कोणती गाडी घ्यावी?

Submitted by साजिरा on 15 October, 2009 - 07:51

इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.

काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्‍यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.

तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्‍या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू. Happy

याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या मित्राने ह्युदाई इऑन ब्लु ड्राईव्ह घेतली ,मस्त गाडी आहे. मी घ्यायचा विचार करतोय.800च्या फॅन्सने एखादा चालवुन बघावी, जबरदस्त वाटते.

ईंडी़का व्हिस्टा (ऑरा) पेट्रोल (सिल्व्हर मॅटॅलीक) मिळतेय.
साडे तीन वर्षापूर्वीचे मॉडेल आहे.
६६००० रन झाला आहे गाडीचा.
एकहाती वापरलेली गाडी आहे.
पाचही टायर्स, बॅटरी नवीन आहेत.
अपघाताची हिस्टरी नाही.
५ महिन्यांपुर्वीच इंश्योरन्स रिनिव्ह केलेला आहे.
पॉवर स्टिररिंग आणि पावर विंडोज आहे.
१,६०,००० ला मिळते आहे.

घ्यावी काय? कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद.

अविकुमार, टाटाच्या नव्या गाड्या देखील मी घ्या असं म्हणणार नाही. ही तर साडेतीन वर्षे वापरलेली.

मला साम्गा १६ वर्षावरिल मुलांना नॉन गियर गाडी चालवायला परवानगी असते ना? त्यात अ‍ॅक्टीव्हा येते का Uhoh

ईंडी़का व्हिस्टा (ऑरा) पेट्रोल (सिल्व्हर मॅटॅलीक) मिळतेय.
>>>>>
टाटाची पेट्रोल गाडी फुकट मिळाली तरी घेवू नये.

का? प्लीज सांगु शकाल सविस्तर जरा काही हरकत नसेल तर? >>

अहो टुनटुन अमेरिकेत फोर्ड अन शेवी च्या गाड्या घेऊन नका असे आजही देसी लोक सांगत फिरत असतात. त्याला काही इंजिनिअरिंग कारण असतेच असे नाही. दोन पाच जनांचा वाईट अनुभव असतो आणि त्यामुळे लोक मग नावं ठेवतात. पण चांगल्या गाडीची (टाटाच्या ) तेवढी जाहिरात होईलच असे नाही. इतके सिरियसली घेऊन नका. तुम्हाला टाटा घ्यायची असेल तर बिनधास्त घ्या ! सर्व टॅ़क्सी वाले रिलायबल म्हणून इंडिका घेऊन फिरतात. आणि १ दिड लाख किमी चालवूनच विकतात.

जुन्या टाटा गाड्यांचा मेंटेन्सस खूप निघत असे कारण इंजिन होम ग्रोन होते पण त्याला आता कित्येक वर्षे झाली आणि आता फियाट इंजिन देते व संबंधीत टेक्नॉलॉजी बरीच पुढे गेली आहे. (टाटांची) नवीन गाड्या खरच चांगल्या आहेत. पण अजूनही जुनेच आठवून लोक नावं ठेवतात.

एवढेच नाही तर हेच १.३ हे सुझुकी स्विफ्ट डिझायर, रिट्झ आणि SX4 ला पण वापरतात. सर्व रोड साईड मेकॅनिकना हे माहिती असतेच असे नाही. ते जास्त बॅड माउथ पब्लिसिटी करतात.

टाटा आरिया आणि नॅनो फेल गेली असं टाटांनीच कबूल केलं आहे. नॅनोचा मागच्या बाजूचा लूक हा सिक्स सीटरसारखा आहे. एक्स्झॉस्टचा पाईप अक्षरशः उत्तर भारतातल्या असेंबल्ड रिक्षांसारखा डुगडुगताना दिसतो. उत्तर भारतात पंजाब आणि काही ठिकाणी रिक्षा असेंबल करून मिळते. त्यांना कार बनवायला सांगितली तर ती नॅनो पेक्षा चांगली दिसेल हे माझं मत. सेकंड हँड मारुती ही दिसायला आणि परफॉर्मन्समधे नॅनोपेक्षा चांगली असं बरेच लोक म्हणतात.
काही प्रश्न :
टाटांचे पुरवठादार क्वालिटी मेन्टेन करतात का ? मध्यंतरी इंडीका मधे अचानक आग लागायची. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे असं कळलं. पण पूर्वीपासून त्यांच्या गाड्यात भेडसावणारा एसीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का ? स्विफ्ट आणि व्हिस्टा यांची तुलना होऊ शकेल का ? एसेक्स फोर आणि मंझा यांची तुलना होऊ शकेल का ? आरियाचे गिअर बदलताना आणि इनोव्हा किंवा इतर एमयुव्हींचे गिअर बदलताना काहीच फरक जाणवत नाही का ?
प्रीमिअरची नवी एसयूव्ही कशी आहे ?

>>टाटा आरिया आणि नॅनो फेल गेली असं टाटांनीच कबूल केलं आहे.
मी कबूल करू शकत नाही, कारण गेली २ वर्षे नॅनो वापरत आहे. सिटी ड्राईव्ह साठी चांगली आहेच, पण दूरच्या अंतरासाठी देखील अतिशय चांगली आहे. मायलेज २२ ते २४ आहे पेट्रोल असुन सुद्धा. अजुन काय हवे, केवळ लुक्स साठी चांगली नाही या मुद्द्यामधे फार दम नाही.
>>उत्तर भारतात पंजाब आणि काही ठिकाणी रिक्षा असेंबल करून मिळते. त्यांना कार बनवायला सांगितली तर ती >>नॅनो पेक्षा चांगली दिसेल हे माझं मत.
तिव्र निषेध Angry टाटा मोटर्सला कळवू का हे ?

'इरा' हे हुंडाईच्या अनेक मॉडेल्सचे एक व्हर्जन आहे, तुम्ही नक्की कोणती गाडी म्हणत आहात?
अल्टो ८०० ही इऑनला स्पर्धक म्हणून उतरवलेली आहे, इंटेरिअर्स तर इऑनचेच ढापलेत.

टाटा मोटर्सला कळवू का हे ?

मी टाटांचा मिंधा नाही Happy माझं मत आहे. त्यांना पटत नसेल तर गाड्या मार्केटमधे आणूच नयेत.

ऑनला स्पर्धक म्हणून उतरवलेली आहे, इंटेरिअर्स तर इऑनचेच ढापलेत. >>

फार पूर्वी ह्युंडाई नावाची कंपनी जेंव्हा अमेरिकेत नवीन नवीन आली होती तेंव्हा तिने होण्डा ला कॉपी करून त्यांची फ्लॅगशिप सोनाटा आणली. डिट्टो रिअर आणि फ्रंट. ह्युंडाईही "चिप कार" पोझिशनिंग मधून बाहेर पडावी ह्यासाठी तिने जिनेसिस नावाचे मॉडेल आणले. एकदम चांगले पण हाय रे दुर्दैव ती मर्झेडिज बेंझची कॉपी होती.

टोयोटो मोटर्सचा लेक्सस हा ब्रॅण्ड प्रिमियम कार्ससाठी आहे. लेक्ससचे अनेक डिझाईन हे मर्क आणि ऑडी वरून उचलले. अगदी जशास तसे. उदा डिआरएल किंवा फ्रंट बॉनेट.

महिंद्रा XUV चे फ्रंट मॅश्ड ग्रील पाहिले का ते जसेच्या तसे मित्सुबिशीचे ठापले आहे. त्याच कारचे हॅण्ड ब्रेक हे सिव्हिक वरून ढापलेले आहेत

ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. तू जे ईऑन चे पार्ट म्हणत आहेस ते कदाचित ह्युंडाईने दुसर्‍या एखाद्या कारचे ढापलेले असू शकतात. ह्या कारचे ते, त्या कारचे हे असे अनेक पार्ट अनेकांनी उचलले आहे. फारच थोड्या कंपन्या ह्या ढापू नसतात. उदा लॅम्बोर्गिनी किंवा लोटस वगैरे.

( हे सहज .. कारण वरही अल्टो फॅन्स असे उद्देशून वाक्य आले होते .. हे पोस्ट लिहिल्यामुळे मी ह्युंदाई विरोधी वगैरे किंवा मारूती प्रो असे काही नाही. मला फक्त कार्स आवडतात. मग त्या कोणत्याही कंपन्यांच्या असल्या तरी. मी ओन केलेल्या कार्स बद्दलही मला बायस नाही. मी माझ्याच कार मधील दोष पण आनंदाने सांगू शकतो. )

ह्युंडाई वर्ना १.४ इएक्स सीआरडीआइ फ्लुईडिक बद्दल मागेही लिहिले होते. - झिझाईन फ्युचरिस्टिक ! चालवायला खूप चांगली आहे. इंटेरिअर पण मला आवडले. १.४ मध्ये अ‍ॅव्हरेज पण चांगले. पण फार महाग आहे. त्यापेक्षा डिझेल सन्नीचा विचार का नाही करत? चालवून पाहा एकदा. जर दोन्ही आवडल्या तर माझे मत मग सन्नीला नाहीतर वर्ना वाईट अजिबातच नाही. सन्नी मध्ये तुम्हाला पावर तेवढीच मिळेल, पण जागा जास्त शिवाय हॅन्डलिंग आणि कॉर्नर्सवर मला सन्नी जास्त चांगली वाटली.

टोयोटो मोटर्सचा लेक्सस हा ब्रॅण्ड प्रिमियम कार्ससाठी आहे. लेक्ससचे अनेक डिझाईन हे मर्क आणि ऑडी वरून उचलले. अगदी जशास तसे. उदा डिआरएल किंवा फ्रंट बॉनेट.>>>> टोयोटा कॅम्री हा युएसमधला टॉप ब्रॅण्ड आहे ,लॅण्ड क्रुझरचे डीझाईन आणि पर्फोरमन्स युएनलाही अपील होते. ढापुगिरि करणारे टॉप पोझिशनला पोचत नाहीत मित्रा...

टोयोटा आणि होंडा( काही प्रमाणात निस्सान हुंडाई मित्सुबिशी ) वगैरेंनी युरोपिय आणि अमेरीकी ऑटोमेकर्सचे त्यांच्याच देशात माकड करुन ठेवल्याने त्या कंपन्या अशी बोंब मारत असतात.
लेक्ससच्या गाड्या कॅम्री आणि लॅण्डक्रुझर वगैरे चॅसीसवर बांधलेल्या आहेत, डीझाईन त्याबरहुकुमच येते . त्यामुळे ढापाढापीचा प्रश्न येतोच कुठे.थोड्या गोष्टि कॉमन वाटतात हे खरे, पण तो योगायोग असावा.
<ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. तू जे ईऑन चे पार्ट म्हणत आहेस ते कदाचितह्युंडाईने दुसर्‍या एखाद्या कारचे ढापलेले असू शकतात.>>>> हुंडाई कार्स त्यांच्या नवीन 'फ्लुईडीक डीझाईन कॉन्सेप्ट'नुसार बनतात ,हा कॉन्सेप्ट जगभर नावाजला गेलाय. आता त्यांचा नवीन 'फ्लुईडीक प्रीसीजन' हा कॉन्सेप्ट येतोय...

टोयोटो मोटर्सचा लेक्सस हा ब्रॅण्ड प्रिमियम कार्ससाठी आहे. लेक्ससचे अनेक डिझाईन हे मर्क आणि ऑडी वरून उचलले. अगदी जशास तसे. उदा डिआरएल किंवा फ्रंट बॉनेट.>>>> टोयोटा कॅम्री हा युएसमधला टॉप ब्रॅण्ड आहे ,लॅण्ड क्रुझरचे डीझाईन आणि पर्फोरमन्स युएनलाही अपील होते. ढापुगिरि करणारे टॉप पोझिशनला पोचत नाहीत मित्रा...

टोयोटा आणि होंडा( काही प्रमाणात निस्सान हुंडाई मित्सुबिशी ) वगैरेंनी युरोपिय आणि अमेरीकी ऑटोमेकर्सचे त्यांच्याच देशात माकड करुन ठेवल्याने त्या कंपन्या अशी बोंब मारत असतात.
लेक्ससच्या गाड्या कॅम्री आणि लॅण्डक्रुझर वगैरे चॅसीसवर बांधलेल्या आहेत, डीझाईन त्याबरहुकुमच येते . त्यामुळे ढापाढापीचा प्रश्न येतोच कुठे.थोड्या गोष्टि कॉमन वाटतात हे खरे, पण तो योगायोग असावा.
<ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. तू जे ईऑन चे पार्ट म्हणत आहेस ते कदाचितह्युंडाईने दुसर्‍या एखाद्या कारचे ढापलेले असू शकतात.>>>> हुंडाई कार्स त्यांच्या नवीन 'फ्लुईडीक डीझाईन कॉन्सेप्ट'नुसार बनतात ,हा कॉन्सेप्ट जगभर नावाजला गेलाय. आता त्यांचा नवीन 'फ्लुईडीक प्रीसीजन' हा कॉन्सेप्ट येतोय...

>>मी टाटांचा मिंधा नाही माझं मत आहे. त्यांना पटत नसेल तर गाड्या मार्केटमधे आणूच नयेत.

चांगल्या गाडीचा आणि टाटांचा तुम्ही वाईट रितीने अपमान करत आहात त्यामुळे राग येणे साहजिक आहे.
मुळात एकतर नॅनो ही फेल नाहीये, तुम्ही मान्य करा अथवा करू नका, रस्त्यावर ज्या प्रमाणात गाड्या दिसतात त्यावरून लगेच कळून येते. असो, तसेही काही लोकांना टाटाची कोणतीच गाडी आवडत नाही, त्यांनी मुद्दाम आवडून घ्यावी असे म्हणणे नाही, पण निदान असे शरसंधान करण्याएवढे वाईट बनवत नाहीत हे तरी मान्य करावे.

(मी कोणती गाडी घ्यावी याबद्दल इकडे बरीच चर्चा केली होती, फलस्वरूप)
मारूती सुझुकी एर्टिगा झेड-डी-आई Happy

ढापुगिरि करणारे टॉप पोझिशनला पोचत नाहीत मित्रा... >>>
लेक्ससच्या गाड्या कॅम्री आणि लॅण्डक्रुझर वगैरे चॅसीसवर बांधलेल्या आहेत, डीझाईन त्याबरहुकुमच येते . त्यामुळे ढापाढापीचा प्रश्न येतोच कुठे.थोड्या गोष्टि कॉमन वाटतात हे खरे, पण तो योगायोग असावा. >>

टोयोटा कॅम्री हा युएसमधला टॉप ब्रॅण्ड आहे ,लॅण्ड क्रुझरचे डीझाईन आणि पर्फोरमन्स युएनलाही अपील होते. >>

सेल्स मध्ये टॉप असल्यावर परफॉरमन्स मध्ये पण टॉप असते हा भ्रम काय कामाचा? व्हर्ना दिसायला चांगली, परमॉरमन्स पण चांगला आणि भारतात सेल्स कमी हे काय दाखवते? आणि लॅण्ड क्रुझरबद्दल कोणी काय लिहिले? कॅम्री ही बेसिक कार आहे. ले मॅन्स एवरीडे गुड कार असे एका वाक्यात मी लिहिन. पण त्यापेक्षा मी वर लिहिलेली सोनाटा ही त्या सेगमेंट मध्ये चांगली कार आहे. व्हॅल्यु फॉर मनी विथ इक्वल परमॉर्मन्स ! लेक्सस आणि टोयोटा एकच कंपन्या आहेत. त्यांच्यात कॉपी केली असे माझे पोस्ट नाही.

मी लेक्सस आणि ऑडी अशी तुलना केली, ह्युंदाई आणि होण्डा, मर्क अशी तुलना केली आहे. तुम्हाला वाटते ना कोणी कॉपी केली नाही. बरं नाही केली. पण हा योगायोग वारंवार घडला की मजा येते नाही ! . गुगल वर तुम्हाला अनेक उदाहरणे मिळतील.

असो कोण श्रेष्ट आणि कोण कनिष्ट ह्यात मला इंट्रेस्ट नाही. गाडी आवडली तर अल्टो पण चांगली आणि X1 पण बेसिक असे माझे मत असू शकते.

ह्याच पोस्ट मध्ये मी टोयोटा कॅम्री पेक्षा सोनाटाला जास्त चांगले हे पण लक्षात घ्यावे. Happy

केदार धन्यवाद. आमची wagaonR सध्या उत्तम स्थितीत आहे, पण नव्या तसेच जुन्या चांगल्या दर्जातील इंडिका विकायला आहेत, असे कळले त्यावरुन विचार चालला होता. कारण बाहेरगावी जाताना परत एका माणसाकरता दुसर्‍या गाड्या भाड्याने घ्याव्या लागतात. wagaonR मध्ये जेमतेम ४ मावतात, तिथे ६ कसे शक्य आहे.

नानु खरी छोट्या कुटुंबाकरता आणी शहरात ऑफिस वगैरेसाठी बनवलीय, पण आपले लोक जाम दामटतात या गाड्यांना. मध्यंतरी खरच अशी उदाहरणे पहायला मिळाली की नानुचा काही फॉल्ट नव्हताच, होता तो या लोकांचा जे नानुमध्ये बाहेरील सोयी बसवु इच्छीत होते.

बराच प्रवास करत असल्याने ट्रान्स्पोर्ट गाडीवाले बरेच ओळखीचे आहेत. त्यांच्याकडून ट्रान्स्पोर्टवाले टाटाच्या गाड्या वापरतात या संदर्भात आमची गाडी घ्यायच्या वेळेला जी माहिती मिळाली ती अशी.
टाटाच्या गाड्या उत्तम अ‍ॅव्हरेज देतात. उत्तम पळतात. बेसिक लेव्हलला व्यवस्थित असतात.
दोन वर्षात मात्र प्रॉब्लेम्स यायला सुरू होतात. खिळखिळ्या व्हायला लागतात. पण तोवर ऑलरेडी लाख दोन लाख किमी रनिंग झालेले असल्याने पैसा वसूल झालेला असतो. त्यामुळे दोन-अडीच वर्षात गाडी काढून टाकून नवीन घेणे परवडते.
मात्र रनिंग कमी झाले तरी हे सगळे प्रॉब्लेम्स येणारच असतात तस्मात पर्सनल वापरासाठी घेताना जेमतेम यूज असेल तर घेऊ नये. लाँग रनसाठी तर मुळीच घेऊ नये.

मी ८ वर्षे वापरून इंडिका विकली.
मग मांझा घेतली. एलान. (अन हाय रे दैव, गाडी घेऊन ६ महिने होण्याच्या आत त्या कुत्र्यांनी नवे फीचर्सवाली मांझा लाँच केली. माझं नेहेमी असंच होतं)
त्या आधी मारूती होती.
सर्व गाड्या फक्त पर्सनल वापरासाठी होत्या. ८ वर्षांत फक्त टायर बदलले होते, कारण झिजले. बाकी मेन्टेनन्स शून्य होता. ट्र्याव्हलला लावलेल्या गाड्या वेगळ्या कारणांनी काम काढतात.
पर्सनली अनुभव म्हणजे, टाटाच्या गाड्या भारतीय रस्त्यावर उत्तम परफॉर्म करतात. शबरीधामला गेलो असताना एका विकृत चढावर डिझायर बंद पडली, तिला ढकलून वर न्यावी लागली. मांझाला प्रॉब्लेम आला नाही Wink

शबरीधामला गेलो असताना एका विकृत चढावर डिझायर बंद पडली, तिला ढकलून वर न्यावी लागली. मांझाला प्रॉब्लेम आला नाही>>>> डीझायर मध्ये मोठ मोठे भोपळे बसले असणार आणि मांझात शिडशिडीत इब्लिस....

Pages