कोणती गाडी घ्यावी?

Submitted by साजिरा on 15 October, 2009 - 07:51

इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.

काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्‍यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.

तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्‍या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू. Happy

याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सेदान हवीये >> तरीही, जर लिनीया बजेटबाहेर असेल तर पुंटो बघा. टॉप एंड मॉडेल येतं. फुल्ली लोडेड फिचर्स! मी घेतली आता मे महिन्यात. फियाटच्या ऑफर्सही दणक्यात आहेत.

८५/९० हजार ऑनरोड किंमत आहे. चालवायला सुख. ऑईल कूल्ड आहे नवीन मॉडेल. पावसात फार लवकर बंद पडते असा एका मित्राचा अनुभव.

टाटांनी ट्रक च बनवावेत.
maximum value पाहीजे असेल तर मारुती किंवा हुंडई ला पर्याय नाही.

जर लिनीया बजेटबाहेर असेल तर पुंटो बघा. टॉप एंड मॉडेल येतं >>>>>>>>> लिनिया वर्षात १००० पण खपत नाहीत. पुंटो जास्तितजास्त ५०००.
तुम्हीच विचार करा इतक्या कमी संख्येनी ज्या गाड्या तयार होतात त्यांच्या स्पेयर पार्ट ची काय अवस्था असेल?

नमस्कार...
मला सेकंडहँड कार घ्यायची आहे.
माझे बजेट 1-2 लाख आहे. पेट्रोल, डिसेल कि CNG घ्यावी? नैनो सोडून कोणतीही चालेल.

१ ते २ लाखात सेकंड हॅन्ड मारूती ८००, जुनी ऑल्टो वगैरे येऊ शकतील. शक्यतो डायरेक्ट सेलर पहा.

Ok. Thanks for the suggestion. Happy
माझा मुंबई - पुणे असा प्रवास असतो. या गाड्या या प्रवासासाठी योग्य आहेत ना?
मला 4 wheeler बद्दल फारशी माहिती नाही म्हणून विचारतोय.

१ ते २ लाखात सेकंड हॅन्ड मारूती ८००, जुनी ऑल्टो वगैरे येऊ शकतील.>>
जुनी आयटेन, वॅगन आर ह्या देखील गाड्या येतील. (४-६ वर्षे जुनी)
तुमच्या जवळच्या मारुती ट्रु व्हॅल्यु मध्ये देखील चेक करत रहा.

लोक्स मला मदत करा...
गाडी घ्यायचं घाटतं आहे. हा पूर्ण धागा वाचून झाला आहेच. अन् मी अजूनच भंजाळलोय.

तर -
बजेट ५ ते ६ लाख ऑन रोड.
बर्‍यापैकी मायलेज
पेट्रोल
शक्यतो दर विकांताला वापरली जाईल. (महिना सरासरी धाव २०० किमी), अर्थात अधून मधून लाँग ट्रिप्स होतील.
गाडी फार मोठी नकोच

सुचवा कृपया.

मी शॉर्टलिस्ट केलेल्यांपैकी - सेलेरिओ झेडेक्सआय, ब्रिओ व्ही एमटी, आयटेन ग्रँड (यातल व्हेरिएंट नाही सुचलं अजून)
अजून काही पर्याय?

वरच्या पोस्टी वाचून टाटा, फियाट, फोर्ड, टोयोटा, व्होल्क्स-वॅगन, शेव्ह्रोले, सध्यातरी नाही विचारात घेतल्यात वेगवेगळ्या कारणांकरता. यांबद्दल काही + असेल तर तेही घेईन विचारात.

कार लोन कुणाचं घ्यावं हेही सुचवा.

...

होंडा अमेझ ?
hyundai xcent ?

यांचे पेट्रोल मॉडेल या बजेट मधे मिळतील.

स्कोडा फाबिया चा पण विचार करा

योकु सेलेरिओ अथवा ग्रॅन्ड मध्येच बघा.

ग्रॅन्ड स्पोर्ट्झ ६ पर्यंत येइल की.

लोन शक्यतो नॅशनलाइज्ड बॅन्केचं घ्या.

ओके...! सेलेरिओ ईज गुड ऑप्शन!

तरीही मला ब्रिओबद्दल अजून काही असेल तर सांगा. तिच्याकडेही कल आहेच. आयमीन काही डिसअ‍ॅड्व्हांटेजेस असतील तर मी ती न घेण्याबद्दल कन्विस होईल :p

तरीही मला ब्रिओबद्दल अजून काही असेल तर सांगा>>
नाही माहिती.
कुणा मित्रमन्डळीत ब्रिओ नाहिये.

सेलेरिओ पेक्षा ग्रॅन्डचे गीअर आणि स्टेअरिन्ग जास्त स्मुथ आहे असं वाटलं का?
मला तसं फील आला आहे.

हुंडाई एक्स सेन्ट पोरांनी घेतली आहे. कशी आहे माहीत नाही. गेल्या ३ महिन्यात मी स्वतः १० किमी प्रवास केला आहे.मला गाडीतले कळत नाही. भाड्याचा ड्रायवर म्हणतो गाडी चांगली आहे

फोर्ड ईकोस्पोर्ट, रेनॉ डस्टर आणि निसान टेरेनो यातली एक फायनल करायची आहे. शक्यतो पेट्रोल..
... ईकोस्पोर्ट फीचर वाईज चांगली वाटतेय पण पुढुन लुक अजिबातच आवडला नाहिये..
बाकि च्या २ मध्ये काही मेजर नो नो आहेत का?

XUV500 घेऊन ओडीशाला जाऊन आलो. जवळपास ४०००किमी प्रवास झाला. मस्त, कम्फर्टेबल.

ईकोस्पोर्ट फीचर वाईज >> आत बसुन पाहिले का? आत जागा कमी वाटली आणि ड्रायवर सीट फारशी अ‍ॅडजस्ट होत नव्हती ( मी घ्यायच्या वेळेस हीचा विचार केला होता, पण सिट माझ्यासाठी अ‍ॅडजस्ट झाली नाही. )

हो जागेचाही जरा प्रॉब्लेम वाटला.. सीट अ‍ॅडजस्टमेंट ठीक वाटली ..मला सस्पेंशन चाही जरा प्रॉब्लेम वाटला

टेरेनो या सगळ्यात लूक, कंफर्ट मध्ये आवडली पण त्याचे रिव्युज फार चांगले नाहीत..म्हणुन जरा कंफुजन आहे..

XUV500 ४, ६ आहे का ८?

Pages