कोणती गाडी घ्यावी?

Submitted by साजिरा on 15 October, 2009 - 07:51

इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.

काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्‍यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.

तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्‍या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू. Happy

याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वापरलेली आय टेन मॅग्ना १.२ , २०१०ची २५००० रिडींग आहे.
किंमत ३.२५.
पॉवर स्टीअरिंग, पॉवर विंडो आहे.
एअरबॅग नाही हे निगेटिव्ह. डिलरच्या मते शिकत असाल तर आणि आयटेन सारख्या कमी पावरच्या गाडीला नसेल तरी चालेल.
चांगली वाटतेय का?
सध्या गाडी शिकणे फेज आहे त्यामुळे वापरलेली किंवा स्वस्तच घ्यायची आहे.

ह्युन्दाई ईऑन बद्दल प्लिज कोणीतरी परीक्षण लिहा, आणि कुठले मॉडेल घ्यावे याबद्दलही मार्गदर्शन करा.

ह्युन्दाई ईऑन- मॅग्ना+, दोन महिन्यांपूर्वी घेतली. रिव्ह्यू लिहायचा विचार करतच होतो.
मायलेज उत्तम १८ पर्यंत. हँडलिंगला स्मूथ. एसी जोरदार. बूट स्पेस बर्‍यापैकी, कदाचित बीट्/स्पार्कपेक्षा कमी.
पॉवर विंडो फक्त पुढच्या. एबीएस नाही. स्टिरिओ इनबिल्ट, स्पीकर्स फक्त पुढे.
फ्रंट पॅनलला स्पेसचा वापर स्मार्ट आहे. इंटेरीअर डिसेंट.
८००सीसी इंजिन त्याप्रमाणात पॉवर, पिकअप इ.इ.
रेअर स्पेस ओके पण जास्त जाड पब्लिक असेल तर अडचण शक्य!
डिझाईन, लूक सुंदर; माझ्यामते या कॅटॅगरीत सर्वात सेक्सी!
निकाल- अल्टोपेक्षा १००% बेटर चॉईस!

ते राहिलच Wink ऑन रोड ४लाखापर्यंत जाते. तुम्ही मागचे स्पीकर्स, कोटींग इ.इ, केलेत तर अजून वर जाईल.
मॅग्नाच्यावर अ‍ॅस्टा मॉडेलपण आहे, १लाख अधिक.

१५ महिन्यां नंतर या महिन्यात मारुतीचे पहिले Paid Servicing केले. Basic खर्च ५,६००/- पर्यंत गेला. मारुती वाले Service Centre मधे येणार्‍या प्रत्येक ग्राहकाला CNG कीट (रु. ४७,०००/-) लावण्याची शिफारस करत होते. महिन्याला जर १०००+ गाडी पळत असेल तर वर्षाभरात कीटची किम्मत वसूल होऊ शकते. CNG फिटिंग मुळे मागची जागा जाणार... इंजिनच्या performance वर काही परिणाम होईल का? कृपया मार्गदर्शन करा.

मंजू CNG किंवा डिजेल गाडी घे.

सावलीजी,
सगळेच शिकाऊ ड्रायव्हर गाडी आपटवतातच असे नाही. तुम्ही चांगलीच चालवाल गाडी. काही होत नाही. फार झालं तर थोडे बंपर वाकडे, एकादा टेल लँप फोडणे (रिवर्स घेताना) इ. होते फक्त.
कोणतीही सेकंड गाडी अत्ता घेऊ, मग नंतर नवी घेऊ यात सेकंड जेव्हा थर्ड हँड म्हणून विकाल तेव्हा कितीला जाईल याचा विचार करा.
नवी गाडी आपटलीत, तरी पेंटींग डेंटींग चा १०-५ ह. खर्च इन्शुरन्स मधून होऊन जातो...

मी स्वतःच्या वापरासाठी सेकंडहँड गाडी घेण्याच्या विरोधात आहे. सेकंडहँड गाडी भाड्याने देणे वै. साठी घेणेच बरे.

बाकी i-10 व एकंदरच ह्युंदाईबद्दलचे ज्ञान मला नाही. Sad

इब्लिसजी धन्यवाद.
मला आपटण्यापेक्षा क्लचप्लेट्स वगैरे खराब होतात ( नीट न चालवण्यामुळे ) त्याबद्दल वाटतेय.
आधी नव्याच गाडीचा विचार करत होतो पण घरी सगळ्यांना पटत नाहीये. त्यामुळे सेकंड..

अहो,
काही खराब बिराब होत नाही.
हाफ क्लच चालवण्यासाठी ती गाडी काय जुनी डिझेल अँबी आहे का? अन जो विकतो आहे तुम्हाला, त्याची ऑलरेडी महिना १०००+ किमी. चाललेली गाडी आहे. त्या गाडीला डॅमेज नसेल का झालेले? मला तरी वाटते नवी घेतलेलीच बरी.. बघा बुवा.

अजून एक मुद्दा.
सेकंड गाडी घ्यायला loan कोण अन काय भावाने देणारे? की कॅशच घेणार आहात?

इब्लिसला अनुमोदन.

सावली... नियमीत वापरासाठी गाडी घ्यावयाची असेल तर सेकंडहॅंडचा विचार नका करू. सरावाने महिन्या भरात गाडी व्यवस्थीत हाताळता येऊ शकते.

क्लचप्लेट्स वगैरे खराब होतात >> नाही होत... शेवटी आपल्या गाडीची काळजी आपणच घेणार.

सावली.. मला i-10 बद्दल फारशी कल्पना नाही पण जर गाडी चांगल्या कंडीशनमध्ये असेल (एखाद्या ओळखीच्या मेकॅनिककडून चेक करून घेउ शकता), तुम्हाला आवडली असेल आणि तुमच्या बजेटमध्ये असेल तर घ्यायला काहीच हरकत नाही

एअरबॅग नाही हे निगेटिव्ह. डिलरच्या मते शिकत असाल तर आणि आयटेन सारख्या कमी पावरच्या गाडीला नसेल तरी चालेल. >> ही कारणं मात्र मला काही पटली नाहीत. i-10 कमी पॉवरची असली तरी समोरची गाडी (जर दुर्दैवानं काही झालंच तर) कमी पॉवरचीच असेल असं काही सांगता येत नाही... माझ्यासाठी तरी safety is always first.

पुण्यात सी एन जीला तासन तास नम्बर लावावे लागतात. एवढे करून ४-५ किलो गॅस मिळतो, त्यात १५० किमी ही गाडी जात नाही. काय फायदा सी एन जी चा?

सगळा बाफ वाचला ..
क्लच नसलेली कार घ्यायचा विचार आहे .क्लच ची गाडी चालवताना कधी बंद पडेल ,वेळेवर सुरु होणार नाही हे डोक्यात बसले आहे .
i10 auto कशी आहे ? आणि i20 मध्ये पण auto आहे का ?
nissan ची micra बद्दल पण जाणून घ्यायला आवडेल .

हा बाफ विसरूनच गेलेलो.

माझ्या इनोव्हा बद्दल सांगितलं होतं पूर्वी. गाडी घेताना टोयोटा करोला (आल्टिस) घ्यायचा मोह होत होता. पण इनोव्हा तांत्रिकदृष्ट्या सरस वाटत होती. शेवटी एकदाचा हिय्या करून इनोव्हा घेतली.

त्यानंतर कोकणात दर आठवड्याला जाऊन आलो. पंजाबच्या पाच ट्रीप्स झाल्या ( फक्त गुजरात हॉल्ट ) आणि खेड शिवापूर, कोल्हापूर, मुरबाड, मुंबईच्या अनेक ट्रीप्स झाल्या. पण केवळ इनोव्हामुळे थकून गेलंय असं कधी वाटलंच नाही. जबरदस्त आहे गाडी !!

गाडीच्या शेपवर गेलो असतो तर कदाचित फसलो असतो असं आता वाटतंय.

@ स्वराली.
डोक्यात बसलेले उभे करा, अन मग बाहेर हाकलून द्या.
क्लच नाही म्हणजे गाडीचे गियर आपोआप पडतात.
अ‍ॅव्हरेज मार खाते हो फारच.
अर्थात अ‍ॅव्हरेज, पेट्रोल, डिझेल, पैसे इ. प्रश्न नसतील तर बिन्धास्त घ्या Happy

Micra Automatic नाही आहे. सर्वात स्वस्त automatic Maruti A star other option i10,i20. All high end cars are available in Auto transmission.

मी पण बाफ विसरले होते.
तर पेट्रोल की डिझेल करता करता अखेर माझे कॅल्क्युलेशन कंपनीतल्या लोकांनी आणि अनेक तज्ञांनाही मान्यच होते त्यामुळे पेट्रोलवर शिक्कामोर्तब झाले.
अडीच महिन्यांपूर्वी टोयोटा लिवा घेतली. व्ही मॉडेल. हवे ते सगळे फिचर्स मिळाले, प्लस काही अ‍ॅक्सेसरीज. सर्व बोनसेस आणि डिस्काउंट वजा जाता पावणेसातला मिळाली. एक्सेंजमधे आधीची झेन काढून टाकली त्यामुळे आपण विका, त्याची कागदपत्रे अशी सगळी झिगझिग वाचली. तिचे ७५ आले.
लिवा गाडी बाकी उत्तम आहे. ड्रायव्हिंगसाठी एकदम स्टेबल. पाठीला कंफर्टेबल. मागच्या सीटवर ३ लोक कंफर्टेबली बसू शकतात. हॅच असूनही डिकीमधे भरपूर सामान मावते.
अडीच महिने झाले तरी अजून २००० किमी पण पूर्ण केले नाहीयेत हे बघता पेट्रोलचा डिसिजन योग्यच होता. असो

मी आजवर गाडी घेतलेली नाहीये आणि भविष्यातही घेणार नाही.
माझ्या मते...किमान मुंबईमध्ये तरी गाडी म्हणजे...असून अडचण नसून खोळंबा असा प्रकार आहे.
घ्यावी म्हणावी तर नन्नाचा पाढाच जास्त...अरूंद रस्ते,दिवसेंदिवस रस्त्यावर वाढणारी नवी वाहने, रस्त्यातले खड्डे की खड्ड्यातले रस्ते, पार्किंगची मारामार, पेट्रोल-डिझेलचे सतत वाढते भाव, मेंटेनन्सचा खर्च,स्वत:ला चालवता येत नसेल तर ड्रायव्हरचा पगार....अशी एक ना अनेक कारणं पुढे येतात आणि गाडी घेणे नको असंच वाटतं...
गाडी असावी असं वाटण्याचीही कारणं आहेत...काही बाबतीत ती खरंच अतिशय उपकारक अशीही आहेत....
तरीही मुंबईतल्या रहदारीत आपल्याकडून अजून भर घातली जाऊ नये म्हणून कोणतीच गाडी घेऊ नये असे माझे प्रांजळ मत आहे. Happy

पेट्रोलचे वाढलेले भाव पहाता आता डिझेल गाड्यांची मागणी नक्कीच वाढली असेल. आणि पेट्रोल गाड्या विकण्यासाठी कंपन्यांचे मार्केटींग प्रमोशन्सही......!

आपुण पण देव काकांबरोबर चालत नैतर आटोने सध्या. Happy उगीच आपलं कोपर्‍यावर सायकल लावून हा बाफं वाचायचा. मुंबईत नवी स्कूटर घ्यायची तर इथल्या पत्त्यावरची एल आय सी पॉलिसी लागते. ते काम अंतिम टप्प्यात आले आहे. पॉलिसी बाँड हातात आला कि इस्कूटर.

आटो कंपन्यांचे सेल्स जाम डाउन आहेत. गाडी घेताना जरूर बार्गेन करा. पैसे वाचवा. Happy

धन्यवाद इब्लिस !
डोक्यात बसलेल्या विचारांना हाकलून द्यायला आधी क्लच ची गाडी चालवायची practice करावी लागेल .
प्रमोद देव >> खरे आहे तुमचे ..traffic इतकी आहे ना कि रोज च्या वापरासाठी two wheeler बरी वाटते.
mandard >> धन्यवाद माहिती सांगितल्याबद्दल .

Pages