इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.
काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.
तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू. 
याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.
बरेचदा कोणती गाडीवर एक प्रश्न
बरेचदा कोणती गाडीवर एक प्रश्न विचारला गेला आहे तो म्हणजे, गाडीचे अॅव्हरेज कसे वाढवावे? गाडीचे अॅव्हरेज हा इतका जिव्हाळ्याचा विषय आहे की मारूतीच्या एका अॅड मध्ये एक सेनानायक रनगाडा विकत घेताना देखील कितना देती है? असे विचारतो.
गाडीचे मायलेज हे अनेक बाबींवर अवलंबून आहे पण त्यापेक्षा जास्त अवलंबून आहे ते आपल्या ड्रायव्हिंग हॅबिटस वर. ह्या बदलल्या तर गाडीचे पार्ट जास्त टिकतील, शिवाय आपला आर्थिक फायदा होईल ते वेगळंच. तर आपण काही थम्ब रूल्स विचारात घेऊ.
१. आपल्या गाडीच्या ग्लोव्ह बॉक्स मध्ये असलेले मॅन्युअल काढून पाहिले तर प्रत्येक गाडीसाठी किती स्पिडवर कोणता गिअर वापरावा हे लिहिलेले आहे. पहिल्या चार गिअर्सच्या बाबतीत तरी जे म्यॅन्युअल मध्ये लिहिले आहे ते तंतोतंत पाळावे.
२. क्लचचा वापर हा शक्य तिथे आणि गरज लागत असेल तरच करावा. बरेच जण अजाणता हाफ क्लच गाडी चालवतात. म्हणजे डावा पाय रेस्ट म्हणून क्लच पेडल वर हलका ठेवतात. तसे अजिबात करू नये. त्याने क्लचची झिज होते. डावा पाय पूर्ण खाली ठेवलेला असावा.
३. ब्रूम ब्रूम : खूप जणांना गाडी सुरू केल्यावर हौसेखातर अॅक्सलरेटरवर पाय ठेवून जोरात दाबायची सवय असते. अचानक मिळाणार्या लोड मुळे इंजिन खराबही होऊ शकते. (टर्बो इंजिनसाठी हे जास्त हानिकारक आहे. पहिले निदान अर्धा किलोमिटर तरी अगदी संथ स्पिड मध्ये गाडी चालवावी.
४. सर्व्हिसिंग - स्पेशली एअर फिल्टर आणि डिझेल फिल्टर - बरेचदा सर्विसिंग करणारा ऑईल बदलले, लेवल्स टॉपअप केल्या की सर्व्हिसिंग झाली असे म्हणतो. पण साधारण दर १५ ते १८००० किमीला एअर फिल्टर साफ करणे, गरज पडल्यास बदलणे. (कमी धुळीच्या वातावरणात राहात असाल तर, जास्त धुळीत राहात असाल तर अगदी ८ ते १०,०००) डिझेल फिल्टर बदलणे इत्यादी केले तर गाडीचा आउटपूट रेशो वाढतो व तुलनेने कमी डिझेल लागते.
५. AC or नो? जर कार ७०-८० च्या स्पिडने जात असेल तर गाडीच्या सर्व काचा बंद करून ए सी चालू करावा. स्पिड मध्ये काच का बंद? तर एअर ड्रॅग मिळतो. ते टाळण्यासाठी AC आवश्यक.
६. टायर प्रेशर : उत्पादकाने दिलेले टायर PSI चेक करून तेवढेच चाकात ठेवावे. गल्लीतला मेकॅनिक सांगतोय म्हणून जास्त नको. कमी वा जास्त प्रेशर अॅव्हरेज व टायर दोन्हीसाठी हानिकारक आहे.
७. क्रुझ कंट्रोल : हायवेवर क्रुझ कंट्रोलचा वापर केला तर विनाकारण क्लच, ब्रेकचा अनावाश्यक वापर टळतो व एकसारखी स्पिड ठेवण्यास मदत होते. मी १२० + स्पिड वर ठेवूनही त्यामुळे माझ्या गाडीला मला हायवेवर अनेकदा १४ चे अॅव्हरेज मिळते. (लिस्टेड अॅव्हरेज ११ आहे)
१०-१२ लाखापर्यंत मोठ्या, जरा
१०-१२ लाखापर्यंत मोठ्या, जरा लक्झरिअस अशा कुठल्या गाड्या आहेत इंडीयात? म्हणजे उदा: स्कोडा रॅपिड किंवा रेनॉ डस्टर वगैरे कशा आहेत?? किंवा अशा रेंजमधील कुठली कार सजेस्ट कराल?
मायक्रा CVT बद्दल कुणाला
मायक्रा CVT बद्दल कुणाला माहिति आहे का?
मारुतीची sting-ray ही गाडी
मारुतीची sting-ray ही गाडी नव्याने लाँच झाली आहे. तिला वॅगन आर स्टिंगरे असे म्हटले आहे . हे वॅगन आरचेच सुधारित मॉडेल आहे का?
वॅगन आर नामक फ्लॉप मॉडेल अनेक
वॅगन आर नामक फ्लॉप मॉडेल अनेक क्लॄप्त्या योजून पब्लिकच्या गळ्यात मारण्याचे लै प्रयत्न मारूतीने आजवर केलेत.. त्यातला हा नवा प्रयत्न.
XUV 500 साठी किती वेटिंग
XUV 500 साठी किती वेटिंग लिस्ट चालू आहे, कोणाला कल्पना आहे काय?
XUV 500 साठी किती वेटिंग
XUV 500 साठी किती वेटिंग लिस्ट चालू आहे, कोणाला कल्पना आहे काय? >> माझ्यामते आता वेटिंग लिस्ट अशी नाही. आठवड्यात गाडी मिळेल. माझ्या शेजारच्याला घ्यायची होती, त्याला आठवड्यात मिळाली.
घेत असशील तर रिव्हर्स कॅमेरा, मॅटस, स्कफ प्लेटस वगैरेचे बार्गेन कर. शेजार्याला हे तिन्ही मिळाले. फक्त बार्गेन करताना मागे हटू नको. आणि तिन्ही डिलर्स कडून किंमत घे.
फोर्ड इकोस्पोर्ट चे कसे आहेत
फोर्ड इकोस्पोर्ट चे कसे आहेत रिव्ह्युज?
लुक्स वरुन गरिबांची लॅन्ड क्रुझर वाटतेय. सध्या तरी होन्डा ब्रायोवर शिक्कामोर्तब झालंय.
@ इब्लिस- वॅगन आर 'सुपरहिट'
@ इब्लिस- वॅगन आर 'सुपरहिट' मॉडेल आहे हो ! पेट्रोल गाड्यांमधे आल्टोनंतर देशातली सर्वाधिक खपाची गाडी आहे ती.
ज्ञानेश +१ XUV 500 मायलेज
ज्ञानेश +१
XUV 500 मायलेज बद्दल कोणाला काही अनुभव आहे क?
त्यातला हा नवा प्रयत्न.>>>
त्यातला हा नवा प्रयत्न.>>> अहो आजवर लैच गाड्या खपवल्यात की त्यानी... १३ लाख एक आकडा वाचलेला..
असो.
स्टिन्ग रे पाहिली कालच.
वॅगन आर आणि त्याच्या लुक्स मध्ये फार काही फरक नाहिये.
पण अलॉय व्हील्स, प्रोजेक्टर लँप वै देत आहेत..
किमतीत फरक आहे..
रिटझ आणि स्विफ्ट वर डिस्काउन्ट, एक्शचेन्ज बोनस वै सुरु आहे.
पण भारी गेम असते एस्कचेन्ज बोनसची.
काल ही गेम तरी कळाली.
समजा तुमच्या गाडीचं व्हॅल्युएशन दिड लाख होणार असेल तर तुम्हाला ९० हजार सांगणार. त्यात एक्शचेन्ज बोनस + लॉयल्टी बोनस + डिस्काउन्ट सर्व काही अॅड करुन दिड लाख करणार त्याची व्हॅल्यु.
आणि तुम्ही ठीक आहे बघतो अस म्हणलं की मग अजुन एक त्यांचा एक सिनियर येणार.
पाच दहा हजार वाढवुन देतो म्हणणार..
असेल बुवा. रस्त्यावर फार दिसत
असेल बुवा. रस्त्यावर फार दिसत नाहीत.
आम्ही दोन दिवसांपुर्वी वॅगन
आम्ही दोन दिवसांपुर्वी वॅगन आर घेतली. VXI - टॉप मॉडेल. ग्लिस्टनिंग ग्रे रंग.
वॅगन आर आणि त्याच्या लुक्स मध्ये फार काही फरक नाहिये.>>>
झक्या, दोन दिवसांपुर्वी गाडीची डिलीव्हरी मिळाली तेव्हा शोरूममधे स्टिंगरे बघितली. XUV चा लूक वाटतो, गाडी स्पेशियस आहे, डिकी पण वॅगन आरपेक्षा मोठी आहे. सध्या फक्त पेट्रोल कार उपलबध आहे. आम्ही वॅगन आर घ्यायची घाई केली काय असं क्षणभर वाटून गेलं. स्टिंगरेची डिलीव्हरी दोन महिन्यांनी मिळेल असं सांगितलं, त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही आमच्या वॅगन आरच्याच निर्णयावर खुश झालो
आशुतोष, फोर्ड इकोस्पोर्टचे रीव्ह्यु चांगले मिळाले आहेत. माझ्या बहिणीने मागणी नोंदवली आहे. पण त्यांना गाडी नोव्हेंबरात मिळणार आहे.
दसर्याला मिळेल अश्या
दसर्याला मिळेल अश्या हिशेबाने मी MS Ertiga VXI CNG बूक केली, पण मारुतीच्या प्रॉडक्शन मध्ये काहीतरी गडबड झाल्याने ती तेव्हा मिळाली नाही
उद्या delivery मिळेल असं सांगितलंय, I'm very excited!
अभिनंदन प्रणव. PDC नीट करुन
अभिनंदन प्रणव. PDC नीट करुन मगच गाडी घ्या.
@ प्रणव.. गाडी घेताना पुर्ण
@ प्रणव..
गाडी घेताना पुर्ण चेक करा .. बंपर चे स्क्रू .. आणि सारे फीटिंग्ज..
PDC नीट करुन मगच गाडी घ्या.
PDC नीट करुन मगच गाडी घ्या. >> म्हणजे नक्की काय काय चेक करायचं??
http://www.team-bhp.com/advic
http://www.team-bhp.com/advice/pre-delivery-inspection-pdi-check-list इथे बघा.
धन्स केदार आणि शाहिर!
धन्स केदार आणि शाहिर!
सिटि डिझेल काल लॉन्च झाली. +
सिटि डिझेल काल लॉन्च झाली. + फेसलिफ्ट ही मिळालाय. आयव्हीटेक अन आयडिटेक -- सेम अॅज अमेझ.
फेसलिफ्टेड डस्टरसुद्धा येतेय...
hundai eon car kashi ahe
hundai eon car kashi ahe plesae koni sangu shakal ka ??
डिझायरचे कोणते मॉडेल सर्वात
डिझायरचे कोणते मॉडेल सर्वात चान्गले आहे?
ह्यूंडाई i-10 ग्रँड कशी आहे?
ह्यूंडाई i-10 ग्रँड कशी आहे? साधारण मे-जून मध्ये कार घ्यायचा विचार आहे, पावसाळ्याआधी. बजेट ४-५ लाख आहे.
१) गाडी दररोज नाही पण बर्यापैकी वापरली जाईल. पुण्यातच बहुदा, पण कधी कधी विकांताला लाँग टूर करता येईल. -- पेट्रोल की डिझेल?
२) मागच्या सीट्स वर ३ जणांना व्यवस्थीत बसता येईल.
या गोष्टी व्यतिरिक्त, सेफ्टी पिचर्स, मायलेज याही बाबी आहेतच नजरेसमोर.
सध्या खालील मॉडेल्सबद्दल विचार चालू आहे.
i) Hyundai i-10
ii) Hyundai i-10 Grand
iii) Ford Figo
iv) Nissan Micra
फोर्ड इको स्पोर्टचा रिव्ह्यु
फोर्ड इको स्पोर्टचा रिव्ह्यु कसा आहे?
मारुती एर्टीगा घ्यायचा विचार
मारुती एर्टीगा घ्यायचा विचार आम्ही करतोय... प्रोज आनि कोन्स कोणी सान्गेल का??
आमच्या बजेट मधे तीच बसतेय.... आणि आम्ही व्ही एक्स आय - सी एन जी घ्यावी का विचार करतोय...
कोणी घेतलीय / वापरलीय का?.... जरा मदत करा प्लीज... म्हणजे योग्य डिसीजन घ्यायला मदत होइल. ..:)
निसान माइक्रा अक्टीव (XV)
निसान माइक्रा अक्टीव (XV) सेफटी- कुणी वापरलिये का? वापरली असल्यास माहिती देण्याची विनंती.
गाडी specious आहे का? फोटोत तरी वाटते आहे पण प्रत्यक्षात कशी आहे?
निसान ची सर्विस खुपच त्रासदायक आहे असं अंतर्जालावर वाचलय, माबोकरांचा अनुभव कसा आहे? (specially पुण्यातील माबोकरांचा oxford nissan बद्दल)
एक्सयुव्ही ५०० बुक
एक्सयुव्ही ५०० बुक केल्यापासून मित्राला चौथ्या दिवशी आज डिलिव्हरी मिळाली..... टॉप एंड मॉडेल..... कंपनी रजिस्ट्रड १६.७५ लाख किंमत होती फायनली १६.१५ मध्ये डन केली...... (पनवेल पासिंग)
सूपर्ब चित्ता...!!!!!
डिलरशी असलेले १२ वर्षांचे सम्बंध आणि आतापर्यंत त्याच्याकडुन ५ - ६ गाद्ञा घेतल्याने इतक्या फास्ट डिलिव्हरी मिळाली पण ओव्हरऑल डिलीव्हरीलब्वकर मिळतेय....!!!
केदार म्हणाला तसे ५० हजार पर्यंत बार्गेन सहज करता येतेय.....
ससध्याच्या अॅव्हेलेबल लॉत्मधली बेस्ट एस्युवी...... टाटा सफारी स्टॉर्म ऑलमोस्ट सेम प्राइइज आहे (थोदं कमी) पण कुठलेही फिचर्स नाहित..... फिचर्सवाइज एक्सयुव्ही ला सफारी स्टॉर्म मॅचही नाही करू शकत.....!!!!
वेल डन महिंद्रा.
सूपर्ब चित्ता...!!!!! >>>
सूपर्ब चित्ता...!!!!! >>> ++
आमची एक्सयुव्ही ५०० W8 awd बुक केल्यापासुन दहा दिवसात आली होती. घेऊन दिड महीना झाला.
मस्त गाडी आहे.
केदारला स्पेशल थँक्स
आम्ही फोर्ड इको स्पोर्ट बघायला गेलो तिथे फोर्डची कस्ट. सर्विस एकदम बेकार वाटली. ट्रायलसाठी सुद्धा २/३ महिने लागतील म्हणाले. दुसरीकडे नुसती ठेवलेली गाडी पाहीली ती आतमधुन छोटी वाटली. मग तिथुनच महिंद्रा शोरुममधे गेलो. ग्रेट सर्विस आणि अटेंड मस्त केले.. गाडी बुक करुनच आलो.
परवा नाशिकला गाडी घेऊन गेले. मस्तच आहे.
जिपीएस सह असल्याने नविन शहरातही काहीच त्रास झाला नाही / शोधाशोध करावी लागली नाही.
थोडेजरी अपहील असेल तर अॅक्सिलेटरवरचा पाय काढला तरी गाडी स्वत:च अॅक्सिलेटर देते आणि पुढे जाते. हे कधी कधी एकदम वेगळेच वाटते. अपहील फिचर नेहेमीच ऑन असते. डाऊनहिल असेल तर ते फिचर ऑन केले तर गाडी दुसर्या गियरला ३०चा स्पीड मेंटेन करते. क्रूझ कंट्रोल आणि ऑटो स्टार्ट स्टॉप फिचरपण आवडली.
भुंग्याच्या मित्राचे अभिनंदन
भुंग्याच्या मित्राचे अभिनंदन ! ६०००० वाचले वा मस्तच.
जनरली तेवढे पैसे वाचवून, रिव्हर्स कॅमेरा, मॅट वगैरेही मागून घ्यायचे.
आमची एक्सयुव्ही ५०० W8 awd बुक केल्यापासुन दहा दिवसात आली होती >>. वा वा अभिनंदन सावली. आता हिमालयात ट्रीपला जायलाच हवे तुम्ही. तिथे गेल्यावर चित्त्याचे आणखी एक वेगळे रूप दिसेल.
म्हणजे आम्ही तुझे नामकरण शुटर गर्ल विथ पर्सनल चित्ता असे करून टाकू.
अभिनंदन परत.
थँक्यु केदार. शुटर गर्ल विथ
थँक्यु केदार.
शुटर गर्ल विथ पर्सनल चित्ता >>
हिमालयात ट्रीपला >> नक्कीच. आधी बहुधा भारताच्या पूर्व भागात जाऊन येणार. त्याआधी लाँग ड्राईवची अजुन सवय करायची आहे.
Pages