इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.
काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.
तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू. 
याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.
भुंगा देवाचीच कृपा म्हणावी
भुंगा देवाचीच कृपा म्हणावी ही.
फार अवघड प्रसंग होता. पहिल्या टायर फुटणे प्रसंगात चांगलं प्रसंगावधान दाखवल.
इकडे तुम्ही चारचाकीची चर्चा करताय. अपघातात मोठी दुखापत होण्याची रिस्क घेवुन बरेच दुचाकीस्वार विना हेल्मेट गाडी चालवतात. आता तर फुल स्टाइल मारण्याची फॅशन आहे. गाडी टिल्ट करत वळवणे वै.
भुंगा, अवघड वेळ होती. काळजी
भुंगा, अवघड वेळ होती. काळजी घ्या.
भुंगा वाचलास रे.. ! थँक्स
भुंगा
वाचलास रे.. ! थँक्स बाप्पा
( गाडी चालवताना रस्त्याकडे लक्ष देणे. )
केदार +१ - भारतात सेफ्टी अजुन
केदार +१ - भारतात सेफ्टी अजुन optional आहे.
भुंगा देवाची कृपा
भुंगा देवाची कृपा म्हणायची.
यापुढे काळजी घ्यालच.
वेगवेगळ्या गाड्यांतून प्रवास
वेगवेगळ्या गाड्यांतून प्रवास झालेला होता.... अगदी कंटेनरमधून पण ऊरण ते भिवंडी गेलो होतो..... झालंच तर अँब्युलन्स आणि पोलिस व्हॅनमध्ये पण बसलो होतो

एक "टोविंग व्हॅन" तेवढी राहिली होती...... या निमित्ताने त्या टोविंग व्हॅनमध्ये पण बसायची ईछा पूर्ण झाली
वर सर्वांनी नमूद केलेल्या सगळ्या सेफ्टी गाईडलाईन्स पाळूनच गेली १० वर्षं चालवली गाडी, कधी अपघात झाला नव्हता..... पण परवा वेळ वाईट होती त्यामुळे एकाच आठवड्यात दोनदा हे प्रकार झाले...
चालायचंच..... !!!!
दोन दिवस मात्र मित्राचा चेहरा डोळ्यासमोर येत होता मला हाका मारतानाचा... काही झालं असतं त्याला तर मला धक्का पचवता आला नसता. माझा सर्वात जिवलग मित्र आहे तो. म्हणून मग
मनावर दडपण येणार नाही पुन्हा एक्सप्रेसवे वर चालवताना याची पूर्ण काळजी घेतली आणि एक एक्सप्रेसवे वारी तिसर्या दिवशी पुन्हा मारून आलो....... उगाच मेंटल ब्लॉक बसला तर नंतर आयुष्यभर ताप गाडी चालवताना.
>>मधली लेन पासिंग लेन असते
>>मधली लेन पासिंग लेन असते हेच ठाऊक नसतं<<
आर.टी.ओ. व कार डीलर्स /सर्व्हिस इंजि. ना बोलावून एकदा सेफ ड्रायव्हिंगवर वर्कशॉप अॅरेंज केला होता त्याची आठवण आली. तो कार्यक्रम फार लोकांना आवडलेला होता व उपयोगी आहे असा अभिप्राय भरपूर लोकांकडुन मिळाला होता.
यानिमित्ताने इथे चर्चा सुरू आहेच, तर एक सूचना करतो.
सेफ ड्रायव्हिंगवर एक धागा काढावा, व जाणकारांनी त्यात माहिती द्यावी.
यात,
१. रहदारीचे नियम.
२. गाडीच्या (मो.सा., चारचाकी) यांचे कोणते मेण्टेनन्स शिकून घेणे गरजेचे आहे? घरी काय काय करावे?
उदा. टायर बदलणे. ट्यूबलेसचे पंक्चर स्वतः काढता येतील अशा किट्स आजकाल मिळतात. कूलंट, पाणी, इंजिन ऑइल इ. कसे तपासावे?
३. हॉर्न/लाईट/इंडिकेटर्सचा वापर कसा करावा? (वळण्याची सूचना देण्यासाठी ऐवजी साईड देण्यासाठी इंडीकेटर आहे अशीही एक समजूत आढळते)
४. सोबत कागदपत्रे कोणती बाळगावीत. इन्शुरन्स कोणता चांगला? थर्ड पार्टी/कॉम्प्रिहेन्सिव्ह इ. थोडक्यात म्हणजे नुसती गाडी चालवणेच नाही, तर एक चांगला गाडीवान (च्याच्याकडे धन तो धनवान, या चालीवर) कसे व्हावे, याबद्दलचा बाफ निघाला तर उत्तम होईल.
५. याव्यतिरिक्त एक महत्वाचा विषय म्हणजे ड्रायव्हर नोकरीस ठेवणे. वेगवेगळ्या शहरात वेगळे पगार असतात. पण त्याला नोकरीस ठेवताना आपण काय काय चौकशा करणे गरजेचे असते? काहीवेळा आपली गाडी चालवून नेण्यासाठी अनुभवी व भरवशाचा माणुस टेंपररी बेसिसवर हवा असतो. तशा लोकांचे काही कॉण्टॅक्टस उपलब्ध असतील तर शेयर करणे इ. करता येईल.
६. इतर फुटकळ गोष्टी. जसे उन्हात रंग खराब होतो का? गाडीला अॅक्सेसरीज कोणत्या घ्याव्या? कोणत्या टाळाव्या? इ.
बघा विचार करून लोकहो.
काढा की मग एक धागा. उपयुक्त
काढा की मग एक धागा.
उपयुक्त ठरेल.
>>>>सेफ ड्रायव्हिंगवर एक धागा
>>>>सेफ ड्रायव्हिंगवर एक धागा काढावा, व जाणकारांनी त्यात माहिती द्यावी.<<<
या धाग्यात, 'आम्ही भरपूर दारू पिऊन कसे उत्तम गाडी चालवतो' अशा बढाया मारणार्यांच्या शौर्याच्या कथा, तसेच मुलाखतींचा समावेश अवश्य असावा. या विषयातील जाणकार मायबोलीमधेच मिळतील.
इब्लिस एक धागा काढाच...
इब्लिस एक धागा काढाच... बाकीचे माहिती देतीलच.. आणि इथली ही चर्चा तिथे हलवली जाऊन इथे फक्त गाडी संदर्भात चर्चा होईल.. गाडी चालवण्या संदर्भात नाही..
इब्लिस अददी हेच मनात आले होते
इब्लिस अददी हेच मनात आले होते काल. आणि विम्य्याचा पण विषय लिहा त्यात. काल २ ४ गोष्टी कळाल्या नविन त्यापण मला शेअर करायच्या होत्या.
अत्ता हतत कॉम्प्युटर नाही.
अत्ता हतत कॉम्प्युटर नाही. उद्या काढतो धागा.
इब्लिस राव तुम्ही उद्घाटन करा
इब्लिस राव तुम्ही उद्घाटन करा आम्ही हौतच वाचायला.
ट्युनिंग, परफॉरमन्स साठीचा
ट्युनिंग, परफॉरमन्स साठीचा नवीन धागा. http://www.maayboli.com/node/38939
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/38940
ईब्लिस यांचा धागा आला हो.
आज गाडी मिळाली. तब्बल १४
आज गाडी मिळाली. तब्बल १४ महिन्यांनंतर.

पण एक गोष्ट खटकली म्हणजे या लोकांची सर्विस खुपच खराब आहे. आज सांगितले की ५०० किमी ला १ ले सर्विसिंग करुन घ्या. तरच वॉरंटी मिळेल. अगोदर अपॉईंट्मेंट घ्यावी लागते ४०० किमी झाले कि फोन करुन घ्या. त्यांना सांगितले ४ दिवसांनंतरची द्या. ४ दिवसात होतिल ५०० किमी. ते म्हणाले १३ तारखेची मिळेल तेंव्हा पर्यंत सगळे बुक आहे. "गाडी वापरायला ब्रेक वापरा"
एवढा लोड आहे तर गॅरेजची कपॅसिटी का वाढवत नाहित देव जाणे. या चार जिल्ह्यात एकच गॅरेज आहे म्हणे ते पण साधारण ५०० चौ. फु.
शाब्बास!
शाब्बास!
पाटील, अभिनंदन. आता बुलेट,
पाटील, अभिनंदन. आता बुलेट, डोळ्याला गोगावला आणि पांढरे शुभ्र कपडे घालुन पाटीलकी करा.
नमस्कार, मला गाडी साठी मदत
नमस्कार, मला गाडी साठी मदत करा प्लीज... सगळा बाफ काढ्लाय वाचून...
आमच्या कडे गाडी घ्यायचं चाललंय. २०१३ मार्च - एप्रिल मधे... बजेट ३-५. मंथली रनींग २०० किमी जास्तीत जास्त. सठी-सहामासी २००-२५० किमी चा लाँगरन... त्यामुळे पेट्रोलच.
मुख्य म्हण्जे गाडी अकोल्यात घ्यायचीय. तिथे फक्त मारोतराव आणि ह्युंडाई चेच शोरूम्स + सर्वीस सेंटर्स आहेत.
आता सांगा ऑप्शन्स...
कुलकर्णी, मी डिझेल गाडीचा
कुलकर्णी,
मी डिझेल गाडीचा पंखा आहे, पण त्यावर जबरा ट्याक्स लागणारे अशी बातमी आहे..
Yes. Thats quite correct! I
Yes. Thats quite correct! I have read it in a news paper! around 50000 rupees per year or something like that...
are maazhyaa prashanaacha uttar dya na... chyaamaari yaa iPaddatna maraathee lihaayalaa layacha kashTa paDataata...
लै वेळ आहे गाडी घ्यायला अजून.
लै वेळ आहे गाडी घ्यायला अजून. २ महिने धीर काढा कुळकर्णी. ह्युंडाईची सर्विस अन स्पेअर्स महागडे असतात. मारूती मला आवडत नाही
त्यामुळे तुम्हाला माझा पास.
-पेट्रोलवाली व्हिस्टा किंवा पुंटो बघा एकदा..
@कुलकर्णी- ३-५ मधे मारुतीची
@कुलकर्णी-
३-५ मधे मारुतीची कुठलीही हॅच घ्या, विशेष फरक पडणार नाही. किंवा मग आय१० आहेच.
शक्यतो बजेटआधी घ्या.
@निवांत पाटील- अभिनंदन !
धन्यवाद पण त्यावर जबरा
धन्यवाद
पण त्यावर जबरा ट्याक्स लागणारे अशी बातमी आहे..>>> ते बहुतेक एस यु व्ही साठी आहे बहुतेक. कार सेगमेंट्ला लावतील असे वाटत नाही. काल इंडिका व्हिस्टा २०००० रु डिस्काऊंट्वर उपलब्ध होती, टॉप एंड मॉडेल.
मारुतीची नवीन अल्टो ( जुनी पण
मारुतीची नवीन अल्टो ( जुनी पण नवीन वर्जन) आलीय तिचा रिव्यु चांगला असेल तर ती बघा. पेपरमध्ये तरी बरा वाटला. इब्लिस म्हणतात ते खरे आहे, ह्युंडाई बर्याच बाबतीत महाग जाते, त्यामानाने मारुती केव्हाही बरी.
तर गॅरेजची कपॅसिटी का वाढवत
तर गॅरेजची कपॅसिटी का वाढवत नाहित देव जाणे. या चार जिल्ह्यात एकच गॅरेज आहे म्हणे ते पण साधारण ५०० चौ. फु>>
ओल्ड पिपल अॅटिटुड. दुसरं काय.
तालुका लेव्हललासुद्धा ऑथोराइज्ड सर्विस सेन्टर आणि गाडी विक्री केन्द्र झालेत बाकीच्या कंपन्याचे.
जग चंद्रावर आणि हे.........
तरी त्यांचा नवीन प्लॅण्ट सुरु होइल (त्याच काम सुरु आहे) तेव्हा वेटिन्ग कमी होइल.
असो.
पाटिल अभिनंदन
आमचीबी आलीकी DSCN7161.JPG
आमचीबी आलीकी
DSCN7161.JPG (45.44 KB)
अभिनंदन हो बाण्डोबा! व्हर्नाच
अभिनंदन हो बाण्डोबा! व्हर्नाच आहे ना ती?
धन्यवाद इब्लिसराव.व्हय व्हय
धन्यवाद इब्लिसराव.व्हय व्हय व्हर्नाच.
अभिनंदन पाटील. अभिनंदन
अभिनंदन पाटील.
अभिनंदन बॉण्ड. गाडीला चक्क लिंबू !
त्या ५०००० प्रति वर्षीचे काही खरे नाही. मेंदूलेस नेतेच अश्या पॉलिसी आणायचे असे बडबडू शकतात. प्रत्यक्षात ते येणार नाही. फार तर वनटाईम टॅक्स म्हणून येईल पण प्रतिवर्षी ५०००० जरा जास्त होतात.
Pages