कोणती गाडी घ्यावी?

Submitted by साजिरा on 15 October, 2009 - 07:51

इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.

काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्‍यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.

तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्‍या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू. Happy

याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा एक मित्र Maruti SWIFT LXi घेत आहे.....३ वर्षे वापरलेली आहे आणि Running पण जास्त नाही आहे म्हणजे घरगुती वापरातली गाडी आहे...
त्याला 2.70 लाख मध्ये मिळत आहे .. हि गाडी घेण्यस योग्य आहे एक?
टेस्ट Drive पण चांगली वाटली मित्राला...

ईंडी़का व्हिस्टा (ऑरा) पेट्रोल (सिल्व्हर मॅटॅलीक) मिळतेय.
साडे तीन वर्षापूर्वीचे मॉडेल आहे.
६६००० रन झाला आहे गाडीचा.
एकहाती वापरलेली गाडी आहे.
पाचही टायर्स, बॅटरी नवीन आहेत.
अपघाताची हिस्टरी नाही.
५ महिन्यांपुर्वीच इंश्योरन्स रिनिव्ह केलेला आहे.
पॉवर स्टिररिंग आणि पावर विंडोज आहे.
१,६०,००० ला मिळते आहे.

घ्यावी काय? कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद.>>>

दोस्तहो, गाडी या दसर्‍याला घेण्यात आलेली आहे! सर्व मार्गदर्शकांचे हार्दिक आभार!!! Happy

महेश | 31 October, 2012 - 20:23 नवीन
इब्लिस, कृपया भाषेवर नियंत्रण ठेवा,
please mind your language

Sad काय चुक्ल ब्वा?
अहो, ९ लाख खर्च करून लग्गे वेगळे फीचर्स दिले. सांगता आलं नस्तं आधी? कुत्रे हा फार माईल्ड शब्द वापरलाय Wink

महेश
इतरांना दमदाटी करणे बंद करा. माझं मत दाबायचा प्रयत्न करू नका. तुम्हाला टाटाकडून पगार मिळत असेल तर तुमच्या निष्ठा वहायला तुम्ही मोकळे आहात. तुम्हाला कुणी अडवत नाही. आम्ही टाटांचे मिंधे नाहीत म्हणून आमचं मत आम्ही मांडणार. तुम्हाला पाहीजे तसं मत मांडायला आम्ही टाटांचे किंवा तुमचे नोकर नाहीत. इतकं वाईट वाटत असेल तर मी दिलेली लिंक पहा लोक्स काय बोलतात ते. इथं दमदाटी करताय ते त्या साईटवर जाऊन बोला कारण त्या साईटवरचे रिव्ह्यू लोकांकडून सिरीयसली घेतले जातात. पुन्हा सांगावं लागणार नाही ही अपेक्षा आहे.

@चचा : मी नंतर लिहिलेला प्रतिसाद वाचला नाहीत का ? माझा प्रत्यक्ष टाटाशी संबंध नसला तरी साधारण अंदाज आणि थोडाफार अनुभव आहे, एवढ्या काही वाईट गाड्या बनवत नाहीत. येथे दमदाटीचा प्रश्नच येत नाही. पण निदान अपमानकारक लिहू नका असे माझे म्हणणे आहे आणि ते अजुनही आहे. येथे चर्चा चालू आहे त्या ओघात हे सांगितले, इतर स्थळावर आगंतुकपणे जाऊन लिहिण्याची माझी ईच्छा नाही.
तुम्हाला जे काही लिहायचे आहे ते लिहा, तुम्हाला कोणी प्रतिरोध करू नये हे तुम्ही ठरवू शकत नाही ओपन पब्लिक फोरमवर. कदाचित मी नाहीतर आणखी कोणी करेल.

असो, हे विषयांतर दोन्ही बाजुंनी थांबवूयात ही विनंती.

सर्व कार चालकांसाठी अनुभव शेअर करतोय. योग्य ती काळजी घेत चला.

माझ्या मारुती एस्टीमचे टायर ४०००० च्यावर चालवून झाले होते. शनिवारी गॅरेजवाल्याशी बोलून पुण्याला जाऊन येतो सोमवारी आलो की चारही टायर बदलूया असं सांगितलं....... दुर्दैवाने रविवारी सकाळी पुण्याला जाताना मळवली स्टेशन पार केलं..... उजवीकडे लोहगड विसापूर दिसत होता आणि अचानक पुडचा डावीकडचा टायर बर्स्ट झाला. Sad आवाज मोठा आला पण नक्की कुठला टायर गेलाय हे कळेना. ब्रेक लागणेही बंद झालं....... सुदैवाने बाजुच्या कुठल्याही लेनमध्ये दुसरी कार नव्हती म्हणून गिअर कंत्रोल करत कशीबशी गाडी लेफ्ट्ला आणून उभी केली. आयआरबी वाले लगेच आले आणि मदत करून कार पुन्हा स्टेपनी लावून पुण्यापर्यंत नेता आली..... तिथे लागोलाग चारही टायर "कुलकर्णी टायर" मध्ये पौड रोडवर बदलले........ स्वतः मालक कुलकर्णी होते, खूप छान सर्व्हिस दिली..
त्यावेळी बरोबर मुलगी आणि बायको होती... नशीब बलवत्तर म्हणून काही अघटित घडलं नाही. कंट्रोल शेवटपर्यंत सोडला नव्हता म्हणून जमेल तशी गाडी साईडला घेण्यात यश आले.
ईथून पुढे कानाला खडा....... टायर ओव्हरयुस्ड असल्यास एक दिवसही लाँग रन करणे नाही.

या प्रकाराला ७ दिवस होतात न होतात तोच पुण्याहून मुंबईला इंडिका व्हिस्टा घेऊन परत येत असताना शेवटचा भातणचा बोगदा पार केल्यावर मी राईट लेनला होतो. मागून सुसाट येणार्‍या गाडीने सिग्नल दिल्याने मी मिडल लेनला गाडी घेत असतानाच दुसरी एक कार सुसाट बाजूने निघून गेली. ती इतक्या जवळून गेली की तिच्यापासून आपली कार सेव्ह करताना गाडी राईटला मारली आणि काही कळायच्या आत गाडी उजवीकडच्या झाडीत घुसली होती. शेवटपर्यंत स्टिअरिंग हातात ठेवून जमेल तितकं डायरेक्शन कंट्रोल करण्याचा निष्फळ प्रयत्न केला..... पण झाडी पुढच्या टायरमध्ये गुरफटल्याने पुढून वर उचलली गेली आणि मग उजवीकडे आपटली.... ती इतकी जोरात आपटली की गाडी पुन्हा डाव्या बाजूला कलंडली आणि पुढे झाडीत फरफटत गेली. ..... बरोबर असलेला मित्र काय होतेय ते न कळल्याने माझ्या नावाने फक्त ओरडत होता. मी अधांतरी सिट बेल्ट लावलेल्या असल्याने सगळं होतेय ते फक्त उघड्या डोळ्यांनी पहात होतो..... काहीच हातात नव्हते. मनात इतकीच प्रार्थना केली की गाडी दुसर्‍या बाजुला किंवा रस्त्यावर जाऊ नये.
फक्त ५०० मिटर अंतरावर ५० फूट खोल नाला होता... म्हणूनच या भागात लावलेली झाडी दाटीदाटीने आणि घट्ट खोडांची ७ फूट उंचीची होती साधारण... त्यामुळे स्पीड कंट्रोल होऊन गाडी झाडीतच कलंडली आणि पुढचा अनर्थ टळला.

सुदैवाने या सगळ्या प्रकारात आम्हाला कुठलीही इजा झाली नाही. फक्त जिवंतपणी मरण अनुभवायला मिळालं...... कार बाहेरून टोटल डॅमेज झाली. पण इंटेरिअर आणि आम्ही दोघेही शाबूत होतो....

फूल मार्क्स टू व्हिस्टा डिझाईन Happy

काळ आला होता पण वेळ आली नव्हती हेच खरं........ टेक केअर दोस्तहो.

अहो देवाने तुम्हाला दोन्ही वेळेस वाचवलं की. टायर बर्स्ट होणे ही सगळ्यात धोकादायक घटना. काळजी घ्या सर्वांनीच. उशीर झाला तर चालेल, पण सगळे चेक करुन मगच प्रवासाला निघणे उत्तम. अवीकुमार अभिनंदन.

भुंगा, एक्सप्रेसवेवर कॉन्सन्ट्रेशन ठेवा पुढे. मित्राशी गप्पा मारण्याच्या नादात डावीकडचा मिरर बघायचा राहीला होता काय...

धन्यवाद चिखल्या, चक्रमचाचा आणि टुनटुन!

वरचा भुंग्याचा इंडीका व्हिस्टाचा अनुभव वाचुन योग्य गाडी घेतल्याचे समाधान दुणावले गेले आहे!!!

भुंगा नशिबवान आहात !

एअरबॅग्ज किती उपयोगी असतात ? एकाने सांगितले की एकदा अचानक काही कारणाने एअर बॅग उघडली गेली आणि त्यामुळे अपघात झाला. येथे कोणाचे काही अनुभव असतील तर सांगावेत.

भुंगा, एक्सप्रेसवेवर कॉन्सन्ट्रेशन ठेवा पुढे. मित्राशी गप्पा मारण्याच्या नादात डावीकडचा मिरर बघायचा राहीला होता काय...
>>>>>>>>>>>>>>>>>>>>

नाही प्रोफेसर. मागून येणार्‍या गाडीचा सिग्नल पाहून लेन मी सिग्नल देऊन बदलत असताना त्याच्या मागून एक सुसाट कार आली. त्यानंतर आय आरबीच्या माणसाकडून जे कळलं ते असं की त्या दोन गाड्या एकमेकांशी रेस करत सुसाट आल्या होत्या आणि तश्याच सुसाट पुढे निघून गेल्या....

सुदैवाने टो करणारी व्हॅन, आय आरबी चा गार्ड आणि त्यांची व्हॅन ही अक्षरशः तिसर्‍या मिनिटाला हजर झाली हे विशेष.... दहा पंधरा मिनिटात रस्ता क्लिअर करू गाडी नेरूळच्या फॉर्थ्यून्मध्ये पाठवली सुध्दा.

तिथे मात्र अजब अनुभव आला. केवळ मॅनेजर ओळखीचा म्हणून त्यांनी गाडी आत घेतली आणि २ दिवस ठेवायला दिली. पण न्यू इंडिया इन्श्युरन्स शी आमचा टाय अप चांगला नाही तुम्हाला आमच्यातर्फे गेलात तर फुल क्लेम मिळणार नाही असं त्याने तोंडावर सांगितलं... रिलायन्सचा इन्श्युरंस असता तर सेटल करता येईल असंही म्हणाला Uhoh
मग माझ्या रेग्युलर मेकॅनिककडे आणली गाडी सरळ.

गप्पांच्या नादात लक्श्य नसण्याचा प्रश्नच नाही. मित्र झोपला होता आणि मी शांतपणे पुलंचं "हरितात्या" ऐकत सुखेनैव चालवत होतो.....
पहिलाच अपघात हो, तसा अनुभव नाही ना अपघाताचा इतकी वर्षं गाडी चालवून Proud
नशीब थोर की आता पुन्हा गाड्या चालवायला एक संधी मिळाली Happy
वाचलो हे देवाचे आभार......

अर्थात वरचे हे काही समर्थन अजिबात नाही. चूक ती चूकच.... धडा घेतलेला आहे मागोमाग झालेल्या दोन्ही प्रसंगातून.... मुद्दाम शेअर केलं म्हणजे सगळ्यांनाच काळजी घेता येईल....
विशेषतः माझ्यासारख्या सतत रनिंग करत राहणार्‍या सर्वांसाठी शेअर केलेय. वेळ काही सांगून येत नाही.

अस्तील नस्तील तितकी सगळी सेफ्टी फीचर्स वाली गाडी घ्यावी. मुख्य म्हणजे सीटबेल्ट न विसरता लावावा. आपण भलेही कितीही नीट गाडी चालवत असू. बुडाखाली गाडी अन पायात अ‍ॅक्सिलरेटर आला की मेनियाक होणारे लोक फार आहेत. अन 'तो' कसा मूर्खासारखा चालवतोय, किंवा 'तो' कसा पुढे जाऊ शकतो? या इर्षेपोटी नको ते साहस करणारे मूर्ख रस्त्यावर भरपूर असतात. तेव्हा आपले डोके थंड ठेवूनच चालावे असे वाटते.

I think any type of listening should be avoided while driving specially safe driving. U can't hear the horns from backside. This happens even due to closed windows for AC.

भुंगा... नशीब बलवत्तर रे बाबा...

गाडी चालवताना आपल्यालाच काळजी घ्यावी लागते...

इंन्शुरन्सच्या बाबतीत प्रत्येक डिलरचा कोणत्यातरी कंपनी बरोबर टाय अप असतो.. त्यामुळे त्याच्या माणसाकडूनच क्लेम केला तर क्लेम पूर्ण सेटल करतील असे सांगतात... प्रत्यक्षात सगळ्या कंपनीचे ठराविक क्लेम सेटलमेंट रुल्स असतात आणि त्या नुसरच क्लेम सेटल होतात.

हम्म...
पादुकानन्द उत्तम बोललात.
भुंगाजी पुढच्या वेळेस लक्षात ठेवा, ओनली ड्रायव्हींग नो लिस्टनिंग. हरीतात्या ऐकण्याच्या नादात तुमचा 'अन्नु गोगटे' झाला Biggrin
चांगले ड्रायव्हींग, दिवसाचा प्रवास ,उत्तम कार्स ह्या जमेच्या बाजु असतील तरच पासिंग लेन पकडुन ठेवावा, नाहीतर 120 -40चा काटा लावणारे 'स्पीड डीमन' कधी घात करतील सांगता येत नाही...

चांगले ड्रायव्हींग, दिवसाचा प्रवास ,उत्तम कार्स ह्या जमेच्या बाजु असतील तरच पासिंग लेन पकडुन ठेवावा >> पासिंग लेन म्हणजे सगळ्यात उजवीकडची असं समजतोय. सगळ्यात उजवीकडची लेन ही पासिंगसाठीच वापरावी (अ‍ॅट लीस्ट ३ लेनवाल्या रस्त्यावर). पकडून ठेवू नये.

भुंगा
जीव वाचला तुमचा. देवाचे आभार म्हणा हवं तर. गाडी उजव्या लेनमधून डावीकड्च्या झाडीत गेली का ?

एकदा मित्राची इंडीका मरीना सासवडजवळ पलटी झाली तेव्हां मात्र दुर्दैवाने सगळे गंभीर जखमी झाले होते. नशीब बलवत्तर म्हणून जीवितहानी झाली नाही.

खूप पूर्वी माझ्याकडे मारुती व्हॅन होती. ड्रायव्हरने एकदा नीरेजवळ गंभीर चूक केली आणि डाव्या बाजूचं पुढचं चाक निसटून अपघात झाला. या अपघातातून सगळेच आश्चर्यकारक रित्या बचावले. मात्र त्यामुळे मारुती व्हॅनचं डिझाईन चांगलं असं काही म्हणता येत नाही. सुरक्षिततेच्या निकषावर व्हॅन उतरूच शकत नाही.

भुंगा, वेळ सांगून येत नाही हे अगदी योग्य बोललास.
मी एक्स्प्रेस हायवेला उजवीकडून दुसर्‍या लेनमधे एका कॉन्स्टंट स्पीडवर(८५-९५) असते. लोक दोन्ही बाजूंनी पुढे निघून जातात आणि काय मूर्ख आहे असा लूकही देतात. पण मी काही बाबतीत अति घाबरट आहे त्यामुळे ४ वाहनं माझ्यापुढे निघून गेल्याने मला फार काही न्यूनगंड येत नाही.

तू जे लिहिलंयस त्याने माझा घाबरटपणा फार काही चुकीचा नाहीये यावर माझ्यासाठी शिक्कामोर्तब झाले. Happy

जेव्हा एकट्याने ड्रायव्हिंग करत असता मोठ्या स्ट्रेचला तेव्हा म्युझिक हे तुम्हाला जागे आणि जाग्यावर ठेवण्यासाठी गरजेचे पडते. एक्स्प्रेस हायवेचे काही पॅचेस असे आहेत की तिथे व्हीलसुद्धा हलवायची गरज पडत नाही आणि नजरेच्या टप्प्यापर्यंत हायवेशिवाय काही नसते. अश्या वेळेला मेंदू बधीर होणं/ झोप येणं अशक्य नसतं. जनरली अश्या वेळेला एसी बंद करून खिडकी थोडी उघडी ठेवावी, थोबाडावर आपटत रहाणारा वारा जागं ठेवतो तुम्हाला. आणि अपबिट प्रकारचे म्युझिक चालू ठेवावे.

बहुतेक भुंगा लेफ्ट जाता त्याचा "ब्लाईंड स्पॉट" मध्ये ती गाडी आली.

चांगले ड्रायव्हींग, दिवसाचा प्रवास ,उत्तम कार्स ह्या जमेच्या बाजु असतील तरच पासिंग लेन पकडुन ठेवावा >>

एक्झॅटली ! मी तर म्हणेन अति उजव्या बाजूने (फास्ट लेन) मध्ये नेहमीच गाडी चालवायाची गरजच नाही. पण हौसे- नवशे आणि ज्यांना आपणच चांगले ड्रायव्हर (काही टॅक्सीवाले तर हमखास) असे वाटत असते ते नेहमीच फास्ट लेन मधून गाडी चालवताना पाहिले आहे. बरं हे लोकं मागून वेगात येणार्‍या गाडीला साईड देतील असेही नाही. कारण कोणाला साईड देणे हे भारतात तरी इगो दुखावल्याचे लक्षण मानले जाते असे मला आता वाटायला लागले आहे. मग मागच्याची गाडी जॅग / बिएमडब्लू असली आणि आपली अल्टो असली तरी!

अल्टो ते आय २० किंवा कुठल्याही गाड्या ज्याचे इंजिन < १.८ ते २ लिटर असेल त्यांनी फास्ट लेन मध्ये खूप वेळ टिकून राहू नये. अन फास्ट लेन मध्ये हळू गाडी तर अजिबात चालवू नये. इंजिन क्षमता खूप असेल तर अचानक वेग वाढवता येतो पण मी अल्टो अन तत्सम कार्सना पण उगाच मोठ्या गाड्यांना चॅलेंज देताना पाहिले आहे. गाडी खराब करून घेण्याचे लक्षण. आपल्या कडे छोटी गाडी आहे, ती तशीच वापरावी, इतरांना पुढे जाऊ द्यावे हे समजत नाहीच. निदान येथे वाचणारे तरी हे अंमलात आणतील.

वर इब्लिस ह्यांनी लिहिल्यासारखे ज्यात सर्वात जास्त सेफ्टी फिचर्स आहेत असेच व्हर्जन घ्यावे. गाडी विकत घेताना खालील गोष्टी माझ्यासाठी मस्ट आहेत.

१. एअर बॅग्स किमान दोन (माझ्या गाडीत ६ आहेत) भारतात ह्याला फिचर म्हणून समाविष्ट केले आहे. तर प्रगत देशात नेसेसिटी म्हणून. आपल्याकडे इमिशन नॉर्म आहेत पण सेफ्टी इतके नाहीत. त्यात बदल व्हावेत अन नो एअरबॅग वाली कार विकलीच जाऊ नये.

२. एबीएस

३. SUV असेल तर ESP किंवा तत्सम आवश्यक. ( Electronic Stability Control किंवा प्रोग्रॅम)

४. चांगले ट्रॅक्शन कंट्रोल

५ Head Restraints - म्हणजे डोक्याच्या पाठीमागच्या बाजूला असणारे हेड रेस्ट ते अ‍ॅडजस्टेबल हवे.

बरं हे लोकं मागून वेगात येणार्‍या गाडीला साईड देतील असेही नाही. कारण कोणाला साईड देणे हे भारतात तरी इगो दुखावल्याचे लक्षण मानले जाते असे मला आता वाटायला लागले आहे. <<
१००%
वाटायला काय लागलेय.. आहेच ते.

भुंग्या, नशीब म्हणुन वाचलास....

मी गाडी चालवताना नेहमी 'अपनी औकात देखके चलाव" हा नियम घोकत राहते. भले रस्ता रिकामा असो, मला ज्या स्पिडपर्यंत गाडी संभाळता येते तेवढाच स्पिड पकडते, त्याच्या वर कधीही जात नाही. Happy

बरं हे लोकं मागून वेगात येणार्‍या गाडीला साईड देतील असेही नाही. कारण कोणाला साईड देणे हे भारतात तरी इगो दुखावल्याचे लक्षण मानले जाते असे मला आता वाटायला लागले आहे

अगदी अगदी..... मी ब-याचदा अनुभव घेतलाय... Happy

कित्येक लोकांना पहिली लेन ही पासिंग लेन आहे हेच मुळात माहित नसतं.. ते आपली बैलगाडी घेऊन डुगुडुगु चालत असतात पहिल्या लेनमध्ये.,... मागचे लेनचेंजसाठी हॉर्न देऊन कंटाळतात आणि मग निमुट जातात आपल्या मार्गाने. Happy

केदार

४०% क्रॅश टेस्ट हे अ‍ॅड कर त्यात. युरोपात ते मस्ट आहे म्हणून युरोपिअन गाड्या मजबूत आहेत. हळूहळू भारतात ते ही शिकतील तो भाग वेगला.

भुंग्या.. नशिब बलवत्तर रे. काळजी घेशलीच Happy

कारण कोणाला साईड देणे हे भारतात तरी इगो दुखावल्याचे लक्षण मानले जाते > अगदीच एक्सेप्रेस वे वर तर हे जास्तच. त्यात भर म्हणजे HMV वाले.

स्पिड लिमिट हा सेफ ड्रायव्हिंग मधला कळीचा मुद्दा आहे.

मुंबई गोवा हायवे वर आलेला अनुभव.. सकाळी ७च्या सुमारास पेण कडे जात होतो... सकाळची वेळ असल्याने पेण कडे जाणारे ट्रॅफिक नव्हते. तसेच समोरुन पेण कडून येणारे ट्रॅफिकही कमी होते. मला ९०+ जायची उत्तम संधी होती. तरी ही मी ८० च्या स्पिडने जात होतो. पळस्पे फाट्या नंतर कर्नाळाच्या आधीच्या रस्त्यावर असताना समोरुन ८०-९० फुटांवर एक ट्रेलर येताना दिसला आणि तो ५० एक फुटांवर असताना त्याचा समोरचा एक्सेल तुटुन सरळ माझ्या समोरील लेनवर घरंगळत आला. गाडी ७०-८०च्या स्पिडला असल्यामुळे मला कंट्रोल करण शक्य झालं. अन्यथा परिस्थीत कठिण होती.

कित्येक लोकांना पहिली लेन ही पासिंग लेन आहे हेच मुळात माहित नसतं.. ते आपली बैलगाडी घेऊन डुगुडुगु चालत असतात पहिल्या लेनमध्ये.,...
>>
yes , this is due to licenses obtained trough agents... Otherwise rules and instructions are very clear...

Pages