कोणती गाडी घ्यावी?

Submitted by साजिरा on 15 October, 2009 - 07:51

इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.

काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्‍यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.

तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्‍या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू. Happy

याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिल्या मग तस पाहिल तर खुप पैसे मिळाले २००६ च्या ईंडिकाला २.४ लाख डो़क्यावरुन पाणी ..... गाडी डॅमेज झाली नसती आणि चालु कंडिशन मधे असती तर ७-८ वर्ष जुन्या ईंडिकाला कोण २.४ लाख देईल रे.

गिरीजा, मॉडिफाय करुन घेता येईल साधारण २ ते ३ लाखात बसते.

फक्त चालवताना जे ईन्जिन लावलं असेल तसा परफॉर्मन्स मिळतो

मिल्या मग तस पाहिल तर खुप पैसे मिळाले २००६ च्या ईंडिकाला २.४ लाख डो़क्यावरुन पाणी ..... गाडी डॅमेज झाली नसती आणि चालु कंडिशन मधे असती तर ७-८ वर्ष जुन्या ईंडिकाला कोण २.४ लाख देईल रे.
>>>>>>>>>>>>>>>>>>

अरे व्हिस्टा होती रे सुशांत........ आणि मला माहितेय विकायला गेलं तर २.२५ मिळत होते म्हणूनच "टॉटल डॅमेजला काढली" म्हटले ना Wink

मला अल्टो साठी चांगली म्युझिक सिस्टिम कोणी सुचवू शकेल का?
पर्याय आहेत - पायोनीअर, जेबीएल , जेवीएल, सोनी यापैकी कोणती घ्यावी?
त्यासाठी लागणारे अम्प्लिफायर्स,स्पीकर साईझ(वॅट्स्),woofers बद्दल ही माहिती हवी आहे.

(हा विषय गाडीशी संबधित असल्याने व बर्याच जाणकारांची वर्दळ असल्याने इथे विचारले.)

प्लेअर : पायोनीअर
स्पिकर : पायोनीअर, जेबीएल.
माझ्या सोनी प्लेअरमधे गाडी खड्ड्यातुन गेली की बर्‍याचदा सीडी रीस्टार्ट व्हायची किंवा भलतच गाण चालु व्हायच. सर्व्हीस सेंटरवाल्यांकड मी गेलू त्यावेळेस सेम प्रॉब्लेम घेउन ३-४ जण आले. मी सिस्टीम बदलुन पायोनीयर घेतली. आत्तापर्यंत (४-५ वर्षात ३ गाड्यांमधे) काहीच प्रॉब्लेम आलेला नाही. परफॉर्म्न्स चांगला आहे.
अल्टो छोटी गाडी आहे त्यामुळ वुफर टाकु नये.
फ्रंट स्पिकर्स टाका ट्विटर टाकु नका. रिअर स्पिकर डोअर मांऊटेड घ्या. बोर्ड मांउटेड शक्यतो नको.

Go for Pioneer

पायोनीअर बेस्ट आहे. सोनीच्या सिस्टीमने फार वैताग दिला होता, त्याचा रिमोट तर कधी धड चालायचा नाही. एफ एम तर कायम खरखर ऐकू यायचा.

झेन व्हीएक्सआय २००६ मेक
५५००० किमी रनिन्ग
१ लाख ५५ हजार म्हणत आहे सेलर.
काय मत आहे?

एक अल्टो के १० आहे. २०१० ची.
रनिन्ग कमी आहे. १० हजार किमी.
त्याने २ लाख ७५ हजार सांगितले आहेत.

गो फॉर पायोनिअर

झकासराव, त्यापेक्षा सँट्रो झिंग घ्या..... १.६ ते २ पर्यंत चांगली मिळेल.

अरे अल्टोला इतके पैसे कशाला घालवताय???? पुण्यात ह्युंदाई शोरूमला भेट देऊन या. २०१० ची आय १० फक्त १२००० किमी चाललेली विथ लेदर सिट कव्हर्स, रिव्हर्स कॅमेरा, सेंसर २.६० लाख ला ४ महिन्यापूर्वी मिळाली होती. गाडी सूपर्ब कंडिशन्मध्ये आहे. स्वतः चालवलीये पुणे ते चिपळूण.
आता जाऊन नीट सर्च मारा..... घाईघाईत डिसिजन घेऊ नका.

सेकंड हँड गाडी घेताना पेशंस ठेवून शोधावं लागेल...... तरच चांगलं डील हाती लागेल..... गुड लक.

श्री ,_सुशांत_, इंद्रधनुष्य ,नंदिनी , भुंगा सर्वांचेच खूप खूप धन्यवाद.
_सुशांत_ सविस्तर सल्ल्याबद्दल धन्यवाद.
पायोनीअर च घेईन .

तुमच्या गाड्या पाहुन मला भोवळच आली ! बर मला गरीबाला 2 लाखांचे बजेट असणारी उत्तम मायलेजची गाडी सुचवा बरं ! ( सेकंड हँड )

ह्युंडाई इऑन आणि होंडा ब्रिओ कुणी चालवतंय का सध्या? काय रिपोर्ट? यापैकी एक घेण्याचा विचार सुरु आहे. बाकी अ‍ॅनालिसिस वगैरे वाचलंय नेटवरुन. फक्त कुणाचा प्रत्यक्ष अनुभव काही विशेष (+/-) असल्यास सांगा.

भुन्ग्या मलाही फार गडबड नाहिये.
त्यामुळे मी फार घाइट वै बघत नाहिये. Happy

किती पैशात अल्टो घ्यावी अस तुझ मत आहे ते तरी सांग.

इब्लिस नको ओ नॅनो.
त्यात जागा जरा जास्त आहे हे मान्य. पण तरिही...

आम्ही ह्या महिनाअखेरीस भारतात परतत आहोत. गाडी घेण्यासंदर्भात मार्गदर्शन हवे आहे. भारतात नव्याने आलेल्या मॉडेल्सबद्दल काहीच माहिती नव्हती म्हणून भुंग्याकडून थोडे पॉंईंटर्स घेतले होते. आता माहिती अगदीच डोक्यावरुन जाणार नाही असा कॉन्फिडन्स आला आहे Happy

आमचे आखुडशिंगी बहुदुधी निकष Wink :

१. गाडी अगदी छोटी नको किंवा अगदी मोठीही नको. मिडसाईझ हॅचबॅक बरी पडेल असे वाटते. रोजचे साधारण २० किमी ड्राईव्ह आहे.
२. टॉलबॉय डिझाईन असलेली गाडी हवी. सहाफुटी लोकांना आरामात बसता आले पाहिजे.
३. हा मुद्दा शेवटी लिहिला असला तरी पहिल्या दोनांइतकाच महत्त्वाचा आहे. गाडीला सेफ्टी फिचर्स उत्तम असले पाहिजेत. पुणे-मुंबई फेऱ्या होणार त्यामुळे हायवेवर गाडी भरपूर चालवली जाणार आहे त्यामुळे ह्या मुद्द्यावर तडजोड करायची नाही.
* सेफ्टी फिचर्सशी संबंधित प्रश्न योग्य धाग्यावर विचारला आहे.

* उंच सीट्स असलेल्या गाड्यांमध्ये वॅगन आर हा ऑप्शन सतत समोर येतो आहे पण ती घ्यावीशी वाटत नाही.
चार वर्षांपूर्वी काही काळासाठी भारतात होतो तेव्हा सँट्रो वापरली होती. त्यातली हेडरुम-लेगरुम आम्हाला आवडायची. आय टेन आणि सँट्रोमध्ये काय फरक आहे ? हेडरुम कमी असेल असे वाटते पण त्यातले सेफ्टी फिचर्स चांगले वाटत आहेत.

@नताशा - माझ्या इऑन मॅग्नाला वर्ष झाले आहे
मायलेज उत्तम १८ पर्यंत. हँडलिंगला स्मूथ. एसी जोरदार. बूट स्पेस बर्‍यापैकी, कदाचित बीट्/स्पार्कपेक्षा कमी.
पॉवर विंडो फक्त पुढच्या. एबीएस नाही. स्टिरिओ इनबिल्ट, स्पीकर्स फक्त पुढे.
फ्रंट पॅनलला स्पेसचा वापर स्मार्ट आहे. इंटेरीअर डिसेंट.
८००सीसी इंजिन त्याप्रमाणात पॉवर, पिकअप इ.इ. एकदम बूम वगैरे नाही
रेअर स्पेस ओके पण जास्त जाड पब्लिक असेल तर अडचण शक्य!
डिझाईन, लूक सुंदर; माझ्यामते या कॅटॅगरीत सर्वात सेक्सी!

मला माझ्या उंचीला (६ फूट) मांझा छान वाटते. हॅचबॅकमधे व्हिस्टाचा विचार करायला हरकत नसावी. डिझेल कार असली तरी माझा अनुभव सुंदरच आहे. एकदमच व्हॅल्यू फॉर मनी आहे.

रेनॉल्टची एक डस्टर म्हणून गाडी आहे. ८ लाखाच्या आसपास. एस्यूव्ही क्याटेगरीत येईल, रिपोर्ट चांगले आहेत. पण फर्स्ट हँड वापरलेली नाहीये. लुक्स आवडले आहेत. कुणी सांगाल काय हिच्याबद्दल?

मारुतीची रिट्झ पण चांगली आहे. ६ फुट उंचीसाठी कंफर्टेबल आहे.

सेकंड कार म्हणून, महिंद्राच्या रेवाबद्दल काय मत आहे? मला आवडली ती गाडी सिटी कार म्हणून.

अगो,
मी गेले दीड वर्ष आय२० अ‍ॅस्टा वापरतोय.... लूक्स, सेफ्टी आणि परफॉर्मन्स या तीन्ही निकषांवर मस्त आहे गाडी... अर्थात पॉवर थोडी कमी वाटते....रेसींग मँटेलिटीचा चालक असेल तर थोडीफार निराशा होऊ शकते
पण ओव्हरऑल आय अ‍ॅम अ हॅपी कस्टमर Happy

अगो पण तू बजेट सांगीतले नाहीस. पण तरी ते ६ ते ८ असे धरून लिहितो.

होण्डा अमेझ. नवीन लाँच ह्याच महिन्यातला. ही हॅचबॅक वरून केलेली सेडान आहे. १.५ लिटर डिझेल इंजीन ज्यातून २५.८ लिटर प्रति किमी असे अ‍ॅव्हरेज मिळेल. ब्रायो मध्ये ६ फुटी माणूस बसू शकतो तर अमेझ मध्ये ही बसेल कारण बेस ब्रायोचाच आहे. हॅच पेक्षा नक्की चांगली. http://www.hondacarindia.com/Amaze/index.html इथे बघ.

निस्सान मायक्रा ही हॅचबॅक किंवा सन्नी / स्काला चा विचार कर. टेस्ट ड्राईव्ह घेऊन ये. अमेरिकन गाड्यांची सवय असल्यामुळे ह्या जास्त आवडतील कारण फिनिश आणि सेफ्टी दोन्ही मध्ये इतर कुठल्याही पेक्षा उच्च आहेत ह्या दोन कार.

डस्टर ८ लाखात ( ते पण x showroom त्यात टॅक्स अ‍ॅड ) बेसिक मिळते. ज्यात SUV च्या सोयी आहेत पण सेफ्टी फिचर्स जास्त नाहीत. ( एअर बॅग पण नाही. तर ABS, EBD दुरच) जर १० लाखाच्या रेंज मधील डस्टर घेतली तरच त्यात सेफ्टी फिचर्स आहेत. मला डस्टर आवडते पण ती फुल्ली लोडेड असेल तरच. मग ती ऑन रोड ११ + जाते.

त्यापेक्षा कमी रेंज मध्ये फोर्ड इकोस्पोर्ट ही नवीन गाडी येत आहे. चेक दॅट आउट. बहुतेक ह्याच महिन्यात ती गाडी इन प्लेश बघायला मिळेल.

अर्थात भारतात सेफ्टी फिचर्स ऑप्शनला आहेत. ह्या फिचर्सचे दणकावून पैसे घेतात अन बेसिक गाड्याच जास्त खपतात. त्यामुळे सेफ्टी फिचर्स हवे असतील थोडे जास्त पैसे प्रत्येक मॉडेलला द्यावे लागतात.

म्हणजे? बाहेरून? एअर बॅग्स अन ABS बाहेरून अ‍ॅड करून कस्टमाईज करून वॉरंटी बिघडवून घेण्यापेक्षा त्या सहीत गाडी घे की. Happy

अगो, गेली ७ वर्ष घरात सँट्रो आहे. घरातल्या ३ ड्रायव्हर्सची उंची ५.९+ आहे. पुढे लेग स्पेस ठीक आहे पण त्यांच्यातील जो मागच्या सीटवर बसतो त्याचे लांब कुठे जाताना गुडघे धरतात.मला चालवायला, पार्किंगला बेस्ट वाटतेय.

बरोबर सुशांत. माझ्या मित्राकडे बेसिक आहे. मी लाँग राईड घेतली आहे. पण केबिन आणि डॅशबोर्ड अगदीच टुकार वाटतो. मे बी मलाच सगळीकडे "टच"ची सवय लागली आहे. Happy

डस्टर ४ X ४ पुढच्या महिन्यात येते आहे. टॉप एन्ड विथ ४ X ४ - डेफिनेटली ए गुड बाय. ज्यांना ऑफरोड आवडते त्यांना एक ऑप्शन मिळेल. XUV मध्ये ४ X ४ नाही त्याचे मला दुखः आहे. Happy

दुचाकी मध्ये नवीन RE TB मस्त आहे. Happy

धन्यवाद सर्वांना Happy
केदार आणि इब्लिस, सिडॅन नको, शक्यतो हॅचबॅकच हवी आहे. बजेट सहा-साडेसहा चालेल. आठ जsरा जास्त वाटत आहेत.
स्वरुप, बरोबर आहे. आय ट्वेंटी लोडेड आहे सेफ्टी फीचर्सनी. आमच्याकडे रेसिंग मेंटॅलिटीचा चालक कुणी नाही.

टोयोटा लिवा, आय टेन, आय ट्वेंटी, व्हिस्टा ह्या चांगल्या वाटत आहेत.

अल्पना, मलाही माझ्यासाठी रेवा घ्यायला आवडेल पण सध्या एकच घ्यायची आहे Wink पार्किंगला सोपी आणि गियर्सची झंझट नाही. शिवाय ग्रीन कार Happy

अगो, तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुम्हाला फियाट पुंटो किंवा आय २०, लिवा हे तीनच ऑप्शन आहेत.
मी हि सेदान सुचवेन, खास करुन फोक्स PASSAT किंवा फोर्ड फिएस्टा क्लासिक.

Pages