इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.
काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.
तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू. 
याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.
आय २० ची सिडान ची probable on
आय २० ची सिडान ची probable on road किम्मत माहित आहे का कुणाला?
माझ्या माहीतीप्रमाणे आय २० ही
माझ्या माहीतीप्रमाणे आय २० ही हॅच आहे. त्यात कनवर्टेड सेदान (स्विफ्ट डीझायर सारखी) येत नाही...
योगेश....माझ्या माहितीत its a
योगेश....माझ्या माहितीत its a new release...
योगेश अहो ह्या गाडीचे फोटो
योगेश अहो ह्या गाडीचे फोटो आले आहेत. माझ्या मते ह्या I 20 बेस्ड सेडानची किंमत ही sx ४ आणि सन्नी च्या किमतीच्या आसपास असावी. पण भारतात लाँच व्हायला अजून वर्षभर लागेल किंवा फर्स्ट क्वार्टर २०१४ असे वाटते. जनरली दिवाळीच्या आसपास गाड्या लाँच होतात पण अजून भारतात टेस्ट चालू आहेत असे दिसत नाही त्यामुळे हा अंदाज.
धन्यवाद योकु आणि
धन्यवाद योकु आणि किरण....
रच्याकने ते " साजिर्याची कृपा/ भुंगा प्रसाद" अशी स्टिकरे छापण्यास दिली आहेत.
मुग्धा
मुग्धा
रच्याकने ते " साजिर्याची
रच्याकने ते " साजिर्याची कृपा/ भुंगा प्रसाद" अशी स्टिकरे छापण्यास दिली आहेत. >>>>
सध्या आमच्याकडे 'मारुती ८००'
सध्या आमच्याकडे 'मारुती ८००' आहे, १५ वर्षं झाली आणि एकदम दणक्यात पळते
आत्ता नवीन गाडी घेतोय. फोर्ड फिगो / आय-१० यांच्यात तुलना करतोय. बजेत ४-४.५ लाख आहे.
गाडी जास्त करुन मिरज-सांगली शहरात आणि महिन्यातून एक्-दोनद आजूबाजूला फिरण्यास (३०-५० कि.मी.) वापर होईल. काही सूचना?
आणखी एक : इथे आधी सर्व वाहनांची यादी होती जी आत्ता दिसत नाहीये. जर अशी यादी दर आठवड्याला / पंधरवड्यात अपडेट करुन वर प्रसिद्ध करता येईल काय? यात गाडीचं मॉडेल / किंमत / मायलेज इ. गोष्टी समाविष्ट करता येतील.
आज अक्षय्यतृतीये च्या
आज अक्षय्यतृतीये च्या मुहुर्तावर आमची वॅगन आर आली. माझे खुप जुने स्वप्न पूर्ण झाले. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्या नवरा, माझ्या मागे ठाम उभा राहिला, मित्र्-मंडळींचा सल्ला, मद्त हे कायम लक्षात राहील. सगळयात महत्वाचे माबो. गाडीच्या धाग्यावरील सल्ले, सूचना खुप खुप मोलाचे. माबो रॉक्स....
congrats!
congrats!
मुग्धानन्द अभिनंदन, कोणते
मुग्धानन्द अभिनंदन, कोणते मॉडेल आहे @ wts price?
काल शोरूम मधे wagon r vxi आणि LXi मॉडेल बघायला गेलो होतो. त्यामधे vxi पसंत आलेय.
अभिनंदन मुग्धानंद्जी. वेलकम
अभिनंदन मुग्धानंद्जी.
वेलकम टु द क्लब.
मुग्धा, अभिनंदन ते स्टिकर्स
मुग्धा, अभिनंदन
ते स्टिकर्स करायला दिले होतेस ते लावलेस का गाडीवर? 
हो. लावायचे आहेत. माबो खरेदी
हो. लावायचे आहेत. माबो खरेदी विभागात शोधते आहे.....
धन्स सगळ्यांना.
प्रसिक, Vxi चांगलीच आहे. पण
प्रसिक, Vxi चांगलीच आहे. पण मला पेट्रोल बरोबर्च आजुन एक ऑप्शन हवा होता. म्हणुन Lxi. कारण सी. एन. जी. फक्त lxi मधेच आहे.
आणि फिचर्स मला बरेचसे सेम वाटले. (माझे अज्ञान पण असु शकेल...)
कॉन्ग्रॅटस् मुग्धानंद. हात
कॉन्ग्रॅटस् मुग्धानंद.
हात साफ झाला का ?
हात साफ झाला का ?>> हात साफ
हात साफ झाला का ?>> हात साफ होणे, नजर मरणे, मोसम पकडणे हे लै भारी शब्द आहेत.,
मोसम कधीही पकडू नका. अगदी
मोसम कधीही पकडू नका.
अगदी प्रेमाचा सल्ला.
त्या मोसम च्या नादी मॅक्सिमम अॅक्सिडेंट होतात.
तुम्ही मस्तपैकी ४ लेन मधे चालत असता, तुमच्या समोर एक ट्रक वाला ७० ने चालत असतो.
त्याच्या मागे एक डुक्कर रिक्षा ७८ ने, दोघे ही मोसम पकडून.
तुमच्या गाडीचा स्पीड १०० असतो.
अन तो डुकर्या मोसमसाठी (मोसम तोडू नै अशी जुन्या डायवरांची शिकवण असते) तुमच्या लेनमधे ऐनवेळी घुसतो..
असा स्टायलित हात बित हलवतो. की थांब. तुम्ही कसे बसे थांबता. इथे एअरबॅग, एबीजी, एवीजी, एबीसीडी, खादाडि, सगळे आठवते..
स्वतः मोसम पकडू नका, अन इतरांच्या मद्द्ड डोक्यात मोसम असतो, हे ध्यानी असू द्या. तरच भारतातल्या रस्त्यांवर निभाव लागेल.
मित्रहो, ओव्हरटेक करताना कृपया गिअर 'उचला'
सुपर टॉप वर असाल, तर टॉपवर या. टॉप वरून थर्ड वर. पिकप वाढवा, अन मग भुर्रकन पुढे जा,
मग पुन्हा तुमचा वरचा गिअर घ्या.
आपल्याकडे अजून एक मूर्ख पद्धत आहे. शेजारी जर ओव्हरटेक करायला मागत असेल, तर समोरचा बैलगाडीवाला देखिल बैलांच्या शेपट्या पिरगाळूपिरगाळू स्पीड वाढवून ओव्हरटेक करू देत नाही. तद्दन मूर्खपणा. यातच आपण गिअर 'उचलत' नाही, का? तर मोसम. समोरून ट्रक/एसटीवाला यमदूत येत असतो.. ऐनवेळी प्रॉब्लेम होऊ देऊ नये, ही विनंती..
याच नोटवर, तुमच्या पेक्षा मोठी गाडीवाला साईड मागत असेल, तर उग्गं त्याला खुन्नस देऊ नका. त्याला जायला जागा द्या. त्याला घाई आहे. त्याची आई वाट पहाते आहे घरी. जाऊ द्या बिच्चार्याला..
मोसम म्हणजे काय? रिक्षाचे
मोसम म्हणजे काय? रिक्षाचे उदाहरण खरच खतरनाक आहे...
डुकर्या ७८ स्पीड??? असेल
डुकर्या ७८ स्पीड???
असेल म्हणा.. ७०-७५ तर जाइलच तो...
मला फक्त वर उल्लेखलेल्या शब्दांची गमंत वाटते बाकी काही नाही.
बाबु. धन्स. नाही हात नाही साफ
बाबु. धन्स. नाही हात नाही साफ झाला आजुन. जी गाडी सुरु केली, ती झुप्पकन पुढे, मग मैत्रिण ओरडली ,तसा गच्चकन ब्रेक लावला.
झकासराव, इब्लिसजी, पामराला मोसम आदि संकल्पना साध्या शब्दात समजाविण्याचे करावे
इब्लिस च्या पूर्ण पोस्ट वर
इब्लिस च्या पूर्ण पोस्ट वर हसुन हसुन मेले
जी गाडी सुरु केली, ती झुप्पकन
जी गाडी सुरु केली, ती झुप्पकन पुढे, मग मैत्रिण ओरडली ,तसा गच्चकन ब्रेक लावला>> जपुन हो...

मोसम आदि>> इब्लिस यांच्या पोस्टीत अर्थ बर्यापैकी स्पष्ट आहेच.
मोसम पकडणे म्हणजे टॉप गीअर वर गाडी मस्त एका स्पीड ला एका लयीत सलग चालली आहे.
त्यात डिस्टर्बस्न नको..
"मोसम" पकडणे म्हणजे जोरात
"मोसम" पकडणे म्हणजे जोरात गाडी हाकणे / काहीही झाले तरी स्पीड कमी न करणे असे नाही. मोसम म्हणजे इंजिन 'स्टॉल' न होवू देता, योग्य आरपीएम रेन्जमधे गाडी ठेवणे. हे करण्यासाठी वारंवार गिअर्स डाऊनशिफ्ट करणे क्रमप्राप्तच असते. योग्य त्या 'रेव्ह-रेन्ज' मधे गाडी चालवणे म्हणजे 'मोसम' अशी माझी कल्पना आहे.
चूभुदेघे.
मोसमलाच खुशी असाही शब्द ऐकला
मोसमलाच खुशी असाही शब्द ऐकला होता.
मला त्याच लायनीतले आणखीन काही शब्द आठवताहेत पण जाउ देत.
मला बाईक शिकवणार्याने अगदी सिस्टीमॅटीक शिकवली होती
स्टार्ट कर
गिअर टाक
उचल
थोडी पुढे घे
थांब.
हे शंभर वेळा जमलं की मग पुढचं
त्याच लायनीतले आणखीन काही
त्याच लायनीतले आणखीन काही शब्द आठवताहेत पण जाउ देत.>> अरे लिहि रे.
हवं तर वेगळा धागा काढ.
सन्ग्रह होइल चांगला.
बाबु, टाक, टाक... आम्च्या
बाबु, टाक, टाक... आम्च्या ज्ञानात भर पडेल...
तुमच्या पेक्षा मोठी गाडीवाला
तुमच्या पेक्षा मोठी गाडीवाला साईड मागत असेल, तर उग्गं त्याला खुन्नस देऊ नका. त्याला जायला जागा द्या. त्याला घाई आहे. त्याची आई वाट पहाते आहे घरी. जाऊ द्या बिच्चार्याला..>>> अगदी अगदी, विशेषतः झायलो, इनोव्हा, सुमो, डस्टर वगैरे तर फारच मातृभक्त असतात. पुन्हा गाडीवर कुठेही; राजे, छत्रपती, छावा, राजकीय पक्षांचे सिंबल्स इ इ. असेल तर नक्कीच!!!
अगदी अगदी, विशेषतः झायलो,
अगदी अगदी, विशेषतः झायलो, इनोव्हा, सुमो, डस्टर वगैरे तर फारच मातृभक्त असतात. पुन्हा गाडीवर कुठेही; राजे, छत्रपती, छावा, राजकीय पक्षांचे सिंबल्स इ इ. असेल तर नक्कीच!!! >>> आगाऊ,
आणि कुठल्याही बेस्टबसच्या पुढे जाण्याचा प्रयत्नही करू नका. ते लगेच आपल्या गाडीला दाबतात आणि त्यांना ते सहज शक्यही होतं.
बेस्टबस हे रस्त्यावरलं
बेस्टबस हे रस्त्यावरलं संस्थान असतं.
गाडीवर जबरदस्त कंट्रोल आणि बाकीच्या जगाबद्दल मस्तपैकी तुच्छता.
Pages