ऑन-रोड, पुणे). हुंडाई आय-२० आणि नवीन ग्रँड पुंटो यांची तिला स्पर्धा आहे. (किंमती- ६.५ ते ७ लाखांच्या आसपास)

Fइat's new PUNTO is said to be best looking small car in the indian market.

केदार ......अनुमोदन!

टोयोटा इन्नोव्हा अन स्कोर्पियो ... जबरी!

पण जो लुक स्कोर्पियो ला आहे तो कोणालाच नाही! Happy

नेहमीच्या वापरला मारुती अल्टो एकदम बेस! मायलेज, मेंटेनंस ची झंझटच नाही! Happy

मारूतीच्या गाड्या ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या मिळतात का? >> wagon R आहे. पण डिलीव्हरी लगेच मिळत नाही.

केदार स्कॉर्पियो ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मधे पण मिळते.

ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या गाड्या अ‍ॅवरेज निम्म्याने देतात ना?>>>>>>>>
ते दुचाकीमध्ये रॉबिन.
चारचाकी कोण घेइल ते ही जादा पैसे घेवुन. Happy
चारचाकीला जास्त फरक पडत नाही. त्यासाठी वेगळ्या प्रकारचा गीअर बॉक्स असतो.

मी असल्या बीबीची अत्यंत आतुरतेने वाट पहात होतो,धन्स!
बजेट ५.५ लाख, हायवेला चांगले मायलेज, ५ जण बसणे आणि सामानाला जागा असणे या माझ्या गरजा आहेत.डेली वापर जास्त असणार नाही आहे.
माझ्या मनात इंडी़का विस्टा( सफायर ऑरा-पेट्रोल) आणि इंडीगो सीएस मधे गोंधळ चाललाय,टाटाच्या गाड्यांची रिसेल व्हॅल्यू कशी आहे? दुसरा काही चांगला पर्याय आहे का?

मी गेले वर्ष भर महिन्द्र लोगन वापरत आहे-डिजेल मध्ये.अतिशय उत्तम गाडी आहे.खूप लेग स्पेस ,प्रच्चन्ड पिक अप ,माईलेज २० किमी प्रति लिटर.
फक्त लूक controversial .
price 5 to 6 lac.
आत ख्हूप जागा आहे.डिकी खूप मोठी आहे.एर्अकन्डिशनिंग टोप क्लास्स, पावर स्झ्टीरिन्ग आहे.
इन्डिगो वाल्यानी विचार करण्यास हरकत नाही.
ही गाडी इथे उल्लेखली गेली नाही.
दुसरी गाडी गेले ४ वर्षे पत्नी वापरत आहे ती झेन -मारुती.उत्तम पिक अप एक्दम व्हाल्यू फोर मनी आहे.

आगाऊ, डिझेल घ्यायची असेल, तरच इंडिकाचा विचार कर.

पेट्रोलसाठी स्विफ्ट किंवा ग्रँड पुंटो यांच विचार करायला हवा. पाऊण-एक लाखभर बजेट वाढवले, तर स्विफ्ट डिझायर हाही एक मस्त पर्याय. अर्थातच, माझ्या मते. Happy

नवीन इंडीगो मांझा पण आली आहे, पण मी अजून पाहिली नाही, आणि अजून तिचे फीडबॅक देणारेही कुणी भेटले नाही.

लुक्स महत्वाचे वाटत असतील, तर लोगान नको. शिवाय २०१० मध्ये नवीन व्हर्जन येते आहे, असेही ऐकले.

त्या टाटाच्या नॅनो चे काय झाले? एक लाखात मिळते म्हणे!! बाजारात आली नाही का अजून?
<<गाडी चालविण्याचा आनंद मिळावा >> सँटी, आता लवकरच स्नो पडू लागेल. मग लाँग आयलंडवरून माझ्या घरी ये! भरपूर आनंद मिळेल गाडी चालवण्याचा!

आम्ही गेल्या वर्षी देशात गेलेलो तेव्ह इंडिका विस्टा घेतली. मला जाम आवडले त्याचे लुक्स. स्विफ्ट पेक्षा तर खुपच छान दिसते. आणि जागाही बर्यापैकि आहे.
आत बिचारी नुसतीच पडुन आहे घरी Sad

Pages