इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.
काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.
तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू. 
याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.
हम्म्म्म्म...
हम्म्म्म्म...
बॉन्ड अभिनंदन. किती महिन्यानी
बॉन्ड अभिनंदन.
किती महिन्यानी मिळाली?
केदार होता घरात लावला मग
केदार
होता घरात लावला मग मिरच्यांबरोबर. तेव्हढच कुत्रा तंगड वर करायला घाबरतो.
झकासराव १५ दिवसात मिळाली जास्त नाय वाटले कारण आधीची आय१० स्पोर्ट होतीच हाताशी.
अभिनंदन पाटील आणि बॉन्ड
अभिनंदन पाटील आणि बॉन्ड
टाटा सफारी स्ट्रॉर्म चे रिव्यूज चांगले वाटतायत. लोकसत्ता मध्ये रिपोर्ट आलाय.
*******
या गाडीची क्षमता अतिशय दमदार आहे. याचे २.२ एल व्हॅरीसीओआर इंजिनमध्ये व्हेरिएबल टर्बाईन तंत्रज्ञान वापरले असल्याने हिची शक्ती १४० पीएस व टॉर्क ३२० एनएम आहे. साहजिकच ही गाडी चालवणे खूपच सहज आहे, वेगवान कामगिरी असली तरी हिचा एनव्हीएच (आवाज, व्हायब्रेशन व अपाय पोहोचविण्याची संभाव्यता) खूपच कमी आहे. यामध्ये ईएसओएफ (इलेक्ट्रॉनिक शिफ्ट-ऑन-फ्लाय) तंत्रज्ञान असून त्यामुळे गाडी चालत असताना ४x४ किंवा ४x२ वापरला जाऊ शकतो. हे सर्व असूनही या गाडीची इंधन क्षमता ४x२ मध्ये प्रति लिटरमागे १४ किमी व ४x४ मध्ये प्रति लिटरमागे १३.२ किमी आहे.
संपूर्ण बातमी -> http://www.loksatta.com/drive-it-news/magnificent-strong-tata-safari-sto...
*******
प्रिमिअर रिओचा काही कोणाला
प्रिमिअर रिओचा काही कोणाला अनुभव??? काही एक्सपर्ट कमेंट???
मला मारुती अल्टो ८०० आवडली.
मला मारुती अल्टो ८०० आवडली. मस्त वाटते, चालवायला कंफर्टेबल, पॉवरफुल एसी. इथे जागोजागी घातलेल्या स्पिड ब्रेकर्स आणि रँबलर्सवर जास्त गचके देत नाही. इंजिन मात्र आधीच्या अल्टोसारखेच आवाज करते.
पॉवरफुल एसी. << ट्रायल तुम्ही
पॉवरफुल एसी.
<<
ट्रायल तुम्ही भर हिवाळ्यात घेता आहात... मला अॅक्चुअल अल्टो चा अनुभव नाही. पण बाहेरच्या तापमानाचे भान ठेवणे गरजेचे वाटते.
ट्रायल नाही हो, गाडी आली
ट्रायल नाही हो, गाडी आली घरी. मुंबईत डिसेंबरातही दुपारच्या पारी जाम उन आहे. इथल्या हवेचे काही खरे नाही.
आधीच्या अल्टोमधे दुपारच्या उन्हात एसी पहिल्या काट्यावर ठेवला तर चालु आहे की नाही ते कळायचे नाही. पण ह्या गाडीत खुप फरक वाटतोय. नशिबाने सिएन्जी पंप घराबाजुलाच आहे. रविवारी संध्याकाळी गर्दी होती पण एरवी कोणी नसते. अडिजचेश्या गॅसवर आठवडा गेला हे बघुन इतके बरे वाटले, जवळजवळ ७५० चे पेट्रोल जायचे आधी आठवड्याला, एसी चालु करायचे जीवावर यायचे. नविन गाडी मस्त एसी लावुन चालवतो, बच्चे मंडळी खुष
पहिल्या आठवड्यात २५ चे मायलेज दिले.
साधना अभिनंदन ... पर किमी
साधना अभिनंदन
... पर किमी किती पैसे लागतात?
२८५ रुपयाचा गॅस भरल्यावर २१०
२८५ रुपयाचा गॅस भरल्यावर २१० किमी प्रवास केला गाडीने आणि परत भरायची वेळ आली. जवळजवळ १.३० पैसे पडला, तेही कायम एसी लावुन.
एकच वाईट गोष्ट आहे - सिलेंडरात फक्त साडेआठ किलो गॅस राहतो . म्हणजे दर २००-२२५ किमिनंतर गॅस भरावा लागणार. गाडी गावी घेऊन जायचे असेल तर पुणे बॅगलोर रोडवर सिएन्जी कुठेकुठे मिळते त्याचा आधी शोध घ्यावा लागणार.
गाडी घेताना ३४ किलोचा सिलेंडर आहे म्हणुन सांगितलेले. मला वाटलेले ३४ किलो गॅस आत मावत असेल. बहुतेक ३४ किलो सिलेंडरचे वजन सांगितलेले

साधना, सीएन्जी प्रच्म्ड
साधना, सीएन्जी प्रच्म्ड स्वस्त पडतोच पण ऑईल रीप्लेसमेन्ट जास्त फ्रीक्वेन्तली करावी लागते त्यावर लक्ष ठेव. २०० चा पल्ला बरोबर. पुणे बंगळूरवर कोथरुडच्या पुढे सीएन्जी नाही बहुधा. लिस्ट मिळवली पाहिजे.
मागे कुणितरि इथे नविन
मागे कुणितरि इथे नविन गाडिच्या अक्सेसरिस बद्दल लिहिले होते किमतिनुसार, उदा...फोग लॅम्प्, कोटिन्ग , म्युझिक सिस्टिम ई ई. मला तो धागा सापडत नाहिये .लिन्क देउ शकेल का कुनि
CNG वर चालनार्या गाडया
CNG वर चालनार्या गाडया धोकादायक असतात असे ऐकले आहे.. खरे आहे का हे?
मला गाडी घ्यायची आहे. बजेट आहे ४-५ लाख. पेट्रोल का CNG या मध्ये सध्या गोन्धळ चालु आहे.
Hyundai EON किन्वा i10 घेणार आहे.
प्लिज मार्गदर्शन करा.
स्नेहा चाच प्रश्न... मी वॅगन
स्नेहा चाच प्रश्न... मी वॅगन आर नक्कि केली आहे. पण मला पेट्रोल सोबत अजुन एक ऑप्शन हवा आहे. एल्.पी. जी. का सी. एन. जी.?
चांगले काय आणि का?
मुग्धानन्द - आम्ही घेतली वॅगन
मुग्धानन्द - आम्ही घेतली वॅगन आर २ महिन्यांपूर्वी... ओन्ली पेट्रोल टॉप मॉडेल ५ लाखात मिळालं. गाडी एकदम मस्त आहे... कंपनी फिटेड सिएनजी चा ऑप्शन जास्त चांगला ओवर एलपीजी (मावैम). कारण - स्वस्त पडतो, तुलनेनी सीएन्जी चे पंप जास्त असतात...
अजून एक - परवा पुण्यात गेलेलो तेव्हा, दोन गाड्यांची जवळून तुलना करता आली. भावाच्या नॅनोत ६ फुटाचे दोन लोक समोर बसल्यावरही एकदम आरामात बसलो होतो + गीयर चेंज करतांना हाताचा स्पर्शही होत नव्हता... सेम केस विस्टा मध्ये पण पाहिली.
नंतर सेम दोन लोक वॅगन आरात होतो, पण गीयर वगैरे बदलताना, एकमेकांना हात लागत होता!
म्हंजेच टाटाच्या गाड्यांत स्पेस ची अजीबातच कमी नाहीये. मी सुचवेन की एकदा त्या गाड्या पण ट्राय करा...
माझं बजेट फार नसल्याने सध्या
माझं बजेट फार नसल्याने सध्या तरी रिसेलची कार घ्यावी म्हणतोय. दोन वर्षे वापरेन.
मग गावी पाठवता येइल.
सध्या तरी डोक्यात अल्टोच आहे.
रिसेल गाडी घेताना काय काय बघावं, काय टाळावं.
गाडीची विश्वासाहर्ता कशी बघावी (म्हण़जे रिसेल विकणारे खुप आहेत पण त्यातले चांगले कोणते)
किती जुनी गाडी घ्यावी? किती किमी रनिन्गवाली?
एन्जिनचं काय काय बघावं?
सध्या कसे रेट्स आहेत साधारण अल्टोचे?
साजिरा, केदार आणि इतर लोक्स प्लीज हेल्प.
धन्स योगेश, आपल्याला वि.पु.
धन्स योगेश, आपल्याला वि.पु. करते.
वॅगन आर नक्की असल्याने, दुसरा विचार नाही.
Wagon R CNG घ्या मी घेउन ६
Wagon R CNG घ्या मी घेउन ६ महिने झाले AVG पण मस्त फक्त्त AC लावल्यावर Pick up मार खातो. बाकि आजच टेम्पोने साईड मिरर तोड्ला आता बसवुन येईन. कम्पनी फिटेड CNG Model घ्या. माझी कम्पनी फिटेड आहे
आपण मुंबईमधे असता का? कुठुन
आपण मुंबईमधे असता का? कुठुन घेतली गाडी?
अरे रिसेलसाठी पण लिहा लोक्स.
अरे रिसेलसाठी पण लिहा लोक्स.
झकासराव, माझा रीसेलचा अनुभव
झकासराव,
माझा रीसेलचा अनुभव चांगला आहे. शक्यतो मारुती घ्या पण.
मुळात गाडी घेताना निरखून/पारखून घेतलीत, तर नक्कीच रिसेलमध्ये फायदा असतो........ पण स्वतः त्यातले जाणकार हवे नाहीतर कोणीतरी जाणकार व्यक्ती असावा गाडीतला बरोबर. .... डिलरकडे थोडे जास्त पैसे जातात पण पॉलिशिंग वगैरे करून मिळते.... शक्यतो डायरेक्ट सेलरची मिळाली तर फायदा होतो.
चांगल्या वस्तू बाजारात नेहमीच असतात..... तुमची नजर शोधक ठेवा..... योग्य लोकांच्या संपर्कात रहा.
नवी गाडी घेतलेली आणि रिसेलमध्ये घेतलेली दोही अनुभवलेय...... मला नेहमीच रिसेल बरी वाटते कारण माझा कल हा एकच गाडी वर्षानुवर्षे वापरण्याकडे नसून.... ठराविक वर्षानी रनिंग जास्त असल्याने बदलण्याकडे आहे..... तुमचा कल काय तो तपासून पहा.
तळटीपः झकासराव, माझा हा व्यवसाय नव्हे. मी फक्त माहिती दिली इथे.
झकासराव - माझ्यामते रीसेल
झकासराव - माझ्यामते रीसेल गाडी शक्यतो ओळखीच्या लोकांकडूनच घ्या... त्यातही एखाद्या एक्श्पर्ट म्येक्यानिकाला दाखवून मग फायनल करा...
नुकत्याच झालेल्या
नुकत्याच झालेल्या अॅक्सिडेंटमध्ये टाटा व्हिस्टा टोटल डॅमेजला काढावी लागली तेंव्हा सर्व्हेअरने दिलेला सल्ला....... टाटाच्या गाड्यांना रिसेल व्हॅल्यू नाही. २००६ च्या इंडिका व्हिस्टाला २.४लाख मिळाले इंश्युरंसचे...... सर्व्हेअरच्या मते हेच जर स्विफ्ट असती तर किमान ३.५लाख मिळाले असते...... हा फरक आहे मारुती आणि टाटामध्ये..... इति सर्व्हेअर.
रिसेलबद्दल बोलणं चालू आहेच तर
रिसेलबद्दल बोलणं चालू आहेच तर मी रिक्षा फिरवून घेतो
मला माझी SX4 विकायची आहे. ऑगस्ट २००७, ZXi, सिल्व्हर, ५४००० किमी. मी सेकंड ओनर आहे. २००९ डिसेंबरपासून वापरतोय. गाडी एकदम चांगल्या कंडीशनमध्ये आहे. पुण्यात बघायला मिळेल. ३.०५ ची अपेक्षा आहे.
मिल्या , टोटल डॅमेजला काढावी
मिल्या , टोटल डॅमेजला काढावी लागली म्हण्जे काय ?
मिलिंदराव, गाडी टोटल केली, तर
मिलिंदराव, गाडी टोटल केली, तर डेप्रिसिएशन नुसार पैसे मिलतात. जितका इन्शुरन्स असेल् तितके. रिसेल चा संबंध नाही.
थापा मारत होता तो..,
माझा हा व्यवसाय नव्हे. मी
माझा हा व्यवसाय नव्हे. मी फक्त माहिती दिली इथे>>

हे वाचलं नव्हतं तोवरच मी मेल ड्राफ्ट करायला घेतलाच होता. मलाही गाडी मिळवुन दे म्हणुन
मस्त माहिती दिलीस. धन्यवाद रे.
सो मुळात गाडी घेताना निरखून/पारखून घेतलीत, तर नक्कीच रिसेलमध्ये फायदा असतो........ पण स्वतः त्यातले जाणकार हवे नाहीतर कोणीतरी जाणकार व्यक्ती असावा गाडीतला बरोबर. .... डिलरकडे थोडे जास्त पैसे जातात पण पॉलिशिंग वगैरे करून मिळते.... शक्यतो डायरेक्ट सेलरची मिळाली तर फायदा होतो>>> ओक्के.
१) नेमकं काय निरखुन पारखुन घ्यावं??
२) इन्श्युरन्स आहे की नाही ह्याने काय फरक पडेल? समजा आधीच्या ओनरने इन्श्युरन्स रिन्यु न करता दोन तीन वर्षे गाडी वापरली असेल आणि आपल्याला करायचा असेल तर मधल्या वर्षाचे दन्ड आपल्याला भरावे लागतात का?
३) अॅक्सिडेन्ट हिस्ट्रीचा काय परिणाम असतो? ओव्हरऑलच.
ही माहिती आधीचा उजर किंवा डीलर लपवतोय का हे कसे कळेल
४) डिलरकडे गाडी घेतली तर कागदपत्रांची कामं सहजरित्या होतात का?
तुमचा कल काय तो तपासून पहा>>> मी दोन तीन वर्षे वापरीन गाडी.
मग कोल्हापुरला ठेवेन ती.
तिकडे तिला रनिन्ग फार कमी असेल पण आयत्यावेळी तिचा वापर चांगला होउ शकेल.
मी शक्यतो अल्टो बघतोय. तिला मायलेज चांगलं मिळत म्हणुन.
भुन्ग्याच्या पोस्टमुळे किमतीचा अंदाज तरी आला.
त्यातही एखाद्या एक्श्पर्ट म्येक्यानिकाला दाखवून मग फायनल करा>> हे लक्षात ठेवीनच.
टोटल डॅमेज दाखवून पूर्ण रक्कम
टोटल डॅमेज दाखवून पूर्ण रक्कम इन्श्युरंस कंपनीकडून ठरली (साधारण IDV नुसार). पण त्यापेक्षा कमीच रक्कम सेटल होते. . त्यात जी रक्कम ठरते त्याप्रमाणे स्क्रॅपवाला येऊन तुमची गाडी ठराविक रकमेला घेऊन जातो आणि उरलेल्या रकमेचा चेकच इंश्युरंस कंपनी तुम्हाला देते.
मग तो स्क्रॅपवाला ते पार्ट्स इतर ठिकाणी वापरतो..... तो मिलाजुला बिझनेस आहे
इब्लिस तुमचं बरोबर आहे.... मी
इब्लिस तुमचं बरोबर आहे.... मी काय लिहिलेले चुकीचं अर्थ लागतोय की काय
मला अजुन गाडी चालवायला येत
मला अजुन गाडी चालवायला येत नाही पण तरीही जेव्हा गाडी घ्यायची स्वप्ने पाहतो तेव्हा डोळ्यासमोर जीप रॅन्ग्लर रुबिकॉनच येते !!
http://www.jeep.com/en/2013/wrangler/#model=rubicon&color=deep_cherry_re...
आता ही काय भारतात मिळत नाही अन इम्पोर्ट परवडणार नाय ....तेवव्हा आपण बोलेरो किंव्वा थार डी आय ४ बाय ४ वर समाधान मानायचे ठरवले आहे
Pages