इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.
काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.
तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू. 
याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.
भारतीय ग्राहक कार घेताना
भारतीय ग्राहक कार घेताना खालील बाबींचा प्रामुख्याने विचार करतो.
१. गाडी बनवणारी कंपनी (गाडी घेतल्यानंतरच्या गोष्टींकरता)
२.गाडीचा मायलेज
३.गाडीची रिसेल व्हॅल्यु
मग
४. गाडीचा लूक

५.मधील सोयी
६.सरते शेवटी उरले तर सेफ्टीशी संबंधीत बाबी.
>>>
आणि त्याच क्रमाने त्याची फळेही भोगतो !
टु-व्हीलर स्कुटर कोणती चांगली
टु-व्हीलर स्कुटर कोणती चांगली आहे सध्या?
>>
अॅक्टीव्हा.. प्रश्नच नाही.
होंडा डिओ (नवीन मॉडेल).
होंडा डिओ (नवीन मॉडेल). नुकतीच घेतली.
अॅक्टिवा, डिओ, व्हेस्पा, पेप यात डिओ उत्तम. (उंचीचा प्रश्न असल्यास, पाय पुरत नसल्यास पेप घ्यावी)
अॅक्टिवा आणि डिओचे इंजिन सारखंच आहे आता. तरी डिओचे मायलेज अॅक्टिवापेक्षा जास्त आहे.
अॅक्टिवा महिलांना थोडी जड वाटते, त्यामानाने डिओ ठीक.
अवांतर,
जुनी डिओ ब्येष्ट होती. ते मॉडेल का बंद केले कळत नाही.
जुनी डिओ ब्येष्ट होती.
जुनी डिओ ब्येष्ट होती.
अनुमोदन.
जुन्या डिओच्या शार्प डिझाईनचा मी फॅन आहे. नवे कर्व्ही, बल्की डिझाईन मला तितके नाही आवडले. आणि पुढच्या पॅनलवर ते दोन खिळे आणि खालच्या हेडलाईटने मिळून तयार होणारा माणसाचा चेहरा अगदीच काहीतरी दिसतो. तुम्ही केले का नोट? ग्रे कलरमधे स्पष्ट दिसते अगदी.
तुमच्या डिओचा कलर कोणता?
आमच्या अॅक्टिवाच्या
आमच्या अॅक्टिवाच्या खरेदीच्या वेळी मेकॅनिकने दिलेली माहिती नुसार डिवो आणि अॅक्टिवा मेकॅनिकली एकच आहेत फक्त डिओ चे डिझाईन मेल ओरिएन्टेड आहे व कॉस्मेटिक लूकसाठी फायबरचे 'पत्रे' वापरलेले आहेत यामुळे गाडीचे वजन कमी होऊन अॅवरेज जास्त येते. लूक स्टायलिश दिसतो. मात्र हे फायबरचे पार्ट सारखे घासत, धडकत राहतात व तुटत राहतात त्यामुळे वारंवार बदलावे लागतात व खर्च वाढतो...
मात्र हे फायबरचे पार्ट सारखे
मात्र हे फायबरचे पार्ट सारखे घासत, धडकत राहतात व तुटत राहतात त्यामुळे वारंवार बदलावे लागतात व खर्च वाढतो...>>
मलाही गाडी घ्यायला गेले असताना असेच सांगितले होते पण मी गेली ९ वर्षे डिओ वापरत आहे.. शहरात वापर असेल तर इतका काही प्रॉब्लेम येत नाही.. अजुन मी एकदाही एकही पार्ट याकारणाने बदललेला नाही ....बाकी गाडी बेस्ट आहे.. साधारण रेग्युलर मेन्टेनन्स ठेवला तर मध्ये अध्ये काहिही तक्रार नाही...
माझ्याकडे सध्या अल्टो आहे
माझ्याकडे सध्या अल्टो आहे जिला नुकतीच ८ वर्षे पुर्ण झालीत आनि १,०७,००० किमी करुन झालेत.
पेट्रोलच्या किमती पाहता मी सिएनजीवाली गाडी घ्यायचा विचार करतेय. बजेट ५ पर्यंत आहे. मी मारुती वॅगनार ग्रिन पाहिली. तिचे मायलेज २६ छापलेय. एक डिलर म्हणाला २६ छापलेय तरी योग्य तो वेग ठेऊन ड्राईव केले तर ३३ पर्यंतही एकाला मिळालेय. दुसरा डिलर म्हणाला की २६ छापलेय तरी २१-२२ पर्यंत मिळते. छापल्यापेक्षा जास्त मायलेज फक्त अल्टो सिएनजी देते.
ह्युंदाय आय-१० मॅग्नाही सिएन्जी मध्ये आहे. तिचे अॅवरेज १८-२१ आहे असे डिलर म्हणाला. आय-१० चालवुन पाहिली. स्मुथ वाटली, एसी चांगला वाटला (अर्थात माझी गाडी जुनी असल्याने कुठलीही नविन गाडी मला आता स्मुथच वाटेल
)
मला वॅगनार नी आय-१० मॅग्ना ह्या दोन्ही सिएन्जी मध्ये नक्की काय घ्यावे हे सुचत नाहीय. माझ्या प्रायोरिटीज मायलेज जास्त, मेंटेनन्स कमी आणि नंतर कंफर्ट ह्या आहेत, लुक्सला जास्त मार्क्स मी सध्या तरी देत नाहीय. वॅगनार आय-टेन्सपेक्षा जास्त स्पेशस वाटली.
आय-१० मॅग्नासाठी सिएन्जी आहे हे मला माहित नव्हते, शोरुममध्ये कळले. कंपनी फिटेड आणि डिलर फिटेड दोन्ही ऑप्शन्स आहेत. डिलरने कंपनी फिटेड कमी कटकटीचे म्हणुन सांगितले.
वॅगनारही कंपनी फिटेड आहे. कंपनी फिटेड नी डिलर फिटेड - पर्फॉर्मन्सवर काय फरक पडतो माहित नाही.
तर मंडळी, या दोघांत डावेउजवे कोण ते कॄपया सांगा
सेदानमध्ये सेफ्टीपासुन सर्व
सेदानमध्ये सेफ्टीपासुन सर्व फिचर्स हवे असतील तर बजेट बारा तेरा लाखापर्यत जाणारच ,एवढ्या किमतीची सेदान घेण्यापेक्षा तेवढ्याच किंमतीची एखादी मिडसाईज मेडीयम ड्युटी SUV घेणे कधीही चांगले. भारतातले पंचवीस टक्के रस्ते हे नाहीतरी ऑफरोडमध्येच येतात.हाय सिटींग पोझिशन, स्पेस, सेफ्टी,endurance,ऑफरोड कॅपॅबिलटी यांचा फायदा मिळतो. थोडे मायलेज कॉम्प्रोमाईज करावे लागेल ,बाकी सगळेच 'manly' वाटेल.
साधना, मारोती ८०० सी सीची
साधना,
मारोती ८०० सी सीची सारखी आणखी एक नवीन कार अल्टो सेगमेंट मध्ये सुझुकी दिवाळीला आणते आहे. किंमत अडिच लाख आणि अॅव्हरेज २५ + असणार आहे. सिएनजी पेक्षा ह्या नवीन ८०० इंजिन व कारची वाट पाहणे जास्त चांगले ठरेल.
सिएनजी असल्यावर कार चालविने कमी अन रांगेत उभे राहणे जास्त असे पुण्यात नेहमी दिसते.
साधना, तुमचा प्रेफरन्स पाहता,
साधना, तुमचा प्रेफरन्स पाहता, वॅगन आर अधिक योग्य वाटते (मला पर्सनली आयटेन जास्त आवडते)
मृनिशना अनुमोदन. नव्या डिओचा
मृनिशना अनुमोदन.
नव्या डिओचा रंग ग्रे. मॅट फिनिश.
<< पुढच्या पॅनलवर ते दोन खिळे आणि खालच्या हेडलाईटने मिळून तयार होणारा
अगदी! त्यामुळे डिओचा ऑप्शन कट करावा की काय असे वाटण्या इतपत ते बॅड बॅड दिसते !

<< माणसाचा चेहरा अगदीच काहीतरी दिसतो.
चेहर्यापेक्षा मला ती गाडी पोटुशी (प्रेग्नंट) वाटते !!
पण दुसरा चांगला पर्याय नव्हता. वजन कमी असणारी, उंची कमी असली तरी चालवता येईल अशी हवी होती. वहिनीकरता घेतली.
माझ्याकडे डिओचे जुनेच मॉडेल आहे. व्यवस्थित चालते. नीट चालवली की पार्ट कुठेही घासत, धडकत आणि तुटत नाहीत
जुन्या आणि नव्यापैकी जुने मॉडेल अधिक उत्तम. उगाच बंद केले.
हाय सिटींग पोझिशन, स्पेस,
हाय सिटींग पोझिशन, स्पेस, सेफ्टी,endurance,ऑफरोड कॅपॅबिलटी यांचा फायदा मिळतो.>> अनुमोदन.
टोयोटाची लिवादेखिल मस्त आहे. टेस्ट ड्राईव्ह घेतली.
दोन नातेवाईकांनी घेतली, त्यांनीही फिडबॅक चांगला दिलाय.
कमी मेन्टेनन्स, भरपूर स्पेस आणि कम्फर्टेबल.
येत्या दिवाळीत बुक करणार.
लिवा मस्त आहे. मे मधे घेतलीये
लिवा मस्त आहे. मे मधे घेतलीये मी पण.
केदार, आनंदयात्री आभार
केदार, आनंदयात्री आभार
दिवाळीपर्यंत वाट पाहायला हवीच मग...
बुलेटसाठे ८-१० महिने वेटिंग
बुलेटसाठे ८-१० महिने वेटिंग आहे
मी पण घेणार आहे, बुक करुन ठेवेन या वर्षाखेरपर्यंत. 

तशी हार्ले पण आहे लगेच उपलब्ध फकस्त ८-९ लाखात
स्पोर्ट सेगमेंट मध्ये KTM Duke मस्त आहे असा रिपोर्ट माझ्या मित्राने दिलाय. हिरो इंपल्स बद्दल माहिती नाही.
नॉनगिअर्ड गाड्यात अॅक्टिवा आणि महिंद्रा ड्युरो आवडल्यात. सुझुकी / TVS च्या नाही वापरल्यात. स्कूटी पेप पण मस्त आहे.
>>पण दुसरा चांगला पर्याय
>>पण दुसरा चांगला पर्याय नव्हता. वजन कमी असणारी, उंची कमी असली तरी चालवता येईल अशी हवी होती
प्लेझरचा पण ऑप्शन चांगला होता की मग!
बुलेटसाठे ८-१० महिने वेटिंग
बुलेटसाठे ८-१० महिने वेटिंग आहे>>> त्यांची प्रॉडक्शन कपॅसिटी कधी वाढेल हे देवच जाणे..
प्लेझरचा पण ऑप्शन चांगला होता
प्लेझरचा पण ऑप्शन चांगला होता की मग!>> मेन्टेनन्स खूप आहे त्या गाडीला.
>>मेन्टेनन्स खूप आहे त्या
>>मेन्टेनन्स खूप आहे त्या गाडीला.
हो का?.... आम्हाला घेउन ३ वर्षे झाली.... नियमित सर्विसिंग आणि अगदी आत्ता आत्ता बॅटरी चेंज याशिवाय काही खर्च नाही काढला गाडीने अजुनतरी!
अरे वा ! उत्तम आहे की मग
अरे वा !
उत्तम आहे की मग !
प्लेजरला मेन्टेनन्स खूप आहे असे ऐकण्यात होते ते खोटे आहे म्हणायचे.
बायकांची वजने हल्ली
बायकांची वजने हल्ली पेट्रोलच्या किमतीशी स्पर्धा करत असल्याने मोपेड, स्कुटरना बराच मेंटेनन्स करावा लागतो.
हा जेन्डर बायास झाला थिंकर...
हा जेन्डर बायास झाला थिंकर...
आपल्यापैकी कोणाला कंपनीतर्फे
आपल्यापैकी कोणाला कंपनीतर्फे unregistered किंवा used कार्सचा जी bid करुन कंपनीतल्या वा त्यांच्या जवळ्च्या लोकांसाठी विक्री होते त्याबद्द्ल काही अनुभव आहे का? असल्यास गाड्या आणी किंमती कश्या असतात?
बाळू जोशी. | 11 September,
बाळू जोशी. | 11 September, 2012 - 09:54 नवीन
हा जेन्डर बायास झाला थिंकर...>>>>>बाळासो आपण लगेच जेंडर बायसच्या आरोपावर का उतरता, फॅक्ट सांगणे हा बायस कसा ठरतो?सेदानच्या बाबतीतही आपण बायसचा विषय काढला होता.
महिंद्रा क्वांटो चे इ-ब्रोशर
महिंद्रा क्वांटो चे इ-ब्रोशर तुम्ही इथुन डाऊनलोड करु शकता.
http://www.mahindraquanto.com/images/quanto-brochure.pdf
परवा पुन्टो स्पोर्टस ची टेस्ट
परवा पुन्टो स्पोर्टस ची टेस्ट राईड घेतली, अप्रतिम गाडी आहे.
नविन व्हेन्टो पण चांगली आहे, या दोन्ही मधे कोणता पर्याय चांगला आहे ?
@महेश- दोन्ही युरोपिअन गाड्या
@महेश-
दोन्ही युरोपिअन गाड्या उत्तम आहेत, पण वेगवेगळ्या सेगमेंटमधल्या आहेत. पुन्टो हॅच आहे, तर वेन्टो सी सेगमेन्ट सेदान. तुमच्या गरजांनुसार निवड करा.
ज्ञानेश, धन्यवाद, खरे तर
ज्ञानेश, धन्यवाद, खरे तर पुन्टो स्पोर्टस ही सिटी ड्राईव्ह आणि हायवे दोन्ही ठिकाणी चांगली आहे.
केवळ स्पेशिअस आहे म्हणुन व्हेन्टोचा विचार करावा का असे वाटत आहे.
अर्थात बजेट वाढणार तसेच सर्विस नेटवर्क फियाटचे चांगले आहे असे म्हणतात.
स्पेस आणि आफ्टर सेल्स सर्विस (त्वरित, महाग, इ.) या तुलनेमधे कोणती सुचवाल ?
महेश | 24 September, 2012 -
महेश | 24 September, 2012 - 03:42 नवीन
ज्ञानेश, धन्यवाद, खरे तर पुन्टो स्पोर्टस ही सिटी ड्राईव्ह आणि हायवे दोन्ही ठिकाणी चांगली आहे.
केवळ स्पेशिअस आहे म्हणुन व्हेन्टोचा विचार करावा का असे वाटत आहे.
अर्थात बजेट वाढणार तसेच सर्विस नेटवर्क फियाटचे चांगले आहे असे म्हणतात.
स्पेस आणि आफ्टर सेल्स सर्विस (त्वरित, महाग, इ.) यातुलनेमधे कोणती सुचवाल ?>>>>दोन्हीपैकी पुन्टो प्रेफर करा. टोयोटा लिवा ,हुडाय आय 20 ची पण टेस्ट ड्राईव घ्या ,चांगल्या आहेत त्यापण.
ग्रेथिं , धन्यवाद, पुन्टोचाच
ग्रेथिं , धन्यवाद, पुन्टोचाच विचार करावा असे वाटत आहे, केवळ एकच मुद्दा छान नाहीये, तो म्हणजे रिसेल किंमत. पण कदाचित अजुन काही काळाने त्यात पण सुधारणा झाली असेल.
Pages