इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.
काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.
तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू. 
याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.
अहो आमचे अजून त्या ह्युन्डाइ
अहो आमचे अजून त्या ह्युन्डाइ एक्स सेन्ट चे तुणतुणे चालूच आहे. कोणी घेतली आहे का? कोणाला त्याबद्दल काही अधिकची माहिती आहे का?
रॉबीनहुड कारवाले आणि तत्सम
रॉबीनहुड कारवाले आणि तत्सम साईटवर तुलना करुन बघा. शेवटी गाडी घ्यायची तर आताच का नाही? लौकर घ्याल, तर लौकर वापरता येईल, असाही विचार करुन बघा.
अहो त्यवरून गृहकलह माजला आहे
अहो त्यवरून गृहकलह माजला आहे !
माझ्यामते तरी एक्सेंट
माझ्यामते तरी एक्सेंट अंडरपॉवर्ड वाटते. रस्त्यावर पाहीली आहे, तिथे तरी ती सेडान असूनही लहानच वाटते... थोडक्यात काय त खूपशी नाही पटत आहे सध्यातरी. त्यापेक्शा अमेझ मस्त नाहीतर ओल्ड गूड डिझायर आहेच की...
विदे - पर्सनली मला स्वतःला गाडीत कुठलेच मॉडिफिकेशन्स नाही आवडत. त्यामुळे लूक जातो असं मला वाटतं. मे बी बॉडी बॅलन्स चा ईशू येईलही...
गाडीमध्ये गणपती प्रतीमा
गाडीमध्ये गणपती प्रतीमा (मुरर्ती ) ठएवतात, रोज पुजा करतात किंवा एकदाच पुजा करतात.
या बद्दल माहीती हवी आहे. कोणी सांगेल का ? एकाला सांगायची आहे. नीट टाइप करता येत नाही.
सांगा प्लीज.
सांगा प्लीज.
कामिनी८ शक्यतो गाडीतील
कामिनी८ शक्यतो गाडीतील मुर्तीची रोज पुजा करत नाहीत ज्यांचा ट्रान्सपोर्टेशन्चा धंदा आहे ते ड्रायव्हर करतात.
गाडीमध्ये नायट्रोजन gas भरावा
गाडीमध्ये नायट्रोजन gas भरावा का? का साधी हवाच चांगली?
फायदे/ तोटे सांगा.
नवीन Wagon R Lxi CNG घ्यावी
नवीन Wagon R Lxi CNG घ्यावी का LPG ?
किंव्हा Vxi (टोप मॉडेल ) घेऊन डीलर तर्फे CNG /LPG ?
एलपीजी घेवुन फायदा काय? मला
एलपीजी घेवुन फायदा काय? मला माहिती नाहिये म्हणुन विचारतोय.
रनिन्ग जास्त असेल तर सीएनजी घ्या कम्पनी फिटेड.
अन्यथा पेट्रोल मॉडेल. (किंवा प्रत्येक वेळी पेट्रोल भरताना वाइट वाटणार असेल तर जास्त कॅल्क्युलेशन मध्ये न जाता सीएनजी )
आणि फक्त पेट्रोलच घेणार असाल तर आयटेन ग्रॅन्ड देखील बघुन घ्या. (इतर कंपन्यांचे ऑप्शन्स देखील चेक करा)
बाहेरुन किट बसवु नका. डिलर कडुन पण नकोच.
नविन बाजारात आलेली TVS
नविन बाजारात आलेली TVS Jupiter ही दुचाकी कुणी वापरली आहे का? असल्यास कशी आहे वगैरे साम्गू शकाल का?
फक्त पेट्रोल वापरण शक्यच
फक्त पेट्रोल वापरण शक्यच नाही.
CNG मध्ये options शोधत आहे.सध्या फक्त Wagon R shortlist केली आहे.
कुणाला अजून सजेशन असतील तर सांगा
फक्त वॅगन आर सीएन्जी घेणे,
फक्त वॅगन आर सीएन्जी घेणे, कं. फिटेड ,डोळे झाकुन.
फेबु - सेलेरीओ सीएनजी. एक
फेबु - सेलेरीओ सीएनजी. एक फ्रेश अन नवीन ऑप्शन. वॅगन आरपेक्षा जास्त मायलेज.
+ पॉईंट्स - ४.७० ला VXi CNG aka Top Model | जास्त मायलेज ३१ का ३२ क्लेम आहे नवीन आहे अन आयटेन सारख्या साईजची त्यामुळे माझ्यामते तरी टॉल्बॉय + नॉर्मल हॅच यामधला बरोबर मेळ. | यात ऑटो गीअर शिफ्ट चा ऑप्शनही मिळेल असं वाटतंय. चेक करावं लागेल.
योकु सीनजी मध्ये ऑटो गीअर
योकु सीनजी मध्ये ऑटो गीअर नसेल.
मारुतीच ह्याच्या हे न्हाइ आणि त्याच्यात ते नाही असे नखरेच लै..
- ४.७० ला VXi CNG aka Top Model | >> ऑन रोड सीनजी वॅगन आर पेक्षा जास्त असेल हो.
५.२ + असायला हवी माझ्यामते तरी.
अव्हेलेबेलिटी बघा. आणि वॅगन आर की सेलेरिओ ह्यात निवडा.
सेलेरिओ जवळपास १ लाखाने महाग
सेलेरिओ जवळपास १ लाखाने महाग आहे .
फेबु हे पहा - ठाण्यातले
फेबु हे पहा - ठाण्यातले अंदाजे ऑनरोड रेट्स...
वॅगन आर सिएनजी - (४९९४२६/-)
http://www.carwale.com/new/quotation.aspx?inquiryId=KJxRY#t=1&c1=2784.40.16
सेलेरिओ व्हिएक्सआय सिएनजी - (५४०३००/-)
http://www.carwale.com/new/quotation.aspx?inquiryId=YJxRY#t=1&c1=3352.40.16
हम्म आज सेल्समन बोल्ला
हम्म आज सेल्समन बोल्ला मला.
धन्यावाद योकु
वॅगन आर वर डिस्काउन्ट्स सुरु
वॅगन आर वर डिस्काउन्ट्स सुरु असतात. त्यामुळे ते २०-३० हजा वाचतील.
त्यात सर्व अॅक्सेसरीज येवुन जातील. रि पा सेन्सर, म्युजिक सिस्टीम रिमोट लॉक वै वै.
नवीन झेस्ट चा काही रिव्ह्यु?
नवीन झेस्ट चा काही रिव्ह्यु? सात लाखाला टॉपएन्ड आहे. झाडून सगळे फिचर्स आहेत. एंजीन मात्र टाटा डेव्हलप्ड आहे. सगळ्या साईट्सवर चांगले व्ह्युज आलेत. माबोकरांची मतं जाणून घ्यायला आवडेल.
एका मित्राला कार फायनलाईज करायची आहे... आतापर्यंत एतिऑस, डिझायर, झेस्ट, एक्सेंट, एलिट आय २०, अमेझ पाहून झालेत. शक्यतो कॉ.सेदान हवीये.
मग फिअॅटची लिनीया बघा की.
मग फिअॅटची लिनीया बघा की. नवीन लिनीया मध्ये खूप सुधारणा केल्यात. मागे लोकसत्तात रिव्यु आला होता. सात पेक्षा जास्तच किम्मत आहे. घरच्यानी बघीतली होती, पण तेव्हा बजेट नव्हते त्यामुळे घेतली नाही. आता वॅगनर पण आहे आणी एक्सेन्ट पण आहे. पण लिनीयाचा रिपोर्ट खूप चान्गला आहे. दिराच्या बॉसकडे ही गाडी आहे.
http://www.carwale.com/fiat-c
http://www.carwale.com/fiat-cars/linea/?ltsrc=95214&gclid=CJ3ctsXZnMACFR...
एंजीन मात्र टाटा डेव्हलप्ड
एंजीन मात्र टाटा डेव्हलप्ड आहे. >> हम्म.
बरचसं काम बाहेरच्या आर & डी मधेय झालय अस ऐकुन आहे.
एन्जिन मध्ये चांगले फिचर दिले आहेत.
फर्स्ट हॅण्ड अनुभव असलेले मित्रमंडळीत अजुन कोणी नाहियेत.
पण त्या कंपनीशी संबंधित लोक (मार्केटिन्ग वाले नव्हे) त्या गाडीविषयी खुप चांगल बोलत आहेत.
एंजीन मात्र टाटा डेव्हलप्ड
एंजीन मात्र टाटा डेव्हलप्ड आहे. >> हम्म.
>>>
वर्षभरानंतर फक्त कुणी असं नको म्हणायला की 'तिथे' चुकलात! :p:
रश्मी, लिनिआ बजेट्बाहेर आहे बहुधा अन ती फारच मोठीही आहे... एक्सटेंन्डेड बजेट ७.५/-.
खरे आहे योकु. तिचे वर्णन इतके
खरे आहे योकु.:अरेरे: तिचे वर्णन इतके छान आले होते आणी रिव्यु पण छान होता.:स्मित:
बाकी ती प्रिमीअरची नवीन ( नाव आठवत नाही, बहुतेक रिओ आहे ) गाडी पण खूप छान आहे, पण ४ च्या वर मावतच नाही, कारण अगदी मोजुन चार सीट आहेत, वॅगनर सारखी प्रशस्त नाही, की पाचवा पॅसेन्जर मावेल.
नवीन वॅगनर भारी आहे. साधारण ६ च्या आत आहे. आम्ही आमच्या वॅगनरचे नियमीत सर्विसीन्ग करुन घेतो प्रवासाला जाण्या आधी वगैरे. त्यामुळे ६ वर्षे झाली तरी बाकी त्रास नाही. नासिक, कोल्हापूर, गोवा, मुम्बई सगळ्या ट्रिपला प्रॉब्लेम नाही. ड्युओ आहे.
रश्मी, वॅगन आर आमच्याकडे आहे.
रश्मी, वॅगन आर आमच्याकडे आहे. अ नो नॉन्सेन्स एम ए व्ही आहे माझ्यामते तरी.
तू स्टींगरे म्हणते आहेस बहुतेक.
ज्या मित्राला आता कार बदलायची आहे, त्यानी आय १० एव्हड्यात काढली आहे. अन आता जरा मोठी हवी पण पूर्ण सेदानही नकोय बजेट मुळे. झेस्ट चालवून पाहिल्यापासून तो तिथे अडकलाय...
मी त्याला डिझायर चं टॉपएन्ड सुचवलेलं.
आताच ऑफिसातही एकाला विचारलं झेस्ट बद्दल. त्याच्या म्हणण्यानुसार, ती गाडी ईंडिकाईश दिसते. :p
बूट्मध्ये म्हणावी तेव्हढी जागा नाही. प्रोजेक्टर हेड्लँप देण्याच्या भरात ते आकारानी जरा मोठे झालेत.
मला एकच प्रॉब्लेम वाटतोय, तो म्हणजे एंजिन.
बाकी टाटा स्पेस च्या बाबतीत अन एसी एफिशिअन्सिच्या बाबतीत कुठेही तडजोड नाही करत. उदा. नॅनो!
नुकतीच ह्युंडाई एक्ससेन्ट
नुकतीच ह्युंडाई एक्ससेन्ट घेतली. आधीची गाडी १६०० सीसी (बॅलेनो) असल्याने चालवताना पॉवरची सवय झाली होती आणि हिच्या अंडर पॉवर्ड असण्यावर शंका होती पण टेस्ट ड्राईव्हमध्ये ती जवळजवळ फिटलीच. शहरी ड्रायविंगमध्ये काही फरक जाणवत नाही. दुसरी गाडी त्यामुळे फुल सेडानचे बजेट नव्हते. अमेझ, डिझायर अथवा एक्ससेन्ट यामधीलच घ्यायची हे नक्की होते.
अमेझ आणि डिझायर या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा नि:संशय फीचर रीच आहे. एस (ऑप्शनल) व्हेरियन्ट घेतलाय (ज्याच्या पुढे एस एक्स हा एक आहे). टॉप एन्ड आणि मी घेतलेल्यात महत्त्वाचे फरक म्हणजे एअर बॅग्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कन्ट्रोल, रीअर व्ह्यू कॅमेरा आणि पुश बटण स्टार्ट हे केवळ टॉप मॉडेलमध्ये आहेत . पहिली गाडीही सुस्थितीत असल्याने या गाडीचा संभाव्य मर्यादित वापर लक्षात घेता एक लाख यासाठी जादा द्यावेत असे वाटले नाही म्हणून एस ऑप्शनल निवडला.
पॉवरफुल एसी, चिलर ग्लोव्हबॉक्स, स्टीअरिंग माऊन्टेड कन्ट्रोल्स, इलेक्ट्रकली फोल्डेबल आणि अॅडजस्टेबल आरसे, रीअर एसी व्हेन्ट्स, पार्किंग सेन्सर्स, सीडी, एम पी थ्री, पेन ड्राईव्ह, ब्ल्यू टूथ स्ट्रीमींग, १२ व्होल्ट सॉकेट हे माझ्या व्हेरीयन्टमध्ये असलेले फीचर फारच आवडून गेले. इन्टीरीयर क्वालिटी अमेझ आणि डिझायरपेक्षा कितीतरी वरची आहे. डिकीसुद्धा अगदी ऐसपैस. मागची सीटही इतर दोन गाड्यांच्या मानाने आरामदायी वाटली प्रत्यक्ष बघून/बसून तुलना केल्यावर.
फीचर्समुळे ऑन रोड किमतीच्या वर अॅक्सेसरी इत्यादीत एक पैसाही घालवावा लागला नाही. व्हील कव्हर, सीट कव्हर, रीमोट लॉक (ज्याने डिकीपण उघडते) गाडीसोबतच मिळते, स्टँडर्ड स्पेसिफिकेशन म्हणून.
साडे सहा लाखापर्यंत बजेट असेल तर नक्की टेस्ट ड्राईव्ह घ्या.
पहिली गाडीही सुस्थितीत
पहिली गाडीही सुस्थितीत असल्याने या गाडीचा संभाव्य मर्यादित वापर लक्षात घेता एक लाख यासाठी जादा द्यावेत असे वाटले नाही म्हणून एस ऑप्शनल निवडला. >> परत एकदा लिहितोय. गाडीचा वापर मर्यादित असला तरी आत बसण्यार्या तुमच्या कुटुंबियांच्या आयुष्याची किंमत मर्यादित नाहिये (१ लाखापेक्षा तर नक्कीच जास्त आहे). कृपया सेफ्टी ऑप्शन्सवर कॉम्प्रोमाइझ करू नका.
कृपया सेफ्टी ऑप्शन्सवर
कृपया सेफ्टी ऑप्शन्सवर कॉम्प्रोमाइझ करू नका. > सहमत
पण, मी हे ऐकून आहे की जर हेड-ऑन कोलिजन असेल तरच त्या एअरबॅग्ज काम करतात. आणि अॅक्सिडेंट मध्ये या गोष्टीची शक्यता त्यामानानी कमी.यावर कुणी काही मतं द्या.
मतं.
मतं.
Pages