कोणती गाडी घ्यावी?

Submitted by साजिरा on 15 October, 2009 - 07:51

इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.

काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्‍यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.

तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्‍या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू. Happy

याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद सागर आणि सेनापती! मी सुद्धा जास्त पॉझिटिव्ह नव्हतोच. त्यात तुमच्या प्रतिसादांनी पक्का निर्णय घ्यायला मदत केली.

मायबोली रॉक्स!!!

ग्रेटथिंकरजी धन्यवाद
सध्या हॅचबॅक (आय १०) असल्याने सेडान घ्यायचा विचार आहे.
(कंपनी देत असल्याने खर्चाचा विचार नको) Wink

मुग्धानंद
एसबीआयचं लोन डोळे झाकून घ्या. लोनचं स्टेटमेंट, तुमचे हप्ते कसे कट होणार याचं कोष्टक मिळते. संपूर्ण पारदर्शी कारभार आहे. प्रोसिजर ला घाबरून सुलभ मिळते म्हणून काही जणांनी इतर कर्जे घेतली होती. मधेच कर्ज फेडायचा प्रसंग आला कि मग वाद उत्पन्न होतात. एसबीआयचे लोन कुठल्याही टप्प्यावर फेडू शकता.

<<<जेम्स बॉन्ड | 8 September, 2012 - 02:13 नवीन
ग्रेटथिंकरजी धन्यवाद
सध्या हॅचबॅक (आय १०)असल्याने सेडान घ्यायचा विचार आहे.
(कंपनी देत असल्यानेखर्चाचा विचार नको)>>>>अच्छा ठीकाय. वर्ना, डीझायर बरोबरच निस्सान सनी, टाटा मांझा, फोर्ड फिएस्टा रेनॉ फ्लुएन्स ,फियाट लिनिआ,फोक्स वेन्टो यांचाही विचार करावा.टेस्ट ड्राईव घेऊन बघा.मला व्यक्तीशः फोर्ड फिएस्टा सेडानमध्ये योग्य वाटते. अर्थात, बजेट ८,९ लाखापर्यंत असेल तरच .

ग्रेटथिंकरजी,
व्यक्तिशा मलाही फोर्ड फिएस्टा क्लासिक आवडतेय. बजेटही ९ पर्यन्त आहेच.
तुम्ही सुचिविल्याप्रमाणे करुन पहातो.
धन्यवाद.

कार इन्शुरन्सबद्दलही इथेच बोलता येईल का...माझी आय १० आहे. सेकंडमध्ये घेतलेली. तिचे सप्टेंबरपर्यंत इन्शुरन्स भरलेले होते. ते संपायला येताच HDFC Ergo वाल्यांनी लकडा लाऊन ते रिन्यु करायला लावले. घाईघाईत भरले खरे पण नंतर असे वाटले की दुसरीकडे चौकशी करायला हवी होती. मित्राचे म्हणणे पडले की ती महागडी आहे कंपनी
कार इन्शुरन्ससाठी कुठली कंपनी चांगली आहे??

आशु,
HDFC Ergo चा काही अनुभव नाही पण मी पहीला इन्शुरन्स TATA AIG कडे काढला पण नंतर Bajaj Allianze कडे वळलो... TATA पेक्षा त्यांची पॉलीसी चांगली वाटली.. इन्शुरन्स मध्ये काय कव्हर केलेय ते महत्वाचे.. कव्हर बंपर टू बंपर आहे का? PA कव्हर किती आहे? पॅसेंजर कव्हर आहे का? असेल तर कीती पॅसेंजर करीता? NCB कीती % देणार की त्या ऐवजी गाडीची IDV कमी करणार नाहीत? गाडी जर ड्रायव्हर ड्रीव्हन असेल तर ड्रायव्हर कव्हर आहे की नाही? गाडीच्या प्लॅस्टीक पार्ट कव्हरेज बाबत कंपनीचे काय धोरण आहे? या आणी अनेक बाबी बघून इन्शुरन्स कंपनी ठरवायला हवी.. त्या बाबतीत मला Bajaj Allianz चांगली वाटते..

अजून एक - आजकाल काही काही कंपन्या क्लेम केल्यावर कंपल्सरी डिडक्शन म्हणून १०००-१५०० रु. कापतात Sad तेही क्लॉज आहे का ते बघायला हवे..
तसेच काही काही कंपन्या शून्य घसारा पॉलीसीज ऑफर करतात.. नेहमीच्या पॉलीसीपेक्षा ह्या पॉलीसीज साधारण २० % महाग प्रीमीयम वाल्या असतात पण रीन्युअलच्या वेळेस शुन्य घसारा पकडतात...

अमेलीया,
होंडा जॅझ ही मला तरी ओव्हरप्राईस्ड वाटते (जरी त्यानी सध्या किंमती कमी केल्या आहेत तरी). ह्या किंमतीत जॅझ पेक्षा बरेच चांगले ऑप्शन आहेत..

होंडा ब्रिओ साठी थोडे थांबा... ब्रिओचे ऑटोमॅटीक व्हर्जन येतेय (बहुधा ह्याच महीन्यात लॉन्च होईल)...

धन्यवाद स्वच्छंदी! होंडा ब्रिओ मला आवडली आहे. Happy
आणि मग जॅझला कोणते ऑप्शन्स आहेत? निस्सान सनी कशी आहे?

अच्छा ठीकाय. वर्ना, डीझायर बरोबरच निस्सान सनी, टाटा मांझा, फोर्ड फिएस्टा रेनॉ फ्लुएन्स ,फियाट लिनिआ,फोक्स वेन्टो यांचाही विचार करावा.टेस्ट ड्राईव घेऊन बघा.मला व्यक्तीशः फोर्ड फिएस्टा सेडानमध्ये योग्य वाटते. अर्थात, बजेट ८,९ लाखापर्यंत असेल तरच .
>>>>>>>>

स्कोडा रॅपिडचा पण विचार करा.

अमेलीया,
जॅझ आणी सनीची तुलना होऊ शकत नाही कारण एक हॅच आहे आणी एक सेदान.. जॅझ च्या ऐवजी तुम्ही i20, पोलो, नवीन स्विफ्ट किंवा पुंटो चा विचार करू शकता..
निसान सनीचा जर वेगळा विचार करत असाल तर सनी मस्त गाडी आहे.. त्या सेगमेंट मध्ये एकदम VFM. स्टायलीश लूक, आवश्यक ते फिचर्स, भरपूर स्पेस आणी किंमतही कॉम्पीटीटीव्ह...

पण निसान सनी साठी परत थोडे थांबा...रेनॉने बॅज इंजीनीयरींचा फंडा वापरून रेनॉ स्काला लाँच केलीय (मायक्रा = पल्स, सनी = स्काला). प्री-बूकींग चालू झालेय आणी दिवाळी पर्यंत ऑफीशीयल लाँच होईल..

ऑटॉमॅटी़क मध्ये अ‍ॅवरेज खूपच कमी बसते ना? पेट्रोलचे वाढते भाव पहाता परवडेल का? की परवडण्याचा विचार करणार्‍या क्लासम्धल्या पब्लिकने ऑटाँमॅटिकच्या फन्दात पडूच नये? ऑटोमॅटिक वापरणारे परिचित बर्‍यापैकी वैतागलेले आहेत. केवळ स्मूथ ड्रायविंगच्या पलीकडे आनखी काही बाबी आहेत का?

स्वच्छंदी, आधीच्या इंडिका झीटाला ६ वर्षे झाली आहेत. आता नविन घ्यायची तर हॅच घ्यावी की सेदान असा विचार चालू आहे. झीटाची स्पेस खूपच चांगली होती, त्यामुळे आताही प्रशस्तच हवी आहे. तुम्ही दिलेली माहिती खूपच उपयुक्त आहे. धन्यवाद! Happy

अनेक लोक नविन गाडी विकत घेत आहात असे दिसते.
मल स्वतःकरता हॅचबॅक प्रकारातली, शक्यतो पुण्यातली जुनी गाडी हवी आहे, कोणाला विकायची असल्यास जरुर सांगा.
http://jahirati.maayboli.com/node/562 ही जाहिरात बघा.
एजंट क्षमस्व !

अमेलिया | 9 September, 2012 - 08:33 नवीन
स्वच्छंदी, आधीच्या इंडिका झीटाला ६ वर्षे झाली आहेत. आतानविन घ्यायची तर हॅचघ्यावी की सेदान असाविचार चालू आहे. झीटाची स्पेस खूपच चांगली होती, त्यामुळे आताही प्रशस्तच हवी आहे. तुम्ही दिलेली माहिती खूपच उपयुक्त आहे. धन्यवाद!>>>सेदान घ्या ,स्पेस हवी असेल तर निसान सनी चांगला ऑप्शन आहे. ओवरऑल पर्फोमन्ससाठी फोर्ड फिएस्टा क्लासिक बेटर ऑप्शन.टाटा युजरशीप चालु ठेवणार असाल तर टाटा मांझा घ्यायला हरकत नाही.

*वरील सजेशन्स हे स्वानुभव ,मित्रपरीवारातील चर्चा ,ऑटो मॅगजीनमधले वाचलेले reviews यावर आधारलेले आहेत *

बॉस म्हणतोय फियाट लिनिया ही बेस्ट ऑप्शन आहे.
पण माझे मत ह्युन्डाई वर्ना फ्लुईडिक किंवा स्विफ्ट डिझायर. वर ग्रेट्थिंकर्जींनी म्हटल्याप्रमाणे सनी किंवा फोर्ड फिएस्टा ला काही हरकत नसावी.

इन्शुरन्सच्या बाबतीत म्हणाल तर मला स्वतःला आयसीआयसीआय, टाटाएआय्जी, भारती एक्साचा अनुभव चांगला आहे.(भारती एक्सा १००% कव्हरही देते काही एक्स्ट्रा पैसे मोजुन.)

भारतीय ग्राहक कार घेताना खालील बाबींचा प्रामुख्याने विचार करतो.
१. गाडी बनवणारी कंपनी (गाडी घेतल्यानंतरच्या गोष्टींकरता)
२.गाडीचा मायलेज
३.गाडीची रिसेल व्हॅल्यु
मग

४. गाडीचा लूक
५.मधील सोयी
६.सरते शेवटी उरले तर सेफ्टीशी संबंधीत बाबी.

बाँड जी,
लिनिया पेक्षा मांझा उजवी. दोन्ही टाटा च्या च गाड्या आहेत. सबकुछ सेम. लिनिया फक्त ब्रांडनेमसाठी १लाखाने महाग आहे. एकाच शोरूम मधे विकतात.
फ्ल्युडिक मलाही आवडली होती. पण ह्युंडाईवाल्यांना लै माज. २ महिने वेटिंग, डिझेल गाडीची किम्मत वाढली तर डिफरन्स तुमच्याकडुन वसूल करू इ. डायलॉग ऐकून म्हट्लं हाऽड!
म्हणून व्हर्ना आवडलेली असूनही एलान घेतली.
८ गाड्यांची टेस्ट घेतली होती. ड्रायव्हिंग कंफर्ट अन पॅसेंजर कंफर्टमधे मांझा बर्‍याच गाड्यांपेक्षा चांगली आहे. अन टाटा/इंडिकाच्या सर्व्हिसबद्दल मी अत्यंत सुखी आहे. (१२-१३ लाखाचं मला वरचं लिमिट होतं, टॅक्स रीझन्स.)

किमती कंपेअर करताना, कृपया एअरबॅग वाल्या मॉडेल्सच्याच करा ही विनंती. सेफ्टि फर्स्ट. ८ लाख अन ९ लाख फार फरक पडत नाही, हॉस्पिटल बिलाचा हिशोब केलात तर Wink

धन्यवाद....बापरे मी एवढे फॅक्टर्स विचारातच घेतले नव्हते...आता घरी जाऊन पाहतो त्यात काय काय आहे ते....

सध्या बुलेट साठी किती वेटिन्ग सुरुय काहि कल्पना आहे का?
आमच्या मायबोलीकर कोल्लापुरी मित्राला अजुन काहि महिने थांबायला सांगितलय.

इब्लिसजी मनापासुन धन्यवाद.
स्वतः इएचेस शी संलग्न असल्याने तुम्ही म्हणत आहात त्याप्रमाणे सेफ्टी प्रथम बाकी नंतर हा माझा चॉइस राहील.
ह्युन्डाईचा माझा अनुभव फारच चांगला आहे (नॉर्थ इंडिया).

@बॉन्ड-
बॉस म्हणतोय फियाट लिनिया ही बेस्ट ऑप्शन आहे.

बॉस इज आलवेज राईट ! Wink
वर्ना / डिजायर पेक्षा लिनिआ बेटर. (वै.म.) फिएस्टा/सनी कंपेरेबल आहेत.

@इब्लिस-
लिनिया पेक्षा मांझा उजवी. दोन्ही टाटा च्या च गाड्या आहेत. सबकुछ सेम.

नो सरजी.
टाटाने फक्त इंजिन आउटसोर्स केलंय फियाटकडून. एकंदर फिट, फिनिश, सायकल पार्टस, बॉडी डायनॅमिक्स, रोड बिहेविअरमधे अबसेल्युटली नो तुलना !!
युरोपिअन कार्स आर वे बेटर. (पुन्हा वै.म.)

ज्यांचे बजेट ६ लाखापर्यंत आहे त्यांनी थोडी वाट पाहावी कारण महिंद्रा क्वांटो लॉन्च होते आहे. ५ १/२ लाख रू मध्ये. ५ सिटर आणि SUV लाईक, १.५ लिटर इंजीन आणि १८ चे अ‍ॅव्हरेज.

http://www.youtube.com/watch?v=9XJffls8tTs

दोन्ही टाटा च्या च गाड्या आहेत. सबकुछ सेम. >>> नाही. दोन्ही ब्रॅण्ड पण वेगळे आहेत. फियाट फेरारी पण ओन करते, टाटा नाही !

वर्ना / डिजायर हे दोन्ही सेगमेंट वेगळे आहेत. तुलना होत नाही.

फियाट / ह्युंदाई मध्ये मी वैयक्तीक मत ह्युंदाईला देईन. दोन्ही मी चालवलेल्या आहे. फियाटच्या ब्रॅण्ड नेमला भारतात पोचा पडलेला आहे. त्यामुळे रिसेल हा मुद्दा असेल तर थोडे जपूनच.

सेफ्टी हा मुद्दा असेल तर व्हर्नाला सध्यतरी टक्कर देईल अशी कूठलिही गाडी बाजारात नाही. (अर्थात त्या सेगमेंट मध्ये) ६ एअरबॅग्स देणारी कार अजून यायची आहे. मी व्हर्नाचा फ्यान नाही. पण लिनिया पेक्षा ती खूप सरस आणि उजवी आहे.

लोल.

टाटा आमचेही आहेत बरं. मागचे काही पानं पाहिले तर मी टाटांवर भरपूर लिहिले आहे. मला टाटा गाड्या आवडतात. नो नॉनसेन्स फॉर ३ इयर्स Happy

वर्ना / डिजायर हे दोन्ही सेगमेंट वेगळे आहेत. तुलना होत नाही. >> +१.. या सेगमेंटमध्ये एसएक्स फोर येते (डिझायर नाही) जी तुम्ही नक्कीच कन्सिडर करू शकता.

युरोपिअन कार्स आर वे बेटर >> +१

किमती कंपेअर करताना, कृपया एअरबॅग वाल्या मॉडेल्सच्याच करा ही विनंती. सेफ्टि फर्स्ट. ८ लाख अन ९ लाख फार फरक पडत नाही, >> +१००००००००००००००००००००००

Pages