कोणती गाडी घ्यावी?

Submitted by साजिरा on 15 October, 2009 - 07:51

इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.

काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्‍यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.

तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्‍या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू. Happy

याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

७५

Mahindra XUV kashi ahe? >> लै भारी! ओव्हरहाईप्ड आणि महाग SUV पेक्षा कितीतरी मस्त.

सॅटिसफाईड फर्स्ट बॅच कस्टंबर.

स्वराली - I20 पेक्षा तुम्ही निस्सान मायक्रा प्रिफर करा. सुंदर आणि मस्त गाडी. थोडेसेच बजेट वाढवले तर निस्सान सनी उत्कॄष्ट आहे.

केदारची XUV500 चालवून बघितल्यावर माझा ड्रायव्हिंगचा कॉन्फिडन्स पार धुळीला मिळाला होता हां. खड्डेमय बारक्या रस्त्यातून ही कशी चालवायची हा प्रश्नही पडला Happy

खड्डेमय बारक्या रस्त्यातून ही कशी चालवायची हा प्रश्नही पडला स्मित >> यु निड अनादर राईड ! Happy आमची ही पेठेतल्या बारक्या रस्त्यातून देखील नॅनो हाकावी तशी हाकते.

गाडी घेताना मलाही खूप लोकं म्हणाले की पेठेत / पुण्यात कशी चालवणार? पण आपला फंडा क्लिअर होता. जिथे PMT पेठेतून जाते, तिथे XUV का नाही.

मारुती एर्टिगा माझ्या एका शेजार्‍याने घेतली आहे. बरी दिसते. अजून चालविली नाही. पण सबकॉम्पॅक्ट SUV पाहिजे तर चांगली दिसत आहे. शिवाय पैसे ही कमी. पण तुम्ही रेनॉ डस्टर देखील बघा. ह्याच रेंज (१ १/२ लाख इकडे तिकडे) आहे.

मी Scorpio Vlx Automatic घेतली , लै भारी , जबरदस्त गड्डी , मस्त पळवली घाटातुन , खड्ड्यातुन , गर्दीतुन , हायवे ने . नो क्लच , नो गिअर चेन्ज , एकदम नो टेन्शन ड्राईविन्ग .
अ‍ॅव्हरेज मे थोडा मार खाती है , शहरातुन १० अन हायवेला १३-१४ पर्यंत , पेट्रोलपेक्षा डिझेल भरायला खिशाला आवडते Happy फार नाही चालवली , २ महिन्यात फक्त ८००० kms Happy

बराचसा धागा वाचला. अजूनही गोंधळ कायम आहे. आत्ता मी wagon r वापरते (petrol/LPG dual). ती बदलून मला येत्या २/३ महिन्यात दुसरी गाडी घ्यायची आहे. पर्याय सुचवणार का? पुढील गोष्टींवर विचार करत आहे:
१. दर महिन्याला सुमारे ८००/९०० कि.मी running व्हावे (ठाणे/मुंबई)
२. ड्रायवर धरून ५ माणसे सहज बसू शकतील अशी गाडी हवी आहे.
२. गाडी बहुतेक वेळा ड्रायवर च्या हातात असेल.
३. गाडी ५/७ वर्षे वापरता येईल अशी असावी
४. पेट्रोल/ cng अशी duel घ्यावी का? cng साठी पेट्रोलपंपावर गाडी/ऑटो अशा वेगळ्या रांगा असतात का?
५. बजेट ५ ते ८ आहे. फ्युएल एकॉनॉमी, सेफ्टी, मेंटेनन्स फ्रेंडलीनेस, राइड क्वालिटी यांना प्राधान्य तर उंची, आतली स्पेस, लूक्स वगैरे पाठोपाठ.

गाडी घ्यायची असे नुसते मनात आले तरी सगळीकडे नुसत्या कार्स दिसायला लागतात !
प्रतिसाद दिल्याबद्दल आभार !दोन वेळा लिहिले पण काहीतरी problem झाल्याने गायबले ...म्हणून उशिरा लिहिते आहे .
केदार , पण मायक्रा ऑटोमेटिक नाही ना..mandard यांनी लिहिले होते .दिसायला छान वाटली ..i20 पेक्षा लूक छान आहे .पण अजून माहिती साठी test ride घ्यावी लागेल .
निस्सान सनी honda city च्या जवळपास जाणारी वाटली!
सध्या भिस्त activa वर आहे !:-)
two wheelar मध्ये बेस्ट !

<<मी Scorpio Vlx Automatic घेतली , लै भारी , जबरदस्त गड्डी , मस्त पळवली घाटातुन , खड्ड्यातुन , गर्दीतुन , हायवे ने . नो क्लच , नो गिअर चेन्ज , एकदम नो टेन्शन ड्राईविन्ग .>> गाडी अशीच हवी !पण अ‍ॅव्हरेज पण चांगला हवा !

गाडी घ्यायची असे नुसते मनात आले तरी सगळीकडे नुसत्या कार्स दिसायला लागतात !>> हे सिलेक्टिव परसेप्शन चे पहिले उदाहरण आहे. वर्किंग मॉम साठी गाडी खूप उपयुक्त ठरेल. सामान आणून गाडीत ठेवता येते. मुलांना क्लासला वगैरे सोडायला सेफ्टी व कंफर्ट गाडीत जास्त. टू व्हीलर मध्ये तुम्हाला फ्लेक्सिबिलिटी मिळेल. Happy

o kedar bhau, PMT pethet park kuthe karatat!
Need another ride he matra absolute, ultimate truth etc! Happy

वैजयंती

पेट्रोल चालत असेल तर होंडा ब्रिओचा विचार करून पहा एकदा. तांत्रिक दृष्ट्या स्विफ्ट पेक्षाही चांगली आहे. सीएनजी हवी असेल तर मात्र दुसरा पर्याय पहावा.

पेट्रोल कि सीएनजी हा निर्णय घेणे सोपे नाही. किंमतीत खूपच फरक आहे. ते आधी निश्चित करा.

किरण, माहितीसाठी धन्यवाद. ब्रिओ शॉर्ट्लिस्ट केली आहेच. जॅ़झ बद्दल काय मत आहे? ब्रिओचं माइलेज काय आहे सांगता येईल का?
मी SX4/Ertiga चा सुद्धा विचार करत आहे. SX4 CNG किट सह मिळते ना?
प्लीज मदत करा.
CNG किट साठी किती फरक पडतो?

मुग्धानंद, वॅगन आर चा माझा अनुभव उत्तम आहे.

वैंजयंती, फियाट पुन्टो, निस्सान मायक्रा,सनी ,फोक्सवॅगन वेन्टो यांचा विचार करुन बघा ,CNG चा विचार द्या सोडून, बोलुन चालुन जवळपास पेट्रोल ईतकाच खर्च येतो.

मी SX4/Ertiga चा सुद्धा विचार करत आहे. SX4 CNG किट सह मिळते ना? >> SX4 एनीटाइम. पण मागच्या बकेट सीटस असल्यानं ३ मोठे लोक लांबच्या प्रवासासाठी एवढ्या आरामात नाही बसू शकत.

एर्टिगा डिझेलला ४ महिने वेटिंग आहे. Sad पण एर्टिगाला पर्याय म्हणून डस्टरची टेस्ट ड्राईव्ह नक्की घेऊन बघा.......

एसेक्स४ ला सीएन्गी कंपनी फिटेड सीएन्जी किट असला तरी ययय्यययययय जागा मिळते डिकीमध्ये..... पिक अप तर अफलातून आहे.

एक होंडा अ‍ॅकॉर्ड मिळते आहे. सेकंड हँड. एकहाती वापरली आहे. २००६ चे मॉडेल. ८७००० रन झाला आहे. किंमत ४.७ लाख सांगत आहेत. घ्यावी का नको? कृपया मार्गदर्शन करा.

नवीन गाड्यांचे सेल्स डाउन असल्यने बक्कळ डिस्काउंट्स उपलब्ध आहेत. आजच्या टाइम्स ऑफ इंडियात आर्टिकल आहे. फायदा घ्या लोक्स.

माझ्याकडे आयटेन स्पोर्ट असुन सध्याचा नवीन घ्यायचा पर्याय हुन्डाई व्हर्ना किंवा मारुती-सुझुकी स्विफ्ट डिझायर पैकी आहे.

एक होंडा अ‍ॅकॉर्ड मिळते आहे. सेकंड हँड. एकहाती वापरली आहे. २००६ चे मॉडेल. ८७००० रन झाला आहे. किंमत ४.७ लाख सांगत आहेत. घ्यावी का नको? कृपया मार्गदर्शन करा.>>>>
होन्डाचा सध्या काही गाड्यांचा स्टॉक क्लिअरन्स सुरू आहे. त्यात तुम्ही सेकंड हँड घेताय. रनदेखिल खूप झालाय.
सहसा लोक ५० के रिडींग झालं की गाडी विकतात. नका घेऊ.

Pages