इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.
काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.
तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू. 
याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.
@महेश- फियाटचे री-सेल भारतात
@महेश-
फियाटचे री-सेल भारतात चांगले नाही, हे खरे आहे. आफ्टर सेल्स फियाट आणि फोक्सवॅगन- दोहोंचेही फारसे चांगले नाही. फियाट नुकतेच टाटापासून वेगळे होत स्वत:चे वेगळे डीलरशीप सुरू करताहेत, तेव्हा तिथे सुधारणा होईल अशी आशा आहे.
फायनली पुन्टो आणि वेन्टोपैकी माझे मत पुन्टोला !
(वेन्टोपेक्षा "स्कोडा रॅपिड" जास्त सेन्सिबल डील आहे. सेम कार, वेगळ्या बॅजसह आणि वेन्टोपेक्षा किमान ५०-७० हजाराने स्वस्त !)
ज्ञानेश, पुन्टो स्पोर्टस
ज्ञानेश, पुन्टो स्पोर्टस साधारण ८.२६ पर्यंत आहे, व्हेन्टो डिजेल मधे टॉपएन्ड मॉडेल किती पर्यंत जाऊ शकेल ? जर फरक खुप जास्त असेल तर पुन्टोचा विचार बरा आहे असे वाटते.
सव्वा आठ लाखात पुन्टो
सव्वा आठ लाखात पुन्टो (हॅचबॅक) महाग वाटते. इतर सेडान चा विचार करा. अन हो. अॅव्हरेजही पहा.
तुम्ही विचार करीत आहात ती डिझेल आहे की पेट्रोल?
सर्व फिचर्स पहाता, सव्वा आठ
सर्व फिचर्स पहाता, सव्वा आठ लाखात पुन्टो (हॅचबॅक) ठिक वाटते. कारण हॅचबॅक असली तरी इतर कोणतीही हॅचबॅक याच्या जवळपास पण नाहीये. अॅव्हरेज सिटीत १७, हायवेल २२ आहे डिजेलमधे. स्मूदनेस एवढा तर पेट्रोल गाडीमधे पण नसेल. पिकअप, स्पिड, एबीएस, इ. जबरदस्त आहे. ग्राऊन्ड क्लिअरन्स व्हेन्टो, एसएक्स४ पेक्षा जास्त आहे (१८५).


सेदानचा विचार करायचा झाला तर फक्त व्हेन्टोच आवडली आहे, सेदान असल्याने पॉवर, टॉर्क, इ. जरा जास्त आहे पुन्टोपेक्षा पण टॉपएन्ड मॉडेल बहुतेक १२ पर्यंत जाईल असे वाटत आहे.
खरेतर सफारीसारखी गाडी आवडली असती, पण त्याचे अॅव्हरेज फक्त ११ आहे, म्हणजे रनिन्ग कॉस्ट जवळ जवळ डबल आणि मुदलात किंमत पण जास्तच.
आणि सेदान किंवा एसयुव्ही सिटीमधे (खासकरून पेठांमधे) चालविणे म्हणजे अजुनच
आणि सेदान किंवा एसयुव्ही
आणि सेदान किंवा एसयुव्ही सिटीमधे (खासकरून पेठांमधे) चालविणे म्हणजे अजुनच >>>
गणेश पेठेतून पी एम टी जाऊ शकते म्हणजे पुण्याच्या पेठांमधून रणगाडेही जाऊ शकतील
@महेश- वेन्टो टॉप एन्ड डिझेल
@महेश-
वेन्टो टॉप एन्ड डिझेल पुन्टोपेक्षा किमान साडेतीन लाखाने जास्त ! (अर्थात फीचर्स, सुविधा, स्पेस, कंफर्ट सगळेच जास्त मिळेल.) 'व्हीडब्ल्यु' च्या आफ्टर सेल्स सर्विसबद्दल जास्त कल्पना नाही. इथे कोणी फोक्सवॅगन ओनर असल्यास सांगू शकतील.
व्हेरिटो म्हणजे जुनी लोगान का
व्हेरिटो म्हणजे जुनी लोगान का नाही विचारात घेत? माझ्याकडे डीझेल गाडी ४ वर्षांपासून आहे. अति उत्तम प्रफॉर्मन्स्, अॅव्हरेज, कंफर्ट ,पिक अप आहे. ८५००० कि मी चालली आहे ,सर्व्हिसिन्ग शिवाय काहीही खर्च नाही. अफाट लेग स्पेस आहे.लूक बद्दल वैयक्तिक मत असू शकते पण माझी बापडी सुंदरच आहे.
रेव्यु जुनी लोगन चांगली होती.
रेव्यु जुनी लोगन चांगली होती. वेरिटो अक्षरशः टुकार आहे
मेन्टेनन्स फ्री इन्जिन असं एकच वाक्य तिच्याबद्दल पॉझिटिव्ह आहे. एसी चालू केल्यावर इंजिनला धाप लागत होती.
वेरिटो आणि लोगानची इंजिने
वेरिटो आणि लोगानची इंजिने वेगळी आहेत काय?
खरेतर सफारीसारखी गाडी आवडली
खरेतर सफारीसारखी गाडी आवडली असती, पण त्याचे अॅव्हरेज फक्त ११ आहे, म्हणजे रनिन्ग कॉस्ट जवळ जवळ डबल आणि मुदलात किंमत पण जास्तच.>>>>महेश तुम्हाला एसयुव्ही किंवा क्रॉसओव्हरची पॅशन असेल तर नवीन सुझुकी इर्टीगा किंवा महिंद्रा क्वांटोचा या कॉम्पॅक्ट एसयुव्ही(or MPV) विचार करु शकता, मायलेज मीडसाईज SUV पेक्षा चांगलेच असेल.
एस यू व्ही मधे एक छोटी झायलो
एस यू व्ही मधे एक छोटी झायलो आली आहे. ती कशी आहे?
>>गणेश पेठेतून पी एम टी जाऊ
>>गणेश पेठेतून पी एम टी जाऊ शकते म्हणजे पुण्याच्या पेठांमधून रणगाडेही जाऊ शकतील
ह्म्म्म पण काही झाले तर ड्रायव्हरला सगळे नुकसान सोसावे लागत नाही हो. कॉर्पोरेशन असते त्याच्या मागे.
लोगन आणि वेरिटो दोन्ही खुप चांगल्या आहेत, वेरिटो तर भारीच आहे, पण का कोण जाणे फार दिसत नाहीत.
अर्थात वेरिटो आणि वेन्टोमधे म्हणाल तर फक्त वेन्टोच.
कदाचित महिन्द्राच्या एसयुव्हीच फक्त आवडतात लोकांना की काय कोण जाणे.
एसयुव्ही मधे एर्टिगा, एक्सयुव्ही ५०० आणि मिनि झायलो (उर्फ क्वान्टो) फार अपिलिन्ग वाटल्या नाहीत.
स्कॉर्पिओ, झायलो, सफारी असे तिन ऑप्शन्स चांगले आहेत, पण मुळात बजेट जास्त आणि रनिन्ग कॉस्ट पण जास्त असल्यामुळे या तिन्ही ऑप्शन्सचा विचार करत नाहीये.
ज्ञानेश, फरक साडेतिन लाखांचा म्हणजे जरा जास्त आहे.
तरी पाहू अजुन एकदा वेन्टोकडे चक्कर मारणार आहे.
आणखी एक मुद्दा म्हणजे आत्ता घ्यावी की जानेवारी ऑनवर्डस, कारण वर्षाच्या शेवटी घेतली तरी नंतर रिसेलच्या वेळी लोक म्हणणार की २०१२ मॉडेल, पण महिना कोणी विचारात घेत नाही.
किंमती वाढण्याची शक्यता किती आहे पुढच्या ४ महिन्यात ?
डिसेंबरला लास्ट विक्ला होंडा
डिसेंबरला लास्ट विक्ला होंडा डिझेल येणार आहे म्हणे... १३ लाख पासुन पुढे
कारण वर्षाच्या शेवटी घेतली
कारण वर्षाच्या शेवटी घेतली तरी नंतर रिसेलच्या वेळी लोक म्हणणार की २०१२ मॉडेल,
>>
च्यायला तुम्ही गाडी वापरायला घेताय की रिसेलसाठी?
निस्सान सनीसुद्धा बघा एकदा,
निस्सान सनीसुद्धा बघा एकदा, महेश.
>>कारण वर्षाच्या शेवटी घेतली
>>कारण वर्षाच्या शेवटी घेतली तरी नंतर रिसेलच्या वेळी लोक म्हणणार की २०१२ मॉडेल,
>>तुम्ही गाडी वापरायला घेताय की रिसेलसाठी?
बाजो, जरी वापरायला घेतली तरी हल्ली असे आहे की साधारण ३ ते ४ वर्षात असे अनेकांना गाडी बदलावी असे वाटते, म्हणुन तो ही विचार करून ठेवलेला बरा.
ज्ञानेश, सनी आणि स्काला पेक्षा व्हेन्टो जास्त आवडली आहे, स्पेसिफिकेशन्स पण व्हेन्टोचे जास्त बरे वाटतात.
आता प्रोब्लेम असा आहे की कामानिमित्त चलो दिल्ली असे होण्याची शक्यता आहे पुढच्या ३ ते ४ महिन्यांसाठी, त्यामुळे पण ही खरेदी पुढे ढकलावी लागण्याची शक्यता आहे.
महेशजी,एकंदर तुमच्या
महेशजी,एकंदर तुमच्या लिखाणावरुन वेन्टो तुम्हाला फारच आवडलेली दिसतेय. आता विनाविलंब घेऊन टाका.जास्त विचारात पडाल तर संभ्रम वाढत जाईल.
वेरिटो आणि लोगानची इंजिने एकच
वेरिटो आणि लोगानची इंजिने एकच आहेत. दोन्ही रेनो फ्रान्सहून आयात होतात.

लोगान्/वेरिटोचे अॅव्हरेज २०
लोगान्/वेरिटोचे अॅव्हरेज २० (गावात ) ते २५ (हायवे वर) ए सी सह आहे
बिझनेसमधले लोक गाडी बदलतातच
बिझनेसमधले लोक गाडी बदलतातच ३-४ वर्षात. डेप्रिसिएशन का कायतरी फंडा असतो म्हणे. बाबा सांगत असतात त्याबद्दल पण माझ्या डोक्यात त्यातलं काही शिरत नाही.
येस्स. 'रिसेल' हा अनेकांसाठी
येस्स.
'रिसेल' हा अनेकांसाठी महत्वाचा मुद्दा असू शकतो.
अल्टो ८०० सिएन्जी बूक केली
अल्टो ८०० सिएन्जी बूक केली फ्रॉस्ट ब्लु रंगात. माय डॉटर इज लविंग इट...
आणि शेवटी बरोबर एक वर्षाने
आणि शेवटी बरोबर एक वर्षाने बुलेट क्लासिक ३५० ब्लॅक नंबर आला. ३० नोव्हेंबर पर्यंत गाडी मिळेल असे सांगितले आहे. दोन दिवसात पैसे भरा आणि महिण्याने गाडी घेउन जा,
ओ गडी. बंदूक घेऊन जा एकदा
ओ गडी. बंदूक घेऊन जा एकदा पैसे भर्ण्या आधी
च्याय्ला अक्खी दुनियाच आपल्याला गंडवायला बसलिये का असं वाटटं कधी कधी.
(गाडीच्या बाबतीत कमनशीबी) इब्लिस.
कॉन्ग्रॅटस् साधना आणि
कॉन्ग्रॅटस् साधना आणि निवांत....
निवांता, पार्टी मागू तेव्हा बंदूक ताणू नकोस...
(मनातल्या मनात पाठीला रायफल
(मनातल्या मनात पाठीला रायफल लावुन बुलेटवरुन फिरणारा निवांत
च्याय्ला अक्खी दुनियाच आपल्याला गंडवायला बसलिये का असं वाटटं कधी कधी.>>> एक्झॅक्टली.... आणि हे मी तरी अॅक्सेप्ट केले आहे.
म्हणुनच अक्कलखाती बॅलंन्स प्रचंड मोठा आहे.
च्याय्ला अक्खी दुनियाच
च्याय्ला अक्खी दुनियाच आपल्याला गंडवायला बसलिये का असं वाटटं कधी कधी.>> सध्या घराची काहि कामं सुरु आहेत त्यामुळे लयीच जोरात रिलेट झालं.
म्हणुनच अक्कलखाती बॅलंन्स प्रचंड मोठा आहे.>> हा आमचा सध्या धप्पाधप्प वाढतोय.
साधना आणि निवांत पाटिल नवीन गाडी साठी अभिनंदन.
साधना >> अभिनंदन. टेस्ट
साधना >> अभिनंदन. टेस्ट ड्राईव चा अनुभव शेअर करा प्लिज.
अल्टो ८०० बद्द्ल खुप उस्तुकता आहे.
वा................ रीपोर्ट
वा................ रीपोर्ट चांगले आहेत ऐकुन आहे असे.........२५ पर्यंत मायलेज देते..............
.
.
.
.
साधना अभिनंदन घाई न करता इथे
साधना अभिनंदन घाई न करता इथे लिहिल्याप्रमाणे ८०० साठी थांबलात ते बरं केलंत. नवीन अल्टो ८०० टोटल व्हॅल्यु फॉर मनी ! फ्रॉस्ट ब्लू मधील ती नवीन जाहीरात पण सुंदरच आहे.
पाटील अभिनंदन ! आता रेक्स्टॉन घेऊन टाका आपल्या महिंद्राची.
Pages