कोणती गाडी घ्यावी?

Submitted by साजिरा on 15 October, 2009 - 07:51

इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.

काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्‍यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.

तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्‍या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू. Happy

याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सावली, अभिनंदन Happy

म्हणजे आम्ही तुझे नामकरण शुटर गर्ल विथ पर्सनल चित्ता असे करून टाकू. स्मित अभिनंदन परत.>>> हे सही होतं Happy

Happy

XUV मध्ये खरच लाँग ड्राईव्हनी थकवा येत नाही. आता भरपूर रोड ट्रीप करा. वेगळा भारत समोर येईल. त्याची एक वेगळीच मजा !

थँक्यु अश्वीनी.

याआधी फक्त आयटेन चालवली होती तीही फक्त मागचे दिड वर्ष. त्यामुळे XUV जास्तच चांगली वाटतेय. चालवताना खुप सेफ वाटते.
वेगळा भारत समोर येईल. त्याची एक वेगळीच मजा !>> नक्कीच. Happy

सावली अभिनंदन.....

केदार, w8 awd आहे.... रिव्हर्स कॅमेरा आणि सर्व संभाव्य अ‍ॅक्सेसरीज हक्काने लुटल्या आहेत डिलरकडून.. Happy

बाकी तुझे लडाखवरचे सर्व लेख मित्रांना दाखवुन हीच एक्सयुव्ही ट्रिप करायचा प्लान आहे..... योग्यवेळी तुला अधिक माहितीसाठी त्रास देणारच आहे Wink

चित्ता मालकांच अभिनंदन Happy
एन्जॉय.....

बा द वे, सध्या रिसेशन मुळे चित्त्याच प्रॉडक्शन थोडसं कमीच सुरु आहे.
त्यामुळे डिलर डिस्काउन्ट देत असतील. टर्नोव्हर वाढवण्यासाठी. Happy

Hyundai Xcent घ्यावी काय याबद्दल मते हवीआहेत....आज आत्ता ताबडतोब Happy

केदार... XUVची चेसी वेगळी आहे का इतर गाड्यांपेक्षा? >>> हो मोनोकॉक आहे. लॅडर बेस्ड नाही.

.आज आत्ता ताबडतोब >> चांगलीच गाडी आहे. आवडली तर जरूर घ्या, पण ५ सिटर ऐवजी ४ सिटर म्हणता येईल कारण विड्थ कमी आहे. सिट बेल्ट अ‍ॅडज्स्टेबल नाही आणि बाकी काही फिचर्स मिसिंग आहेत. पण जर मध्ये बसून सगळे तुमच्या साठी योग्य वाटत असेल तर गो फॉर इट.

Honda Amaze Automatic मॉडेल कसे वाटते? रोजचे ५० किमी जाउन येउन.. आणि विकेंड्ला २०० किमी..

केदार कोणते फीचर्स मिसिंग आहेत हे जरा सांगता येईल का? महत्वाचे आणि सुरक्षेशी निगडीत असेल तर विचार करावा लागेल. येथे कोणी घेतली/ वापरली आहे का?

भुंग्या - गाडी घेऊन लडाखला जाणार आहेस तर ते २९ ऑगस्ट ते ११ सप्टे. मध्ये कर बरे. आम्हालाही कंपनी मिळेल

मी मुंबईत रोजच्या वापरासाठी सेकण्ड हँड गाडी घ्यायचा विचार करते आहे. काही ऑटोमॅटिक गाडीचे ऑप्शन आहेत का?
ऑटोमॅटिक नाही मिळाली तर आल्टो एलेक्सआय सीएनजी किंवा विस्टा डिझेल घेईन म्हणते (मला भारी आवडते ही गाडी). नवीन नॅनो घ्यायचा विचार केला होता. पण गेल्या वर्षी टेस्ट ड्राईव मध्ये तिची ड्रायव्हिंग सीट कम्फर्टेबल नाही वाटली. तिच्या मॉडेलमध्ये काही बदल झाले आहेत का? तिच्यातही सीएनजी ऑप्शन आहे. ती गाडी कशी आहे

तुमची काय मते आहेत. (मी कन्फ्युज झाले आहे)

सुरक्षेविषयक एक महत्वाचे फिचर अ‍ॅटो लॉकिंग मिसिंग आहे, मी टेस्ट राईड घेतली नाही अजून पण जे वाचले आहे त्यावरून दिसते आहे तसे.

हे सेफ्टी फिचर्स गाडी घेताना विचार करा.

१. एबिएस - त्यांचे पँप्लेट वाचले तर असे दिसते की ते वर दोन्ही एस आणि एस एक्स मॉडेल मध्ये पण ऑप्शनल आहे. तर ते ही घ्यावे कारण एकदा गाडी हातात आली की कुणीतरी ती पळवणार हे नक्की, अश्यावेळी ब्रेकिंग साठी एबिएस आवश्यक आहेच.
२.एअर बॅग्स - एस मध्ये एअर बॅग्स नाहीत. त्यामुळे एस एक्स वर जा.

बाकी मधून आणि बाहेरून गाडी चांगली दिसते आणि प्लास्टिक क्वालिटीही चांगली आहे. पण फ्रंट नेक रिस्ट्रेन्टंस फिक्स आहेत.

वेल, ऑटोमॅटीक सेकंडहँडमध्ये मारुती ए स्टार किंवा आयटेन अ‍ॅस्टा / स्पोर्ट्स घेऊ शकतेस.
मारुती सेलेरिओ आता नवीन ऑप्शन आहे. त्याचे मायलेज आयटेन ऑटोमॅटिकपेक्षा खूपच चांगले मिळेल पण ती सेकंडहँड मिळणार नाही बहुतेक.

नॅनोची ड्रायव्हिंग सीट तुला कंफर्टेबल का वाटली नाही ? माझा नवरा सहा-एक आहे. त्याच्यामते नॅनोला जी लेग आणि हेडस्पेस मिळते ती दुसर्‍या कुठल्याही छोट्या गाडीत मिळत नाही. सिटी ड्रायव्हिंगसाठी नॅनोसारखी कार नाही असे त्याचे म्हणणे. पण हायवेवर आणि लांब पल्ल्यासाठी सेफ वाटत नाही तितकीशी.

आम्ही गेल्यावर्षी आयटेन अ‍ॅस्टा ऑटोमॅटिक घेतली. त्यावेळी हॅचबॅक ऑटोमॅटिक कार्समध्ये तीच सगळ्यात चांगला चॉईस वाटली आणि नंतर एक-दोन महिन्यांतच आयटेन ग्रँड लाँच झाली. आणि आता सेलेरियो ! जरा जीव जळला की ह्या गाड्या थोड्या आधी का नाही आल्या Happy अर्थात सेलेरियोमध्ये एअरबॅग्जचा ऑप्शन नाहीये बहुतेक त्यामुळे पहिली गाडी म्हणून ती घेतली गेली नसती.

अगो मी फक्त पाच फूती आहे. त्यामुळे सीट पूर्ण पुढे न घेता आल्याने मला ते कम्फर्टेबल नाही वातली. शिवाय तिचं रिक्लायनिंगसुद्धा नाही आवडलं.

बाकी ऑटो गाड्या बघते.

पण ती सेकंडहँड मिळणार नाही बहुतेक>> अहो ती आटुकमाटुक नवीन मिळत नाहिये. तीन महिने वेटिन्ग सांगत आहेत.
तसही ती गाडी कॉम्पॅक्ट सेगमेन्ट मधील आहे.
आतमध्ये मला तरी लहान वाटली.
त्यापेक्षा आयटेन किंवा ग्रॅन्ड चांगल्या की.

डिझेल गाडी जर भरपूर रनिंग असेल तरच स्वस्त पडते. कारण डिझेल गाडीची किंमत पेट्रोल गाडीपेक्षा साधारण लाखभराने तरी जास्त असते (मी लिवा घेतली तेव्हा हेच चित्र होते!).

म्हणजे डिझेलवर तुम्ही जेवढे वाचवणार (अ‍ॅज अपोज्ड टू पेट्रोल) ते लाखभराच्या पुढे गेल्याशिवाय फायदा सुरू होत नाही. यात परत पेट्रोल व डिझेल मधल्या किमतीच्या फरकातले चढउतार गणितात आले की अजून घोळ होतो. मी गणित केले होते तेव्हा माझ्या रनिंगच्या प्रमाणात मला तो जास्तीचा लाखभराचा टप्पा पार करायला ५-६ वर्षे लागू शकतात असे लक्षात आले.

तसेच अनेक सेफ्टी फिचर्स किंवा इतर फिचर्स हे पेट्रोलच्या गाड्यांमधे जास्त मिळतात.
उदा. लिवाच्या डिझेलच्या टॉप ऑफ द लाइन मॉडेलमधे रेअर विंडो वायपर नव्हता.

आतमध्ये मला तरी लहान वाटली. >>> इंटरनेटवर कम्पेअर करुन पाहिल्या होत्या आयटेन आणि सेलेरिओ. तर सेलेरिओ किंचित मोठीच होती. प्रत्यक्षात माहीत नाही.

आयटेन आता तशी जुनी झाली. अन त्यामानानी सेलेरीओ फ्रेश लूक्स अन जास्त उजवी वाटते. वर पुन्हा फुल लोडेड वर्जन ५ लाखाच्या आत आहे. अजून एक + म्हणजे, ती मारूती आहे.

नी - मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये क्लच ब्रेक अक्सेल असं अडीच तास करून पायाची वाट लागते. ऑफिस नसतं त्यादिवशी कधी फिरायला बाहेर गेलो तर काही वाटत नाही पण ऑफिसच्या दिवशी नको नको वाटतं एक दिवस अनुभव घेतला. दुसर्‍यादिवशी पासून मी बोरिवली दादर स्कूटरवर जातेय पण घरी गेले की कंबर आणि खांदे बोलायला लागलेले असतात. ऑटोमॅटिक गाडी थोडी जास्त कम्फर्टेबल होईल असं वाटत आहे पण तरी सगळ्या फर्स्ट हँड ऑटोमॅटिक गाड्या बजेट बाहेर जात आहेत. बजेतमध्ये बसेल अशी सेकंड हँड घेतली तरी पेट्रोलचा खर्च खूप येईल असे वाटते. ६० किमी रोज तेही बंपर टू बंपर ट्रॅफिकमध्ये.

घरची एक गाडी डिझेल आहे. पेट्रोल च्या कम्पॅरिझन मध्ये महाग पडली होती. पण आता फ्युएलला जास्त पैसे जात नाहीत तेव्हा खूप बरे वाटते. डिझेल गाडी असेल तर मग लांबच्या ट्रिप्स सुद्धा स्वत:च्या गाडीतूनच करता येतील असा विचार होता तेव्हा आणि तसे थोडेफार जमलेही. यापुढेही करत राहू. तसेसुद्धा यापूर्वीची पेट्रोल गाडी - वर्सा - भरपूर पादडली पाच वर्ष. ८ सीटर असल्याने पाच जणात राजस्थानची ट्रीप मस्त झाली. आतासुद्धा आहे ती गाडी सहा - सात वर्ष वापरून मगच विकणार. दुसरी गाडी डिझेल घेण्यामागे काही खास उद्देश नाही पण टेस्ट ड्राईव केली होती तेव्हा विस्टा प्रचंड आवडली होती.

केवळ स्कूटर, रिक्शा, नॅनो आणि अल्टो ट्रॅफिकमधून लवकर बाहेर निघतात असे ऑब्जर्वेशन आहे.
आता तर प्रायव्हेट रिक्शा घ्यावी असेच वाटत आहे. पण तिला एसीची सुविधा नाही मग स्कूटर काय वाईट आहे असा विचार येतो.

ह्या सगळ्या कारणाने मी कन्फ्युज झाले आहे आणिइ निर्णय घेता येत नाही आहे.

वॅगन आर ला पर्याय नाही. काय योकु? > पर्सनली मला ती गाडी आवडतेच. आता २ दिवसांपूर्वी अकोला - नागपूर - कारंजा (लाड) - अकोला अशी ६००+ किमी ची ट्रीप करून आलो. काहीही त्रास नाही. एसी बर्यापैकी चांगला आहे. कारण ४५ - ४६ डिग्रीच्या उन्हात ही काम करत होता. एकच छोटा प्रॉब्लेम म्हणजे डिकीचा. जर लहान आहे, पण चलता है.

ऑटो स्पीड डोअर लॉकिन्ग डीलर एनेबल्ड असते काय. एक्ष सेन्ट मध्ये ती सुविधा दिसत नाहीये.... एन्ट्री लेव्हल मॉडेलला सिक्युरिटी फीचर्स अजिबात दिसत नाहीत . मग एअर बॅग्ज व एबीएसचे पैसे वेगळे द्यावे लागतात काय?

ऑटो स्पीड डोअर लॉकिन्ग डीलर एनेबल्ड असते काय >> नाही. चाईल्ड लॉक करण्याची सुविधा असेल तर ती डिलर इनेबल्ड असते.

एक्ष सेन्ट मध्ये ती सुविधा दिसत नाहीये.. >> नाहीये.

एन्ट्री लेव्हल मॉडेल एकदम बेकार असतं. भारतात अ‍ॅटो लॉज भंगार असल्यामुळे आणि कुणालाही ते अजूनही नीट करावे वाटत नसल्यामुळे बहुतेक सगळ्या कार्स मध्ये एन्ट्री लेवल मॉडेल मध्ये जे अत्यावश्यक फिचर्स असतात (उदा एअरबॅग) ते ही नसतात. कॉस्ट सेव्हिंगच्या गोंडस नावाखाली. चांगले आणि योग्य कायदे आले तरच हे चित्र बदलेल.

मग एअर बॅग्ज व एबीएसचे पैसे वेगळे द्यावे लागतात काय? >> नसलेल्या मॉडेल मध्ये एअर बॅग्स फिट करता येत नाहीत*. बेसिक नाही पण त्यापुढच्या मॉडेल मध्ये एअर बॅग्स आहेत. ते मॉडेल घ्या. एबीस मात्र मॉड करता येते. त्याचे पैसे वेगळे.

* मग स्टिअरिंग कॉलम बदलावे लागेल वगैरे वगैरे, त्यापेक्षा त्यापुढचे मॉडेल घेणे स्वस्त पडेल.

-

एक सल्ला मात्र अवश्य देईन, गाडी कुठलिही घ्या, लोडेड घ्या. शेवटी गाडी तुम्ही तुमच्यासाठीच घेत आहात मग सगळे सेफ्टि फिचर्स आणि लक्झरी वापरा की. अर्थात त्याचे पैसे पडणारच. पण जेंव्हा ६ लाख द्यायला तयार आहात तिथे अजून एकाने खूप काही बिघडत नाही. ( हे उदाहरण आहे, ३ तिथे साडेतिन टाईप.)

गाडी कुठलिही घ्या, लोडेड घ्या. शेवटी गाडी तुम्ही तुमच्यासाठीच घेत आहात मग सगळे सेफ्टि फिचर्स आणि लक्झरी वापरा की. अर्थात त्याचे पैसे पडणारच. पण जेंव्हा ६ लाख द्यायला तयार आहात तिथे अजून एकाने खूप काही बिघडत नाही>>> + १०००

सध्याची ऑल्टो (जुनी) घेतली. नुकतच अमरावती - शिर्डी - नाशिक - अमरावती (१३०० किमी) जाउन आलो. एसी चांगला वाटला. पुढच्या वर्षी XUV घ्यायचा विचार आहे. ४+१ ऑल्टोसाठी जरा गर्दी वाटते. Happy

योकू +१. डीकीचा प्रॉब्लेम मलाही आला. रिमुवेबल कॅरिअर लावावं का? गरज असेल तेंव्हा वापरायचं? आजकाल नविन कॅरिअर्स दिसायलाही चांगले दिसतात. पण त्याने गाडीवर परिणाम होईल का?

Pages